आजोबा......
डोंगराच्या पल्याड
चेटकीणीचा बंगला
घुबडाचा थोबडा
दरवाज्यावर टांगला
दारावरती वेताळ
अन् भिंतीवरती पाली
पायामध्ये घोटाळते
मांजर काळी काळी
चेटकिणीच्या घरात
सारे गौडबंगाल
न्हाण्यासाठी तपेली
पिण्यासाठी घंगाळ
बंगल्याच्या भोवताली
गोळ्या बिस्किटांचे मळे
त्याच्या मध्ये खोल खोल
साॅफ्ट ड्रिंकचे तळे
चंदेरी, मऊ मऊ,
चेटकिणीचे केस
घातला होता तिने
खवल्या मांजराचा ड्रेस
तीन तीन खविस
मालिश करत होते
लांबसडक केस
उन्हात वाळत होते
नाकाडी चेटकीण
हडकुळीच फार
रोज पकडून खायची
गोड, गोबरी पोरे चार
नातवंडे.........
आजोबा!!
गोष्ट तुमची झाली
आता खूप खूप जुनी
मोटू पतलू अन सिंघमची
आम्ही पोरं दिवानी
काळ्या काळ्या मांजराला
आता कुणी बी घाबरत नाय
टाॅमपेक्षा आमचा जेरीच
खूपच डांबरट हाय
काय पण आजोबा!!!!
काय बी 'फेकतात'
चॉकलेट, गोळ्या कुठे
झाडाला का लागतात?
फ्रुटी आणी साॅफ्ट ड्रिंक
माॅलमध्ये मिळतात
कशाला गुंडाळता आम्हाला..
त्या तर फॅक्टरीत बनतात
'ऑगी आणी झिंगुर'ची
जोडी जगात भारी
'हरी पुत्तर' करतो
झाडूवर सवारी
शुभंकरोती, पर्वचा कालबाह्य झाले त्याच्या जागी लिटिल कृष्णा, माय फ्रेण्ड गणेशा आले तोडले पोरांनी अकलेचे तारे अन् आजोबा चारी मुंड्या चीत झाले...
शुभंकरोती, पर्वचा कालबाह्य झाले त्याच्या जागी लिटिल कृष्णा, माय फ्रेण्ड गणेशा आले तोडले पोरांनी अकलेचे तारे अन् आजोबा चारी मुंड्या चीत झाले...
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
हा हा हा, एकदम खरे आहे.
एकदम वास्तववादी चित्रण
कालाय तस्मै नमः
कविता भारी आहे!!!
मनापासून आभार....
व्वा, खुपच छान.
छान. आपण नातवंडे आणि आताची
मळे अन तळे ...
एकदम मस्त कविता