मस्त गुलाबी थंडी!!
जॅकेट कानटोपी वगैरे घालुन भल्या पहाटे वॉकायला रनायला बाहेर पडलेले लोक्स!!
बाईकला कॅन अडकवुन जाणारे दूधवाले, पेपरवाले
घराबाहेर शाळेच्या व्हॅनची वाट पहाणारी मुले
लांबवरुन ऐकायला येणारा काकड आरतीचा रेल्वेच्या शिट्टीचा आवाज आणि काय काय.....
लेख वाचुन सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
हिवाळा हा माझाही आवडता ऋतू असल्यामुळे की काय, या ऋतूचं वर्णन खूपच भावलं.
---
वाटतं अशा वेळी "तो"जरी आला तरी थांबेल तोही पळभरी!
हे आवडलं नाही, आजी. तुम्ही छान लिहिता. नेहमीच सगळेच वाचक प्रतिसाद देत नसले तरी ते वाचत राहतात. असं काही लिहून तुमच्या लिखाणात खंड पडण्याची भीती दाखवू नका ही विनंती.
---
सवांतर:
पाचवी-सातवीत असताना "माझा आवडता ऋतू" या विषयावरचा नवनीतचा निबंध वाचला होता, त्यात हिवाळा हा आवडता ऋतू असं वर्णन केलेलं होतं. कदाचित ते वाचल्यापासूनच की काय, "हिवाळा हा माझा आवडता ऋतू" ही जाणीव झाली असावी.
---
अवांतर:
३१ डिसेंबर २०१६ रोजी आम्ही चार मित्र दार्जिलिंगला होतो. शिमला येथील मॉल रोड सारखेच दार्जिलिंग येथेही एक ठिकाण आहे. आम्ही चारजण दिवसभर भटकंती करून रात्री आठ वाजता हॉटेलात परत आलो. फ्रेश होऊन बाहेर जाऊन गावात भटकावे, प्यावे-खावे, मॉल रोडवर नाचगाणे करावे, हिरवळ पहावी, थर्टी फर्स्टचा आनंद रात्री उशिरापर्यंत लुटावा असा बेत होता. रूमवर चार जणात मिळून जेमतेम २००-२५० मिली शिल्लक होती. ती गटकावून रात्री सव्वा नऊ ला बाहेर पडलो. जवळच्या वाईन शॉप वॉर जातो तर काय, तो शटर लावून घेत होता. इथला सगळा बाजार नऊ वाजताच बंद होतो असे समजले. त्या दुकानदाराला कसेबसे थांबवून सामान घेतले. कसचा मॉल रोड, हिरवळ, थर्टी फर्स्टची रात्र आणि कसचे काय? सगळेच बंद झाले होते. मौजमजा करण्याचा सगळं बेत पाण्यात गेला. निराशेने शेवटी दहा वाजता हॉटेलात परत आलो. हॉटेलचे रेस्टॉरंट होते तिच्या मालकीणबाईंना विनंती करून काहीतरी खायचे करून घेतले.
पिणे-खाणे करून मग जवळपास पाय मोकळे करायला बाहेर पडलो. बाहेर प्रचंड थंडी होती. जाडजूड स्वेटरं, टोप्या, हातमोजे स्पोर्ट्स सॉक्स आणि बूट्स असा जामानिमा असूनही अक्षरशः हाडे गोठविणारी थंडी वाजू लागली. पोटभर जेवल्यावर थंडी जास्त वाजते याची तिथे जाणीव झाली.
पण ओव्हरऑल नंतर ती रात्र आम्ही चार जणांनी खूपच एन्जॉय केली. म्हणजे, unplanned मौजमजा केली. बोचर्या थंडीचा मस्त अनुभव घेतला.
हिवाळा खरंच आवडता ऋतू आहे.
त्याचा कंटाळा नाही येत कधी उन्हा-पावसासारखा!
मी आजवर एकापेक्षा एक देखणे चंद्र पाहिले,पण इतका दिलतोड देखणा चंद्र मी पूर्वी आणि नंतर पाहिला नाही.
तुम्ही वर्णन केलेलं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माघ पौंर्णिमेचा उगवता चंद्रदेखील असाच सुंदर दिसतो.
सुंदर लिहिलंय आजी!
मलापण बाई थंडीच आवडते.
मी बर्फाचे कण अंगावर झेलत,हात जोडून, डोळे टक्क उघडे ठेवून तो अनुभव मी पंचेद्रियांनी घेत होते. परमेश्वराच्या जवळ नेणारा अनुभव!!
सुंदर क्षण!
आपला हेमंत ऋतू
अहो, गंमत केली. तुमचा मुद्दा रास्त असेलही. शीर्षक एका प्रसिद्ध गाण्यासारखे वाटते आहे. लेख तर मराठीत आहे ना. झाले मग.
बाकी थंडीवरून एखादे मराठी गाणेदेखील शीर्षकात चालून जावे. तूर्त असे गाणे पटकन आठवेना. गारवा हे गाणे पावसाळी आहे असे स्मरते. असो.
आजी गं मस्त लेखन. मस्त आठवणी. लेखन आवडलं. सगळ्या आठवणी भारी. सर्व वाचकांना लिहिते करणा-या. तर, ऋतु म्हणशील आजी तर, तरुणपणात पावसाळा आवडायचा. तिच्या गावाकडे पाऊस पडला की आपल्याही गावातही पाऊस व्हायचा. दोन-चार थेंब तर आठवणींचे येऊन जायचे. तेव्हा पाऊस आवडायचा. आता वयपरत्वे म्हणे तिकडे ब्लडप्रेशरच्या गोळ्या. इकडेही तसंच थोड्याफार प्रमाणात तर, पाऊस असा विविध आठवणी घेऊन येतोच येतो. बाय द वे, पाण्याची भिती म्हणजे वाहत्या पाण्यातील साचलेल्या पाण्यातील खड्ड्यात फोर व्हीलरचं तर एक चाक कायम अडकण्याची भिती वाटते. एवढं भितीदायक सोडलं तर पाऊस आवडतो. आजी प्रत्यक्षातला पाऊस आवडतो तसा सिनेमातला म्हणशील तर दीठीतला आवडला. सिनेमाभर पाऊस पडतो.
थंडी विशेष आवडावी इतकं तिचं कौतुक नाही. पण, नौकरीच्या गावी थंडीच्या दिवसात मंदिरात भजनं करणा-या वारक-यांबरोबर एक दोन भजनं ऐकण्यातली मजा भारी. गुळाचा चहा यायचा भारी वाटायचं. काही अभंग-ताल-नाद अहाहा. भारी एकदम ती थंडी मस्तच. लहानपणी शेकोटीत 'सासू' आणावी लागे. सासू म्हणजे पाचट, काड्या, कागदं जमा करुन आणायचं आणि मग शेकायला यायचं. ती थंडी शेकोटी भन्नाट. थंडीत लाड वाढतात शरीरास पौष्टीक सकस आहाराच्या गप्पा. आता काही मोठी मुलं थंडीचं उष्णमय द्रव्याबद्दल बोलत असतात. आपण दुर्लक्ष तर, अशी वेगवेगळी थंडी.
म्हैसमाळ म्हणजे आमच्या छ.संभाजीनगरातलं काय ? पूर्वी दूरदर्शनचा सेटप तिथे होता. मोठमोठ्या छत्र्या तिथे लावलेल्या. मोठा टॉवर खास बघायला शहरवासी तिथे जायचे. आताही लोक तिकडे गर्दी करतात. पण, मुलं मुली, महिला-पुरुष काही असे तसे त्यामुळे त्या छोट्याशा हीलष्टेशनला गर्दी वाढली आहे. इतकी की आता तिकडे नको असे म्हणायची वेळ आली आहे. असं सगळं.
आजी तुम्हाला खूप हजारो वर्षाचं दीर्घायूष्य लाभो. रावसाहेबांच्या एका लेखाची मला आठवण येते. ’मरणा तुझा काय तेगार’ ची आठवण झाली. जालावरील रावसाहेबांनी त्याबद्दल खूप वर्षापूर्वी इकडे मनोगतवर लिहिलं होतं मला कायम त्याची आठवण होते. रावसाहेबांच्या लेखनाची ओळख झाली ती याच लेखापासून.
आजी तुमचं लेखन गप्पांची मैफिल असते. घमील्यात फळ्या टाकून शेकत तुमच्या गप्पा आठवणी निवांत ऐकत राहावे असे आणि लेखाला दीर्घ प्रतिसाद उमटत जातो तो असा. तहे दिलसे शुक्रिया. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
खूप छान लेख आजी. एकेक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो तुमच्या लिखाणातून.
एकदा मी आमच्या कंपनीतल्या ग्रुपमध्ये बोलत असताना ठंड लग रही हैं च्या ऐवजी ठंड बज रही हैं असं म्हटलो होतो ,त्याची आठवण झाली शीर्षक बघून :D
प्रतिक्रिया
अरे वा!!
मुक्तक नेहमीप्रमाणेच आवडलं आजीबाई.
खूपच सुंदर लेख आज्जी.
सुंदर ओघवते लेखन
थंडी आणि पावसाळा...
हिवाळा खरंच आवडता ऋतू आहे.
मी आजवर एकापेक्षा एक देखणे चंद्र पाहिले,पण इतका दिलतोड देखणा चंद्र मी पूर्वी आणि नंतर पाहिला नाही.तुम्ही वर्णन केलेलं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माघ पौंर्णिमेचा उगवता चंद्रदेखील असाच सुंदर दिसतो.सुंदर लिहिलंय आजी!
मी बर्फाचे कण अंगावर झेलत,हात जोडून, डोळे टक्क उघडे ठेवून तो अनुभव मी पंचेद्रियांनी घेत होते. परमेश्वराच्या जवळ नेणारा अनुभव!!सुंदर क्षण! आपला हेमंत ऋतूhttps://misalpav.com/node
लेखाचं शिर्षक हिंदी का?? मग
खरे तर
:-)
हे सिनेमातील पात्र आहे. पण
अहो, गंमत केली. तुमचा मुद्दा
थंडीची झोप मला लागेना .....
अहाहा...!
खूप छान लेख आजी. एकेक प्रसंग
मस्त लेख.आजकाल दिल्लीत थंडीचे
तुम्ही नोएडा जाणार होतात ना??