Skip to main content

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 18/05/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या जीवनात सर्वानाच वाढत्या वजनाची काळजी लागलेली असते. वजन ही अशी गोष्ट आहे की जी वाढताना कळत नाही. पण उतरवताना खिशासहीत सगळेच हलके करते. मी एक अनुभव घेतलेला आहे त्यामुळे वजन एका रात्रीत ( म्हणजे "ओव्हरनाईट" उगाच अपसमज नकोत) दोन ते अडीच किलोने कमी होउ शकते. कोणतेही विनोदी व्यायाम प्रकार न करता / कोणतेही महाग औषधोपचार न करता वजन दोन ते अडीच किलोने कमी करणे शक्य आहे का? अनुभवान्ती म्हणेन हे सहज शक्य आहे. कसे?...... किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे? ...................................................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13469
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

In reply to by दशानन

असेच म्हणतो. दोन अडीच किलो वजन आम्ही कमी करुन घेतलं तर उरणार काय? हाडाचे सापळे? त्यापेक्षा वाढवायची युक्ती सांगा, लय गिर्‍हाईकं देतो. मी आहे, राजे आहे, पर्‍या आहे, डान्या आहे. अजुन लै ग्यांग आहे. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

+१.. :) (लै गँगचा मेंबर) ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

गोधडीतल्या जोर, बैठका शिकवताय की काय? ;)

आय ऍम नॉट इन्टरेस्टेड इन दोन-अडिच किलो. १०-१२ किलो वगैरे बोलत असाल तर, सांगा... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिनशी सहमत!! दोन -अडिच किलो म्हणे!!! हॅ!!! साधं बीयर पिऊन अगस्तीक्रिया केली तरी तेव्हढं वजन कमी होतं.... :)

In reply to by पिवळा डांबिस

शे दोनशे किलो म्हणतंय का कोणी ? तसं विजाभौ ... मनभर केळी खाऊन मग वजन करून पाटणकर काढा प्या !! असं नाय ना सांगत ? - एकटणी) टारझन

कोणाचे वजन ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

दुसरा भाग टाका लवकर. तुम्हालाही क्रीप्टीकलागण झाली आहे असा माझा ठाम समज झाला आहे. कृपया लवकरच शंकानिरसन करा अन्यथा, अन्यथा हलकेच घ्या ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

In reply to by अनंता

@एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा हा हा हा हा

विजुभाऊ हे प्रभूमास्तरांचे नवे झाड दिसतेय. शेवटी उपाय हा प्रभूमास्तरच सांगणार. खरे तर तो आत्तापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल. ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by प्रमोद देव

=)) =)) =)) गुरुदेव.... _/\_ काय जबरा डिटेक्टीव्ह आहात राव तुम्ही. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

कसे?...... किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे? ................................................................... मला सांगा! जाऊ द्या, नकाच सांगू..! :):) मी खपल्यावर मला उचलायला किती माणसं लागणार आहेत आणि त्यांना किती कष्ट पडणार आहेत याची काळजी मी का करू?! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

थोडं आधी कळलं तर स्मशानातच जाऊन झोपू. उगाच कुणाला तरास नको. आधी अमदाबादचे चमचमीत खाण्याचे धागे काढायचे आणि नंतर साळसूदपणाने असले धागे काढायचे. वा विजुभौ! भौ भौ !!

वरील लेखाशी माझा आर्थिक्,शारिरीक, मानसिक संबंध नाही. गेल्या ३० वर्षात माझे वजन आहे तसेच आहे. कमी नाही जास्त नाही.

एका दिवसात साधारणतः अर्धा - ते एक किलो वजन कमी करण्याचा जालीम उपाय म्हणजे एच.आय.व्ही रूग्णाची सुई टोचून घ्यावी ! एड्स लावून घेण्याचे 'इतर' मार्गही सगळ्यांना ठाऊक आहेतच.. :)

इथे तर उपाय प्रकाशित केलेला दिसत नाहीय. प्रत्येकाला व्यक्तिगत रीत्या सांगितला का? मला देखील सांगा.

In reply to by विनीत संखे

छे हो, वात्स्यायनाची अगदी सगळी आसनं ( समजा) केली तरी एका रात्रीत एवढं वजन घटणं कठीण. विजुभाऊंचा वेट लॉस प्रोग्रॅम वेगळाच असावा. ते कुठे दडी मारून बसले असतील तिथून त्यानी कृपया बाहेर यावे आणि त्यांचा वजन घटवण्याचा उपाय आणि त्यांना झालेला फायदा ( जमल्यास आधी आणि नंतर अशा फोटोंसकट) सकलांना सांगावा ही विनंती.