अरे वा!! मस्त सहल आहे.
मीं २०१९ डिसेंबरात बंगलोर-मैसुर-बांदीपुर-कूर्ग-बंगलोर अशी सहल केली होती. ईथे मडीकेरी नाव बघुन जरा बुचकळ्यात पडलो, पण मग वाचताना खुलासा झाला. ओंकारेश्वर मंदिर ग्रहणामुळे बंद होते, पण राजाज सीट आणि ईतर ठिकाणे बघितली. किल्ला बघितला नाही, कदाचित ट्रुरिस्ट कारवाले त्यात फारसे ईंटरेस्टेड नसावेत किवा पर्यट्कांचे अनुभव बघुन त्यानी टाळला असेल. बस/ट्रेन करत जायचे तर नीट माहीती पाहीजे आणि हाताशी जरा वेळ हवा, म्हणजे एखाद दिवस ईकडे तिकडे झाला तरी चालतो. एकदा स्वतःच्या गाडीने कोस्टल कर्नाट्क करायची ईच्छा परत बळावली. फक्त २-३ ड्रायव्हर पाहीजेत, म्हणजे एकावरच ताण येणार नाही.
मस्त एकदम. फोटो आणि नेमके आणि नेटके वर्णन आवडले.
शाकाहारी जेवणाची वाट कोकणात देखील लागलेली आढळते, अपवाद वगळता सर्वत्र कोबीची भाजी, चवळी किंवा वाटाणा उसळ असेच खायला मिळते.
मडिकेरीचा किल्याची निगा उत्तम राखलेली दिसते. नुनिझने केलेल्या विजयनगरच्या वर्णनात बहुधा मडिकेरीचा उल्लेख आहे.
हे ठिकाण निवास आणि जेवण यासाठी ठीकठाक वाटले. मडीकेरीच्या मुख्य बाजारात उडुपी द व्हेज हे एक चांगले उपहारगृह वाटले.
मयुरा व्हॅली व्ह्यू आणि कर्नाटक सरकारची इतरही ठिकाणची पर्यटक निवासी संकुल चांगली असतात. त्यांना अतिशय मोक्याची जागा मिळते जी सहसा खाजगी व्यावसायिकांना मिळण्याची शक्यता नसते. हीच स्थिती इतरही राज्यात असते ज्यामुळे बऱ्याच वेळा जुने प्रशस्त बंगले निवासासाठी मिळू शकतात.
व्वा सुंदर भटकंती आणि प्रचि !
माहिती दिलीय उसका का तो जवाब नहीं !
कुर्ग ची चार वर्षांपुर्वी ही सहल केली होती.
बहुतेक सर्व स्थळे पाहिली होती.
तळकावेरीचे मंदिर अप्रतिम आहे !
राजा बैठक बेहद्द्द आवडली मला !
इथंनं सुर्यास्त पाहणं फारच सोयीस्कर आहे !
(महाबळेश्वरचा सनसेट पॉइन्ट टुकार वाटला मला)
इथून पाहिलेला खूप आनंददायी आणि संस्मरणीय वाट्ला मला !
कुर्ग अ थ वा कोडगू बेस्ट आहे फिरायला !
धन्यवाद, कंजूस जी !
माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः, पत्नी, दोन अपत्ये असं तीन-चार दिवस फिरण्याचा प्लॅन आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाण्यासाठी मैसूर कूर्ग मेंगलोर मुर्डेश्वर हे ठीक राहील का?
बेंगलोरच्या आसपास आणि परत बेंगलोरला परत जाणे असेल तर ....
मैसूर कूर्ग मेंगलोर मुर्डेश्वर या ठिकाणांपैकी मुर्डेश्वर आणि जमल्यास गोकर्ण प्रथम पाहावे. कारण पावसाळा तोंडावरच आहे. ही ठिकाणे समुद्राकाठी असून किनाऱ्याची मजा घेता येईल. मैसूर , कूर्ग हे बेंगलोरपासून (१२०+१२० किमी) असल्याने आणि तेवढ्याच उंचीवर (१०००मिटर्स) असल्याने फारसा फरक नाही वातावरणात फारसा फरक नाही.
कूर्ग बघण्यापेक्षा तिकडे दोन तीन दिवस रेंगाळणे अधिक आवडेल.
माझ्या मते ३-४ दिवसात ही चार ठिकाणे म्हणजे धावपळ होईल.... कारण तुमच्या सोबत कुटूंब आहे... त्यापेक्षा आता २ च ठिकाणे फिरा, पुढच्या वेळी उरलेली २ .. या मुळं व्यवस्थित वेळ देऊन बघता हिंडता येईल. फार धावपळ आणि काटेकोर वेळापत्रक यामुळं सहलीचा नीट आनंद घेता येत नाही !
लहान मुलांसाठी 'activity' देणारी ठिकाणं म्हटली तर.....
मैसुरूचा झू.
समुद्र किनारे ( मुर्डेश्वर/ गोकर्ण - पाच किनारे/उडुपी- माल्पे,काउप आणि मट्टू. )बाकी मुर्डेश्वरच्या पुतळ्यांत गंमत फारशी नाही. एकवीस मजली गोपुराचे आकर्षणही कमी होत आहे. कारण विविध शहरांत २५-४० मजली इमारती उभ्या राहतात आहेत.
बरेचदा असं होतं की हवे असलेले माहितीचे विडिओ इंग्रजी/हिंदी/ मराठीत असतातच असे नाही.
इतर भाषांत शोधावे लागतात. असाच एक DR BRO चानेल आहे . या मुलाने कन्नडामध्ये सुरू केलं आणि आता तो इंग्रजी सबटायटलही टाकतो. त्याचं वय आणि उत्साहामुळे खूप चांगले कंटेंट असते. पर्यटन चानेलच्या बाबतीत यूट्यूबरचे वय परिणाम करते.
अरे वा. छान भटकंती करत आहात. (एक प्रश्नः तुम्ही एकटे प्रवास करता किंवा कसे ?)
उतरत्या कौलारू छपरांची घरे हल्लीच्या शहरांमधे उरलेली दिसत नाहीत. मला ती फार आवडतात. त्यात एक कलात्मकता वाटते. तुम्ही फिरलात त्या भागात तशी घरे पुष्कळ असावीतसे फोटोंवरून वाटले. राजाचा १८१२-१४ मधे बनलेला महाल पाश्चात्य धाटणीचा वाटतो. . अर्धगोल कमानी आणि घड्याळाचा चौरस टॉवर. राजाच्या आसन-उद्यानातले हत्तीचे शिल्प अप्रतीम आहे. कातडीवरले सळ, सोंड, कान आणि सर्वच अवयव अगदी हुबेहूब.
सुरुवातीच्या बाजाराच्या फोटोत दुकानाबाहेर प्लास्टिक थैलीत ठेवलेल्या लांबट पिवळसर वस्तु, तसेच त्याशेजारी मोठ्या गोलसर वस्तु कोणत्या आहेत ?
असेच भटकत रहा आणि लिहीत रहा. पुढील सर्व प्रवासांसाठी शुभेच्छा.
प्रवास - एकटाच करतो किंवा कुटुंब.
दुसऱ्या कुटुंबाला घेत नाही कारण सहल आराखडा माझाच असतो आणि त्यात ऐनवेळी चर्चा किंवा फाटे फोडलेले मला आवडत नाहीत. अगोदर पुस्तकांतून माहिती वाचून आणि विडिओ पाहून त्या ठिकाणांच्या कोणत्या गोष्टी पाहायच्या टाळायच्या ते अगोदरच ठरवलेले असते. सर्व प्रवास रेल्वे, स्थानिक बसेस किंवा पायीच करतो. भाड्याचे वाहन टाळतो. फक्त एकदाच चिक्कमगळुरूला कार केली होती कारण ते उपयोगी होतं
फोटोत मसाल्याच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या लांबट पिवळसर वस्तु म्हणजे वाळलेली शिराळी/ दोडके आहेत. पण ते तिथे का विकतात हे भाषेच्या अडचणीमुळे विचारता आले नाही.
मलाही एकट्याने फिरायलाच आवडते. मला कोणत्याही शहरातली संग्रहालये प्रामुख्याने बघायची असतात. त्याखेरीज अगदी निर्मनुष्य, ओसाड, शहराबाहेरच्या जागा - उदाहरणार्थ शेकडो वर्षांपूर्वीच्या दफनभूमी, उत्खननच्या जागा, जुनी मंदिरे, किल्ले, प्रासाद, गिरिजाघरे, प्राचीन इमारतींचे पडके अवशेष वगैरे.
--- घरच्या मंडळींच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत गेलो तरी माझा मी एकटा भटकून संध्याकाळी सर्वजण भेटतो. भटकंतीत अगदी खास मित्र बरोबर असतील तर गोष्ट वेगळी, पण ते भाग्य गेल्या अनेक दशकात लाभलेले नाही.
ते वाळलेले दोडके स्नान करताना अंग चोळायला छान असतात. बाकी उपयोग माहीत नाही.
अगदी आपलीच आवडणारा मित्र आणि सहलीच्या तारखा जमणे अशक्यच असते.
साधीच गोष्ट म्हणजे तंबू लावून राहण्याचे स्वप्न आहे. एकटाच राहण्याची भीती नाहीच.
परंतू तंबू लावल्यावर तो सोडून पाणी आणायला वगैरे जाणे शक्य नाही. आणि दुसरा कुणी बरोबर मिळणे (शनिवार रविवारच्या सुट्ट्या सोडून) हेसुद्धा बादच. कुटुंबाला खोलीवर सोडून जाणेही योग्य नाही. जमेल तेवढे करायचे.
मला एका अमेरिकेतल्या नातेवाईकाने सांगितले की तिकडे घेऊन गेला तंबू, आणि लावला कुठेही रानात डोंगरात असं करू देत नाहीत. परवानग्या लागतात आणि ठराविक नेमलेल्या जागीच ते लावावे लागतात. त्या बाबतीत इकडे बरंय. सह्याद्रीत कुठेही लावू शकतो.
तिकडे घेऊन गेला तंबू, आणि लावला कुठेही रानात डोंगरात असं करू देत नाहीत. परवानग्या लागतात आणि ठराविक नेमलेल्या जागीच ते लावावे लागतात.
-- ते चांगलेच आहे. कारण अमेरिकेत अस्वले, लांडगे वगैरे वन्य प्राणी असतात, त्यापासून धोका असतो. जंगले खरोखर घनदाट असतात. कँपिंगच्या जागा अगदी जंगलात असतात, तिथे संडास-बाथरूम, हँडपंप, पिण्याचे पाणी, लाकडी बाकडी, ग्रिल, नकाशे, वगैरे सोयी असतात त्यामुळे अगदी लहान मुलांना सुद्धा नेता येते आणि त्यांना बालपणापासूनच जंगलात फिरणे, रहाणे, मासेमारी, शिकार, नावा वल्हवत नदी-सरोवरातून फिरणे वगैरेंची गोडी लावता येते. रात्री मोठी शेकोटी पेटवून त्याभोवती बसून गरमागरम अन्न, चहा-कॉफी वगैरे घेत गप्पा, भेंड्या लावणे वगैरेतून कौटुंबिक आनंद घेता येतो. रात्री पायवाटेने फिरताही येते. आम्ही सहकुटुंब असे कँपिंग करत असतो, अद्भुत अनुभव असतो. मात्र अशा ठिकाणी एकट्याने जाणे मला शक्य नाही आणि योग्यही नाही, कारण काही संकट आले, तर मला तिथे काहीही करता येणार नाही.
-- 'परवानग्या' म्हणजे फक्त ऑनलाईन बुकिंग करावे लागते. जागेचे भाडे अगदी कमी असते. धबधबे, अरण्य, सरोवरे, डोंगर-दर्या वगैरे फिरणे त्यामुळे सर्वांना शक्य होते. रात्री जेवणानंतर अन्नाचा एक कणही जमिनीवर पडलेला नसेल याची खबरदारी घ्यावी लागते, कारण अन्नाच्या वासाने अस्वले येतात. मोठी कचरापेटी खूप वजनदार लोखंडाची असते, ती अस्वलांना उघडता येणार नाही, अशी रचना असते, त्यात सगळे खरकटे, प्लेटा वगैरे टाकायचे. एक तंबू तिथे सुरक्षा-कर्मचार्यांचाही असतो - (काही संकट आले तर जोरजोरात शिट्या वाजवायच्या म्हणजे ते मदतीला येतात, असे सगळे शिस्तशीर काम असते) .-- सगळे तंबू लांब लांब असतात. एकमेकांचा आवाज पोचणार नाही इतके लांब. तंबूखेरीज घनदाट जंगलात लाकडी केबिना पण आरक्षित करून रहाता येते.
-- अमेरिकेत जाण्याचा खरा फायदा शहरांपेक्षा अश्या जागी जाण्यात असतो.
प्रतिक्रिया
मी पयला!!
ट्रुरिस्ट कारवाले त्यांच्या
मस्तच!बेगम बहार पहिल्यांदा
मस्त भटकंती!
सुंदर माहितीपूर्ण लेख
मस्त एकदम. फोटो आणि नेमके आणि
कर्नाटक टुरिझम चे मयुरा व्हॅली व्ह्यू
छान !
व्वा सुंदर भटकंती आणि प्रचि !
माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः,
बेंगलोरच्या आसपास आणि परत
तीन-चार दिवस फिरण्याचा प्लॅन
लहान मुलांसाठी 'activity'
अर्धवट लिहिल्याबद्दल क्षमस्व _/\_
' Not in office ' channel चे
सुरेख
बरेचदा असं होतं की हवे असलेले
अरे वा. छान भटकंती करत आहात.
प्रवास - एकटाच करतो किंवा
त्यात ऐनवेळी चर्चा किंवा फाटे
एकट्याने फिरणे सर्वात उत्तम.
ते वाळलेले दोडके स्नान करताना
गिलकेच.
अगदी आपलीच आवडणारा मित्र आणि
अमेरिकेतील कँपिंगची मजा काही औरच असते.
तंबू लावून राहण्याचे स्वप्न येत्या सप्टेंबरात पूरे करूया.
परिवर्तन पसंद नही. हाहाहा