Welcome to misalpav.com
लेखक: गामा पैलवान | प्रसिद्ध:
लोकहो, म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया. हा इसम शियांचा प्रमुख होता असा दावा आहे. क्याथलिकांचा पोप असतो तसा. मग हा पॅट्रिस लुमुंबा नामे नास्तिक कम्युनिस्ट विद्यापीठात काय झक मारायला गेला होता का? नाही. मुळीच नाही. तो तिथे कम्युनिस्ट क्रांती भक्कम करणं शिकायला गेला होता. होय, इ.स. १९७९ ची खोमेनीची इराणातली धार्मिक क्रांती कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित आहे. खुद्द खोमेनी उदारमतवादी ( = लिबरल ) विचारसरणीचा होता. मात्र क्रांती झाल्यावर अचानक कट्टर इस्लामी बनला. आयारजीसी म्हणजे IRGC म्हणजे इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ही संघटना बऱ्यापैकी NKVD म्हणजे सोव्हियेत पोलिसांच्या पद्धतीवर आधारित आहे. पॅट्रिस लुमुंबा हा आफ्रिकेतला काळू लोकांचा एक नेता होता. तो कम्युनिस्ट होता म्हणून त्याच्या नावाने सोव्हियेत शासनाने इ.स. १९६० साली मॉस्कोमध्ये एक विद्यापीठ खोललं. अमेरिकेतल्या हार्वर्ड, इंग्लंडातल्या ऑक्सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांना कम्युनिस्टांचे प्रत्युत्तर म्हणून ऐन शीतयुद्धाच्या काळांत लुमुंबा विद्यापीठ उघडलं. त्यास २०१० साली ५० वर्षे पूर्ण झाली. तन्निमित्ते विद्यापीठाने एक चलचित्र प्रकाशित केलं होतं. त्यात महमूद अब्बास या पालेस्तिनी नेत्याचं आणि अली खामेनेई या इराणच्या शिया नेत्याचं नाव माजी विद्यार्थी म्हणून घेतलंय. ते इंग्रजी चलचित्र इथे आहे ( ३ मिनिटे ) : https://youtu.be/bN_oEJEp9Ro?t=100 यांत १ मिनिटे ४० सेकंदांनी उपरोक्त दोन नावे येतात. सदर विद्यापीठाचं हल्लीचं नाव लोकसखा विद्यापीठ आहे. अली खामेनेईच्या पार्श्वभूमीची ही लपवाछपवी कशासाठी ? उत्तर उघड आहे. लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी. तो खरंच मेला तरी आहे का ? त्याचा मुडदा कोणी बघितलाय का ? हा खोमेनीचा उजवा हात होता. तर मग खोमेनी तरी खरोखर इस्लामवादी होता का ? तर उत्तर नकारार्थी आहे. त्यानं ग्रीक तत्त्वज्ञान अभ्यासलं होतं. त्यातल्या अॅरीस्टॉटल व प्लेटो त्याच्या खास आवडीचे. ही मुस्लीम धर्मगुरूची रूपरेखा ( = प्रोफाईल ) वाटते का ? त्याने बरेच लेख आणि पुस्तके वगैरे लिहिलेत. त्यांतला एक अत्यंत आक्षेपार्ह विषय म्हणजे ग्नॉस्टिसिझ्म. हा ख्रिश्चन गूढवादाशी संबंधित विषय आहे. हे मुस्लीम धर्मगुरूचे उद्योग वाटतात का ? गूढवादी सुफी वगैरे मुस्लिम धरावेत हा ? तो खरंच मुस्लिम होता का ? की केवळ नावापुरताच होता ? पॅरीसमध्ये असतांना खोमेनी इस्रायल आणि इराणच्या शहाच्या विरोधात भाषणे देत असे. पण मग त्यास क्रांती करण्यार्थ पर्शियन ज्यूंचा पाठींबा कसा मिळतो ? काढा पाहू हुडकून. खोमेनी १९७९ च्या बऱ्याच आधीपासनं ( इ.स. १९६३) अमेरिकी प्रशासनाच्या संपर्कात होता असा दावा आहे ( इंग्रजी लेख ) : https://www.theguardian.com/world/2016/jun/10/ayatollah-khomeini-jimmy-carter-administration-iran-revolution त्याच्या विनंतीवरून जिमी कार्टर प्रशासनाने इराणी मुस्लिम क्रांतीत हस्तक्षेप टाळला. घ्या, म्हणजे इराणातली इस्लामिक क्रांती मुळातून कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित असून ती अमेरिकेच्या पाठींब्यावर घडवलेली आहे. आणि म्हणे जगातनं कम्युनिझम नाहीसा झालाय. खोमेनी सत्तेत आल्यावर पळून गेलेला पदच्युत मोहमद रझा पहेलवी काय म्हणतो की, खोमेनीची दाढी उचलली की मेड इन इंग्लंड चा छाप दिसेल. कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हां सांगेल काय या दाढीखाली दडलंय काय ! या मुकुटाखाली दडलंय काय !! या नाट्यपदासोबत पहिला अंक समाप्त. --------x--------x-------- यथोचित अवयवांच्या यथोचित ऐवजांची यथोचित उलाढाल झाली की बटाटेवडे खाऊया. संपले की परत आसनस्थ होऊया. --------x--------x-------- अंक २. हां, तर काय म्हणंत होतो की या मुकुटाखाली दडलंय काय. इ.स. १९७९ च्या पदच्युत शहा मोहमद रझाचा बापही इ.स. १९४१ साली पदच्युत झाला होता. बापाचं नाव रझा खान. त्याकाळी इराणात आडनावं लिहित नसंत. त्यानं पहेलवी आडनाव घेतलं आणि पोरालाही तेच लावलं. रझा खान हा पहिला पहेलवी आणि त्याचा मुलगा मोहमद रझा पहेलवी हा दुसरा पहेलवी. या दोन पहेलव्यांचे व्यतिरिक्त इतर कोणीही पहेलवी इराणचा राजा नाही. तर बापाची कथा अशी की तो इराणी कोझाक ब्रिगेडचा प्रमुख होता. ही पलटण कॉकेशियन व इराणी शिपायांची बनलेली असे व तिच्यावर केवळ रशियन अधिकारी नेमलेला असे. रझा खान हा तिचा पहिला बिगर रशियन अधिकारी होता. ही पलटण अधिकृतरीत्या काजार राजघराण्याच्या अखत्यारीत होती. हिने इ.स. १९२५ साली फितवा घडवून आणला आणि काजार राजास हटवून रझा खानला राजेपदी बसवला. या घटनेस पर्शियन संवैधानिक क्रांती म्हणतात. आता प्रश्न असाय की नवा राजा रझा खानाने फत्तेअली काजाराचा पणतू अमानुल्ला जहांबानीस आपला युद्धमंत्री का नेमला ? रझा खानाने काजार राजवट उलथून टाकली ना ? मग तिच्याच एका वंशाजास मंत्री म्हणून नेमायचं कशाला ? की राजवट बदलण्याची फक्त हूल दिली होती ? मला हीच शक्यता अधिक समर्पक वाटते. अशीच हूल १९४१ साली ब्रिटीश व रशियन संयुक्त आक्रमणाचे वेळीस उठवली होती. या खेपेस थोरला पहेलवी रझा खान यांस पदच्युत करून त्याचा पुत्र मोहमद रझा पहेलवी यांस गादीवर बसवला. ज्याला हाकलला त्याच्याच वंशाजस गादी द्यायची ? परत परत तीच सर्कस ! मज्जानु लाईफ. पिता पहेलवीस पदच्युत केला १९४१ साली. नंतर तो तडीपारीत ( प्रथम मॉरीशस व नंतर दक्षिण आफ्रिका ) १९४४ साली मरण पावला. पण त्याची बायको मात्र नव्याने राजा झालेल्या पुत्रासोबत तेहरानात राहिली. नंतर वर्षभरात तिने गुलामहुसेन दिवाणीशी विवाह केला. कालांतराने १९७९ च्या इस्लामी क्रांतीच्या आधी पुत्र मोहमद रझा पहेलवीने तिला लॉस एंजेलिसच्या डोंगऱ्या भिवरलीस तिच्या मुलीकडे कायमचे धाडले. एक प्रकारची तडीपारीच म्हणा ना. पण ही अलिशान पंचतारांकित तडीपारी आहे. भारतात नाहीका काही लोकांना पंचतारांकित तुरुंगवास होत असे, त्याच धर्तीवरची ही पंचतारांकित तडीपारी ! दयाळू मायबाप सरकाराच्या मर्जीत राहिलं की ही सुखे आपसूक प्राप्त होतात. तर इराणचे हे दयाळू मायबाप सरकार कोण ते बघूया. इराणी लोकांची इराणबाहेरची सर्वात दाट वस्ती दक्षिण कॅलीफोर्नियात आहे. आणि दक्षिण कॅलीफोर्नियात डोंगऱ्या भिवरलीस इराणी ज्यूंची भली थोरली वस्ती आहे. लक्षांत घ्या, डोंगऱ्या भिवरलीच्या अलिशान वस्तीत इराणी ज्यूंचं संख्याप्राबल्य आहे; यावरनं त्यांची जागतिक पोहोच लक्षांत येते. काजार काय, पहेलवी काय, खोमेनी काय, खामेनेई काय या साऱ्या कठपुतळ्या आहेत. इराणचे खरे सत्ताधारी अमेरिकेत बेव्हरली हिल्स मध्ये आहेत. एक प्रश्नं पडतो की, जर डोंगऱ्या भिवरलीत इतके पावरबाज इराणी ज्यू राहतात, तर इराणात सत्तापालट चुटकीसरशी झाला पाहिजे. बरोबर ? खोमेनी कसा अलगद येऊन बसला होता. जणू फुलावर बसलेलं फुलपाखरूच. मग आत्ता २०२६ साली युद्धाचा खटाटोप का ? याचं उत्तर असंय की छटाकभर मागणीसाठी फुकट राडा माजवायची ज्यू प्रस्थापितांची जुनीच खोड आहे. जर्मनीस कशी पहिल्या महायुद्धात धूळ चारली होती ज्यू थैलीशहांनी, आठवतेय? बास, ज्यू थैलीशहांना बारीकसारीक कारणांसाठी कुणालातरी वेठीला धरायला आवडतं. पहिल्या महायुद्धाच्या खेपेस जर्मनी व आजूबाजूचा प्रदेश होता. दुसऱ्या महायुद्धाच्या खेपेस ही व्याप्ती वाढून आख्ख्या युरोपसह उत्तर आफ्रिका, जपान व आग्नेय आशिया ( प्रामुख्याने ) वेठीस धरले गेले. आता हीच पाळी जगाच्या मोठ्या भागावर येऊ घातलीये. आज होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. तिच्यातनं केवळ तेलंच नाही तर गंधकाम्ल ( = सल्फ्युरिक आम्ल ) , नत्रखते ( = नायट्रेट्स ) यांचेही दळणवळण मोठ्या प्रमाणावर होतं. यासंबंधी एक ( इंग्रजी ) लेख : https://www.businesstoday.in/world/middle-east/story/its-not-just-oil-ceo-warns-hormuz-shutdown-could-choke-sulfur-chip-and-fertilizer-supply-519633-2026-03-08 सांगायचा मुद्दा काय की इराणच्या युद्धामुळे बरंचसं जग वेठीस धरलं गेलं आहे. आणि या युद्धास जबाबदार इराणी ज्यू थैलीशहा आहेत. आता कळलं ना ज्यूंच्या विरोधात युरोपात वारंवार जनमत का प्रक्षुब्ध व्हायचं ते ? नाडलेल्या गांजलेल्या माणसाच्या मनांत सर्वसामान्य ज्यू आणि थैलीशहा ज्यू यांच्यात फरक करायची ताकद नसते. त्यामुळे ज्यूंवर सरसकट तडीपारी लादली जायची. थैलीशहांच्या हट्टापायी सामान्य ज्यूने प्रचंड त्रास भोगला आहे. किंबहुना माझा अंदाज आहे की ज्यूंवर परचक्र फार कमी वेळा आलंय. ज्या आपत्ती आल्या आहेत त्या स्वचक्र आहेत. असो. वर म्हटलंय की इराणचे खरे सत्ताधारी अमेरिकेत बेव्हरली हिल्स मध्ये आहेत. हे सगळं कसं झालं आणि कधी झालं? नक्की सांगता येत नाही. मात्र काही ऐतिहासिक धागे जुळवता येतात. या घडीला हा अंक समाप्त करूया. डोस्कं चक्करलं की नाही ? आजून चक्रीपाळण्याच्या फेऱ्या बाकी आहेत. तयार रहा. पण सध्या जरा मध्यंतर घेतो. --------x--------x-------- आणलेत पॉपकॉर्न मध्यंतरात ? छान. आता सरसावून बसा. --------x--------x-------- अंक ३. जरा इराणच्या इतिहासाकडे भूतकाळाच्या दिशेने नजर टाकूया. ही इराणच्या राजांची एक कालानुक्रमणिका आहे. --------------------- शासक / परिवार / महत्त्वाचे साल --------------------- १२. तिसरा इस्लामी सर्वेसर्वा = मोजतबा खामेनेई / खामेनेई / इ.स. २०२६ साली सत्ताधारी ( सध्याचा ) ११. दुसरा इस्लामी सर्वेसर्वा = अली खामेनेई / खामेनेई / इ.स. १९८९ साली सत्ताधारी १०. पहिला इस्लामी सर्वेसर्वा = रोहुल्ला खोमेनी / खोमेनी / इ.स. १९७९ साली सत्ताधारी ०९. शेवटला पहेलवी = मोहमद रेझा पहेलवी / पहेलवी / इ.स. १९७९ साली पदच्युत ०८. पहिला पहेलवी = रेझा खान पहेलवी / पहेलवी / इ.स. १९२५ ला सत्ताधारी ०७. शेवटला काजार = अहमद शहा काजार / काजार / इ.स. १९२५ ला पदच्युत ०६. पहिला काजार = आगा मोहमदशहा काजार / काजार / इ.स. १७८९ ला सत्ताधारी ०५. शेवटला झंड = लुत्फ अली खान झंड / झंड / इ.स. १७९४ ला मृत ०४. पहिला झंड = करीम खान झंड / झंड / इ.स. १७५१ ला सत्ताधारी ०३. शेवटला सफावी = इस्माईल तिसरा / सफावी / इ.स. १७५० ला नामधारी सत्ताधारी ( राजपालक : उपरोक्त करीमखान झंड ) ०२. पहिला सफावी = शहा इस्माईल पहिला / सफावी / इ.स. १५०१ साली सत्ताधारी .... सुमारे ८५० वर्षांचा एकछत्री अंमल नसलेला कालखंड .... ०१. शेवटला सासनी = यस्तजुर्द / सासनी / इ.स. ६५१ ला मृत --------------------- वरील यादीतले 'पहिले' वाले राज्यकर्ते विशेष रोचक आहेत. झंड केवळ पन्नासेक वर्ष सत्ताधारी होते. ते वगळता पहिला काजार ( इ.स. १७८९ ) व पहिला सफावी ( इ.स. १५०१ ) हे महत्त्वाचे कलाटणी टप्पे ( = टर्निंग पॉइंट्स ) आहेत. काय बरं झालं या कलाटण्यांच्या वेळेस ? पहिल्यांदा पहिल्या काजारचं उदाहरण घेऊया. याची आई झंड होती. ही बाब का लपवून ठेवली जाते? विकी वर उल्लेखही नाही पण जेनीवर मात्र तिला झंड राजकन्या म्हंटलंय. याचा अर्थ पहिला काजार हा शेवटल्या झंडचा नातलग होता. आता पहिला झंड करीमखान कोण होता ते पाहूया. वर दिलंय त्याप्रमाणे तो तिसऱ्या इस्माईल शहा या शेवटल्या सफावीचा राजपालक ( = रीजंट ) होता. म्हणजेच तो शेवटून दुसऱ्या सफावीचा विश्वासू होता. कदाचित नातलगही असेल. मग जेव्हा राजघराणी बदलली तेव्हा नेमकं झालं काय ? काहीच नाही. हेच खरं रहस्य आहे. तीच तीच घराणी परतपरत येतात. यांत नादिरखानाचं ( जो पुढे नादिरशहा झाला ) अफशरी साम्राज्य घेतलं नाहीये. कारण की हे फक्त पन्नासेक वर्षंच टिकलं आणि नंतर एका काजारात विलीन झालं. तर मग इस्माईल शहा प्रथम हा पहिला सफावी तरी कोण होता ? त्याने सर्वप्रथम स्वत:स शिया पंथीय घोषित केलं, बरोबर ? त्याचा काय ठावठिकाणा लागतोय ते बघूया. विकिवर त्याची आई हालीमा बेगम आहे. आणि हिची आई कोण, बघातरी ती आहे थियोदोरा कॉमनेने. कोणी म्हणेल की कोण ही थियोदोरा आणि हे कॉमनेने कशाशी खातात ? प्रश्न अगदी रास्त आहेत. थियोदोरा कॉमनेने ( उपाख्य देस्पिना खातून ) ही बायझेंटाईन साम्राज्याच्या उपराज्याची एक राजकन्या आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर इ.स. १४५३ साली कॉन्स्टंटिनोपोलचं बायझेंटाईन रोमन साम्राज्य महमद द्वितीय नामे ऑटोमन तुर्काने लढाई करून जिंकलं. ते जित साम्राज्य आपल्या जुन्या राजघराण्याचे मार्फत उण्यापुऱ्या पन्नासेक वर्षांत दूरवर इराणात सफावी म्हणून उदयास आलं. आजच्या इराणची ओळख एका ग्रीक बाई आणि तुर्की पुरुषाच्या अपत्याने घडवली आहे. आहे किनई गंमाडी जंमत. विकीवर ही माहिती इथे मिळते ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Empire_of_Trebizond#cite_ref-Nicol-407_40-0 हे कसं घडलं त्याचे धागे पुढल्या अंकात जुळवायचा प्रयत्न करूया. हा अंक छोटासा असला तरी भ्रमण भरपूर झालंय. या मिषे तूर्तास मध्यंतर घेतो. --------x--------x-------- आता खमंग केळावेफर्स चेपायला पाहिजेत. मिळाले वाटतं ! चला तर मग, पुडकं हातात घेऊन बुडकं टेकवूया. --------x--------x-------- अंक ४. हां, तर सुरुवात करूया सफावींच्या शिया पंथाने. पहिल्या सफावी इस्माईल शहाने केलेला शियापंथाचा स्वीकार ही केवळ एक राजकीय सोय आहे. अगदी तश्शीच राजकीय सोय सुमारे पावणेपाच शतकांनंतर खोमेनीने इ.स. १९७९ साली बघितली आहे. पहिला इस्माईल शहा जसा कॉमनेनेचा वंशज होता तसाच खोमेनीही आहे. आपण कॉमनेनॉस घराण्यापासून सुरुवात करूया. साडेतीनशे-पावणेचारशे वर्षांचा इतिहास थोडक्यात सांगतो. इ.स. १०८० साली कॉन्स्टंटिनोपोलचं बायझेंटाईन साम्राज्याचं राजेपद या कॉमनेनॉस घराण्याच्या हाती आलं. सत्ताधारी पहिला अलेक्सीयॉस होता. त्यानंतर १०४ वर्षं या घराण्याकडे राजेपद होतं. इ.स. ११८० साली पहिला मन्युएल कॉमनेनॉस सत्तेत असतांना मेला. त्याच्या मागे विधवा मारिया, मुलगा अलेक्सियॉस द्वितीय आणि लहान भाऊ आंद्रोनिकॉस प्रथम होते. मुलगा अलेक्सियॉस सज्ञान नव्हता. त्याचा राजपालक म्हणून आंद्रोनिकॉस (प्रथम) ने गादी बळकावली. पुढे त्याने विधवा भावजय व तिचा मुलगा अलेक्सियॉस द्वितीय यांना ठार मारलं. आंद्रोनिकॉसला सर्वंकष सत्तेचा लोभ पडल्याचं दिसून आल्याने राज्यात बेदिली माजली. लाटिन म्हणजे पश्चिमी रोमन आणि पौर्वात्य रोमन एकमेकांचे गळे घोटू लागले. त्या लफडेबाजीत आंद्रोनिकॉसने आपला सेनापती आयझाक आंजेलॉस याला विरोधकांना संपवायच्या सुपाऱ्या दिल्या. परंतु कॉन्स्टंटिनोपोलाचे लोकं चिडल्याने त्यांनी आंद्रोनिकॉसला राजवाड्यात कैद करून ठेवलं. अशा रीतीने आयझाक आंजेलॉस अजाणतेपणे लोकक्षोभाचा नायक बनला. या गडबडीत आंद्रोनिकॉस लोकांकडून बडवला जाऊन ठार मारला गेला. आयझाक आंजेलॉसने आपलं बूड सुरक्षित ठेवण्यासाठी आंद्रोनिकॉसच्या मन्युएल या पुत्राचे डोळे काढून नंतर ठार मारलं. तर दुसरा पुत्र जॉन याला जॉनच्याच सैन्याने बंडाळी करून ठार मारलं. परंतु मन्युएलची दोन पोरे अलेक्सियॉस व डेव्हिड निसटली. त्यांनी नंतर ट्रेबिसोंड ( आजचं त्राबझॉन ) येथे राज्य उभारलं. लक्षांत घ्या कॉमनेनॉस घराणं पदच्युत झालं तरी त्यांची तग धरून राहायची क्षमता अफाट होती. ट्रेबिसोंड हे काळ्या समुद्राच्या काठी मोक्याच्या व्यापारमार्गावर वसलेलं ठिकाण आहे. ट्रेबिसोंडचं राज्य इ.स. १२०४ साली उभारलं. ते लवकरंच साम्राज्य बनलं कारण की व्यापारमार्गावर कर लावून बरंच धनवान बनलं. पर्शियाचा ग्रीस व आशिया मायनर ( हल्लीचा तुर्कस्थान ) शी होणारा सगळा व्यापार ट्रेबिसोंड मार्गे होत असे. यावरून त्याची महत्ता कळते. ट्रेबिसोंडच्या ऐटीत आजून एक गोष्टीची भर पडली होती. ती म्हणजे त्या साम्राज्याच्या स्त्रिया अतिशय सुंदर असंत. तर सुंदर स्त्रियांना लग्नात विदा करून भरपूर हुंडा कमावला जाई. अशीच एक सुंदरी होती थियोदोरा कॉमनेनॉस. कॉमनेनी हे ही कॉमनेनॉस या आडनावाचंच एक रूप आहे. या नावाच्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या. पण आपली जी थियोदोरा आहे ती ट्रेबिसोंडच्या शेवटून तिसऱ्या राजा जॉन चतुर्थ याची मुलगी आहे. जॉन चं आडनाव मेगा-कॉमनेनॉस होतं. आपल्याकडे देसाईचं सरदेसाई, देशमुखचं सरदेशमुख होतं त्या धर्तीवर कॉमनेनॉसचं मेगा-कॉमनेनॉस झालं. या थियोदोराचं लग्नं तिच्या बाप जॉनने व काका डेव्हिडने एका तुर्काशी लावलं. त्याचं नाव उझून हसन. तो अक-कोयनलू राज्याचा व बेयंदर जमातीचा होता. या लग्नामागील हेतू ट्रेबिसोंडचे राज्य सुरक्षित राखणे हा होता. त्याचं असं झालं की इ.स. १४५३ साली कॉन्स्टंटिनोपोलचं रोमन साम्राज्य महमद द्वितीय या ऑटोमन तुर्काने जिंकलं. मग महमद सुटलाच. तो आज ना उद्या ट्रेबिसोंडवर संपत्तीसाठी चालून येणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. म्हणून दुसऱ्या पराक्रमी तुर्काचं सहाय्य मिळावं म्हणून जॉनने उझून हसनला आपली मुलगी दिली. मात्र एक अट टाकली की ती ख्रिश्चनच राहील. ही अट उझुन हसनने आनंदाने मान्य केली. हे लग्न नेमकं केव्हा झालं ते माहीत नाही, पण इ.स. १४५३ ते जॉनचा मृत्यू इ.स. १४६० च्या दरम्यान केव्हातरी झालं. थियोदोरा अत्यंत सुंदर होती व तिची अदाकारी सबंध पर्शियात पसरली होती. उझून हसनला जणू घबाड मिळालं. या जोडप्यास अनेक मुलं झाली. त्यापैकी एक हालीमा अमलशहा बेगम. हिने शेख हैदर या तिच्या आतेभावाशी लग्न केलं. हा सफावी होता. त्यांना तीन मुलगे आणि चार मुली झाल्या. मोठा मुलगा अली मिर्झा सफावी बनला, पण मारला गेला. पण तत्पूर्वी त्याने धाकटा भाऊ इस्माईल यास सफावीचा वंशज म्हणून नेमला. या इस्माईलने पुढे राज्य वाढवून शहा ही पदवी धारण केली ( इ.स. १५०१ ). याच्यापासून इराणचा अर्वाचीन इतिहास सुरू होतो. यानेच इस्ना अशारी ( बारा इमामांचा ) पंथ स्थापन केला व तोच पहिला प्रमुख बनला. हाच पंथ आज इराणचा अधिकृत शिया पंथ आहे. यास बारा इमामांचा पंथ असंही म्हणतात. हे सफावी अगदी आजतागायत इराणच्या राजकीय पटावर कार्यरत आहेत. शेख हैदर या सफावीने सफावी नामे धार्मिक/अध्यात्मिक चळवळीस सैनिकी परिमाण दिलं. त्याचा मुलगा प्रथम इस्माईल शहाने सफावी राज्य निर्माण केलं व पुढे वाढवलं. ट्रेबिसोंडचे कॉमनेनॉस ते सफावी हा धागा दिसून येतो. हा धागा मजबूत कसा राहिला ? कोणी बरं मदत केली ? ही मदत ज्यू व्यापाऱ्यांनी केली. ज्यू यत्र तत्र सर्वत्र पसरलेले होते. पूर्वेकडे पर्शिया ते पश्चिमेकडे पश्चिम युरोपापर्यंत सगळीकडे ज्यू आढळून येतात. कॉमनेनोस हे घराणं ज्यू आहे. थियोदोरा ही काही पहिलीच स्त्री नाही की जिचे वंशज राजेपदी आरूढ झाले. एक वेगळं उदारण देतो. जेरुसलेमचे राणी पहिली इझाबेला ( https://en.wikipedia.org/wiki/Isabella_I_of_Jerusalem ) हिची आई मरिया कॉमनेनॉस होती. आपल्या घराण्यातल्या कन्यांना इतरत्र लग्न करवून त्या राज्यांशी संबंध जोडायचं काम अनादि काळापासून चालंत आलेलं आहे. अशाच प्रकारे कॉमनेनॉस घराण्याने कोयनलू या तुर्की घराण्यामार्फत पर्शियावर प्रभाव टाकला. आता ज्यू उपाख्य यहुदी म्हणजे काय याचं एक अस्सल देशी उदाहरण देतो. अॅनाबेल लँकेस्टर जन्माने ज्यू आहे. म्हणून तिची मुलगी अंजली आनंद मेहता ही ज्यू आहे. म्हणूनंच अंजलीची दोन्ही मुलं सारा सचिन तेंडुलकर व अर्जुन सचिन तेंडुलकर ज्यू आहेत. आपल्या नेहमीच्या ओळखीतली पेज-३ वरची माणसं ज्यू आहेत, पण विकीवर अंजलीसाठी पान नाही. आता लँकेस्टर हे दिसायला देशी ( = नेटिव्ह ) इंग्लिश आडनाव असलं तरी हे लोकं नेटिव्ह नाहीत. इंग्लंडात नेटिव्ह इंग्लिश आडनावं आणि नॉर्मन आडनावं असे दोन गट आहेत. लँकेस्टर लोकं नॉर्मन आक्रमणाच्या वेळेस ( इ.स. १०६६ ) बाहेरून इंग्लंडात शिरले. पण हे नाव नॉर्मन नाही : https://en.wikipedia.org/wiki/Category:Surnames_of_Norman_origin हे इंग्लिश नाहीत, नॉर्मन नाहीत, मग हे लोकं नेमके आहेत कोण आणि उपटले कुठनं ? हे ज्यू आहेत. आता भारतात तरी ज्यू असणं हा गुन्हा नाही. पण मग इतकी लपवाछपवी कशाला? इराणातही असेच ज्यू बऱ्याच आधीपासनं अस्तित्वात आहेत. खोमेनी हे नाव खोमेन या गावावरनं घेतलं असं म्हंटलं जातं. प्रत्यक्षात गावाचं नाव कॉमनेनॉस घराण्यावरून पडलेलं असू शकतं. इतकं सांगून मध्यंतर घेतो. जरा लांब अंक होता. पण केळावेफर्स होते ना? का संपवले लगोलग? --------x--------x-------- आता कुलफी पाहिजे. सावकाश चाटंतचाटंत पुढला अंक बघायला मजा येईल. --------x--------x-------- अंक ५. हां, तर काय म्हणंत होतो की या कॉमनेनॉसचा धंदा काय होता ? तो होता क्रुसेड पेटवणे. क्रुसेड म्हणजे ख्रिस्ती भाविकांनी मुस्लिमांना जेरुसलेमच्या पवित्र भूमीवरून हाकलून लावण्यासाठी छेडलेलं धर्मयुद्ध, अशी अधिकृत व्याख्या आहे. प्रत्यक्षांत हे अधर्मयुद्ध आहे. कारण की, या युद्धांच्या आडून कॉमनेनॉस घराण्याने बराच पैसा कमावला. इ.स. १०८१ साली कॉन्स्टंटिनोपोलात सत्तेवर आल्यावर इ.स. १०९४ च्या आसपास पहिलं क्रुसेड आणि इ.स. ११४० च्या आसपास दुसरं क्रुसेड अशी दोन अधर्मयुद्धे कॉमनेनॉस घराण्याने खेळली. ही युद्धे म्हणजे पाहुण्यांच्या चपलेने विंचू मारायचे प्रकार होते. पहिलं क्रुसेड बऱ्यापैकी यशस्वी झालं, तर दुसरं फसलं. कॉमनेनॉस सत्तेबाहेर गेल्यावरही क्रुसेडचा धंदा चालूच राहला. पहिली २ व नंतरची ७ अशी मिळून ९ अधर्मयुद्धे झाली. आता वर्तमानात येऊया. आज इ.स. २०२६ मध्ये जे अमेरिका विरुद्ध इराणचं युद्ध चालू आहे ते असंच एक क्रुसेड म्हणजे अधर्मयुद्ध आहे. याचा धर्माशी काहीही संबंध नाही. अमेरिका चप्पलवाले पाहुणे आहेत, इराण विंचू आहे आणि इस्रायल फायदा उपटणारे ज्यू आहेत. हुरमुजी आखात वेठीस धरलं गेलंय. तांबडतोंडे ट्रंपूतात्या डोंगऱ्या भिवरलीचे ऑफिस बॉय आहेत. बस, इतकं लिहिण्यासाठीच एव्हढ्या लांबलचक नाटकाचा घोळ घातला. कसं वाटलं नाटक? आवडलं का? इतकी मेजवानी बटाटेवडे, मक्याच्या लाह्या, केळावेफर्स, कुलफी खायला घातली तुम्हांस, म्हणून हो म्हणायची गरज नाही. मनापासनं आवडलं तरंच हो म्हणा. पोटापासनं आवडणार हे माहितीये मला. तिसरा पहेलवी इराणात परतण्यास तयार आहे म्हणालाय. बातमी ( इंग्रजी ) : https://www.foxnews.com/world/iranian-crown-prince-reza-pahlavi-announces-readiness-lead-irans-post-regime-transition याचा कॉमनेनॉस घराण्याशी नेमका काय संबंध आहे ते मला माहीत नाही. पण एकंदरीत प्रस्थापित आणि बिगर-प्रस्थापित असा संघर्ष उद्भवू घातलाय हे नक्की. कोण कोणत्या बाजूने आहे ते पाहणे मनोरंजक ठरावे. पहेलवीचा इतिहास खोदून काढायला हवाय खरा. जमल्यास ते ही करू. चटकन मिळंत नाहीये. त्यामुळे वेळ लागतोय. म्हणून म्हंटलं की आधी लेख पुरा करू आणि नंतर पहेलवींचा इतिहास खणून काढायला इतर वाचकांची मदत घेऊ. पहिला पहेलवी रझाखान काही राजकीय पार्श्वभूमी नसतांना अचानक उगवला कसा, हा प्रश्न आहेच. असो. भारताला काय शिकण्यासारखं आहे यांतनं? युद्धाचा भारतावर जो काही परिणाम होतोय तो हाताळण्यास सध्याचं शासन समर्थ आहे. त्यामुळे आपला थेट काही संबंध नाही. पण एक परिप्रेक्ष्य तयार असलेलं बरं पडावं. म्हणून पुढे उपसंहार लिहिलाय. --------x--------x-------- आता खादाडी समाप्त. फक्त मुखशुद्धीसाठी मसाला भडंग उरलेत. कुलफीच्या काडीने दात कोरायचे नाहीत. लोक नावं ठेवतील मला ! म्हणतील, एव्हढं नाटक ऐकवलं तर जरा खायला घालायला काय धाड भरली होती ! --------x--------x-------- उपसंहार. उत्तर इराकात यझदी नामे मयूरपूजक लोकसमूह राहतो. मोर त्यांचा पवित्र प्राणी आहे. अनेक वर्षे सुन्नी लोकांनी त्यांच्या मोराला सैतान ठरवून यझदींचे छळण केले. आयसिसने इ.स. २०१४ ते २०१७ मध्ये यझदींचा जनोच्छेद केला. दुवा ( इंग्रजी ) : https://en.wikipedia.org/wiki/Yazidi_genocide इराणात आज ज्या घडामोडी चालू आहेत, त्यातनं संभाव्य सत्तांतर होऊ शकतं. अशा प्रसंगी काही लोकांचा वंशसंहार होऊ शकेल काय? कारण की गडबडीच्या वेळेस एकाचे गुन्हे दुसऱ्यावर ढकलता येतात. मला वाटतं की कुर्दांनी अतिशय सजग राहिलं पाहिजे. यझदी हे कुर्द मानले जातात, पण तरीही त्यांचा वंशसंहार झालाच. या घडीस बाकीच्या कुर्दांनी धडा घेऊन डोळ्यांत तेल घालून स्वसंरक्षण करणं आवश्यक आहे. वंशसंहारावरनं आठवलं की आर्मेनियन लोकांचाही जनोच्छेद झाला होता. इ.स. १९१५ ते १९२२ पर्यंत तुर्क सत्ताधाऱ्यांनी आर्मेनियन लोकांना टिपून मारलं होतं. आर्मेनियन लोकं आजच्या तुर्कस्थानात मोठ्या प्रमाणावर पसरलेले होते. विशेषत: पूर्व भागांत अधिक दाट वस्ती होती. वंशसंहार होतोय म्हंटल्यावर ते आजच्या अर्मेनियाकडे सरकले. तुर्कस्थानच्या अधिकृत मते आर्मेनियन वंशसंहार झालाच नाही, ज्या हत्या झाल्या त्या पहिल्या महायुद्धातल्या होत्या. त्यांत आर्मेनियन लोकांना टिपून मारलेलं नाहीये. आता हे मत जर खरं धरलं तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जर्मनीतही ज्यूंचा जो संहार झाला होता, तो जनोच्छेद नाही असं म्हणता येईल. कारण त्यावेळेस ज्यूसमावेत असंख्य ख्रिस्ती मारले गेले होते. त्यामुळे होलीकाष्ठ या संकल्पनेस मुळातून हादरा बसतो. ज्यूंचं होलीकाष्ठ खरं धरलं तर आर्मेनियन जनोच्छेद खरा धरावा लागतो. अन्यथा दोन्ही वंशसंहार म्हणून बाद होतात. सांगायचा मुद्दा काये की मोठ्या वा छोट्या युद्धांच्या प्रसंगी अल्पसंख्य गटांची हालत खराब असते. आज इराणात जी गडबड चालू आहे तिच्यातनं एखादा वंशसंहार तर निपजणार नाही ? असो. लेख लांबलाय व नेहमीप्रमाणे विस्कळीत आहे. सगळं काही एका वेळेस चर्चेत घेता येत नाही. लेखात कुठलीही उत्तरं दिलेली नाहीयेत. फक्त प्रश्न उपस्थित केलेत. उत्तरं देण्यास काळ समर्थ आहे. फक्त ती ध्यानात यायला हवीत. त्यासाठी परिप्रेक्ष्य बांधावं लागतं. ते या लेखाद्वारे बांधण्याचा यत्न केला आहे. इत्यलम. काही संज्ञा : ०१. रोम : हे आज इटलीची राजधानी आहे. परंतु पूर्वीच्या काळी म्हणजे कॉन्स्टंटिनोपोल ऑटोमनच्या हाती पडण्यापूर्वी रोम हा एक प्रांत असे. त्याचं फारसी नाव रूम आहे. त्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपोल असून त्या साम्राज्याचं आजचं नाव बायझेंटाईन आहे. जेव्हा महमद द्वितीय या ऑटोमन तुर्काने इ.स. १४५३ साली कॉन्स्टंटिनोपोल कबज्यात घेतलं तेव्हा स्वत:स कैसर-ए-रूम म्हणजे रोमचा सीझर असं बिरूद लावून घेतलं. नंतरच्या ऑटोमन राजांनी आम्हीच रोमन साम्राज्याचे खरे वारसदार आहोत हे सदैव सूचित केलं. त्या काळी इटलीतल्या रोमचंही एक साम्राज्य होतं. त्यास पवित्र रोमन साम्राज्य ( = होली रोमन एम्पायर ) म्हणतात. तर बायझेंटाईन आणि पवित्र रोमन दोन्ही साम्राज्य इ.स. ४७६ पूर्वी एकंच होती. त्यास रोमन साम्राज्य म्हंटले जाई व त्याची राजधानी आजचं रोम हीच होती. इ.स. ३३० साली कॉन्स्टंटिन याने कॉन्स्टंटिनोपोल येथे स्वत:चं वेगळं साम्राज्य उभारलं व तो स्वत:स रोमन साम्राज्याचा वारसदार म्हणवून घेऊ लागला. प्रथम ख्रिस्ती पंथ स्वीकारणारा हाच पहिला राजा होता. याच्यामुळेच ख्रिस्ती पंथ फोफावला. जेव्हा इ.स. ४७६ साली एकत्रित रोमन साम्राज्य फुटलं तेव्हा कॉन्स्टंटिनोपोलचं साम्राज्य आणि रोमचं साम्राज्य यांच्यात वारसदारीवरनं खटके उडाले. रोमने लॅटिन भाषा स्वीकारली तर कॉन्स्टंटिनोपोलने ग्रीक, फारसी, इत्यादी भाषा स्वीकारल्या. दोन्ही साम्राजे स्वत:स रोमचा खरा वारसदार म्हणवून घेत. रोमचे लोकं कॉन्स्टंटिनोपोलला ग्रीक साम्राज्य म्हणंत, तर कॉन्स्टंटिनोपोलचे लोकं रोमला लॅटिन म्हणंत. यावरून अर्वाचीन विद्वानांतही मतभेद होते. शेवटी कॉन्स्टंटिनोपोलच्या पोटांत बायझेंटियम नामे ग्रीक वस्ती होती, तर तिच्यावरनं त्यास बायझेंटाईन साम्राज्य असं संबोधन देण्यावर विद्वानांचं एकमत झालं. बायझेंटाईन ही तुलनेने अर्वाचीन संज्ञा आहे. ०२. ज्यू कोण ? : ज्यू एकसंध वंश कधीच नव्हता. यहुदीसम समजुती असलेले अनेक लोकगट अस्तित्वात होते. असे याहुदीय गट कॉकेशस पासून थेट पश्चिम युरोपपर्यंत अगदी इ.स. पहिल्या शतकाच्या आधीपासूनही सर्वत्र पसरलेले होते. तर आता लेख आवरता घेतो. चर्चा सुरू हौद्या. आपला नम्र, -गामा पैलवान


Comments

इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?