Welcome to misalpav.com
लेखक: Bhakti | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नगरमध्ये मी जवळपास बावीस वर्ष होतो. पण तिथे पंचक्रोशीत वृद्धेश्वर, नेवासा, राशीनची दीपमाळ, सौताड्याचा धबधबा अशा मोजक्याच जागांची माहिती होती. निघोजचे रांजण घळगे, सांधण घळ वगैरे जागा आता आता लोकप्रिय व्हायला लागल्या आहेत. जाता जाता: पुरातन दगडी वास्तूंना ऑइल पेंट फासण्यावर कायदेशीर बंदी आणावी असे वाटते.

सांधण दरीत पहिल्यांदा १४/१५ वर्षांपूर्वी गेलो होतो, तेव्हा ती कुणाला माहितीदेखील नव्हती, अगदी निर्जन परिसर होता, आता मात्र जनता असते.

छोट्याछोट्या गावातून इतीहास बघायला मिळतो. फक्त दृष्टी आणी इच्छा हवी. लागली सुट्टी की चला उटी, चला काश्मीर पण आजूबाजूस किती वैभव आहे ते मात्र माहित नसते. आवडले.

करेक्ट दृष्टी आणि इच्छा हवी.मागच्या दोन आठवड्यात पूर्वी हत्ती बारव पाहिली.किती तरी वर्ष रोज या रोडने जायचे पण कधीच थांबून पाहिले नव्हते कारण दृष्टीकोनच नव्हता इतिहास आसपास पासून सुरू करावा.आज ब्राह्मणी बारव पाहायला आले हे बहिणीला सांगितले तर तू काय आता बारव रिसर्च करतेय का तिने विचारले (हा हा ;))

छान लिहिलंय, बारवेच्या एकूण स्थापत्यशैलीवरून तसेच खोलेश्वर ह्या मंदिराच्या नावावरून ही बारव तसेच मंदिर ह्यांचा काळ १३व्या शतकातला असावा असे वाटते. सिंघण यादवाचा पराक्रमी सेनापती खोलेश्वर हा होता व त्याने पुष्कळ मंदिरेदेखील बांधली होती. बारव आणि त्याच्या काठावरील मंदिर अगदी अशाच प्रकारची रचना लोणी भापकर येथेही दिसते.