तुमचे लेख वाचणे म्हणजे पर्वणी असते. खूप दिवसांनी लिहिते झालात. फ्रेंच राज्यक्रांती फक्त शालेय पुस्तकातून वाचली होती. गिलोटीन म्हणजे शिक्षेचा अत्यंत भीषण प्रकार.
क्रूसेड्सवरील लेखमालेची आतुरतेने वाट पाहात आहे.
प्रचेतसशी सहमत
इतिहासातील अशा ज्ञात गोष्टी म्हणजे हिमनगाचे टोक.
दुर्दैवी, अद्भुत, रोमांचक, वीरश्रीपूर्ण सर्वच भावना. तुमच्या युध्दविषयक लेख, लेखमालांमधून पण वेळोवेळी हे दिसून आलेच आहे.
फ्रेंच राज्यक्रांती हा तद्दन भिकारखोट प्रकार आहे. ती कसलीही क्रांतीबिंती नव्हती. रॉबेस्पियर हा पराकोटीचा हलकट इसम होता. त्यास फुकटचा डोक्यावर चढवून ठेवला आहे. हा केवळ खऱ्या देश्प्रेमीना एकत्र आणून त्यांचा विश्वासघात करण्यासाठी नेमलेला चमचा होता. त्याने ते घृणास्पद काम चोखपणे बजावलं. सुमारे १३० वर्षांनंतर ( इ.स. १९२० नंतर ) लेनिन व स्टालिन यांनीही अशीच कुकर्मे केली.
बॅस्टिलचा तुरुंग फोडणे ही फ्रेंच राज्यक्रांतीतली एक महत्त्वाची घटना मानली जाते. तो फोडून म्हणे क्रांतीकारकांना मुक्त केलं. प्रत्यक्षात त्याच्यात फक्त सहासात बेवडे पब्लिक भरले होते. ही म्हणे क्रांतीची सुरुवात. बोंबला तिच्यायला.
इ.स. १७८९ च्या या तथाकथित क्रांतीनंतर फ्रेंच सत्ता दुर्बल व खिळखिळी झाली. तिला सावरलं ते नंतर १७९९ साली नेपोलियनने. तो पण १८१२ साली मोडीत निघाला. तदोपरांत फ्रेंच सत्ता परत राजेशाहीच्या मार्गाने स्थैर्याकडे वळली. यांस बर्बन घरवापसी ( Bourbon Restoration ) म्हणतात. १७८९ च्या क्रांतीचा मागमूसही उरला नाही. युरोपातली फ्रेंच सत्ता दुर्बळ झाली. क्रांतीच्या बापाचं काय जातंय म्हणा.
फ्रेंच क्रांतीच्या वेळेस चौथा जॉर्ज ब्रिटनचा राजा होता. त्याने बऱ्याच काड्या घातल्या म्हणतात. या क्रांतीमुळे इंग्रजांचं चांगलंच फावलं. आठवतंय पानिपतामुळे बंगालात इंग्रज कसे माजले ते? पुढे १८४० च्या आसपास व्हिक्टोरियन युग सुरू झालं आणि इंग्रज युरोपातले एक अतिप्रबळ सत्ताधारी बनले ( पहिल्या एलिझाबेथ पासून प्रबळ होतेच ).
-नाठाळ नठ्या
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत
फ्रेंच राज्यक्रांती आणि एकूणच डाव्या विचारसरणीमागचे भयावह वास्तव जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकात अभिजित जोग यांनी यथार्थ वर्णित केले आहे.
उत्सुकांना वाचण्याची शिफारस करतो.
या आधीचा प्रतिसाद फारच उथळ वाटला, पण तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशी १००% सहमत. या पुस्तकाचे शिर्षक खरोखरच समर्पक आहे... ही डावी वाळवी वेळेवर नष्ट केलीच पाहिजे यात शंका नाही...
जयंत कुलकर्णी,
माझा आधीचा प्रतिसाद तिच्यायला घंट्याची राज्यक्रांती हा तुम्हांस उथळ वाटला. ते बरोबर आहे. त्यामुळे सखोल प्रतिसाद लिहितो.
फ्रेंच राज्यक्रांती ही स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांच्या प्रस्थापनाची हिरीरीने लढली गेलेली लढाई असल्याचं एक रोम्यांटिक चित्रं रंगवण्यात येतं. ही खरंतर इंग्रजांनी पसरवलेली भूलथाप आहे. फ्रेंच सत्ता खिळखिळी झाल्यामुळे इंग्रजांचं भलं झालं. ते सहजिकंच क्रांतीला डोक्यावर घेऊन नाचणार. आपण भारतीयांनी काहीतरी शिकायला हवं ना त्यातनं? काय शिकायचं बरं?
फ्रान्स जावो खड्ड्यात पण क्रांती यशस्वी दिसली पाहिजे, असा जो दृष्टीकोन आहे तोच नेमका भारतातही जोपासला जात होता. तुकडेतुकडे होऊन भारत जावो खड्ड्यात पण अहिंसा जिंकली पाहिजे. हाच तो देशबुडवा दृष्टीकोन. तो म्ल मोडीत काढणं अत्यावश्यक वाटतं.
माझं म्हणणं सविस्तर मांडण्याची संधी दिलीत याबद्दल आभारी आहे. :-)
-नाठाळ नठ्या
नमस्कार!
फ्रान्स खड्ड्यात जावो पण्.... हा दृष्टिकोन डाव्यांचा आहे. भारत खड्ड्यात जावो पण अहिंसा नामक भ्रम जपला पाहिजे हा दृष्टिकोन डाव्यांनी/आणि नंतर काँग्रेसने व समाजवाद्यांनी व तथाकथित उदारमतवाद्यांनी जपला, पण या सगळ्यामागे अस्तित्वाची लढाई लढणारे डावेच आहेत यात माझ्या मनात शंका नाही. ( WOKE) माझ्या पुस्तकात शेवटी चांगल्या हेतूंचा कसा बोजवारा उडतो हे मी लिहिले आहे. या पुस्तकात त्या घटनेत जे नायक होते, त्यांच्या चरित्रातून उलगडत जाणारा इतिहास लिहिला आहे. असो. जेव्हा हे पुस्त छापले जाईल तेव्हा जरूर वाचावे. (ही पुस्तकाची जाहिरात नाही. वाचले नाहीत तरी चालेल)
मला वाटतं विचारसरणींचा समतोल बिघडला की ज्या विचारसरणीवर / किंवा समाजाच्या वर्गावर जुलूम झालाय ती विचारसरणी/वर्ग उफाळून विरोध करतो मला वाटते हे नैसर्गिक असावे.. जेव्हा सारासार विचार करणारा समाज या मंथनातून निर्माण होतो तेव्हाच शांतता प्रस्थापित होते. मी डाव्यांच्या विरोधात आहे पण फ्रेंच राज्यक्रांतीआधी फ्रान्समध्ये काय परिस्थिती होती हे आपल्या येथे कल्पना नाही. उदा. वरील एका प्रतिसादात रॉबेस्पियर हा एक हलकट माणूस होता असे विधान केले आहे. हे विधान त्या माणसाबद्दल पुरेसे वाचन केल्याने झाले आहे असे मला वाटते. त्याला " द अनकरप्टिबल '' या नावाने ओळखत आणि ते खरे आहे. असो. हे निसर्गचक्र आहे आणि जोपर्यंत स्वत: परमेश्र्वर समानता प्रस्थापित करत नाही तोपर्यंत फिरतच राहणार... अर्थात ही माझी मते आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मतांचा आदर आहेच..
जयंतराव,
उथळ प्रतिसादाबद्दल पहिल्याप्रथम तुमची क्षमा मागतो. तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहित आहात, ही माहिती नजरेतून निसटली. ज्या विषयाचा तुम्ही इतक्या कसोशीने शोध घेत आहात त्याबद्दल मी उथळ भाषा टाळायला हवी होती. तर मला जे सांगायचंय ते वेगळ्या शब्दांत मांडतो.
त्याचं काय आहे की फ्रेंच राज्यक्रांतीमुळे नेमका कोणाचा फायदा झाला हा एक प्रश्नंच आहे. तुम्ही वर जे म्हंटलंय की ... समाजाच्या वर्गावर जुलूम झालाय ती विचारसरणी/वर्ग उफाळून विरोध करतो ..., तर हाच न्याय क्रांतीलाही लावता येईल.
मला म्हणायचंय की जर सोळाव्या लुई राजाच्या दडपशाहीपायी लोकं उफाळली असतील, तर क्रांतीनंतर सगळं आलबेल व्हायला हवं होतं. पण प्रत्यक्षात लोकं तितकीच, नव्हे अधिकंच वैतागली. त्यातनं पुढे नागरी युद्ध ( French Civil War ) सुरू झालं. क्रांतीच्या विरोधात उभारलेलं व्हेंडेईचं बंड ( War in the Vendée ) फारंच गाजलं.
याचा अर्थ क्रांतीच्या नावाखाली अजालुक ( अत्याचार, जाळपोळ, लुटालूट, कत्तली ) चालल्या असाव्यात. या लेखावरनं ही शंका फारंच बळावते : https://www.worldhistory.org/War_in_the_Vendee/
तेव्हा, या क्रांतीची दुसरी बाजू काय आहे हे ही तपासून घ्यायला हवं. बाकी, रॉबेस्पियरने सदर पत्राच्या लेखकाचा विश्वासघात केलाय असं लेखक म्हणजे डिमुलां स्वत:च म्हणतोय. थोडी उकराउकार केली तर रॉबेस्पियरने असंख्य लोकांना ठार मारल्याचे दावे मिळाले. ऑक्सिजनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ आंतवा लव्हॉईझिये याला गिलोटिनखाली रॉबेस्पियरनेच धाडला.
मग रॉबेस्पियरची विश्वासार्हता काय राहिली? त्याला अस्खलनशील, अभ्रष्ट वगैरे मानतात ते त्याच्या कंपूतले लोक आहेत. त्यांनाही जीवाची भीती आहेच. रॉबेस्पियरला जर क्रांतिकारक मानलं तर नक्षलवादीही क्रांतिकारक धरावेत का? क्रांती म्हणजे नेमकं काय आणि त्यातनं पुढे नागरी युद्ध का सुरु होतं, हे दोन कळीचे प्रश्न आहेत. त्यांचा वेध घेता आला तर पहा, म्हणून सुचवेन.
-नाठाळ नठ्या
अरेच्या क्षमा कसली मागताय?..
मला एवढेच म्हणायचे आहे की कुठल्याही तत्त्वाचा अतिरेक झाला की त्याची जागा दुसरे तत्त्व घेते.. यात जो संघर्ष उडतो त्यात या असल्या गोष्टी घडतात. मी डिव्हाईन कॉमेडीचे भाषांतर केले आहे.. त्याची कथा आपल्याला माहीत असेलच.. त्यात सारासार विचार न करणाऱ्या माणसांना नरकात जागा दिली आहे. उरला प्रश्र्न दुसरी बाजू.. माझ्या पुस्तकात राजेशाहीने केलेले सामान्य जनतेवर केलेले अत्याचार, सामान्य माणसांनी सामान्य माणसांवर केलेले अत्याचार, क्रांतीकारकांवर केलेले अत्याचार, क्रांतिकारकांनी केलेले अत्याचार इ इ सगळ्याचा वेध घेतला आहे. (त्यात व्हेन्डीचे अत्याचारही आहेत..:-)
असो.. धन्यवाद !
जयंतराव,
तुम्ही ज्यास तत्त्वाचा अतिरेक म्हणता ते तसं नसून मुद्दम घडवून आलेलं कपट कारस्थान वाटतं. अन्यथा क्रांतीमुळे नागरी युद्ध भडकण्याचं कारण काय मुळातून?
-नाठाळ नठ्या
प्रतिक्रिया
तुमचे लेख वाचणे म्हणजे पर्वणी
प्रचेतसशी सहमत
तिच्यायला घंट्याची राज्यक्रांती
फ्रेंच राज्यक्रांती
या आधीचा प्रतिसाद फारच उथळ
आहेच उथळ तो ....
नमस्कार!
फ्रान्स मधील महागाई पाहून
मला वाटतं विचारसरणींचा समतोल
याच्या उलटे उदाहरण म्हण्जे
जयंत कुलकर्णी यांच्याकडे क्षमायाचना
तुम्ही मनमोकळे
तुम्ही मनमोकळे दिसता..
चूक झाली की....
अरेच्या क्षमा कसली मागताय?..
तत्त्वाचा अतिरेक की कारस्थान
म्हणजेच कुठल्यातरी विचारांचा