Welcome to misalpav.com
लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सीवुडचे सर्व तलाव पाहीले. पाम बीडच्या सिग्नल वरून चाणक्यकडे आत गेल्यावर लगेच उजवीकडे खाडीकडे जाण्याचा पूल होता तो मात्र त्यांनी बंद करून टाकला. पाम बीचवरून एक अंडरपास ( वाहनांसाठी नाही) आहे तिथे एक तलाव आहे. पण त्यांच्या बाजूने एक खाडीवर जाण्याचा मार्ग तोही बंद केला. तलाव हे शेवटी तलावच असतात. त्यात भरती ओहोटीचे पाणी वर खाली होत नाही.

फोटो आणी वर्णन या बद्दल लिहीत नाही कारण तुमचा हातखंडा आहे. जैववैविध्य अभ्यास करण्या साठी चांगली साईट आहे. जर सात्यत्याने बघत राहीले तर अनेक नवीन आणी निसर्गातील चमत्कार दिसून येतील. सर्व प्रकारचे पक्षी,त्यांचे अधिवास, प्रजनन, पॅरेन्टिंग या सर्व गोष्टी बघणे आनंद दायी असते. सुरूवातीला पक्षी ओळखण्यात साठी फिल्ड गाईड आणी मर्लिन ॲण्ड्राॅईड मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यास आवाजावरून पक्षी ओळखण्यात मदत होईल. थोड्याच दिवसात शंभर सव्वाशे पक्षी सहज ओळखू शकाल. हिचे नाव माहित नाही. शाळेत असतांना वहीची फाटलेली पाने चिकटवण्यासाठी शेंगांचा रस डिंकासारखा वापरायचो. प्रथमदर्शनी सुभाबुळ वाटते. या शेंगा कुटून आम्हीं क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू बनवायचो.

प्रथमदर्शनी सुभाबुळ वाटते. या शेंगा कुटून आम्हीं क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू बनवायचो.
मलापण सुबाभूळ वाटली.माझी आई सांगते ती लहानपणी या वाळलेल्या शेंगा तीन तीन भाग करून ते तोडून त्यांना बांधून पैंजण बांधून खेळायच्या.

हे तलाव.
अजूनही अशा जागा टिकून आहेत आणि टिकून राहायलाच हव्यात असे वाटते.
काठाविना तलाव म्हणजे मेलेला पाण्याचा साठा. सीवुडच्या सर्व तलावांची गळचेपी केलेली आहे.

सीवूड तलाव नवी मुंबईचा सुंदर फेरफटका ! प्रचि नेहमीप्रमाणे छानच ! मजा आली आप्ल्या सोबत फेफ करताना ! धन्यवाद, गोरगावलेकर !

एक दोन वेळा पाम बीच रोडवरुन जाताना हा तलाव पहिला आहे पण कधी थांबुन निरिक्षण केले नाही. फोटोंमधले फ्लेमिंगो पक्षी बघीतल्यावर ह्या सिझनमध्ये पुन्हा कधी ह्या परिसरात जाणे झाले तर आवर्जुन थांबुन पहाणार!