Welcome to misalpav.com
लेखक: ईंद्रधनु | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तिन्ही फंड चांगले आहेत . निप्पोन स्मॉल कॅप मध्ये गुंतवले असते तर अजून अधिक परतावा मिळवला असता आजच्या घडीला . स्मॉल कॅप ने हौदोस घातला यावर्षी ;) sip करतांना पण स्मॉल कॅप चे थोडे एक्सपोजर ठेवा, वयागणिक प्रमाण कमी करणे .

वयागणिक प्रमाण कमी करणे . बहुसंख्य अर्थ सल्लागारांचा हाच झापडबंद सल्ला असतो. माझी समभागात गुंतवणूक ९९ .९% आहे आणि केवळ एक प्रयोग म्हणून मी दोन महिन्यांपूर्वी म्युच्युअल फंडात थोडेसे पैसे गुंतवले आहेत. माझे निवृत्त झालेले मित्र ज्यांना महिना लाखभर रुपये निवृत्तीवेतन आहे आणिआयुष्यभर वैद्यकीय सुविधा आहे त्यांना पण सर्व अर्थ सल्लागारांचा असाच सल्ला मिळताना पाहून आश्चर्य वाटते. ( त्यांचे पोट कसे चालेल याप्रमाणे बरेच अर्थ सल्लागार सल्ला देताना आढळतात) मला एक रुपया सुद्धा निवृत्तीवेतन नसताना मी ९९% गुंतवणूक समभागातच केलेली आहे. यासाठी धीर धरणे आवश्यक असते. मार्च २०२० मध्ये बाजार पडलेला असताना माझी गुंतवणूक मूळ मुदलाच्या ३० % वर आलेली होती. त्यावेळेस मी मोठ्या प्रमाणावर ब्लू चिप मध्ये गुंतवणूक केली. आज हीच गुंतवणूक तीन वर्षात चौपटीपेक्षा जास्त झालेली आहे. उदा. टी सी एस, एल अँड टी, स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या बाजार फार उच्ची वर आहे त्यामुळे गेल्या तीन महिन्यात मी जवळजवळ ३० % गुंतवणूक काढून घेतली आहे आणि पुढच्या वर्षभरात (किंवा दोन वर्षात) जेंव्हा बाजार पडेल तेंव्हा हेच पैसे मी उत्तम समभागात गुंतवेन. बाजारात भय आणि लोभ या दोन गोष्टीमुळे गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान होत असते. गेल्या १५ वर्षात मी बाजाराची तीन आवर्तने पाहिली आहेत यात मला सर्वात जास्त नफा २००८ च्या आणि २०२०च्या पडझडीत झालेला आहे. अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. सर्व अर्थ सल्लागार dont try to time the market हाच सल्ला देताना आढळतात. दुसर्यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये माझे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. यामुळे गेली ६-७ वर्षे मी कुणीही दिलेला कोणताही सल्ला लक्षात घेत नाही. बाजारात अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी अशा अनेक कंड्या पिकवत असतात. उदा शेअर खान या सल्लागार कंपनीनें २०२१ मध्ये लॉरस लॅब मध्ये पैसे गुंतवा हा समभाग ८०० च्या वर जाईल असा सल्ला दिला आणि आपल्या ग्राहकांना ७०० च्या पातळीला समभाग विका असा सल्ला दिला होता. हा समभाग जास्तीत जास्त ७२३ पर्यंत जाऊन मग आपटला होता. यानंतर या कंपनीने ७०० ची पातळी आजतागायत गाठलेली नाही. एक तर स्वतः अभ्यास करा किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा असेच माझे म्हणणे आहे. चार पैसे गाठीशी बांधून कोणतेही कष्ट न करता बक्कळ नफा मिळवावा याच हेतूने सर्व बाजारात आलेले असतात हि वस्तुस्थिती आहे. पण there is no free lunch. व्यवस्थित अभ्यास करा आणि विचार र्पूर्वक गुंतवणूक करा. जाता जाता नाक्यावर दिलेल्या सल्ल्यावर अवलंबून गुंतवणूक केल्यास नुकसान नक्की.

> अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. १००% खरे आहे :-) नव्वदच्या दशकात वय १६ वर्षे असताना कागदी सर्टिफिकेट असणारे शेअर घेतले होते, त्यात रिलायन्स होता. त्यातले काही पैसे लागतील त्यावेळी विकले. उरलेल्याचा परतावा कित्येक पटीत आहे. २००२, २००८, २०२० साली घेतलेले शेअर अजूनही आहेत.

याबाबतीत माझा देखील अनुभव चांगला आहे. शेअर मार्केट मधून पैसा कमविण्यासाठी अभ्यास आणि पैसा दोहोंची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे जास्त अभ्यासासाठी वेळ नाही किंवा गती नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्तम पर्याय आहे.

कागदी परतावा आणि प्रत्यक्ष मिळालेला यात फार फरक असू शकतो, त्यामुळे सतत परतावा पहात राहू नये. त्याने उगाच anxiety शिवाय फार काही मिळत नाही. गरज असेल त्याच वेळी विक्रीच्या अगोदर काही दिवस जरूर पहावा.

म्युचुअल फंड मागच्या १-२ वर्षात स्मॉल कॅप आणि इन्फ्रा फंड्स दोन्ही कॅटेगरी जबरदस्त धावत आहेत. कोणतेही फंड घराणे पहा. खालील दुवा वापरुन आपण एकेक फंड घराणे सिलेक्ट करुन शेवटचा कॉलम सॉर्ट करुन प्रत्येक घराण्याचे टॉप फंड्स बघु शकता. होम अ‍ॅम्फि च्या वेबसाईटवर जाउन कुठल्याही फंडाची नेट अ‍ॅसेट व्हॅल्यु बघु शकता दुवा शेअर्स- खालील प्रत्येक क्षेत्रातील टॉपच्या ३-४ कंपन्या निवडुन त्यात पैसे गुंतवु शकता. आय टी बँक फार्मा एफ एम सी जी एनर्जी शेवटी काय? एफ डी पेक्षा आणि इन्फ्लेशन रेट पेक्षा जास्त परतावा मिळाल्याशी मतलब.(टॅक्स, ब्रोकरेज वगैरे वगळुन)