जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५)
शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्यांना बूथ व हेरॉल्ड सापडले.
ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याचे लक्षात आल्यानंतर बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन व्हावे असे वारंवार सांगूनही ते बाहेर येण्यास तयार नव्हते. शेवटी गवताची गंजी पेटवून देण्याचा इशारा दिल्यानंतर हेरॉल्ड बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. परंतु बूथ बाहेर येण्यास तयार नव्हता. नंतर बूथ गोळी लागून मेल्याचे दिसले. त्याने स्वतःला गोळी मारून घेतली की पोलिसांच्या गोळीने तो मेला हे समजले नाही. प्परंतु गोळीने मेलेला बूथ नसून कोणीतरी दुसराच होता अशी काही काळ अफवा पसरली होती . . .
नंतर कटात सहभागी असलेल्या ८ आरोपींवर लष्करी न्यायालयात खटला चालविला गेला. एकूण ३६६ साक्षीदारांची साक्ष झाली. ३० जून १८६५ या दिवशी खटल्याचा निकाल लागून सर्वांना दोषी जाहीर करण्यात आले. हेरॉल्ड, पॉवेल, आट्झेरॉट आणि मेरी सरॅट (ही महिला वॉशिंग्टन डी सी मध्ये एक खाणावळ चालवित होती ज्यात कायम अनेक भूमिगत सरकारविरोधी जेवायला जात होते) यांना दोषी जाहीर करून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी ७ जुलै १८६५ या दिवशी करण्यात आली. याव्यतिरिक्त डॉ. मड, मायकेल ओ'लॉकलन आणि सॅम्युअल अर्नॉऑल्ड यांना जन्मठेपेची व एडमन स्पँगलरला ६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली. कटातील अजून एक आरोपी, जॉन सरॅट देश सोडून पळाला होता. त्याला नंतर पकडून खटला चालविला गेला, पण तो निर्दोष सुटला.
================================================================================
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
================================================================================
वॉरन आयोगाने १० महिने संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदरांशी बोलले, केनेडींच्या शवविच्छेदनाचा अहवाल तपासला, गोळी झाडतानाचे चित्रीकरण अनेक वेळा बघितले, सर्व उपलब्ध पुरावे तपासले आणि अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून शेवटी निष्कर्ष काढला की ओस्वाल्ड हा एकटाच या खुनात सामील होता व त्याने एकट्यानेच केनेडींच्या हत्येची पूर्ण योजना आखली होती.
केनेडींच्या हत्येसंदर्भात काही अंदाज -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येबाबत अनेक सिद्धांत समोर आले. मात्र, त्यांची हत्या का करण्यात आली याबाबत अद्याप काहीच माहिती समोल आली नाहीय. त्यामुळं त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पहिला अंदाज - अमेरिकन एजन्सी एफबीआयनं केनेडी यांच्या मारेकऱ्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना एक महिला छायाचित्रकार दिसली. हत्येच्या वेळी ती महिला छायाचित्रे काढत होती. या महिलेचं नाव द बाबुष्का लेडी असे होते. केनेडींची हत्या याच महिलेने आपल्या कॅमेर्यात पिस्तुल लपवून आणून केल्याची चर्चा होती. परंतु या महिलेची कधीच ओळख पटली नाही. तसंच तिच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. यानंतर केनेडी यांची हत्या कोणी केली, ती महिला त्यांच्यासोबत होती का अशी चर्चा सुरू झाली.
दुसरा अंदाज - या हत्येच्या वेळी अमेरिका तसंच रशियामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. अवघ्या वर्षभरापूर्वी रशियाने अमेरिकेच्या शेजारचा देश क्युबामध्ये अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे तैनात केली होती. जगात तिसरं महायुद्ध पेटणार असे वाटायला लागले होते. परंतु केनेडींनी रशियाशी करार करून हे संभाव्य युद्ध टाळले. त्यामुळं केवळ अमेरिकेतच नव्हे तर रशियातही केनेडींची प्रशंसा झाली. त्यामुळं चिडून रशियाचं नेते ख्रुश्चेव्ह यांनी केजीबी या गुप्तचर संस्थेच्या सहकार्यानं केनेडी यांची हत्या घडवून आणल्याचे सांगण्यात आले. मात्र या आरोपाबाबतही ठोस पुरावे मिळू शकले नाहीत.
तिसरा अंदाज - अमेरिकन माफियांनी क्युबामध्ये खूप पैसा गुंतवला होता असे सांगण्यात येत होते. अमेरिकेच्या क्युबासोबतच्या संबंधात आलेल्या कटुतेमुळं त्यांची मोठी हानी झाली व त्यामुळं अमेरिका तसेच क्युबाच्या माफियांनी मिळून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हत्या केली असा अजून एक अंदाज व्यक्ते करण्यात आला. मात्र या प्रकरणातही अमेरिकन एजन्सीकडून तपासात फारशी मदत मिळाली नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
जॉन केनेडी व अब्राहम लिंकन हे दोघेही पूर्ण वेगळ्या आव्हानात्मक काळात राष्ट्राध्यक्ष झाले होते. केनेडींच्या तुलनेत लिंकनचा काळ खूपच कठीण होता. केनेडींच्या काळात रशियाचा धोका होता पण तो बाहेरून होता, पण लिंकनच्या काळात देश तुटायला आला होता व आपल्याच नागरिकांशी युद्ध करून लिंकननी देश एकसंध ठेवला. दुर्दैवाने काही प्रभावशाली व्यक्तींचे हितसंबंध दुखविले गेल्याने पूर्वनियोजित कटानुसार त्यांची हत्या करण्यात आली. परंतु या दोन्ही हत्याकांडातून अमेरिका सावरली व पुढे जात राहिली.
एकंदरीत अब्राहम लिंकन व जॉन केनेडी या दोघांचीही हत्या पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आली. अनेक बडी धेंडे यामागे होती असा शेवटपर्यंत संशय होता, परंतु ते सिद्ध करणारे सबळ पुरावे मिळविण्यात तपास संस्थांना अपयश आले. प्राथमिक तपासानंतर जे मारेकरी व साथीदार सापडले तेवढेच पकडले गेले व त्यांना शिक्षा झाली. परंतु या कटामागील मुख्य सूत्रधार शेवटपर्यंत नानानिराळे राहिले असे सर्वसामान्य जनतेला वाटत राहिले. या हत्या या केवळ तात्कालिक संताप यातून एकट्या दुकट्या माथेफिरूने केलेले कृत्य नसून त्यामागे अनेक प्रभावी व्यक्ती व दीर्घकालीन योजना होती यावर बहुसंख्य जनतेचा विश्वास होता. ज्याप्रमाणे धाकटे मर्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येसाठी पकडलेला एक बळीचा बकरा होता व प्रत्यक्षात त्यामागे वेगळीच प्रभावी माणसे होती व ती माणसे कधीही पकडली गेली नाहीत यावर बहुसंख्य अमेरिकनांचा विश्वास होता, त्याप्रमाणे लिंकन केनेडी यांच्या हत्येसाठी केवळ बळीचे बकरे पकडले व मुख्य सूत्रधार सुरक्षित राहिले असे बहुसंख्य अमेरिकनांना अनेक वर्षे वाटत होते.
अमेरिकेच्या इतिहासातील जवळ्पास १०० वर्षांच्या अंतराने घडलेली व अत्यंत गाजलेली ही दोन प्रकरणे लेखमालिका स्वरूपात मांडण्याचा रयत्न केला. यामागे माझे कोणतेही संशोधन नाही. आंतरजाल , काही लेख व काही पुस्तके वाचून मी केवळ सर्व माहिती एकत्रित स्वरूपात समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
(इति लेखनसीमा)
__________________________________________________________________________________________________________________
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4014
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक कॉन्स्पिरसी थिअरी
असे बरेच अंदाज व्यक्त झाले.
In reply to एक कॉन्स्पिरसी थिअरी by चंद्रसूर्यकुमार
छान झाली लेखमाला
धन्यवाद! लिंकनच्या हत्येची
In reply to छान झाली लेखमाला by श्वेता२४
छान लेखमाला! केनेडी आणी
दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व
In reply to छान लेखमाला! केनेडी आणी by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद!
In reply to दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व by श्रीगुरुजी
काहीकाही साम्ये
In reply to दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व by श्रीगुरुजी
आंतरजालावर खालील साम्य आढळले.
In reply to काहीकाही साम्ये by चंद्रसूर्यकुमार
ट्रंप प्रशासनाने केनेडी हत्या
माहितीपूर्ण लेखमालेबद्दल
माहितीपूर्ण लेखमाला आणि
सर्व वाचकांना व प्रतिसादकांना
ॲब्रॅहॅम लिंकनचे अंत्यसंस्कार
ॲब्रॅहॅम लिंकन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वॉशिंग्टन डी.सी मध्ये पीटरसन हाऊसमध्ये १५ एप्रिल १८६५ रोजी त्यांचे सकाळी निधन झाले. त्यानंतर व्हाईट हाऊस आणि अमेरिकन संसदेच्या कॅपिटॉल इमारतीत लोकांना अंत्यदर्शनासाठी त्यांचा मृतदेह ठेवला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांची कर्मभूमी इलिनॉय राज्याची राजधानी स्प्रिंगफिल्डमध्ये करायचे होते. लिंकन यांच्या गुलामगिरीविरोधातील मतांमुळे त्यांच्या जीवाला धोका होता त्यामुळे १८६१ मध्ये अध्यक्षपदासाठी शपथ घ्यायला ते स्प्रिंगफिल्डहून वॉशिंग्टनला रेल्वेने ज्या दूरच्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने उलट प्रवास करून स्प्रिंगफिल्डमध्ये ओकरीज cemetery मध्ये त्यांच्या देहाचे दफन करायचे ठरले. लिंकन अध्यक्ष असताना १८६२ मध्ये व्हाईट हाऊसमध्येच त्यांचा पुत्र विली टायफॉईडने मरण पावला होता. त्याच्या कबरीशेजारीच त्याच्या वडिलांनाही पुरायचे ठरले.
ॲब्रॅहॅम लिंकन यांचे पार्थिव वॉशिंग्टन डी.सी हून स्प्रिंगफिल्डला नेण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली गेली. २१ एप्रिलला ती ट्रेन निघाली. जास्तीत जास्त लोकांना अंत्यदर्शन घेता यावे यासाठी मधल्या मार्गावरील वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ती ट्रेन थांबवून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मृतदेह काही काळ ठेवायचा असे ठरले. मृतदेहाच्या विघटनाची प्रक्रीया शक्य तितकी लांबवावी म्हणून मृतदेहाचे विलेपन करण्यात आले. ती ट्रेन बाल्टीमोर, हॅरीसबर्ग, फिलाडेल्फिया, न्यू जर्सी शहर, न्यू यॉर्क शहर, अल्बेनी, बफेलो, क्लिव्हलॅंड, कोलंबस, इंडियानापोलिस, शिकागो आणि शेवटी स्प्रिंगफिल्ड अशी गेली. त्या ट्रेनचा वेग एकदम कमी ठेवला होता. त्याचे कारण रेल्वेमार्गाच्या आजूबाजूला उभे राहून लोकांना धावत्या ट्रेनमधील आपल्या नेत्याला शेवटचे अभिवादन करता यावे. लिंकन यांचे पार्थिव नेणाऱ्या ट्रेनच्या पुढे दुसरी एक ट्रेन पाठवली गेली होती. ती ट्रेन पुढे जाऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये लिंकन यांचे पार्थिव लवकरच येत आहे आणि शहरात अमुक एका ठिकाणी ते ठेवले जाणार आहे तेव्हा लोकांनो तयार राहा अशी वर्दी द्यायचे काम करत होती. पार्थिव आपल्या शहरात येत आहे ही वर्दी मिळाली की लगेचच लोक त्या ठिकाणच्या बाहेर रांगा लावून तयारच असायचे.
न्यू यॉर्क शहर मोठे असल्याने तिथे खूप गर्दी होणार म्हणून पार्थिव २४ तास ठेवायचे ठरले. त्यावेळेस न्यू जर्सी ते मॅनहटन जोडणारे हडसन नदीवरील रेल्वे पूल नव्हते. त्यामुळे न्यू जर्सीहून त्यांचे पार्थिव न्यू यॉर्कला बोटीतून आणले गेले. तिथून मॅनहटनमधील सिटी हॉलमध्ये त्यांचे पार्थिव घोडागाडीने नेणार होते त्या मार्गावर लोकांची तोबा गर्दी उसळली होती. अनेकांनी खांबांवर चढून किंवा इमारतींच्या गॅलऱ्या/गच्च्यांमधून अंत्यदर्शन घेतले. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या गॅलऱ्यांमध्ये आपल्याला जायला मिळावे म्हणून त्या काळी १०० डॉलर द्यायलाही लोक तयार होते. सिटी हॉलमध्ये २४ तास अखंड लोकांचा राबता होता. स्वत: लिंकन गुलामगिरीविरोधात यादवी युध्द लढले पण लोकांच्या मनातील वर्णद्वेष सहजासहजी जायला तयार नव्हता. न्यू यॉर्कमध्ये कृष्णवर्णीयांना सिटी हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका न्यू यॉर्क शहर कॉमन काऊंसिलने घेतली. मग युध्दमंत्री एडविन स्टॅंटननी दम भरल्यानंतर तिथे सगळ्यांना प्रवेश मिळाला.
शेवटी ३ मे रोजी सकाळी पार्थिव स्प्रिंगफिल्डला पोचले आणि दुपारी त्यांच्यावर तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. असे म्हणतात की जवळपास २ कोटी लोकांनी म्हणजे अमेरिकेच्या त्यावेळच्या लोकसंख्येच्या जवळपास अर्ध्या लोकांनी लिंकनच्या पार्थिवाचे एक तर अंत्यदर्शन तरी घेतले किंवा रेल्वेमार्गाच्या बाजूला उभे राहून अभिवादन तरी केले.
स्प्रिंगफिल्डमधील ओकरीज दफनभूमीत लिंकनच्या थडग्याची सुरक्षाव्यवस्था ठेवली गेली नव्हती. फार तर लोक त्या थडग्याच्या तिथे दर्शन घ्यायला येतील तिथे सुरक्षा कशाला असा विचार असेल किंवा तिथे काही वावगे घडू शकेल ही शक्यताही कोणी ध्यानात घेतली नसावी. १८७६ मध्ये काही दरोडेखोरांनी ते थडगे खोदून त्यातील लिंकनची शवपेटी पळवून त्या बदल्यात २ लाख डॉलरची खंडणी आणि तुरूंगातील आपल्या सहकाऱ्यांची सुटका याच्या बदल्यात ती शवपेटी परत करायची हा बेत आखला होता. शवपेटी पळविण्यात ते दरोडेखोर जवळपास यशस्वी झाले होते पण थोडक्यात तो प्रयत्न हाणून पाडला गेला. त्यानंतर लिंकनच्या शवपेटीच्या जागा ओकरीज दफनभूमीतच अनेकदा बदलण्यात आल्या. तरीही लिंकनचा मृतदेह पळविला अशा वावड्या अनेक वर्षे उडत राहिल्या होत्या. शेवटी १९०१ मध्ये त्यांची शवपेटी परत एकदा उघडून आत लिंकनचा मृतदेह आहे याची खात्री करण्यात आली. १८६५ मध्ये मृतदेहाचे विलेपन बहुदा खूप प्रभावी पध्दतीने केले गेले असावे. त्यामुळे १९०१ मध्ये म्हणजे ३६ वर्षे उलटल्यानंतरही आत नुसता हाडांचा सांगाडा शिल्लक नव्हता तर तो मृतदेह लिंकनचाच आहे हे ओळखता येईल इतपण खाणाखुणा शिल्लक होत्या. त्यावेळेस ॲब्रॅहॅम लिंकनचे पुत्र रॉबर्ट लिंकन आणि इतर काही जण उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी तो मृतदेह लिंकनचाच आहे हे खात्रीपूर्वक सांगितले. मग रॉबर्ट लिंकनच्या इच्छेप्रमाणे त्याच्या वडिलांची शवपेटी आणखी दहा फूट खोल खड्ड्यात ठेऊन तो खड्डा कॉन्क्रिटने बंद करण्यात आला आणि त्यानंतर कधीही ती शवपेटी परत उघडली गेली नाही.
ऐकावे ते नवलच 🧐
In reply to ॲब्रॅहॅम लिंकनचे अंत्यसंस्कार by चंद्रसूर्यकुमार
ऐकावे ते नवलच 🧐