Welcome to misalpav.com
लेखक: मनो | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared