Welcome to misalpav.com
लेखक: आजी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

उत्तम लेख. शिव्या दिल्याने भावनांचा निचारा होतो हे मान्य. श्री बिपिन कार्यकर्ते यांनी खोबार (?) मालिकेत तत्सम विषयावर लिहिले होते. --
त्याहून वाईट शिव्या म्हणजे आई बहिणीवरुन दिलेल्या शिव्या. आणि अगदी ऐकवणार नाहीत अशा लैंगिक अवयवांवरुन दिलेल्या शारीरिक संबंधावरुन दिलेल्या, अश्लील शिव्या. शिव्या देताना समोरच्याच्या मर्मावर आघात केला जातो. आई हा माणसाचा "हळवा कोपरा "असतो. आईबद्दल माणसाच्या मनात अपार प्रेम,माया,आदर असतो. ती त्याचं मर्मस्थान असते. त्या मर्मावर आघात झाला की माणूस विद्ध होतो. कोलमडून पडतो. ती शिवी त्याला कमालीची झोंबते. तोच तर शिवी देणाऱ्याचा हेतू असतो. म्हणून मग आईवरुन शिवी दिली जाते.
हे पुर्णतः खरे नाही. शिवी काय, त्याबरोबरच ती कोणी दिली आणि कोणाला दिले हे सुध्दा महत्वाचे आहे. उदाहरणार्थ १. तथाकथीत सवर्णाने दलिताला शिवी दिली तर तो गुन्हा ठरतो. पण तीच शिवी दलिताने दलिताला दिली तर तो गुन्हा ठरत नाही. २. गोर्या युरोपियनला नाझी म्हणुन म्ह्टले ते आईवरील शिवीपेक्षा वाईट समजले जाते. ३. श्री हरभजन सिंग यांनी श्री अ‍ॅन्ड्रु साईमंड यांना माकड म्हटल्यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. श्री सिंग यांनी पंजाबीमधुन आईला शिवी दिली असे सांगुन स्वत:ची सुटका करुन घेतली. https://www.theguardian.com/sport/2008/jan/30/cricket

आजी, नेहमीप्रमाणेच वेगळा विषय. शिव्यांबद्दल मागे कोणी एक मिपाकर प्रचेतस नामक आयडीने वीरगळावर आईवरुन दिलेला शाप शिव्या शिळा आठवण झाली. आईवरुन शिव्या दिल्या की त्या थेट पोचतात, आई हा प्रत्येकाचा हळवा कोपरा. शिवी दे, पण आईवर नाय द्यायची. आणि दिली की त्यावरुन भांडण तर, अनेकांची होतात. लहानपणी कितीतरी शिव्या दिल्या आणि खाल्ल्या आहेत. शिव्या जशा द्यायच्या असतात, तशा खायच्याही असतात, हे समजूनच शिवीगाळ करावी लागते. गाडी चालवतांना चूकीच्या साईडने कोणीतरी येतो तेव्हा, कोणीतरी आडवा तिडवा येतो तेव्हा, कोणीतरी रस्त्यात गाडी उभी करुन गप्पा मारत असतो तेव्हा हलक्या फुलक्या शिव्या येतातच. बावळट, येडपट, अडाणी असा स्तर आताशी उंचावला आहे, हल्ली इतकाच तो काय फरक झालेला असतो. पण, तेही फार कमी. वयपरत्वे राग व्यक्त होण्याचं प्रमाण होत जात असावं, मन की बात मनमे. असं सगळं. मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार, संकेत हे अ.द.मराठे यांच्या पुस्तकात तर, अनेक शिव्यांची तपशीलवार ओळख होते. आजी लिहिते राहा. तुम्ही काही तरी, वेगळं लिहिता म्हणून निवांत वाचून प्रतिसाद लिहावा लागतो. तेव्हा लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

आईवरुन शिव्या दिल्या की त्या थेट पोचतात, आई हा प्रत्येकाचा हळवा कोपरा. शिवी दे, पण आईवर नाय द्यायची. आणि दिली की त्यावरुन भांडण तर, अनेकांची होतात.
+१ भांडणं मारामाऱ्या पर्यंत ठीक आहे पण वेळप्रसंगी खुनही केले जातात. असो, लेख आवडला हो आजी 👍 (एकेकाळी भरपूर अर्वाच्य शिव्या देणारा) टर्मीनेटर 😀

शिवी त्याच्या दर्जावरून हलकी किंवा भारी समजू नये. वाहत्या रस्त्याच्या मध्यभागी कानाला भ्रमणध्वनी लावून माझ्या मोटारसायकलच्या पुढे अचानक आलेल्या एका तिशीच्या आसपास वय असलेल्या विशाल महिलेला मी शांत शब्दात, "आजी, आता वय झालंय तुमचं! बघून रस्ता ओलांडायला पाहजे!" असे म्हटल्यावर संतापाने तिचं तोंडातून शब्द फुटेनासा झाला होता. मोटार सायकल पुढे गेल्यावर मागून आवाज ऐकू आला, "मेल्या, आजी कुणाला म्हणतोस?"

मस्त माहितीपुर्ण लेख !
म्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे.
मला नाही वाटत असं असेल म्हणून ! या विषयी आणखी तपशिलात जाऊन (सभ्य भाषेत) कोण सांगु शकेल ?

अरेच्चा - अरे च्या... च्यायला.

उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून शिवी हा एक महत्वाचा "हिंसक" भाग आहे. ह्यावर भरपूर रिसर्च झाला आहे. स्टीवन पिंकर महोदयांनी ह्यावर विपुल लेखन तसेच व्याख्याने दिली आहेत. जरूर ऐका. काही शेकडा वर्षे मागे जा. तुम्ही एक पुरुष आहात आणि कुठेतरी दुसऱ्या पुरुषा बरोबर तुमचा वाद होतो. आता, तुम्ही निमूट पणे हार मान्य केली तर तुम्ही बीटा आणि तो अल्फा सिद्ध होतो. त्यामुळे, तुम्हाला त्या वादांत हार मानणे तुमच्या फायद्याचे नाही. इतर लोक तुमच्याकडे बारकाईने पाहत आहेत. आता तुमच्याकडे एक उपाय उरतो तो म्हणजे ठोसा मारणे. पण एकदा तुम्ही ठोसा मारला तर दुसरी व्यक्ती लाथ मारेल, मग तुम्हाला शस्त्र काढावे लागेल. मग तुमच्यापैकी एक मृत्युमुखी पडेल. ह्यावर सोपा उपाय म्हणजे फक्त शिवी द्या. शिवी हा एक शाब्दिक ठोसा आहे. त्यावर दुसरी व्यक्ती आणखीन शिवी देईल त्यावर तुम्ही आणखीन शिव्या देऊ शकता. जो पर्यंत कुणी ठोसा मारत नाही तो पर्यंत फक्त शिव्यांचे ठोसे मारणे आपल्या हिताचे आहेत. इथे तुम्ही "प्रतिकार" केला हे सुद्धा दिसते आणि त्यांत escalation ची रिस्क सुद्धा नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात शिव्या देणे हे किमान पुरुष मंडळींच्या हिताचे आहे. लहान मुलांना शिव्या देऊ नये असे संस्कार दिले तरी त्याच वेळी योग्य परिस्थितीत शिव्या त्यांनी दिल्याचं पाहिजेत नाहीतर अनेकदा "ठोसा" हा एकमेव उपाय त्यांच्या हाती राहतो जो चांगला नाही.

>>> काही शेकडा वर्षे मागे जा. आताही असेच असते कमी जास्त प्रमाणात बातम्या वाचल्या बघितल्या की लक्षात येते फार फरक नाही. >>>तुम्ही एक पुरुष आहात आणि कुठेतरी दुसऱ्या पुरुषा बरोबर तुमचा वाद होतो. आता, तुम्ही निमूट पणे हार मान्य केली तर तुम्ही बीटा आणि तो अल्फा सिद्ध होतो. त्यामुळे, तुम्हाला त्या वादांत हार मानणे तुमच्या फायद्याचे नाही. इतर लोक तुमच्याकडे बारकाईने पाहत आहेत. आता तुमच्याकडे एक उपाय उरतो तो म्हणजे ठोसा मारणे. पण एकदा तुम्ही ठोसा मारला तर दुसरी व्यक्ती लाथ मारेल, मग तुम्हाला शस्त्र काढावे लागेल. मग तुमच्यापैकी एक मृत्युमुखी पडेल. >>>खरंय, किरकोळ गोष्टी जीवावर बेततात. -दिलीप बिरुटे

विविध शब्द वापरून मानवी मनावर प्रभाव पाडला जाऊ शकतो. लहान मुलाशी बोलताना "शी" तीच गुरांच्या बाबतीत शेण होते, नगर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सांडपाणी तर वैद्यकीय दृष्टिकोनातून मल, फॉर्मल भाषेंत विष्ठा आणि शिवीच्या बाबतीक गू. एकच वस्तू पण शब्द वापरा प्रमाणे भावना बदलतात.

ज्या मित्राचा फोन आला असता प्रतिक्षिप्त क्रियेने आपल्या तोंडुन हॅलो ऐवजी कचकचीत शिवी उत्तरादाखल जाते असा एकही मित्र नसलेला मनुष्य खरोखर हतभागी! संभाषणाची सुरुवात आणि अखेर जर शिवीने होत असेल तर ते जिवलग मित्र, बाकी सगळे स्नेही, सवंगडी, परिचीत वगैरे.. खरंच सांगतो, अशा एका मित्राचा एकदा सकाळी सकाळी फोन आला. उचलला तर काय? एकदम सोज्वळ भाषा! मी कानाला लावलेला फोन समोर धरला आणि खात्री करुन तो फोन त्याचाच आहे ना याचे खात्री करुन घेतली. मग हळूच विचारलं अरे कुठे बाहेर आहेस का? आजूबाजूला कुणी पाहुणे वगैरे आहेत का? गाडी चालवताना अशा मित्रवर्यांचे फोन आले तर कॉल उचलताक्षणी समोरच्याला बोलाची संधी न देता ओरडून सांगावं लागतं की गाडी चालवत आहे, हपीसला निघालो आहे आणि बरोबर काही सत्पुरुष आणि कुलीन स्त्रिया आहेत. तर शिव्यांची मनमोकळी देवाणघेवाण हे घट्ट मैत्रीचं लक्षण आहे जिथे कुठल्याही औपचारिकतेला थारा नाही. अशा मित्रांशी बोलल्यावर खूप बरं वाटतं. विशेष्तः दिवसभर औपचारिक, सावध, शिष्टसंमत बोलून झाल्यावर रात्री अशा मित्राचा फोन ही संजीवनी असते. माझ्या अशा एका मित्राला करोनाकाळात एकाएकी जबरदस्त मानसिक दडपण आलं. ठणठणीत असणार्‍या जीवाला फोनवर बोलताना धाप लागू लागली. आपल्या मुलीची प्रकृती नाजूक आहे, ती चार चौघांसारखी नाही; आई नव्वदीत आहे, आणि यापैकी कुणाला करोना झाला तर? या चिंतेने तो ग्रासला आणि असा विपरीत परिणाम दिसू लागला . एका मित्राची आई गेली तेव्हा तो आणि त्याची पत्नी तिथे भेटले आणि ही सगळी हकिगत समजली. मी त्याला सांगितलं की त्याला काही झालेलं नाही तर भितीने घरात बसून असल्याने तो मित्रांच्या प्रेमळ संवादांना मुकतोय आणि यावर सोपा उपाय म्हणजे आपण किमान दिवसाआड तरी रात्री फोनवर बोलू, मनसोक्त शिव्या घालू (आतल्या खोलीत बसून) जरा रोजचे शब्द कानी पडले की तब्येत सुधारेल.

ह्या संदर्भात रा. चिं. ढेरे यांनी आपल्या "शिवी आणि समाजेतिहास" ह्या निबंधात ज्ञानेश्वरांच्या 'खर दृष्टांताचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात सकळांना आपल्या करुणेच्या मायेत घेणार्‍या, सकळांचे इष्ट चिंतिणार्‍या ज्ञानदेवांनीही आपल्याला सौम्यसा धक्का दिलेला दिसतो. खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें । तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥ ७०६ ॥ तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं । व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥ गाढवीण गाढवाला स्पर्श करु न देता उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड फोडते तरिही ज्याप्रमाणे गाढव मागे हटत नाही त्याप्रमाणे विषयासक्त पुरुष जळत्या आगीसारख्या स्त्रीदेहाचा उपभोग घेण्यास सरसावतो आणि ही व्यसनी अलंकारासारखी मिरवतो. हा खर दृष्टांत म्हणजे ज्ञानदेवांनी विषयलंपटांना दिलेली एक तिखट शिवीच आहे असे म्हणावे लागेल.

कित्येक शिव्या आपल्या नकळत आपण देत असतो. तुम्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे. हे माझ्यासाठी नविन आहे ! पूर्ण शिवी काय असावी ? असं विचार करुन देखील काही सुचलं देखील नाही ! ज्ञान वर्धन करावे ! बाकी या विषयावर अमुल्य रत्न मिपावर उपलब्ध आहेच :- शिव्यांना शिवी देऊ नका

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures

जिव्हासफाई एक अभियान कदाचित काहींना आठवेल... काही काळापूर्वी या धाग्यावर २१ हजारहून अधिक टिचक्या पडल्या होत्या. कधी सकारण तर कधी अभावितपणे भाषेला धार आणायला जिव्हा लवलवते. तो जिव्हा'ळ्याचा विषय बनतो. कळतं पण वळतं नाही असेही होते! मग उपाय काय?

माझ्या या लेखावर भरपूर प्रतिसाद आपण दिलेत. वाचनेही खूप जणांनी केली. आपणा सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानते. आणि एक सांगायचे झाले तर "अरेच्या"प्रमाणेच"अरे"हा सुद्धा शिवीचा एक तुकडा आहे.बाकी ठीक.असाच लोभ असावा.