Welcome to misalpav.com
लेखक: Bhakti | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हो, खुपच अवर्णनीय आहे हरिश्चंद्रगड:)

Bhakti, वर्णन छान आहे. गडही मस्तंय. प्रेमात पाडणारा डोंगर आहे. नीट सुरक्षितपणे फिरलं तर अविस्मरणीय अनुभव आहे. मी अनेकदा गेलोय. -नाठाळ नठ्या

थोडक्यात पण उत्तम लिहिलंय. पाचनई वाटेने कधीच गेलो नाहीये अजून, टोलार खिंडीमार्गानेच आत्तापर्यन्त दोन तीनदा जाणे झालेय.
लेखक: Bhakti वेळ: गुरुवार, 01/18/2024 - 06:30 Permalink

टोलार खिंड म्हणजे पुण्याकडून जवळ खिरेश्वर का की ते व्याघ्र शिल्प लिहिले ती वाट? अ

कल्याण किवा पुण्याहुन येताना खुबी फाटा लागतो तिथे खिरेश्वर गाव आहे. तिथुन पुढे आल्यावर टोलार खिंड लागते जिथे व्याघ्र शिल्प आहे. परंतु पाचनई हुन येणारा मार्ग सुद्धा टोलार खिंडीतच येतो. त्यामुळे व्याघ्र शिल्प दिसतेच. (तिथुन वर जाताना रेलिंग लावले आहेत.) बाकी माकड नाळ कोकण कड्याच्या उजव्या कुशीतुन तर नळीची वाट डाव्या कुशीतुन वर येते. साधले घाट नक्की माहीत नाही त्यामुळॅ माझा पास. मी हरीश्चंद्र गड खिरेश्वर मार्गे आणि नळीच्या वाटेने केलाय, पण ईतर मार्गे नाही जाहीरात https://www.misalpav.com/node/33956

हरिश्चंद्रगडला जाणं नेहमीचं आनंददायक असतं. पुण्या-मुंबईकडून येणारे बहुतेक ट्रेकर्स, पिंपळगांव जोगा धरणाच्या भरावाच्या जवळून येणाऱ्या रस्त्याने, खुबी फाट्याने खिरेश्वरमार्गे टोलारखिंडीतून वर चढून येतात, खिंडीतील व्याघ्रशिल्पाजवळून वरच्या बाजूला मंदिराकडे जाणारी वाट आहे. इथे आता रेलिंग्ज लावलेले आहेत. पाचनई वाटेच्या तुलनेत ही वाट जरा आव्हानात्मक आहे. पलीकडील कोथळे गावातून येणारी एक वाट ही टोलार खिंडीतच व्याघ्र शिल्पाजवळ खिरेश्वरवरून येणाऱ्या वाटेला मिळते. गर्दीचं म्हणाल तर वीकएंड टाळून गेलात तर जवळपास निर्मनुष्य असा गड पाहण्याची संधी मिळू शकते....

आम्ही अनेक वर्षांपूर्वी (१९८३) गेलो होतो तेंव्हा तर रेलिंग देखील नव्हते. त्यामुळे खाली उतरताना चित्तथरारक अनुभव होता. बसुन बसुन उतरलो. खाली बघितलं तर डोळे फिरत होते.