सहज सुचलं म्हणून
Primary tabs
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील.
_______________________________________________
* कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे.
कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM
या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली.
-दिलीप बिरुटे
तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार?
इथे सगळी मिपाखरे गुरुजींचा आयडी बॅन केल्याबद्दल नापसंती व्यक्त करत आहेत, त्यांचे ससंदर्भ लेखन, विस्तृत माहिती, ऐतिहासिक दाखले हे सर्व acknowledge करत आहेत आणि तुम्ही मात्र...
असो, मिपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.
हल्ली गवि यांनी मिपासन्यास घेतलेला दिसतोय. गोव्याचे लेख लिहिले की ते हटकून हजेरी लावतात. पण ते कुणी लिहित नाही.
बोला कंकाका. माझ्यालायक काय सेवा?
नमस्कार गवि, बरेच दिवसांत दिसला नाहीत म्हणून आठवण काढली.
Starlink - elan musk - satellite internet
हे कसे काम करते याचा (अमेरिकेतल्या एक विडिओ)
https://youtu.be/Vh5cDulKvZ8?si=DVOI113Bq-_2_-Bm
हल्लीच दोन दिवसांपूर्वी इलान मस्कच्या स्टारलिंक कंपनीस भारतात सटेलाइटमधून इंटरनेट देण्याचे लायसन्स मिळाले. यांचे स्पेसएक्सचे जे उपग्रह आहेत त्यातून इंटरनेट देता येते. ( साधारणपणे अडीचशे टीवी चानेल्स देणाऱ्या उपग्रहांकडून आपण डिश टीव्ही पाहातोच आहोत).
इंटरनेट देणारे वेगळे असतील. या कंपनीशी एअरटेल आणि जियो यांनी अगोदरच करार केले आहेतच. नेट स्पीड किती मिळू शकतो ते वरच्या व्हिडिओत दिले आहेच.
आणखी काही वर्षांनी पुढची पिढी डोक्यावरच्या टोपीवर अँटेना बसवून आणि एका जागी बसून कुठेही इंटरनेट वापरणारी असेल.
एक दोन वर्षांत यांचे रेटही आवाक्यात येतील सामान्य माणसाच्या.
रोचक.
आमचा पंधरा - सोळा जणांचा फॅमिली ग्रुप १ ५ ऑगस्टला माळशेज MTDC येथे मुक्कामी जात आहे . दुसऱ्या दिवशी नाणेघाट येथे जायचे आहे . जुन्नर बाजूने गाडी जाऊ शकते असे वाचले आहे . माळशेज घाटातून नाणेघाट येथे ट्रॅव्हलर गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे का आणि असल्यास रस्त्याची सद्यस्थिती कशी आहे याबद्दल माहिती हवी . नुकतेच कोणी तेथे जाऊन आले असल्यास मार्गदर्शन करावे.
गाडीतून उतरल्यावर किती अंतर चालावे लागते व कठीण श्रेणी काय ? ग्रुपमध्ये ३ ते ६५ वयोगटातील पर्यटक आहेत म्हणून विचारणा .
माळशेज घाट चढून आल्यावर चूल फाटा-गणेश खिंड - जुन्नर असा रस्ता आहे. ट्रॅव्हलर आरामात जाईल. दुसरा अजून लांबचा रस्ता म्हणजे ओतूर - जुन्नर.
गाडी पार नाणेघाटाच्या नळीपर्यंत जाते. जेमतेम 100 मीटर फ्लॅट वॉकने उतरंड सुरू होते. अजिबात सवय नसलेल्यांना नळीचे प्रथम दर्शन भयप्रद वाटू शकते मात्र प्रत्यक्षात सोपे आहे. बिनधास्त जावा.
तत्परतेने माहिती पुरवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
एक सुचवतो.
घाट चढल्यावर खूबि फाटा, पिंपळगाव बसवंत धरणाची भिंत आणि त्यावरचा रस्ता( डावीकडे) खिरेश्वर गाव आणि मंदिराकडे नेतो. फंड्री सिनेमातलं चित्रीकरण झालेला रस्ता. येताना अथवा जाताना इकडे वळून बघता येईल.
वेळ मिळाला तर निश्चितच जाऊ . ते पिंपळगाव बसवंत नसून पिंपळगाव जोगा आहे बहुतेक .
शक्य झाल्यास ओझरच्या गणपतीचेही दर्शन घ्यायचे आहे .
माथेरानला एक दिवस भटकून आलो. त्यातील क्षणचित्रे
1) माथेरान क्षणचित्रे १७ जानेवारी२०२६
https://youtu.be/R94HlpnUGLg
2) Matheran videos 2026_01_17
https://youtu.be/FWV-sRTrOaM
बरेच दिवस झाले माथेरानला जाऊन . जायला हवे एकदा .
तशी तर नववर्षात मुंबई आणि मुंबईजवळच्या ठिकाणांची उजळणी सुरु झाली झाली आहे .
नातीला प्राणी - पक्षांची ओळख व्हावी म्हणून राणीच्या बागेला भेट देऊन झाली .
मस्त आहेत फोटोज राणीच्या बागेतले!
नात खूप गोड आहे तुमची 😍
नात खूप गोड आहे तुमची
हो , आहेच गोड. थोडा वेळ लागतो नवीन लोकात मिसळायला पण नंतर खूप बडबड करते.
वाघाचे फोटो छान मिळाले आहेत.
विशेष म्हणजे पेन्ग्विनचे फोटो काढू देत नाहीत तरी कसे मिळाले?
बंदी आहे पण मोबाईलचा फ्लॅश बंद ठेवून फोटो काढायला देत होते.
मला एक सांगा याच धाग्यावर मी किंवा आणखी कोणी फोटो चढवत गेले तर धागा उघडायला जड जाईल का ? आणि असे होणार असेल तर ठराविक काळाने नवीन धागा काढा
बरोबर आहे परंतू आतापर्यंत तुमच्याकडूनच आले आहेत फोटो. अजून टाकू शकता. धागा उघडेल सहज.
मी म्हणतो की मिपाने हे एक सदरच चालू करावे त्यात { राजकारण सोडून} काही गंमतीशीर लिहिता येईल किंवा फोटोही देता येतील. काही वेळा दोन चार फोटोंसाठी नवीन धागा काढता येत नाही परंतू या सदरात करता येईल.
मी भूजमध्ये मागच्या महिन्यात जाऊन आलो त्याचे काही फोटो टाकण्याचा विचार आहे. तिकडे रण पाहिले पण तंबुंमध्ये राहिलो नाही. खूप महाग आहे. भूजमध्येच राहिलो. मी स्लाइडशोची लिंकच देणार आहे.
मोबाईलमध्ये मी ही apps वापरतो.
विडीओ क्लिप्स जोडण्यासाठी ...
VN - AI Video Editor ( Ubiquity Labs L.L.C.)
https://play.google.com/store/apps/details?id=com.frontrow.vlog
विडिओ किंवा ओडिओमध्ये काटछाट करण्यासाठी....
Video to Audio - MP3 Cutter ( InShot Inc
https://play.google.com/store/apps/details?id=mp3videoconverter.videoto…
फोटोंचे स्लाईडशो करण्यासाठी...
Video Editor and Maker - Inshot ( InShot Video Editor) Video Guru
https://play.google.com/store/apps/details?id=com.camerasideas.instashot
मस्त फोटो. आवडले.
राणीच्या बागेतील वाघ मस्त आहे. मधून मधून दर्शन द्यायला आल्यासारखा काचेजवळ येतो :)
कंकाका छान आहेत माथेरानची क्षणचित्रे 👍
१.हल्ली मी कुटुंबाचे फोटो अगदी निवडून त्यातले दहा बारा प्रिंट मारतो. एका पिडीएफ पेजवर दोन फोटो आणतो आणि त्याची फोटोग्राफिक पेपरवर प्रिंट काढून आणतो. ( वीस रुपये/पेज). माझ्याकडे एक app आहे ( होतं) त्यात दहा बारा mb size ची पीडीएफ करता येत असे. प्रिंटसाठी चांगली. पण ते app आता play store वरून गायब झाले. App चं नाव Print Adjuster. याची apk file करून नवीन फोनात टाकली पण मूळ app सारखं काम होत नाहीये. सगळ्या चांगल्या appची अशीच वाट लागते.
२. हेच काम word >> pdf करता येतं पण रेझलूशन फार कमी होतं.
३. गूगल फोटोज् मधून चांगल्या फुल साईजची पीडीएफ करता येते ही एक चांगली गोष्ट आहे ....पण एका पेजवर एकच मोठा फोटो टाकता येतो.
४. इतर साध्या फोटोंच्या slideshow करून यूट्यूबवर टाकतो. विडिओ सर्व किंवा पाच पाच जोडून तेही यूट्यूबवर टाकल्यावर फोनची मेमरी रिकामी करता येते.
करून पाहा. हल्ली मेमरी कार्ड्स महाग होत आहेत आणि फोटो/ मिडिया स्टोरेज फ्री ( १५जीबी) देणारी फक्त गूगल उरली आहे.
एक विडिओ राहिला ... 3) Matheran videos ( part 2) 2026_01_17
https://youtu.be/8MJF1pfdOyc
खूप लिहू खूप शिकू मग कोण राहील अडाणी
https://youtu.be/ljBRsgnwgJk?si=eucRXrNFBXRrAFKs