Welcome to misalpav.com
लेखक: चित्रगुप्त | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍 (काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)
रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.
+१००० मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन. . .

सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे. धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते) Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो. या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे: https://archive.org/details/artillusionstud00gomb

Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत. रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत. पुभाप्र

केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.
-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली. St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa. इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती! अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत. येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

सुंदर लेख ! दोन प्रश्न १. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ? २. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ? अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही. त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर. या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात. जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

कवीवर्य बोरकर आठवले. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा सुंदर.

क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान ! रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !
या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.
बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं ! व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय ! कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे ! Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर ! रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !
- अस्मादिक.
ह्यो फोटो लै पेशल !
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
हा हा हा

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो! सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं. येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

लेख आणि फोटो - दोन्ही खासच! (काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो. मन खूष झालं. असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका _/\_

अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे: माहिती खालील ठिकाणी: सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर चित्रगुप्तजी, हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.