Welcome to misalpav.com
लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वैद्यकीय क्षेत्रात चाललेले संशोधन या कडे लक्ष नसते व सर्व सामान्य जनतेला काही घेणेदेणे नसते व या बद्दल चे अपडेट्स सर्व सामान्यांच्या भाषेत उपलब्ध ही नसतात. आपण नेमकी हीच उणीव भरून काढत अहात.प्रशंसनीय आहे. लेख आवडला. कृत्रिम मूत्रपिंड हे रिनल फेल्युअर वर वरदान व डायलेसिस पासुन मुक्ती देणार असे ऐकेले होते. त्यावर कुठपर्यंत प्रगती झाली आहे यावर थोडा प्रकाश टाकावा.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! चांगला प्रश्न. The Kidney Project या नावाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अमेरिकेत चालू आहे. त्यामध्ये कृत्रिम मूत्रपिंडाची प्राथमिक प्रारूपे तयार करून त्यांची चाचणी झालेली आहे. preclinical या पातळीवरील संशोधन झालेले आहे. आता प्रत्यक्ष रुग्णप्रयोग करण्यासाठी पुढील तंत्रज्ञान विकसित करायचे आहे. त्यासाठी सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. * सध्या या उपचाराकडे डायलिसिस आणि खऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यांच्या दरम्यानची उपचार पायरी (bridge) म्हणून पाहिले जात आहे. * डायलिसिसपेक्षा या पद्धतीत होणारे फायदे असे आहेत : १. रुग्ण कुठल्याही निर्बंधाविना नेहमीचा आहार घेऊ शकतो २. या उपचारानंतर शरीराची प्रतिकारशक्ती दाबणारी किंवा रक्तपातळ करणारी औषधे द्यावी लागत नाहीत. *अजून काही वर्षांत पुढील संशोधनातली प्रगती समजेल.

कुमार सरांच्या पोतडीमधुन आलेला अजुन एक उत्तम लेख!! सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत माहीती देणे ही खासियत याही लेखात दिसुन येते. नॅनो तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता ईतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातही जोरदार प्रगती करत आहेत (अगदी स्टेथास्कोप सारख्या प्राथमिक गोष्टीतही) हे वाचुन आनंद झाला. एक शंका(रोगोपचार व प्रतिबंध) औषध निर्मिती करताना, ‘जर त्या प्रथिनाची निर्मितीच थांबवता आली तर?’ ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना? समजा--प्रथिने निर्मिती थांबली, रोग आटोक्यात आला, पण निर्मिती पुन्हा सुरु झालीच नाही/किवा कमीजास्त प्रमाणात झाली, तर? बाहेरील औषधाचा डोस कमीजास्त करता येईल, पण ईथे पेशीला दिलेली सूचना कशी रद्द करणार?

अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना?
प्रश्न चांगला आणि रास्त आहे. सध्या हे नवे तंत्रज्ञान तसे बाल्यावस्थेत आहे. त्याचे तोटे किंवा धोके समजून यायला काही काळ जावा लागणार आहे. या तंत्राने बनवलेली औषधे ठराविक डोस मध्ये आणि ठराविक काळच दिलीत. एखाद्या प्रथिनाची निर्मिती थांबवणे हे नेहमीच पूर्णपणे असते असे नाही; ते औषधाच्या डोसवर आणि कालावधीवर अवलंबून असते. पेशीला दिलेली सूचना कायमस्वरूपीच असेल असे नाही; किंबहुना ती कालमर्यादेतच राहते. या औषधांमुळे एलर्जी किंवा दीर्घकालीन जनुकीय बदल होऊ शकतील का, ही खरी सतावणारी समस्या आहे. अजून पुरेशा संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल

अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना?
प्रश्न चांगला आणि रास्त आहे. सध्या हे नवे तंत्रज्ञान तसे बाल्यावस्थेत आहे. त्याचे तोटे किंवा धोके समजून यायला काही काळ जावा लागणार आहे. या तंत्राने बनवलेली औषधे ठराविक डोस मध्ये आणि ठराविक काळच दिलीत. एखाद्या प्रथिनाची निर्मिती थांबवणे हे नेहमीच पूर्णपणे असते असे नाही; ते औषधाच्या डोसवर आणि कालावधीवर अवलंबून असते. पेशीला दिलेली सूचना कायमस्वरूपीच असेल असे नाही; किंबहुना ती कालमर्यादेतच राहते. या औषधांमुळे एलर्जी किंवा दीर्घकालीन जनुकीय बदल होऊ शकतील का, ही खरी सतावणारी समस्या आहे. अजून पुरेशा संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल

१. लालपेशींच्या सिकलसेल या आजारावर जनुकीय संपादन उपचार उपलब्ध झाले आहेत. नुकतेच त्याला अमेरिकी औषध प्रशासनाने मान्यता दिली. ‘exa-cel’ या प्रकारचे उपचार करून रुग्णाच्या मूळ रक्तपेशी सुधारित केल्या जातात. २. अंशतः चेहरा आणि संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण : ही एक अभूतपूर्व यशस्वी शस्त्रक्रिया अमेरिकेत पार पडली. एका विद्युत कर्मचाऱ्याचा चेहरा व डोळा काम करताना जळाला होता. त्याच्या बाबतीत हे मानवी प्रत्यारोपण करण्यात आले. डोळ्यातील फक्त corneaचे प्रत्यारोपण रूढ आहे परंतु या घटनेत संपूर्ण डोळा प्रथमच प्रत्यारोपित करण्यात आला आहे. अद्याप त्या रुग्णाला नव्या डोळ्यात दृष्टी आलेली नाही परंतु ती यथावकाश यावी अशी डॉक्टरांची अपेक्षा आहे.