Welcome to misalpav.com
लेखक: कंजूस | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

व्वा, खुप छान भटकंती आणि त्याला समर्पक प्रचि. खूप सुंदर आटोपशीर सहल. दिलेले तपशिल पुढील सहल आयोजनासाठी अ त्यंत उपयोगी आहेत ! कंजूस जी +१ N1234eCL456 एकता पुतळ्याला जाने २०१९ जाण्याचा अचानक योग आला ! अमदावदला नातेवाईका कडे आलो होतो. सकाळी लवकर उठून एकता पुतळ्या पाशी येऊन पोहोचलो. दु, चे जेवण आटोपून अडीच ते सुर्यास्त असा परिसराचा आनंद लुटला. अप्रतिम अनुभव होता. परदेशी जाता आलेलं नाही याचे दु:ख दुर झाले ! व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तेव्हा नविनच होते काम सुरु होते. येता येता जवळच असलेलेल पोयचा येथे रात्री नीलकंठ धाम हे स्वामीनारायण मंदिर आहे. तिथली रोषणाई आणि पाण्यातले प्रतिबिंब पाहून डोळ्यांचे पारणे फिटले ( यासंबंधी माझ्या फेसबुक वर एक पोस्ट पण लिहिली आहे आणि फोटो व्हिडिओ सुद्धा जोडले आहेत. ) . परतीचे रिझर्वेशन असल्याने वडोदरा बघता आले नाही आता या धाग्यातली माहिती वापरून वडोदरा सहलीचे नियोजन करता येईल.

धावती असली तरी माहितीपूर्ण सहल. फोटोही सुंदर. मी सुद्धा २०१९ ला एकता पुतळ्यास भेट दिली होती. बडोदा बघायचे बाकी आहे. आपण दिलेल्या माहितीचा निश्चितच उपयोग होईल. याच सहलीत वाटेत कुबेर मंदिरही पहिले होते.

ही ट्रिप करायची आहेच, माहीतीचा नक्की उपयोग करेन. रच्याकने- एकतानगर स्टेशनच्या रस्त्यावरची हॉटेल्स महागडी आहेत. त्या ऐवजी गरुडेश्वर गावात चांगली होम स्टे आणि घरगुती जेवणाची सोय आहे. मराठी घरे खुप आहेत. अंतराच्या दृष्टीने एकतानगर स्टेशनपासुन पुतळा डावीकडे पाचेक कि.मी. असेल तर गरुडेश्वर उजवीकडे तितकेच अंतर आहे. पण लोकल जीप्स असतात ये-जा करायला. दिवसभराची जीप ठरवली तर आसपासची ८-१० ठिकाणेही बघुन होतात (कुबेर मंदीर, अनुसुया माता,शूलपाणीश्वर वगैरे). त्यामुळे एक दिवस गरुडेश्वर आणि आसपास बघुन मुक्काम, एक दिवस पुतळा आणि एक किवा दोन दिवस बडोदा (विथ मुक्काम) असे करता येईल. टेन मात्र ही एकच सोयीची आहे दादरहुन.

गरुडेश्वर - आणि इतर कुबेर मंदिर वगैरे. या नावाचे तसेच टिळकवाडा ही नावे नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्या वर्णनात येतात. रस्त्याकडे आहेत. गरुडेश्वराचे महत्त्व म्हणजे महाराष्ट्रातील एक संन्यासी (अगोदर विवाहित) संत श्री टेंबे स्वामी तिकडे जाऊन राहिले. समाधी आहे. तर या नावाची रेल्वे स्टेशने केली आहेत तिथे रेल्वे थांबत नाहीत. एकट्या दुकट्या पर्यटकांना शेअरिंग जीप ठरवणे परवडणारे नाही. चार सहा भाविकांनी ठरवून वाहन केल्यास ती ठिकाणे सहज जमतील.

लेख आवडला.. मी या पुतळ्याला उदघाटन झाल्या झाल्या भेट दिली होती , त्यावेळीस फुलपाखरू उद्यान व अजून एक उद्यान बनलेले होते. टेंट सिटी बनायची बाकी होती. माझ्या मते धरणाची उंची खूप गाजली होती त्या उंचीला रिप्लेस करायला हा पुतळ्याचा उंचीचा वाद epitome असू शकतो . एकंदर परिसर हिरवागार असतो पावसाळ्यात. वडोदरा स्टेशन च्या बाहेर बुलेट ट्रेन चे मोठे काम चालू आहे त्याचा उल्लेख राहिला....

बुलेट ट्रेन चे मोठे काम - रुळाच्या पश्चिम भागात विश्वामित्री स्टेशनपासून खूप काम दिसत होते पण ते बुलेट ट्रेनचे असावे ही कल्पना नव्हती. शिवाय सूरत पर्यंत रुळाची पश्चिम हद्द कुंपण घालून सुरक्षित केलेली दिसली. तापी नदीवर पूल बांधत होते. म्हणजे पूल बांधणे प्रथम संपवणार. आम्ही 09:45 train ने वडोदरा हून निघालो. त्यानंतरच्या लगेचच 09:55 च्या बिकानेर हॉलिडे स्पेशलचे एंजिन कोसांबाला बिघडले ही बातमी वाचली. चार तास सर्व गाड्या अडकल्या होत्या. आम्ही थोडक्यात सुटलो.

पहायला मिळाला. आता खरे तर राणी साहेबांसमावेत दालने पहायला मिळणार नाहीत. तरीही बडोदा शहरातील विविध भागात सयाजी राव गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा ठसा पहायला मिळतो. मला एकता मूर्तीच्या रूपात वल्लभाई पटेलांना पाहायला व्हिआयपी म्हणून सपत्नीक भेट द्यायची संधी मिळाली. सूरत चा नवा किल्ला जमल्यास जरूर पहावा. शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीमुळे हा किल्ला जरा बदनाम होता. आता तो पहायला मिळणे एक पर्वणी आहे. विविध कालखंडातील घटना, आतील वातानुकूलित दिवाणखाने वापरणारे बदलले की कसे दिसत, तोफा, व इतर शस्त्र सामुग्री कशी आदर्शवत ठेवावी ते पहायला मिळाले.

सुरेख आणि तपशीलवार माहिती काका. बडोद्याला नातेवाईक असल्याने हे सर्वच सहज पाहता येईल. पुतळ्याचे आकर्षण मात्र फारसे नाही.

खूप छान माहिती दिलीत. पुढच्या आठवड्यात बडोद्याला चाललो आहोत. मला असं विचारायचं आहे की जॉय ट्रेनला तिकिटाला फार गर्दी असते का? की ऑनलाईन आधी काढलेलं बरं? आम्ही जातो आहोत तो वीकएंड नाही.

जॉय ट्रेनला ओनलाइन तिकिटांची गरज नाही. खिडकीवरच तिकिट घ्या. दर ४५ मिनिटांनी गाडी भरून सुटते. १५० लोक एका फेरीत जातात. सध्या अंधार लवकर होतो. प्राण्यांच्या पिंजऱ्यात जवळून जाताना ते दिसणार नाहीत. तीन वाजता आत जाऊन प्रथम गाडी फेरी करा. त्यानंतरच प्राणी पाहायला जा. बागेला चार गेट्स आहेत. काला घोडा चौकाकडच्या गेटने आत गेल्यास डावीकडे प्रथम तिकिट खिडकी आणि स्टेशन आहे. एक /दोन नंबरच्या गेटने गेल्यास उजवीकडे आहे.