Skip to main content

मन चांदण्याचे तळे

लेखक सुवर्णमयी यांनी गुरुवार, 06/03/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
मन अंधाराचा काठ मन चांदण्यांचे तळे मन आभाळ उंचसे मन धुळीची पावले मन आवर्त फिरते मन हळवे कोवळे मन एक सूर्यफूल त्याला सुखाचाच ध्यास किती सोसून झळांना होते शेवटी उदास मन बेट हे वेळूचे असे मोत्यांनी भरले परी मिटते नयन जसे फुलले फुलले मन सतारीची तार मन इवला तुषार मन कुणाला कळेना असा मोहक झंकार

वाचने 4723
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वाह! खुपच छान. मन सतारीची तार मन इवला तुषार मन कुणाला कळेना असा मोहक झंकार या ओळी विशेष आवडल्या. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

वा ! मस्त कविता ! (केशवसुमार हा तुम्हाला इशारा.. येऊ द्या... :-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट ,केशवसुमारांना कशाला इशारे करताय? आणि करून काही फरक पडेल का?:) मला तरी आठवत नाही की माझ्या (एका तरी)कवितेचे त्यांनी विडंबन केले आहे( मी हुश्! किंवा अरे रे असे काहीही म्हणत नाहीये) मी लिहिते ते त्यांच्या पसंतीला उतरले नसावे. :)

In reply to by सुवर्णमयी

उत्तम कविता.. मन चांदण्यांचे तळे हे खूप आवडले.. तुम्ही पुण्याच्या का हो.. नाही तुमच्या ह्या प्रतिसादाची नोंद घेतली आहे.. ;) (पुणेरी)केशवसुमार अवांतर.. मनोगतावर आपल्या वेळ झाली, शिष्ठाचार या कवितांची नोंद घेतली होती.. (स्मरणशील)केशवसुमार

बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय ची आठवण झाली. सुंदर.. मन सतारीची तार मन इवला तुषार मन कुणाला कळेना असा मोहक झंकार हे जास्ती आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु

मन आभाळ उंचसे मन धुळीची पावले मन आवर्त फिरते मन हळवे कोवळे अप्रतिम कविता!! आपला, (मनवेल्हाळ) तात्या.

कविवर्य ग्रेस यांची एक कवीता, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ ती सुधीर मोघे यांनी थोडी सोपी केली आहे. मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नांतिल पदर धुक्याचा हातास कसा लागावा आवडली.