Welcome to misalpav.com
लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आता ही काय नसती पीडा..!! हे राम. नीरा पिणे देखील अवघड झाले की. विषाणू इतका घातक आहे पण तुलनेत पसरत मात्र नाहीये ते बरे आहे. असे का होत असावे. म्हणजे नकोच पसरायला.. पण पुन्हा ते लॉक डाऊन वगैरे स्थिती येण्याची कितपत शक्यता या निपामुळे?

काळजीचे कारण नाही. काही दिवसांपूर्वीच तो केरळमध्ये मर्यादित स्वरूपात आला आणि परिस्थिती चांगल्यापैकी नियंत्रणात आहे. गणेशोत्सवा दरम्यान दक्षिणेकडील वृत्तमाध्यमांमध्ये त्या बातम्या सतत झळकत होत्या. हा आजार केरळमध्येच अधूनमधून का येतो यावर पत्रकारांचा थोडाफार काथ्याकूटही झाला होता. तिथल्या एका जिल्ह्यातील शाळा आठवडाभर बंद ठेवल्या होत्या. आपल्याकडे उत्सवी वातावरण असल्याने त्या काळात मी संयम ठेवून या विषयावर लिहिणे टाळले. आताचे लेखन फक्त एका संसर्गजन्य रोगाची नोंद / माहिती देणे इतक्याच हेतूने केलेले आहे.

२०१८ मध्ये निपा विषयी बातम्या यायच्या ते आठवलं.तुम्ही लिहिलेल्या रेबीज लेखाचा दुवा (लिंक)द्याल का?

रेबीज लेखाचा दुवा
नाही. अद्याप या आजारावर मी लेखन केलेले नाही. अन्य आरोग्य लेखांमध्ये ओझरता उल्लेख आलेला असावा.

आज किवा कालच्या पेपरमध्ये या विषाणु ची तुलना, कोविड्,सार्स्,ईबोला वगैरे शी केलेली आढळली. ती गुण साधर्म्यामुळे की संहारकतेमुळे? बाकी लेख नेहमीसारखाच माहितीपुर्ण आहे. शेवटचा फोटो आवडला :)

या विषाणुची तुलना, कोविड्,सार्स्, ईबोला
हे तिघेही आरएनए या जमातीचे आहेत तसेच ते फ्रुट बॅट या वटवाघळापासून मानवात येतात

निपा आणि झिका यांच्याबाबतीत असं वाचलं होतं, की हे विषाणूजन्य आजार जास्त संहारक असल्याने त्यांचा प्रसार मर्यादित राहतो. म्हणजे बाधित व्यक्ती जर लवकर मृत्यूमुखी पडली तर विषाणूला प्रसार व्हायला कमी संधी मिळते. जर विषाणू जास्त संहारक नसेल (समजा बाधितांमधील मृत्यूदर १०% हून कमी - उदा कोविड१९) तर विषाणूसंसर्ग झालेले जास्त लोक प्रसार करण्यासाठी उपलब्ध असतील आणि विषाणू जास्त पसरेल. म्हणजे संसर्ग जास्त लोकांना म्हणजे विषाणूची संहारकता (Mortality Rate) आणि प्रसारक्षमता हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात, असं काहीसं असतं का?

विषाणूची संहारकता (Mortality Rate) आणि प्रसारक्षमता हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात, असं काहीसं असतं का?
प्रश्न अतिशय चांगला आहे. वरवर पाहता त्या दोन गोष्टींचे प्रमाण व्यस्त असेल असे वाटते, पण हा मुद्दा इतका सोपा नसून गुंतागुंतीचा आहे ! एखाद्या आजाराची संसर्गक्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी काही प्रमुख पाहू : १. प्रसारगती : इथे त्या आजाराचा बेसिक रिप्रोडक्शन नंबर (RO) पाहावा लागतो. म्हणजे, एक बाधित व्यक्ती तो आजार किती निरोगी लोकांना पसरवू शकते? २. संसर्गची तीव्रता (contagiousness) : म्हणजे, बाधिताच्या निव्वळ जवळ उभे राहिले असता प्रसार होऊ शकतो, की बाधित वारंवार जोरात शिंकल्यास/ खोकल्यास मगच प्रसार होऊ शकतो?.. इत्यादी ३. लक्षणविरहित किंवा लक्षणपूर्व बाधित लोक त्या रोगाचा प्रसार करू शकतात किंवा नाही? जो आजार पुरेसा गंभीर झाल्यावरच लक्षात येतो ( किंवा पसरू शकतो) त्याच्या बाबतीत रोग्याचे विलगीकरण करणेही सोपे जाते. ४. एखाद्या रोगाची अस्तित्वात असलेली समाज-प्रतिकारशक्ती : म्हणजे, पूर्वी त्याचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले आहे किंवा नाही... इत्यादी इत्यादी सारांश : Not all serious infectious diseases spread less.

निपा हा एक क्षुल्लक विषाणू आहे. खरोखर भयानक घातक मिपा नावाचा विषाणू आहे. त्याने एकदा दंश केला की माणूस मरेपर्यंत त्याच्या आधीन राहतो. औषध वगैरे विसरावे लागते. - नाठाळ नठ्या