Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मित्रमंडळांची नावे

व
विजुभाऊ
Mon, 09/15/2025 - 14:43
💬 25 प्रतिसाद
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली. त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा. पुढचे शब्द गविं आहेत. मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता. संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ... एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते. रक्तगट नव्हे, मंडळ. दुचाकी वाहने, विशेषत: बुलेट, हिच्यावर तर खूनखराबा किंवा टोळीयुद्ध हवेच. माफिया असा इंग्रजी स्टिकर, कवटी चिन्ह, उगारलेला चाकू आणि त्यातून रक्ताच्या थेंबाची धार. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या बंदुका वगैरे अशी प्रतीके. हे सर्व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील निरीक्षण, पुण्यापर्यंत. सांगलीहून कोल्हापूरला जायच्या रस्त्यावर अतिशय देवस्थान म्हणून पाटी बघितली होती. मुंबईत चेंबूरला वाघोबा मित्रमंडळ म्हणून एक नवरात्रीचा मांडव बघितला होता ( चं सु कु) “अचानक” मित्र मंडळ! अशी दोन मंडळे मी पाहिली, मित्रमंडळाचे नाव “ अचानक” का असावे? अचानक असे नाव असते? की अचानक ठरले मंडळ स्थापावे? म्हणून मंडळाचे नाव अचानक? :) ( अ बा.) अ नगरला एक पाटी " अचानक तरुण मंडळ " अशी पाहिली होती. तुम्ही पाहिली असलेली एखादी मजेशीर पाटी ( मित्र मंडळाचे नाव) सांगा.

प्रतिक्रिया द्या
4255 वाचन

💬 प्रतिसाद (25)
व
विजुभाऊ Mon, 09/15/2025 - 15:07 नवीन
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 09/16/2025 - 06:33 नवीन
अचानक सारखेच मी सोलापुरात चक्क एकाएकी तरुण मंडळ असे नाव वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 09/15/2025 - 17:33 नवीन
पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/16/2025 - 07:11 नवीन
प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
व
विजुभाऊ Tue, 09/16/2025 - 08:26 नवीन
लैच खत्तरनाक.................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सौंदाळा Tue, 09/16/2025 - 06:47 नवीन
झिरो बॉईज चौक आहे पिंपरीत
  • Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर Tue, 09/16/2025 - 09:49 नवीन
मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 09/16/2025 - 13:54 नवीन
पाटाकडील तालिम मंडळ , स्टार टेक्सास ओलि भेळ अशीही नावे वाचली आहेत .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 09/16/2025 - 14:00 नवीन
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
र
रामचंद्र Tue, 09/16/2025 - 15:08 नवीन
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गवि Wed, 09/17/2025 - 08:46 नवीन
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्वेता२४ Tue, 09/16/2025 - 15:03 नवीन
आबा कावत्यात असे एक मित्रमंडळ आहे...
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास गुरुवार, 09/18/2025 - 06:40 नवीन
खिक्क, पुण्यामध्ये या धर्तीवर 'बाबा ओरडतात' काढायला हरकत नाही :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
स
संजय पाटिल गुरुवार, 09/18/2025 - 08:57 नवीन
आमचच ते... गावभाग नदिवेस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
श
श्वेता२४ Sat, 09/20/2025 - 19:27 नवीन
तुम्ही गावभागातले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
स
संजय पाटिल Wed, 10/08/2025 - 11:30 नवीन
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
व
विजुभाऊ Tue, 09/16/2025 - 15:10 नवीन
नगर मधे " खुंट" असा काहीतरी प्रकार आहे. रामचंद्र खुंट हे एका चौकाचे नाव आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 09/16/2025 - 15:59 नवीन
धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
B
Bhakti Wed, 09/17/2025 - 07:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
य
युयुत्सु Wed, 09/17/2025 - 04:35 नवीन
अचानक तरूण मंडळ पुण्यात पण आहे. पौडफाट्याला त्यांचा गणपती असतो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 09/17/2025 - 07:12 नवीन
एका जिमचं नाव होतं "यश बॉडी टेम्पल" आता मन नाही शरीरही एक मंदिर!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 09/18/2025 - 08:08 नवीन
वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 09/21/2025 - 06:19 नवीन
मस्त करमणूक.
  • Log in or register to post comments
न
निमी Sat, 10/25/2025 - 07:00 नवीन
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 10/25/2025 - 14:40 नवीन
आमच्या इथे सार्वजनिक स्वच्छता गृहाचं नाव.. आकांक्षी स्वच्छता गृह......
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा