Welcome to misalpav.com
लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं. गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.

अ.बा. आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद 🙏
"पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना"
तितकं सोपं नाहीये हो ते... तथाकथित 'मानवाधिकार' संघटना, संयुक्त राष्ट्रसंघ, अरब लीग आणि संपूर्ण इस्लामिक जगत असे अनेक अडथळे आहेत त्यात. इस्रायल संरक्षणात्मकदृष्ट्या कितीही ताकदवान असला आणि त्याच्या बलाढ्य पाश्चिमात्य देशांचा त्याला कितीही पाठिंबा असला तरी त्या देशाची भौगोलिक स्थिती पहाता सर्व बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी घेरलेल्या इस्रायलच्या सर्व शत्रुंनी एकजुटीने त्याच्यावर चहूबाजूंनी आक्रमण केल्यास त्यापुढे इस्त्रायल फारकाळ टिकाव नाही धरू शकणार. पॅलेस्टाईनची राखरांगोळी करणे हा खरंच त्यांच्यासाठी पोरखेळ असला तरी त्याच्या परिणामी इस्रायल पण जगाच्या नकाशावरून गायब होईल हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे.
"मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं."
सौदी अरेबिया आणि यु.ए.ई. शी अगदी मैत्रीपूर्ण झाले नसले तरी थोडेफार का होइना पण बऱ्यापैकी व्यापारी-धोरणात्मक संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली असताना इस्त्रायल असला मूर्खपणा करण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यात आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताविषयी तो देश किती संवेदनशील आहे हे देखील सर्वश्रुत आहे!
"गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी."
८ ऑक्टोबरला इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी लष्कराकडून गाझा पट्टीचे 'निर्जन बेटात' रूपांतर केले जाण्यापूर्वी तिथल्या सुमारे २३ लाख नागरिकांना तिथून निघून जाण्याचा इशारा दिला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे कि २००७ पासून इस्त्रायलने गाझा पट्टीची 'जमिन, हवाई आणि समुद्र' अशा सर्वबाजूंनी अशी काही नाकेबंदी केली आहे कि त्यांना तिथून बाहेर पाडण्यासाठी मार्गच ठेवला नाहीये. खालची दोन चित्रे पाहून ह्या नाकाबंदीची बऱ्यापैकी कल्पना येईल. gaza barrier Gaza Strip Blockade गाझा पट्टीच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील इस्रायलच्या सीमेवर 'गाझा-इस्राएल बॅरिअर' हि तटबंदी आहे आणि पश्चिमेकडील बाजूला भूमध्य समुद्र आहे आणि त्या समुद्रावर आणि गाझा पट्टीच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण आहे. नाही म्हणायला गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील बाजूला इजिप्तने आपल्या आणि गाझा पट्टीच्या सीमेवर बांधलेल्या कुंपणातून ते इजिप्त मध्ये प्रवेश करू शकतात पण त्यासाठी इजिप्तने ह्या निर्वासितांच्या लोंढ्यांसाठी कुंपणाचा दरवाजा उघडला पाहिजे. गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या ह्या चक्रम पॅलेस्टिनी रहिवास्यांना आपल्या देशात प्रवेश देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा गाढवपणा इजिप्त करेल असे वाटत नसल्याने तसे होण्याची शक्यता कमीच आहे.

गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या ह्या चक्रम पॅलेस्टिनी रहिवास्यांना आपल्या देशात प्रवेश देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा गाढवपणा इजिप्त करेल असे वाटत नसल्याने तसे होण्याची शक्यता कमीच आहे.
गाझा पट्टीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना तिथुन बाहेर पडण्यासाठी इजिप्तच्या सीमेवरील 'राफा क्रॉसींग पॉईंट' खुला करण्यावर इजिप्त, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये एकमत झाले आहे, ह्या वाटाघाटीमध्ये कतारचाही सहभाग होता. परंतु गाझा पट्टीतुन बाहेर पडण्यास उत्सुक असलेल्या पॅलेस्टीनी लोकांसाठी हा दरवाजा उघडण्याची संयुक्त राष्ट्र संघाची विनंती इजिप्तने फेटाळुन लावली आहे. हे अपेक्षीतच असले तरी हे युद्ध चिघळत गेल्यास पुढे वाढत जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे इजिप्त सरकार झुकते कि आपल्या नागरीकांची सुरक्षितता जपण्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम रहाते हे बघणे रोचक ठरेल! Rahfah Crossing Point गाझा पट्टीची आणि इस्त्रायलची सीमा इजिप्तच्या सिनाई प्रांताला (द्वीपकल्पाला) लागुन आहेत. १९६७ च्या युद्धात (सिक्स डे वॉर) इजिप्तचा पराभव झाल्यावर हा प्रदेश इस्त्रायलच्या ताब्यात गेला होता. इस्रायलव्याप्त सिनाईमध्ये इस्रायलने सुमारे १८ नागरी वसाहती, दोन वायुदलाचे तळ आणि एक नौदलाचा तळ स्थापन केला होता. इजिप्तसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या सुवेझ कालव्याचा पश्चिम किनारा इस्रायलव्याप्त सिनाई प्रदेशात असल्याने युद्धात झालेल्या पराभवापेक्षाही हा प्रदेश गमवावा लागणे इजिप्तच्या जिव्हारी लागले होते. शेवटी इजिप्तने इस्त्रायलला 'सर्वभौम राष्ट्र' म्हणुन मान्यता देण्याच्या अटीवर इजिप्त आणि इस्त्रायलमध्ये १९७९ साली शांतता करार झाल्यावर इस्त्रायलने टप्प्या टप्प्याने आपल्या ज्युईश वसाहती बंद करत १९८२ साली सिनाईमधुन संपुर्ण माघार घेत हा प्रदेश पुन्हा इजिप्तच्या हवाली केला. आज पाकव्याप्त काश्मिर परत मिळवणे हा विषय भारतीयांसाठी जितका जिव्हाळ्याचा आहे, तशाच किंबहुना त्यापेक्षाही तीव्र भावना सिनाईच्या बाबतीत त्याकाळी इजिप्शियन लोकांच्या होत्या आणि ह्या लोकभावनेला प्राधान्य देत, समस्त इस्लामिक जगताच्या रोषाची पर्वा न करता २६ मार्च १९७९ रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत, इस्त्रायलचे पंतप्रधान मनाहेम बिगिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जिमि कार्टर अशा तत्कालीन नेत्यांनी ह्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इजिप्तचा बहुतांश भाग हा उत्तर आफ्रिकेत आहे पण तांबड्या समुद्रातील सिनाई द्वीपकल्प मात्र आशिया खंडात येतो. इस्त्रायलकडुन हा प्रदेश परत मिळाला असला तरी इजिप्तसाठी अद्याप ते एक अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. जवळपास १२-१५ वर्षे इस्त्रायलच्या अधिपत्याखाली अनिच्छेने रहावे लागल्यामुळे आणि गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या लोकांबरोबर जवळीक निर्माण झाल्या कारणाने तिथल्या सिनाई स्थानिक इजिप्शियन लोकांच्या विचारसरणीत अमुलाग्र बदल झाला. इस्त्रायलने आपल्या सीमेवर कडेकोट तटबंदी उभारुन गाझा पट्टीला अपल्यापासुन वेगळे ठेवले असले तरी ह्या सिनाई प्रांतातुन गाझा पट्टीत जमिनीखाली बोगदे / भुयारे खणुन त्यातुन इराण आणि अन्य पॅलेस्टाईन समर्थक देशांकडुन गाझा पट्टीतील दहशतवाद्यांसाठी तस्करी करुन इजिप्तमध्ये आणलेली शस्त्रास्त्रे आणि पैसा त्यांच्यापर्यंत पोचवला जातो, आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांशी निर्माण झालेल्या बंधुभावापोटी ह्या 'धर्मकार्यासाठी' सिनाईतले बदललेल्या मानसिकतेचे स्थानिक इजिप्शियन लोकं संपुर्ण मदत करतात. आपल्या भुमीतुन गाझा पट्टीत होणारी ही तस्करी आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांची ये-जा रोखण्यासाठी इजिप्तकडुन प्रामाणिकपणे प्रयत्न सुरु असतात (हे इस्त्रायलसुद्धा मान्य करतो आणि अनेक प्रसंगी हे प्रयत्न ते परस्पर सहकार्याने किंवा संयुक्तपणेही करतात). पण पोलीसांकडुन आणि सुरक्षा दलांकडुन सातत्याने तिथे होणाऱ्या छापेमारीच्या घटना आणि चकमकींच्या परिणामी रस्तेमार्गे प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाल्याने सिनाई द्वीपकल्पाच्या दक्षीणेला असलेल्या 'शर्म अल शेख' ह्या जगभरातील आणि विषेशतः युरोपियन पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या नितांत सुंदर पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या तिनेक दशकांत प्रचंड घट झाल्याने तिथल्या पर्यटनातुन इजिप्तला मिळणारे उत्पन्नही लक्षणीय प्रमाणात घटले. आजही तिथे युरोपियन पर्यटक आवर्जुन जातात पण रस्तेमार्गे जाणे सुरक्षीत नसल्याने विमानप्रवासाचा एकमेव पर्याय उप्लब्ध आहे. अर्थात गेल्या दिडेक दशकात 'हुरघाडा' हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावरील शर्म अल शेखच्या तोडीस तोड असे पर्यटनस्थळ चांगले विकसित आणि लोकप्रिय झाल्याने ह्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई होत आहे आणि सुरक्षेच्या कारणासाठीच माझ्या इजिप्त सफरीत 'शर्म अल शेख' ऐवजी मी 'हुरघाडा'ची निवड केली होती. तसेच त्या सफरीवर सव्वा पाच वर्षांपुर्वी लिहिलेल्या मालिकेच्या पहिल्या भागावर एका मिपा सदस्याने विचारलेल्या इजिप्तमधील सुरक्षेविषयक प्रश्नाला उत्तर देताना त्या प्रतिसादात मी ह्या सिनाई प्रांताचा त्रोटक उल्लेख केला होता. खरंतर वरीलपैकी काही माहिती त्या प्रतिसादात द्यावी असाही विचार त्यावेळी डोक्यात आला होता पण ती अस्थानी ठरेल असे वाटल्याने केवळ सिनाईची काश्मिरसोबत तुलना करुन एका वाक्यात उत्तर देउन आवरते घेतले होते 😀

छान माहीतीपुर्ण प्रतिसाद. इस्रायलने गाझाच्या तीन बाजू आवळल्या आहेत. चौथी बाजूजी इजिप्तच्या बाजूने ऊघडीय तिथे हमासकडून शस्त्रात्रे आयात केली जातात. ही चौथी बाजू इस्रायलने ताब्यात घेऊन हमासच्या नी गाझाच्या चारही बाजूने मूसक्या आवळाव्यात. हळूहळू गाझाची गावेच्या गावे ताब्याच घ्यावीत, गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी. नी गाझा स्वराज्यात (इस्रायलच्या) सामील करावे. सततच्या हल्लांपासूनहा मूक्ती मिळेल नी युध्दावरील खर्चही वाचेल. ह्यावेळेस तशी संधी आलीच आहे. अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत घेऊन गाझा नावाचा काटा कायमचा संपवावा.

गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी.
मग कोणत्या तोंडाने होलोकॉस्टच्या नावाने गळे काढुन जगाची सहानुभुती मिळवणार??

जगाची सहानूभूती घेऊन जगायला ज्यू काही लेचेपेचे नाहीत. जर एकही ज्यू गाझांच्या लोकांमूळे मरत असेल तर ज्यूंना पुर्ण अधिकार आहे गाझा संपवायचा.

श्री श्री श्री Trump महोदय... धाग्यावरील तुमचे सर्व प्रतिसाद वाचले आणि तुम्हाला ते विध्वत्तापुर्ण वगैरे वाटत असले तरी ते अत्यंत भंपक असुन हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे असा त्यांचा प्रवास होत चालला आहे असे खेदाने नमुद करतो. तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही आणि तुमचे वैचारीक स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा कोणाला अधिकारही नाही! पण समाज माध्य्मांवर आपले विचार व्यक्त करताना लेखकाने किमान आपण कशाचे आणि कुठ्ल्या पातळीवर जाउन समर्थन करत आहोत ह्याचे तारतम्य बाळगावे इतकी माफक अपेक्षा ठेवण्याचा अधिकार त्या माध्यमाचे वापरकर्ते म्हणुन आम्हाला आहे, आणि हे तुम्हालाही अमान्य नसावे. इत्यलम.

श्री टर्मीनेटर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही
बर्याच देशात पुराव्याशिवाय कोणावरही हिटलर / नाझीं समर्थकाचा आरोप लावणे हा मोठा अपराध आहे. त्यामुळे जरा जपुन. उगाच आक्रसताळेपणाने आरोप करुन काहीच सिद्ध होत नाही. मला श्री हिटलर यांच्याबद्दल ना तर प्रेम आणि ना तिरस्कार आहे. तसेच मला ज्युंबद्दल ना प्रेम आहे ना द्वेष. माझी भुमिका तटस्थ आहे. श्री हिटलर यांच्यामुळे भारताचे किंवा हिंदु समाजाचे कोणतेही नुकसान झाल्याचे मला माहिती नाही. (तुम्हाला माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी.) दुसरे महायुध्दात अगोर्‍याचा फायदाच झाला आहे. त्यामुळे उगाच गोरे सांगतात म्हणुन अगोर्यांनी प्रचारतंत्रात यायची गरज नाही. अजुन तरी भारतीय कायद्यानुसार प्रत्येकाने श्री हिटलर यांचा द्वेष करावा, किंवा सत्य उजेडात आणु नये असा कायदा आला नाही. -
तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही आणि तुमचे वैचारीक स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा कोणाला अधिकारही नाही!
धन्यवाद -- आता तुमचे प्रतिसादाबद्दल बोलुया. श्री अमरेंद्र बाहुबली गाझामध्ये सरळ सरळ नरसंहार करावा असे सुचवत आहेत. ("गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी." याचा अर्थ न समजण्यासारखे तुम्ही दुधखुळे, ना मी आहे.) त्याचा तुम्ही निषेध/विरोध न करता अप्रत्यक्ष सहमती दाखवुन ते कसे शक्य नाही ते उपप्रतिसादामधुन दाखवत आहात. गाझामधील बहुसंख्य लोक जेहादी कसे आणि सुक्याबरोबर ओलेही करे जळणार ते तुम्हाला मान्य आहे. म्हणजे थोड्क्यात ज्युंचा नरसहांर झाला, त्याचा तुम्हाला त्रास आहे पण इतरांचा चालतो आहे; ह्या दुटप्पीपणाला/दाभिंकपणाला काय म्हणणार ? तुम्हाला जर माझ्या "हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे " मुद्द्यांचा प्रतिवाद करणे जमत नसेल तर श्री नेत्यान्याहु यांच्या मुद्द्याचा करा. मग बघुया. कधी वेळ भेटला तर जनरल पॅटन युध्दानंतर काय म्हटला ते वाचा, पश्चिम जर्मनीच्या नेतेमंडळीत, अधिकारी वर्गात, गुप्तहेरसंस्थेत कोण होते याची माहिती मिळवा.

आता तुमचे प्रतिसादाबद्दल बोलुया. श्री अमरेंद्र बाहुबली गाझामध्ये सरळ सरळ नरसंहार करावा असे सुचवत आहेत. ("गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी." याचा अर्थ न समजण्यासारखे तुम्ही दुधखुळे, ना मी आहे.) त्याचा तुम्ही निषेध/विरोध न करता अप्रत्यक्ष सहमती दाखवुन ते कसे शक्य नाही ते उपप्रतिसादामधुन दाखवत आहात. गाझामधील बहुसंख्य लोक जेहादी कसे आणि सुक्याबरोबर ओलेही करे जळणार ते तुम्हाला मान्य आहे. म्हणजे थोड्क्यात ज्युंचा नरसहांर झाला, त्याचा तुम्हाला त्रास आहे पण इतरांचा चालतो आहे; ह्या दुटप्पीपणाला/दाभिंकपणाला काय म्हणणार ?

अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत घेऊन गाझा नावाचा काटा कायमचा संपवावा.
रशीया सध्या स्वतःच युक्रेन युद्धात गुंतलेला आहे आणि मला वाटतं काल कि परवा आता युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवणे शक्य नसल्याचे सांगत अमेरिकेने आपला मदतीचा सगळा ओघ इस्त्रायलकडे वळवला आहे, हि गोष्ट पुतिन ह्यांच्या पथ्यावर पडणारी असल्याने ते आता ह्या संधीचा फायदा घेउन इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाकडे विषेश लक्ष न देता लवकरात लवकर युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही. आताच्या युद्धात गाझा पट्टीचे जे व्हायचे ते होइलच, तसेही आज तिथले बहुसंख्य लोकं जिहादी मनसिकतेचे आहेत त्यामुळे भरपुर प्रमाणात असलेल्या सुक्या बरोबर थोडे ओलेही जळणे अपरिहार्य आहे, पण युक्रेनच्या फाजिल आत्मविश्वास बाळगणाऱ्या विदुषकाने मात्र नको त्या लोकांच्या नादी लागुन जवळपास गेले पावणेदोन वर्षे सुरु असलेल्या युद्धामुळे तिथल्या लाखो निरपराध नागरिकांचे आयुष्य धोक्यात तर घातले आहेच पण देशालाही कितीतरी वर्षे मागे नेउन ठेवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही. मला वाटतंय युक्रेनचा बाजार ऊठवणं रशीयाला कठीण नाही. त्यांनी मुद्दाम प्रश्न चिघळत ठेवलाय. बाकी ऊत्तर गाझा रिकामं करायला सांगीतलंय इस्रायलने. जितके हल्ले होतील त्याच्या बदल्यात मोठी जमीन इस्राईलने लाटत जावा तेव्हाच हे हमासी अतिरेकी सरळ होतील.

गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी. गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे त्याचिच पुरवणी म्हणजे काश्मीर खोऱ्यातील ६० लाख मुसलमान मारून टाकून काश्मीर खोरे शुद्ध करून टाकावे असे आपले म्हणणे आहे का? किंवा मणिपूर मधील ८ लाख कुकी लोकांना मारून टाकून मणिपूर चा प्रश्न कायमचा सोडवून टाकावा काय? न रहेगा बांस न बजेगी बांसुरी

गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे सर आपण नीट वाचत नाहीत. आपल्या सोयीने हवं तेवढं वाक्य गाळून वाचलंय का?? पुन्हा वाचा पाहू.

गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे सर हे वाक्य आपण कुठून ऊचलले ते माहीत नाही असो. तरीही ऊत्तर देतो. हमास ही गाझापट्टीतील संस्था आहे ना तिथल्याच लोकांनी तीच्या राजकीय भूमीकेला पाठिंबा देऊन निवडूण दिलंय. म्हणजे गाझाचे लोक बिच्चारे वगैरे नाहीत. दुसरी गोष्ट इस्रायलने का म्हणून सतत गाझाच्या हल्ल्याच्या भितीने जगत कहावे नी लाखो रूपये खर्च करावेत? गाझात माणसे राहतात तर इस्राईलात जनावरे राहतात का? कि इस्राइलच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही?? जर गाझाच्या हल्ल्यात एकही इस्रायली मरत असेल तर इस्रायल ने संपुर्ण गाझापट्टी बेतिराख करावी. स्वतच्या नागरीकांची सुरक्षीतता महत्वाची. आता कश्मीर बद्दल, कश्मीर हा भारचाचा भाग आहे. कश्मीरातील मुस्लिमही भारतीय आहेत. ते आंगोलनं करतात राॅकेट वगैरे डागत नाहीत. पण हो सिमेपलिकडून पाकिस्तानातून होणार्या हल्ल्यात जर एकही भारतीय मरत असेल तर भारताला ही अधीकार आहे संपुर्ण पाकिस्तान बेचिराख करायचा.

४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं. गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.

दुसरे लेख मागे पडणार (कोकण,गोवा,हिंग-वगैरे,नाईन-इलेवन.) आणि आगामी नेपाळ सुद्धा. इकडे काय होणार? भारतातातली चाळीस टक्के जनता हमासच्या बाजूने आहे म्हणे. बॉलिवूड कलाकार निम्मे निम्मे. निवडणुकीला हा मुद्दा होणार. (मला वाटते).

कंकाका आणि राघव, प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏
दुसरे लेख मागे पडणार
हो, तसं होणार आहे खरं 😀 पण हा ताजा विषय मला जास्त महत्वाचा वाटल्याने त्याला आधी हात घातला!
भारतातातली चाळीस टक्के जनता हमासच्या बाजूने आहे म्हणे.
असु शकेल! बाकिच्यांबद्दल काय बोलणार? खुद्द मी पण साधारणपणे दिडेक दशकापुर्वी पर्यंत पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमास सारख्या दह्शतवादी संघटनेचा सहानुभुतीदार होतो, अज्ञानीच होतो म्हणा ना 😀 अर्थात त्या अज्ञानामागे आपल्याकडील माध्यमांतुन चालवला जाणारा इस्त्रायल विरोधी 'इस्लामिक' आणि 'डाव्यांचा' प्रोपगंडा कारणीभुत होता. पण पुढे आंतरजालाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या संघर्षाची दुसरी बाजु समजु लागली, तसेच विविध देशांमध्ये भेटलेल्या मध्यपुर्वेच्या नागरिकांकडुन समजत गेलेली वस्तुस्थिती आणि उत्तरोत्तर विस्तारत गेलेल्या अनुभवविश्वातुन विचार आणि दृष्टिकोन बदलत गेले. असो, आज ना उद्या जास्तीत जास्त जनतेला सत्यपरिस्थितीची जाणीव झाल्यावर हे प्रमाणही ४० टक्यांवरुन कमी होउन १८ ते २० टक्यांवर येइल अशी अपेक्षा करुयात, अजुन काय!

भारतातले तथाकथीत पुरोगामी जर भारत चीन किंवा भारत पाक युद्ध झाले तर कोणाच्या बाजूने बोलतील हे त्यांच्या वर्तनावरून सांगणे कठीण आहे. त्याना अजूनही गंगाजमुनी तेहजीब चे उमाळे येत असतात. अमयु तील त्या लोकाना हमास ने केलेले वर्तन दिसले नाही मात्र इस्राईलचा सम्हार दिसला

भारतातले पुरोगामी देशप्रेमी आहेत म्हणूनच ते गेल्या २००-२५० वर्षांपासून सनातनींशी लढताहेत. सर्व सुधारणा पुरोगामींनाच करवून घेतल्या त्यामुळेच देश आज इतका प्रगत आहे. पुरोगामी वसतो तर देश आज हिंदू तालिबान असता. त्यामुळे पुरोगामींचं देशप्रेम वादातीत आहे. बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात. ह्या देशात अब्दुल कलाम, अब्दुल हमीद, दलवाई वगैरे लोक झाले हे विसरू नका. त्यामुळे देशप्रेमी पुरोगाम्यांबद्दल नेहमीच वाईट लिहीणे बंदं करावे अशी विनंती करून खाली बसतो. लिहीता आलं तर सनातनी प्रतिगाम्यांबद्दलही लिहीत चला.

सरसकट मुस्लिम द्वेष करीत नाहीत हे पुरोगम्यांच फारच साधं वैशिष्ठ्य आहे. मुळात देशप्रेम ही बोलण्याची गोष्ट नसते तर चांगलं सहजीवन जगण्याच्या कल्पनेशी एकरूप झालेली गोष्ट असते. कोणताही देशप्रेमी उन्मादी वृत्तीने संस्कृतीचे गोडवे गाणार नाही. दुष्काळ येत्या काही दिवसातच आपलं विक्राळ रूप दाखविणार आहे पण त्याकडे डोळेझाक करून वाघनखं काही दिवस महाराष्ट्रात आणणं याला कोणी देशप्रेम म्हणणार नाही. अप्रिय, वेदनादायक भूतकाळ मागे टाकून अनेक देशांनी अगदी कालच्या शत्रूच्या सहाय्याने प्रगती केलेली दिसेल. आणि हेच कदाचित सुसंस्कृत समाजाचं वैशिष्ठ्य असू शकते.

देशप्रेमी उन्मादी वृत्ती
मला हा वक्प्रचार फार आवडतो =)))) ह्या निमित्ताने सर्जिकल स्ट्राईक वर आधारित उरी ह्या चित्रपटातील गीत आठवले . तो चित्रपट आलेला तेव्हाही लोकांनी त्याला " राष्ट्रभक्तीचे हिडीस प्रदर्शन" असे म्हणले होते ते स्मरते !! https://www.youtube.com/watch?v=g62J-8nV5FI

. बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात.
एका बाजुला गाझा पट्टी पुर्ण संपवावी म्हणत आहात, दुसरीकडे "बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात." म्हणत आहात. कोणती तरी एकच गल्ली पकडा.

गाझा पट्टी संपवावी कारण त्या बाजूने इस्राईलवर भरमसाठ हल्ले होताहेत नी लोक मरताहेत. गाझापट्टीत मुसलमान आहेत म्हणून संपवावी असं मी कुठेही म्हटलेलं नाही. गाझा पट्टीतील लोक कुणीही xyz (खरंतर yz) असो. त्यांना इस्रायली लोक मारायचा काहीही अधिकार नाही नी जर एक जरी इस्रायली मरत असेल तर अख्खं गाझा बेचिराख करावं असं मी पुन्हा सांगतो. बायदवे, आपलं म्हणणं तरी काय आहे गाझात मुस्लिम राहतात म्हणून त्यांच्यावर हल्ले करू नये नी त्यांनी केलेले हल्ले इस्राइलने सहण करावेत? कारण काय तर तुमच्या सारख्या मानवतावाद्यांची मने दुखावू नयेत म्हणून?

भारतातले तथाकथीत पुरोगामी जर भारत चीन किंवा भारत पाक युद्ध झाले तर कोणाच्या बाजूने बोलतील हे त्यांच्या वर्तनावरून सांगणे कठीण आहे.
त्याचं उत्तर तसं सोपं आहे! हे लोकं पहिले ज्याने कोणी युद्ध छेडले असेल त्याचा नावापुरता निषेध करतील आणि मग भारताची भूमिका कशी चुकीची होती किंवा आहे ह्यावर तत्वज्ञान झाडत बसतील. अर्थात ह्याबाबतीत जास्ती बोलणे एका गोष्टीसाठी उचित होणार नाही कारण मिपावर राजकीय चर्चाना मनाई आहे... अन्यथा विद्यमान सरकारच्या आधीच्या भूमिकेविषयी समाधानी असलो तरी (कालांतराने वाजवलेल्या) डबल ढोलकीवर पण भाष्य केले असते.. असो... सगळ्यांचे पाय मातीचे, अजून काय? थोडक्यात सांगायचे तर भारताचे पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल विषयक धोरण पूर्वी अत्यंत घाणेरडे राहिले आहे असे माझे वैयक्तिक मत, काहींना ते योग्य वाटत असल्याचे त्यांनी खाली प्रतिसादात म्हंटले आहे, त्या प्रतिसादापर्यंत पोचलो की माझे मत मांडतोच!

वाखूसा आपले केंद्र सरकार, इस्रायलच्या पाठीशी आहेत काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत ----- इस्रायल मधील विरोधी पक्ष, त्यांच्या केंद्र सरकारला संपूर्ण पाठिंबा देत आहेत राष्ट्र भक्ती, म्हणजे नेमके काय? ह्याचे उत्तम उदाहरण, इस्रायल जनता नेहमीच दाखवून देते , मग ते व्योम कप्पुर युद्ध असो किंवा म्युनिक हत्याकांड असो

"आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा - Marathi News | Israel-Palestine: First Condemnation of Attack on Israel, Now Congress Supports Palestine | Latest national News at Lokmat.com" https://www.lokmat.com/national/israel-palestine-first-condemnation-of-attack-on-israel-now-congress-supports-palestine-a-a732/amp/ https://mpcnews.in/congresss-support-for-hamas-remains-decision-against-pm-modis-stance-378999/ https://www.mahamtb.com/Encyc/2023/10/9/Congress-extends-support-for-Palestinians.html

"मिपावर राजकीय चर्चांना अद्याप बंदी आहे!"
मुविकाका आणि अ.बा. धागाविषय आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधीत असल्याने कृपया प्रतिसादांत देशी राजकारण (काँगेस, भाजप, गांधी, मोदी वगैरे) आणू नये हि नम्र विनंती 🙏

इस्राईलवरील हल्ल्याचा निषेध ही केलाय हे सोयास्कररीत्या लिहीलंलं नाहीये मुवीकाका आपण वरील प्रतिसादात. :)

ह्यात हमासला सपोर्ट कुठे दिसला ? खुद्द भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून त्यानंतर आपला दविराष्ट्र सूचनेला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. मग काय भारत सरकार पण हमासला पाठींबा देते आहे काय ?

काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत काॅंग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिबा दिलाय हमासला नाही. हमास ही अतिरेकी संघटना आहे तर पॅलेस्टाईन हा देश आहे. टंकायच्या आधी थोडातरी माहीती घेत चला काका. किती खोटं लिहीनार? :) काॅंग्रेस द्वेषात आपण खोटं लिहीत हे देखील आपल्या लक्षात येत नाही? कठीण आहे.

या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला (आणि बर्‍याच जणांना न पटलेला ) सिद्धांत पुन्हा उगाळतो. मुळात ज्यूंना पहिल्या / दुसर्‍या महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत. जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता. पवित्र भुमी च्या गोंडस नावाखाली ज्युंनी गवताचे पाते उगवत नसलेली जमीन आणि आजूबाजूची मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले. गोरे फुकटात सुटले.ज्युंनी फुकटात xxx गाढवं अंगावर घेतली. पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते). तसे पाहिले तर ख्रिश्चन, मुस्लीम आणि ज्यु एकाच देवाला वेगवेगळ्या नावाने भजतात म्हणजे ते धर्मबंधूच आहेत पण सगळ्यात जास्त एकमेकांचे वैरी देखील आहेत. शेवटी भाऊबंदकी काही सुटत नाही. तिन्ही भावांनी मिळून पवित्र भूमी सांभाळली असती तर अजून काय पाहिजे होते. ब्रिटिशांनी पाचर मारली म्हणता पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये. असो. पुढील लेखनास शुभेच्छा !

प्रतिसाद पटला नाही. महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत. फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये. नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता. जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता ज्यूंचं इस्रायली भूमीवर प्रेम असण्यामागे ती जमीन त्यांच्यासाठी पवित्र आहे हे धार्मीक कारण आहे, जर्मनीचा तूकडा त्यांच्या पवित्र भूमीत मोडला नसता. हिंदूंना रामजन्मभूमावरच मंदीर का हवंय? अख्खा भारत पडून असताना त्याच जागेवर मंदीर का ऊभारायचंय?? ह्याचं जे ऊत्तर आहे तेच पवित्र ईस्रायली नी जेरूसलेमबद्दल ज्यूंचं आहे. मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले. मुस्लिम राष्ट्रे असेही नवनवे शत्रू शोधतच असतात. कुणी नसेल तर आपसांत लढतात. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). का करू नये? मूळात आपल्या भूमीसाठी तीनच राष्ट्रे मुस्लिमांशी लढली असं मला वाटतं. पहीलं स्पेन ज्यांनी संपुर्ण भूमी निर्मूस्लिम करून घेतली. दुसरा भारत ज्याने आपला बराचसा भाग गमावून भूमी त्रासापासून मूक्त करून घेतली नी तिसरं इस्राईल जे आजही आपल्या भूमीसाठी अरबी मुस्लिमांशी लढतंय. पाकिस्तानची अणूभट्टी ऊडवायला इस्राइलच्या मोसादने भारताबरोबर प्लान आखला होता. पण आपल्याच पंतप्रधानाच्या चुकीमूळं सर्व एजंट्स मारले गेले. इस्राईल तंत्रन्यानातही प्रगत आहे नी त्याचा भारताला फायदाच होईल पण पॅलेस्टाईन किंवी इतर राष्ट्रांकडून तेल सोडले तर भारताला काहीही फायदा नाही. कश्मीर प्रशनावर किती मुस्लिम राष्ट्रे भारताच्या बाजूने असतात हा मोठा प्रश्नच आहे. तस्मात इस्राइल वाढतच रहावा नी भारतीयांनी नी भारताने होईल तेवढी मदत नी पाठिंबा इस्राईल ला द्यायलाच हवा. आणी महत्वाचं राहीलं. डायबेटीसवर रामबाण औषध इस्राईलकडेच आहे हे विसरू नका. :)

काही हरकत नाही. म्हणूनच प्रतिसादाच्या पहिल्या वाक्यात हा ढिसक्लेमर दिलाय ना :)
या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला (आणि बर्‍याच जणांना न पटलेला ) सिद्धांत पुन्हा उगाळतो.

"फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये."
अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही! नाझींचा उदय आणि अस्त विसाव्या शतकात झाला, पण खिश्चनांच्या युरोपमधील ज्यू द्वेष / विरोधाला पंधराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. आणि तो जाणून घ्यायचा असेल तर 'Spanish Inquisition' , 'Portuguese Inquisition' हे वाचा. अजुनही बरंच काही आहे, पण मला वाटतं एवढ्याने तुमचे शंका निरसन होइल. बाकी ख्रिश्चनांच्या ज्यू विरोधाबद्दल म्हणाल तर त्याचा इतिहास पार ख्रिस्ती धर्माच्या जन्मापर्यंत म्हणजे, २००० वर्षांहून थोडा अधिक इतका मागे जातो. ज्यू मध्यपुर्वेतील त्यांच्या मूळ भूमीतून (सोयीसाठी आजचा इस्त्रायल किंवा पॅलेस्टाईन म्हणूयात) विस्थापित होण्यास त्याच काळात सुरुवात झाली होती, पुढे रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर त्याचे प्रमाण आणखीन वाढले आणि सातव्या शतकात इस्लामचा उदय झाल्यावर तर विस्थापनाच्या प्रमाणात विलक्षण वाढ होत गेली.
"नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता."
नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली. उदाहरणासाठी 'The Times Of Israel' मधला हा लेख वाचा! "१९१८ ते १९२१ पर्यंत, आताच्या युक्रेन मध्ये ११०० हून अधिक पोग्रोम्स (ज्यू द्वेष्ट्या संघटना/टोळीचे सभासद) १,००,००० ज्यूंना ठार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण युरोपातील साठ लाख ज्यू लोकांच्या जीवाला ह्या ज्यू द्वेषामुळे धोका असल्याची भीती निर्माण झाली होती." 20 years before the Holocaust, pogroms killed 100,000 Jews – then were forgotten

आणखी, जर १८७०-९० मध्ये युरोपियन लोकांना विचारले असते की "ज्युंविरुद्ध भलेमोठे शिरकाण कोणत्या देशातले लोक करतील ?" तर लोकांनी फ्रान्स कडे बोट दाखवले असते. जर्मनी, सुशिक्षित आणि सभ्य जर्मनी कोणाच्या डोक्यात सुद्धा आली नसती. हिटलर येण्याच्या आधी सुद्धा जर्मनीमध्ये आणि एकंदर युरोपात ज्यूंना खूप तिरस्कार सोसावा लागला. हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.

हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.
करेक्टो! त्यासाठीच अबांच्या त्या विधानाशी 'काही प्रमाणात सहमत' असे लिहिले आहे. हिटलरने जर्मनांमध्ये राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग पेटवण्यासाठी आणि Racial hygiene, ज्यावर त्याची गाढ श्रद्धा होती ती संकल्पना जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी ज्युद्वेषाचा वापर एक साधन म्हणुन केला होता. पुढे 'फायनल सोल्युशन' ची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेकडुन पैसे जमा करायला जर्मनीत मुतारी पासुन हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, बागा अशा सर्व ठिकाणी ठेवण्यात आलेल्या भांड्यांमध्ये (कुठलीही पाटी वगैरे लिहीलेली नसतानाही) आपण कशासाठी वर्गणी देत आहोत ह्याची व्यवस्थीत कल्पना असुनही जर्मन लोकं थंडपणे, स्वेच्छेने पैसे टाकत होते ह्यावरुन ते साधन किती प्रभावी ठरले होते ते लक्षात येते.

हिटलर येण्याच्या आधी सुद्धा जर्मनीमध्ये आणि एकंदर युरोपात ज्यूंना खूप तिरस्कार सोसावा लागला. हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.
खरे तर हे विधान पुर्णतः खरे नाही. श्री हिटलर यांचा ज्यु लोकांच्या वृत्तीचा / वर्तनाचा तिरस्कार होता. जर्मन सैन्यात किती तरी अर्ध-ज्यु लोकांना श्री हिटलर यांनी आणि मंत्रीमडळातील इतर लोकांनी सहभागी करुन घेतले होते. श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.