चित्राचे नाव :पेशवा दरबार
चित्रकाराचे नाव : थॉमस डॅनियल
इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Daniell
चित्र :
टिप्पण्णी : हे माझ्या आवडत्या चित्रांपैकी एक. ह्या चित्रावरुन पेशवा काळात असलेल्या शनिवार वाड्याची भव्यता आणि समृध्दी दिसुन येते. पेशव्यांच्या बैठकी मागे श्री गणेशाची भव्य मुर्ती (की चित्र? ) होते असे ऐकुन आहे, मात्र ह्या चित्रात श्री विष्णुंची चतुर्भुज रुपातील मुर्तीही दिसत आहे !
पशुपति
सिंधू संस्कृती मोहोर एक शिल्प
माहिती नाही हे या धाग्यात बसते की नाही पण एक ऐतिहासिक चित्रण/शिल्प/मोहोर काय योग्य वाटेल त्यात हे बसवावे.
कधी कधी ना एखाद्या प्रश्नावर अनेकदा तिथंच घुटमळते, उत्तर का मिळत नाही हे सतावते.तेव्हा मी हे शिल्प आठवते.म्हटलं तर याचं उत्तर मिळालं हा प्राण्यांनी वेढलेला त्यांचा देव पशुपती आहे.तर काहींचं म्हणणं ही दुर्गा देवी,तर काही हा योगी शिव,तीन मुख?चार मुख?
अशी ना ना प्रश्न याभोवती जमा होतात.उत्तर जे तुम्हाला समाधान देईल ते!
पशुपती.... पशुपती.... वैगरे करत .. लगेच आपण भारतीयांनी हवेत जायची गरज नाही ...
एखाद्या गोऱ्या माणसाने (इंग्रजाने ) संशोधन वैगरे करून ही मुद्रा शोधली आणि तिला पशुपती वैगरे म्हटलं तर लगेच आपण भारतीयांनी ...
बघा बघा आमची संस्कृती यंव आणि त्यांव करण्याची तशी गरज नसते..
तत्कालीन मूलनिवासी वैगरे जमातीतील एखादा पारंपरिक पोशाख वैगरे असेल तो, कुठल्यातरी कार्यक्रमाचा .... त्याचेच चित्रण मातीच्या मुद्रेत केले गेलं असेल ...
दीनानाथ दलालांनी अशाप्रकारची बरीच चित्रे केली असली तरी हे त्यांचे नाही. शैली वेगळी आहे. अॅनॉटोमी दलाल साकारत तशी नाहीये. मुख्य म्हणजे ठाकूर सिंगाची सही आहे डाव्या बाजुला खाली. दलाल मुख्यत्वे कमर्शिअल कामे करीत. कॅलेंडर वगैरे साठी जरी असे चित्र केले तरी त्यांची लफ्फेदार सही असली असती. अगदी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या शिष्यांनी जरी काम केले तरी त्यावर त्यांच्याच सहीतला द हे अक्षर एका छोट्या त्रिकोणात बसवलेली स्वाक्षरी असायची.
तस्मात हे चित्र दलालांचे नाही.
अफलातून वगैरेर वाटले असेल हे चित्र तर वास्तविक पाहता गोडबोल्यांना एक अनाहूत सल्ला द्यावा वाटतो.
अध्यात्म, अभंग, अर्थ पुरेसे आहे. उगी कलेच्या उंटाच्या कशाला मागे लागता?
तुमची चुकलीय ती ट्रेन. द्या सोडून.
हीच का तुमची सिंधू घाटी सभ्यता ??
ज्या सावरकरांना मानता . त्यांनीच एक प्रश्न विचारला होता.
गाय ही जर माते समान, तिचे मल मुत्र प्राशन करणे जर पवित्र ...
तर तुमच्या जन्मदात्या आईचे सुद्धा मल मुत्र प्राशन तुम्ही का करत नाही ??
सदर फोटोतील व्यक्ती तथाकथित डॉक्टर आहे ..
फोटो पाहून वाटतं .. खरं आहे ... शिकला म्हणजे अक्कल असेलच असे काही नाही ... शेवटी शहाणपण स्वतःच्या डोक्याने विचार करून येतं ...
.
.
.
काहीही फेकतो हा माणूस बिनधास्त.
काय संबंध सिंधू संस्कृतीचा आणि वेदाचा आणि वैदिक धर्माचा?
आणि असेल तर त्या बैलाच्या वर लिहिलेले वाचून दाखवा बरं. वेदात असेलच ना हि लिपी.
प्रतिक्रिया
१. पेशवा दरबार
पशुपति
पशुपती.... पशुपती.... वैगरे
अब आया मजा
अहो असं काय बोलताय राव !!
आवडीत दत्त सवडीत दत्त =))))
होय होय!मान्य आहे असू शकतो.
होय होय!मान्य आहे असू शकतो.
ओलेती
माझ्या माहितीप्रमाणे हे चित्र
हे राम...
नाही.
धन्यवाद!
अफलातून वगैरेर वाटले असेल हे
राम :)
जिथे शिव पशुपति असतो तिथे
हीच का तुमची सिंधू घाटी
काहीही