पैजारबुवा, लेख वाचला आणि आजचा दिवस आनंदमय झाला. धन्यवाद.
मला तर वाटतं ही प्रत्येकच विपश्यना केंद्राची गोष्ट असावी. विलासराव सरांना आवर्जून भेटलो आहे आणि त्यांचा ध्यास पाहिला आहे. ते धम्माच्या मार्गावरून वेगात चाललेले आहेत.
थोडीफार अशीच गोष्ट आहे मिरजेजवळच्या भोसे येथील धम्मसुगंध या केंद्राची. माझे आदरणीय मित्र कै. शितल मुळे हे असेच त्या कामासाठी झपाटलेले होते. त्यांच्याकडून अनेक धम्मसेवकांच्या प्रयत्न व तळमळीतून हे असे काम कसकसे आकाराला आले, ते ऐकत व पहात आलो. एकेक अनुभव ऐकण्यासारखे. हे सर्व करताना कुठेही मुल्यांशी तडजोड नाही. पैसे, संस्थांच्या, शासकीय परवानग्यांच्या कामात अपरिहार्यपणे येणारा भ्रष्टाचार याचा लवलेशही तिकडे नाही. शिवाय आपण भव्य काहीतरी करत आहोत, किंवा गोयंका गुरूजींची महती वगैरे असला काही तद्दन कल्टचा प्रकार नाही. एकदम शुध्द काम. यामुळे अनेक लोकांच्या जीवनाला वेगळे, नैतिक वळण लागावे, याच शुभेच्छा.
पैजारबुवा,
धम्मपठार केंद्र सुरू झाले आणि तुम्ही तिथे एक दिवसाचे शिबीर करून आलात हे वाचून फार आनंद झाला आहे.
छान ओघवत्या लेखात मिपाऐतिहासिक रेफरंसेस देत केंद्राबद्दलची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद, खासकरून फोटोबद्दल.
पुढच्या भारत दौऱ्यात केंद्राला भेट देण्याचा मानस आहे.
भवतु सब्ब मंगलम्
- (साधक) सोकाजी
मस्तच, विलासराव आणि बाकी टीम म्हणजे या काळातले भगीरथच म्हणायला हवे.
इतका ध्यास आणि एका ध्येयाने प्रेरीत होऊन काम करत आहेत.
विलासरावांचा फोटो दिसला नाही वर?
अतिशय कौतुकास्पद !!!
विलासराव यांच्या कडून फार मोठे कार्य घडले आहे.
आगामी वर्षांत धम्मपठारचा विशाल वटवृक्ष होणार या त का ही वाद नाही.
हार्दिक शुभेच्छा !
या निमित्त विलासराव लिखित अद्भुत मिपा हिट मालिका : आमची पहिली परदेशवारी
विपश्यना, ध्यान, साधना, अध्यात्म वगैरे माझे क्षेत्र नाही, त्यामुळे त्यावर काही बोलण्याचा मला अधिकार नाही!
परंतु,
"समान शीले व्यसनेषु सख्यम" या उक्ती प्रमाणे या वेडसर माणसा भोवती मग तशीच वेडसर माणसे गोळा झाली तर काही नवल नाही."
+१०००
एका 'अर्थ-सामाजिक' संकल्पनेवर आधारित असलेला भव्य उपक्रम तडीस नेण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या अशाच काही 'ध्येय वेड्यांच्या' सहवासात गेल्या काही वर्षांपासून असल्याने विलासरावांचे हे 'ध्येय वेड' कसे आणि किती सकारात्मक विचारांतून आलेले असते हे चांगलेच माहिती असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे 🙏
लेख आणि फोटोज छान!
टर्मीनेटर (मोदी का परीवार)
कारण अशा विषयांवर कारण नसतांना गरळ ओकणारे तथाकथित पुरोगामी विज्ञानवादीच असतात.
नाही पटत?
हे बघा... एक स्वतःला विज्ञानवादी समजणारे महाशय काय लेख लिहितात ते पहा इथे क्लिक करा
या लेखावरील प्रतिक्रिया वाचनीय आणि मननीय आहेत. हे महाशय सोईस्कर नसलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत.
बरे हे असु द्या. हिंदूंबर दिसेल तिथे तोंडसुख घेणारे हे महाशय मुस्लिम धर्म, सुफी परंपरा आल्या की अगदी भावुक होतात.. इतके की हिंदू सुद्धा राम, कृष्णासाठी होत नाही.
नाही पटत ? हे बघा ... क्लिक करा
असले हे स्वतःला पुरोगामी समजणारे पण प्रत्यक्षात जे काही हिंदू, भारतीय असेल त्याचा द्वेष करणारे महानुभाव !!! हल्ली असली मंडळी आयुर्वेदाला शिव्या देत असतात.
पैजारबुवां सारखे लोक मिपाचे आधारस्तंभ आहेत.त्यांच्या मुळे विलासराव यांच्या बद्दल समजले. मी ही नगरीच,पण माहित नव्हते. आता नक्कीच भेटायचा प्रयत्न करणार.
मलाही गोयन्कांची सर्व लेक्चर्स आवडतात,व इगतपुरीला जायचा मानस आहे. मी नक्की शिंदे साहेबांना भेटणार.
बघू कधी योग येतो.
या केंद्राचा अथः पासून इतिपर्यंतचा प्रवास विलासरावांकडूनच पाह्यला आहे. विलासराव म्हणजे खरोखरच धेय्याने झपाटलेला माणूस! गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहतोय, त्यांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, 'धम्मपठार आणि तिथले विपश्यना केंद्र' हा त्यांच्या धेय्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
प्रतिक्रिया
अतिशय कौतुकास्पद कामगिरी
माहिती बद्दल धन्यवाद ...
अद्भुत! आता "काय 'ध्यान' आहे!
उत्तम माहिती. विलासराव, माऊ
आनंदच आनंद
शुभेच्छा!
पैजारबुवा,
मस्तच, विलासराव आणि बाकी टीम
अतिशय कौतुकास्पद !!!
विपश्यना, ध्यान, साधना, अध्यात्म
लगे रहो
लेख आवडला. कार्य ही आवडले.
जळी स्थळी काषिटी पाषाणी
आपल्या आरोग्याची काळजी घेणारा
कारण अशा विषयांवर कारण
नानावटींचे लेख छान आहेत
सुंदर
या केंद्राचा अथः पासून
हा लेख लिहून उत्तम केलेत.
धम्मपठार मेडीटेशन हॉल
धम्मपठार - काही नवे फोटो- सौजन्य विलास्राव
धन्यवाद.
अन हा व्हिडो