Welcome to misalpav.com
लेखक: Bhakti | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चांगलं लिहिलं आहे. हे आणि रेव. टिळक यांचेही पुस्तक वाचलं आहे. नगरमध्ये कथोलिक रोमन तसेच अमेरिकन प्रोटेस्टंट दोन्हींचा धर्मप्रसार होता. टिळक बहुतेक अमेरिकन मिशनरींबरोबर होते. त्यामुळे वसईचे फ्रान्सिस दिब्रिटो (कथोलिक) टिळकांचं नावही घेत नाहीत.

चांगली माहिती दिली कंकाका. नगरच्या ह्युम चर्चला जायचं होतं काल बंद ह़ोतं दुपारी.तिथे टिळक आणि ह्युम यांचा मोठा फोटो आहे असं कळलं.तसेच नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात नारायण टिळकांच्या काही वस्तू,ग्रंथ,केस(त्यांच्या सुनेने ते आठवण म्हणून शेवटच्या वेळेस दाढीतून कापून ठेवले होते)पण अजून ते लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध नाहीत.फर्ग्युसन गेट अजून अस्तित्वात नाही.माळीवाड्यात ते राहायचे ते घर पडीक अवस्थेत आहे असे समजले.

लहानपणी मराठीच्या पुस्तकात काही धडे होते. विजया मेहता यांनी स्मृतीचित्रे मधे खुपच सुंदर काम केले आहे. दोन्ही भाग बघीतले. फार दिवस झाले. उजळणी करायला हवी. लेख आणी लिंक साठी आभार.

स्मृतिचित्रे म्हणजे मोठाच खजिना. त्याबद्दल लिहिणे हे दमछाक करणारे ठरेल अशा भीतीने कधी धाडस झाले नाही. त्या काळाचा आल्बमच तो. केवळ टिळक आणि लक्ष्मीबाई यांची कथा नव्हे तर तेव्हाचे समाज जीवन आणि ताणे बाणे सर्वच खूप सुंदर रित्या प्रकट होतात. टिळकांची समाधी आणि इतर फोटोही लेखाशी सुसंगत. हे पुस्तक प्रत्येकाने खरोखर वाचावे. ज्यांना वाचणे शक्य नाही त्यांच्यासाठी अत्यंत स्वच्छ आवाजात वाचन करून ऑडियो बुक करण्याचे सत्कर्म कोणीतरी आंतरजालावर केले आहे. विद्या हर्डीकर सप्रे असे नाव दिसले. डाऊनलोड करून कारमधे गेल्या दहा वर्षांत अनेकदा ऐकले.

त्याबद्दल लिहिणे हे दमछाक करणारे ठरेल अशा भीतीने कधी धाडस झाले नाही. त्या काळाचा आल्बमच तो. केवळ टिळक आणि लक्ष्मीबाई यांची कथा नव्हे तर तेव्हाचे समाज जीवन आणि ताणे बाणे सर्वच खूप सुंदर रित्या प्रकट होतात.
हो, अगदी आता परत लिहिल्यावर वाटतं,त्याकाळच्या पत्र,तार यांचा त्याकाळी किती प्रामुख्याने वापर व्हायचा असे अगणित प्रसंग यात आहेत तेही लिहिणार होते पण विसरले.प्रचंड आवाका आहे या पुस्तकाचा.

शिवाय आपल्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज इतर असंख्य पोरे बाळे, पुतणे भाचे, आश्रित, सांभाळलेले, पाहुणे असे सर्व सदैव घरात ठेवून घेतलेले असणे हे आणखी एक जाणवलेले. अनेक अशा जबाबदाऱ्या हौसेने म्हणा किंवा समाजाची रीत म्हणून म्हणा, घेतलेल्या दिसतात. हे केवळ टिळकांच्या बाबतीत नव्हे तर इतर सर्व कुटुंबात. पेंडसे असोत, खांबेटे असोत, बुटी असोत, ह्युम असोत. कोणाची बायको मेली की त्या पुरुषाने तिची मुले थेट माहेरी / मामाकडे स्वाधीन करून जबाबदारीतून मोकळे होणे हेही रूटीन असावे असे भासले. बायकांना अतिशय नगण्य किंमत हेही सर्वत्र जाणवते. लहान पोरे, ती काहीतरी आजार होऊन मरणे, आणि एकूण व्यक्तीचे मरण हेही फारसे मोठे काही मानले जात नसावे. मनकर्णिका गोखले यांच्या वडिलांना झालेला "सोवळे" असा उल्लेख केलेला मंत्रचळ म्हणजे ओसीडीचा तीव्र नमुना, हे आता वाचताना भेदकपणे जाणवते. पण तेव्हा ते डायग्नोसिस झाले असणे शक्य नाही. ठार वेड सोडले तर अन्य मानसिक आजारांचे तपशील तर तेव्हा लोक पाहतच नसावे. पण त्या ओसीडीमुळे त्या सर्व कुटुंबाने आयुष्यभर किती सोसले ते जाणवते.

शिवाय आपल्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज इतर असंख्य पोरे बाळे, पुतणे भाचे, आश्रित, सांभाळलेले, पाहुणे असे सर्व सदैव घरात ठेवून घेतलेले असणे हे आणखी एक जाणवलेले.
मी तेच सहकार्यांशी डिस्कस केलं, काही दिवस कुरबुरी पण एखाद्यावर प्रसंग आलं की जवळचे दुरचे नातेवाईक,ओळखीचे सगळे बरोबर उभे राहत.
ठार वेड सोडले तर अन्य मानसिक आजारांचे तपशील तर तेव्हा लोक पाहतच नसावे.
विचार करण्यासारखे आहे.

अखेर टिळक लक्ष्मी आणि मुलगा दत्तू यांना आपल्याकडे वळवण्यास यशस्वी झाले.आणि लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने टिळकांच्या सावली झाल्या.बरेच दिवस त्या सोवळ,पूजा चालीरीती पाळायच्या पण आजूबाजूच्या वातावारणामुळे आपसूकच प्रार्थना करू लागल्या आणि त्या आणि दत्तू ख्रिस्ती झाल्या. नवऱ्याने शेण खाल्ले म्हणुन सवता शेण खाणारी लक्ष्मीबाई सारखी बायको सगळ्यांना मिळावी :=)

तुम्ही पुस्तक वाचलेत का? मी हे पुस्तक आणि रेव.टिळकांचंही पुस्तक अशासाठी वाचले की जाणून घ्यायचे होते की त्या काळी काही जणांनी क्रिस्ती धर्म का स्विकारला. मुख्य कारण म्हणजे प्लेग,आणि इतर साथींमध्ये गरीबांचे कुणीच वाली नव्हते. ते काम या मिशनऱ्यांनी उचलले. साहजिकच ते गरीब लोक मिशनऱ्यांना सोडून नाही गेले. आमच्या इथल्या धनाढ्य लोकांनी अधुनमधून गावजेवणे. घालण्यापलीकडे काही केले नाही.

+१ हो प्लेग व इतर साथीचे रोग उद्रेक दर तीस चाळीस पानांतर परत परत येतात.

कृपया लक्षात घ्या ही वाक्य पुस्तकातील नाही,हे माझ़ं आकलन आहे, पुस्तक वाचून आपलं मतं नक्की द्या.

नवऱ्याने शेण खाल्ले म्हणुन सवता शेण खाणारी लक्ष्मीबाई सारखी बायको सगळ्यांना मिळावी :=)
आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ !

आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ ! युपीच्या एका तहसीलदाराने बायकोच्या सांगण्यावरून इस्लाम स्विकारला. ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव.

अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.” +१ हायेत आपलेच काही बावळट ज्यांना असल्या लोकांचे कौतुक आहे :=)

अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.” या बद्दल काय बोलता?

वरचा प्रतिसाद गांडला :=) ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव. +१

अवांतर : स्मृतिचित्रे उत्तम साहित्य आहे यांत शंका नाही. मात्र आजची परिस्थिती पाहता काही प्रश्न उत्पन्न होतात. ०१. येशूची भक्ती करायला धर्म बदलून ख्रिश्चन का व्हायला पाहिजे? पाण्यांत डुबकी मारायची गरज काय मुळातून? ०२. येशूचा/ची भक्त झाल्यावर मुडदा पुरायला हवाच का? जाळून नाही का टाकता येणार? मुडदे पुरायला सतत जागा कुठून मिळणार? ०३. येशूची भक्ती करण्यासाठी पोपची चमचेगिरी आवश्यक आहे का? असल्यास का बरं? नसल्यास का नाही? ०४. रशियन स्वत:स ख्रिश्चन म्हणवून घेतात पण ते पोपचे विरोधक आहेत. ते खरे ख्रिश्चन मानावेत का? ०५. ख्रिस्ती ( इंग्रजीत ख्रिश्चन ) म्हणजे नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे ख्रिस्तावर ज्यांचा विश्वास आहे ते सारे ख्रिस्ती आहेत. ख्रिस्त म्हणजे मराठीत तारणहार. येशू हाच आमचा तारणहार अशी सक्ती आहे का? माझा तारणहार कल्की असेल तर मी स्वत:स ख्रिस्ती म्हणून घोषित करू शकतो का? पोपला कदाचित आवडणार नाही. पण त्याला विचारतोय कोण ! ०६. समजा मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो. ही फार मोठी प्रगती आहे. माझं कोणी माझं अभिनंदन व सत्कार वगैरे करेल का? त्यातनं मला पैसे मिळतील का? मिळाले तर ते घ्यावेत का? की इतर कोणास दान वगैरे करावेत? ०७. 'तू तर माझ्याही पुढे गेलीस' असं रेव्हरंट टिळक लक्ष्मीबाईंना म्हणाले होते. मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो, तर मी कुणास मागे टाकून पुढे गेलो? माझ्या प्रगतीची दिशा काय? पोपची चमचेगिरी झुगारून दिली म्हणून माझा आदरसत्कार कोणी करेल काय? ०८. पोप पैसे कशाला मागतो? मी ख्रिस्ती झालो तर मला पैसे भरावे लागतील काय? ते न भरले तर मी परत अख्रिस्ती होईन काय? मला सुलभ हप्त्यांवर ख्रिश्चन होता येईल काय? हल्ली Subscription Based Model बरंच लोकप्रिय आहे. तशा धर्तीवर ख्रिस्तीपणाचं सदस्यत्व मिळेल काय? कंटाळा आल्यास बंद करता येईल. लक्ष्मीबाई व रेव्हरंट टिळकांनी उगीच इतका खटाटोप केला. ०९. जर सुलभ हप्त्यांवर ख्रिस्ती होता आलं आणि मी ती योजना बंद केली तर पूर्वी भरलेले पैसे पोप मला परत करेल काय? आयुर्विम्याची पॉलिसी मध्येच रद्द केल्यास एलायसी परत करते म्हणे. पोप माझ्या पैशांचं काय करेल? हडप करेल काय? काही वर्षांपूर्वी व्हाटिकन आपल्या पैशांचा हिशोब जाहीर करणार म्हणून राट्झिंगर पोपने घोषणा केली होती. पण इथे https://www.vatican.va तर तसं काही दिसंत नाही. पोप माझ्या पैशाचं काय करेल? इतरांना बाटवण्यासाठी तर वापरणार नाही? १०. इतरांना बाटवण्यासाठी जर माझा पैसा वापरला जाणार असेल, तर मी निषेध कुठे नोंदवायचा? की मलाही या अफरातफरीत सामील व्हावं लागेल? तसं झाल्यास पोपची ख्रिश्चानिटी ही खरंतर एक अॅमवे पिरामिड सारखी पॉन्झी स्कीम म्हणायची. असो. असे बरेच प्रश्न आहेत. पण तूर्तास इतकं पुरे. यथावकाश बायबल व पोपवरील प्रश्न बाहेर काढेन. -नाठाळ नठ्या टीप : एक रोचक इंग्रजी लेख सापडला : https://www.catholicnewsagency.com/news/33788/suspended-audit-reveals-power-struggle-at-the-vatican मला या मारामारीत भाग घेता येईल काय?

खूप छान लिहिलंय भक्तीताई तुम्ही. स्मृतिचित्रांचा पट किती मोठा आहे आणि तुम्ही तुमच्या लेखात तो खूप छान मांडला आहे. स्मृतिचित्रात लक्ष्मीबाईनी राहुरीत जो काळ घालवला तो त्यांच्या दृष्टीने सर्वात सुखाचा असेल असे मला वाटते. शिर्डीला जाताना नगर आणि राहुरी लागले की लक्ष्मीबाईंची आठवण येतेच. टिळक ख्रिस्ती का झाले हा प्रश्न खूप जणांना पडतो, स्मृतिचित्रे वाचून जे मला समजले ते असे की टिळक आणि त्यांचा लहान भाऊ ह्यांचे स्वभावच वेगळे होते. टिळकांना प्रत्येक वर्गातील गरजू लोकांचा कळवळा होता, त्यांना त्यांची मदत करायची इच्छा असायची पण त्या काळातील एकूणच जातिभेदाचा विचार करता त्यांना ते प्राप्त परिस्थितीत शक्य होत नव्हते त्यामुळे ते ख्रिस्ती झाले. टिळकांचे ख्रिस्ती होणे आणि इतर लोकांचे ख्रिस्ती होणे यात कायमच फरक दिसत राहतो. लक्ष्मीबाई तरी कुठे जातिभेदाच्या विचारापासून एकदम सुटल्या? आणि त्याची साद्यंत वर्णनेही त्या सांगतात. सोवळा झालेल्या बापाची मुलगी मनू ते प्लेगच्या रुग्णांची स्वच्छता करणाऱ्या लक्ष्मीबाई हा प्रवास थक्क करणारा आहे. स्मृतिचित्रात नागपूरचे बुटी भेटतात, बालकवी येतात आणि नाव उघड न होता (बहुधा) दासगणू महाराज ही येतात. मराठी आत्मचरित्रातील सर्वात प्रांजळ आणि उत्तम लिहिलेले असे हे संग्राह्य पुस्तक आहे.