Welcome to misalpav.com
लेखक: Bhakti | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

इंग्रजी लेखाचं मराठीत भाषांतर केलंय गूगल वरून? आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी

इंग्रजी लेखाचं मराठीत भाषांतर केलंय गूगल वरून? आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी

नाही दोन तीन पेपर वापरून लिहिली आहे.तेवढा परिच्छेद गुगल ट्रान्सलेट केला आहे.तो संपादन करायचा राहिला. स्वामिनाथन - ज्यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले होते - यांना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) मध्ये बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी. पिकांवर होणारा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि त्यांना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले. संपादकांना विनंती आहे वरील परिच्छेद खाली दिल्याप्रमाणे संपादित करावा. स्वामिनाथन यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये संशोधनाचे विशेष प्राविण्य प्राप्त केले होते . त्यांना बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती . बटाटा पिकांवर होणारा अजैविक घटकांचा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि नवीन बटाटा प्रजातींना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले.

हे ठीक. पण पंजाबातील 'हरीत क्रांतीचे जनक' याबद्दल हवे आहे. आता तिकडे ओरड आहे म्हणतात. ठराविक काळानंतर रासायनिक खते,बायो टेक तंत्रज्ञान सूस्त पडते. (जसे अँटिबायोटिकस अतिवापरानंतर अकार्यक्षम होतात तसे)

Evolution is key to survival! कीटक ,व्हायरस जे जैविक घटक आहेत ते स्वतः मध्ये बदल घडवून परत पिकावर जोमाने हल्ला करतात. डास पूर्वी DDT ने मरायचे आता DDT त खुशाल लोळतात :) गुड नाईटही काही मरत नाही. इलेक्ट्रिक bat वापरावी लागते. सर्दीचे व्हायरस पण हुशार असतात,लवकर अडाप्ट होतात. अवांतर -एक गंमत सांगते मी असं वाचलंय की खुद्द माणस किंचित उत्क्रांत झालाय.आताशी survival फेजमधून बाहेर पडून त्यांच्या मेंदूचा काहीसा भाग उत्क्रांत झालाय. जेवढा सिंपल तेवढा लवकर उत्क्रांत जेवढा कोम्प्लेक्स तेवढा उशीर उत्क्रांत होतो. पण इथे अजैविक घटक रेझिस्टंट प्रजाती त्यांनी तयार केल्या आहेत.

ही आपल्या देशाच्या मागासलेपणाची प्रमुख समस्या आहे. समाजाला पुढारी, प्रशासकीय अधिकारी, कलावंत, खेळाडू यांच्यासारखं व्हावं असं वाटणं हे त्यातून मिळणारे पैसे आणि प्रतिष्ठा यापायी हे होत असावं. स्वामीनाथन यांच्या कर्तृत्वाचा सी. सुब्रमण्यम या पुढाऱ्यांचा पाठींबा होता. परंतू हरीत क्रांतीचं श्रेय म्हणून भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तो सी. सुब्रमण्यम यांना. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांची यादी पाहिली की अजूनही विज्ञान, तंत्रज्ञान, मानव कल्याण यांच्यासाठी काम करणारे फारच कमी व्यक्ती आहेत. स्वामीनाथन आणि वर्गिस कुरीयन यांनाही हे पुरस्कार मिळणं गरजेचं आहे.

https://pro.bookstruck.app/nonrmn-borlong-bhaartiiy-tsec-vaishvik-hritkraantiitiice-jnk/ स्वामिनाथन ह्यांचे योगदान महत्वाचे असले तरी हरित क्रांती ज्यामुळे शक्य झाली त्यासाठी अमेरिकन नॉर्मन बोरलॉग (मूळ नॉरवे वंशाचे) ह्यांचे खूप मोठे योगदान आहे. बोरलॉग ह्यांनी भर भारत पाकिस्तान युद्धांच्या काळांत दोन्ही देशांत काम करून हरित क्रांती घडवून आणली. स्वामिनाथन सारखे भारतीय अधिकारी कर्तव्यनिष्ठ होते म्हणून हे शक्य झाले. बोरलॉग ह्यांना त्यांच्या कामासाठी नोबेल सुद्धा मिळाले. बोरलॉग ह्यांनी भारत पाकिस्तान शिवाय मेक्सिको इत्यादी देशांत सुद्धा काम केले.

वडील सर्जन एम के स्वामिनाथन आणि आई पार्वती सांबशिवन गृहिणी होती हे घडले नसते तर तो पोलिस अधिकारी झाला असता. ही वाक्ये देखील खटकतात. व्याकरणदृष्ट्या

नक्कीच खुप चुका आहेत. लवकरात लवकर इतरही भाग लिहिता येईल असे वाटलं होतं पण वेळेअभावी जमलं नाही. दुसरा भाग कागदावर लिहिला आहे , अजून काही भाग होतील.तेव्हा ह्या पहिल्या भागावरपुन्हा संस्कार करून परत प्रकाशित करेन.