Welcome to misalpav.com
लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.