हे माझ्या बकेट लिस्ट मध्ये ठिकाण आहे. सध्या मुलगा लहान असल्यामुळे त्याला कंटाळा येईल म्हणून याचे नियोजन केलेले नाही. कधीतरी मी व माझा नवरा असे दोघेच हम्पी व तंजावर, त्रिची ही स्थळे पाहायचे ठरवले आहे. आम्हाला ऐतिहासिक गोष्टींची आवड आहे. निवांत व माहिती घेत पाहण्यात दोघांनाही रस असल्यामुळे व्यवस्थित वेळ काढून अत्यंत बजेटमध्ये ही ठिकाणी करायची ठरवली आहेत. तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मी सुद्धा हे ठिकाणे रेल्वे बस व रिक्षा इत्यादी साधनांनीच करावयाची ठरवले आहेत. फोटोमुळे व स्लाईड शो मुळे तिथल्या मंदिरांची कल्पना आली. धन्यवाद.
हे चोला अकराव्या शतकातील.
पण आद्य चोला पहिल्या शतकातील होते. काराईकल चोला म्हणतात. त्यांचे राज्य आताच्या तमिळनाडूएवढे अधिक केरळचा भाग पसरले होते. पुढच्या लेखात येईल. तमिळी लोकांना चोलांचा फार अभिमान असतो. पुमपुहार बंदर तेव्हा प्रसिद्ध आणि प्रचलित होते.
उत्तम सुरुवात, चोळांची ही तीन जगप्रसिद्ध मंदिरे आजही पूजेत आहेत. तमिळनाडूमधले मंदिरांचे नियम कडक, दुपारी बंद, शिवाय गाभार्यातल्या मूर्तीला वस्त्रे नेसवलेली असतात. दगडी जीना आवडला. इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का? कर्नाटकात फारसा प्रश्न येत नाही, मोडक्या तोडक्या भाषेतून समजते पण तमिळ अवघड जाते.
बाकी कोंडा म्हणजे "आणली" ह्यापेक्षा "जिंकली" जास्त योग्य. पल्लव नृसिंहवर्मनने बदामी जिंकून स्वतःस वातापीकोंडा अशी पदवी धारण केली होती.
इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का?
येतो. पण तो प्रश्न मी कसा सोडवला ते पुढच्या भागात. खरं म्हणजे भारतीय/जगातील मुख्य पन्नास भाषांसाठी पाच वर्षांपूर्वी प्रोजेक्ट गुटेनबर्ग , जर्मनी यांनी विडिओ ओडिओ लेखी अशी साईट बनवली. 50languages.com व्याकरण वगळून थेट कामाची वाक्ये दिली आहेत. पर्यटकांसाठी उपयुक्त.
प्रतिक्रिया
अत्यंत उपयुक्त माहिती
छान लेख व माहिती .
हे चोला अकराव्या शतकातील.
उत्तम सुरुवात, चोळांची ही तीन
इकडे भाषेचा प्रश्न येत नाही
+१
छान!
वाचतोय