Welcome to misalpav.com
लेखक: Bhakti | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख आवडला . सुक्क्ष्मजीवशास्त्र चा अभ्यासक असल्याने क्लिष्ट काही वाटले नाही . रोचक माहिती . पण गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनाने ज्वारी नि बाजरी पिके झाकोळली गेली.

गहू उपयुक्त आहे. पण वाटतं काही कामांची नसतात. खुलं खात नाहीत. पण ट्रॅक्टर आल्याने बैलांचे नांगर,गाड्या बाद झाल्या. शेणखत कमी झाले. बाजरीची धाटं गोठे शाकरायला चालतात. ज्वारी संपूर्ण कामाची आहे. आता ' मिलेटस' चा पुन्हा प्रचार सुरू झाला आहे. गव्हाचा अतिरेकी वाईटच. पण त्या काळी झालेली प्रगती कामाची होती.

वेगळा विषय घेतल्याबद्दल आभार. स्वामीनाथन, हरीत क्रांती व बोरलॉग हे एकाच लेखात जरा जास्तच झाले आहे. हे खरे तर स्वतंत्र मोठ्या लेखाचेच नव्हे तर पुस्तकांचे विषय आहेत. त्यामुळे लेख जरा गच्च झाला आहे. स्वामीनाथन यांना जग खूप थोर मानते, पण त्यांच्यावर काही महत्वाचे आक्षेपही आहेत. ते यथावकाश घ्याल अशी आशा आहे. उदा. आपल्याच लेखात - >> गव्हाच्या नव्या प्रजाती बनविण्यासाठी काही मुद्दे महत्वाचे होते. १.नवीन प्रजातीनी खतांशी जुळवून घेतले पाहिजे. म्हणजे किती उलटा विचार आहे असे वाटते. पिकांनी खतांशी कशासाठी जुळवून घेतले पाहिजे? खत कंपन्यांना सतत नफा व्हावा म्हणून? अवघड आहे. मुळात रासायनिक खतांमुळे जमीनीचे खूप नुकसान होते, फक्त ते २०-२५ वर्षांनी लक्षात येते. जमीनी क्षारपड झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खासकरून शिरोळ तालुक्यात भयंकर परिस्थिती ओढवली आहे. रासायनिक खतांना भरमसाठ पाणी लागते, त्यानेही जमीनीचे नुकसानच होते. हे जोपर्यंत समजत नव्हते, तोपर्यंत हरित क्रांती व रासायनिक खतांचा (पर्यायाने स्वामीनाथन यांचा) उदोउदो चालून गेला. हा केवळ एकच मुद्दा झाला. असो. शेवटी भक्तीपूर्ण लेख न लिहीता, पुढील लेख परखड, वस्तुनिष्ठ लिहाल अशी अपेक्षा.