फुटबॉलचं महायुद्ध दि. ११ पासून सुरू झालं. एकूण ४८ संघांचा सहभाग असलेले फुटबॉलचे सामने पुढे रंगत जातील. सध्या सामन्यांच्या वेळा आपल्या भारतीयांच्या अजिबात सोयीच्या नसतात. हायलाइट्सची व्यवस्था उरली नाही, त्यामुळे सामन्यांचा आनंद घेणे जिकिरीचे झाले आहे. अडतीस वर्षांचा मेस्सी अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देतो का, ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तिकडे, एक्केचाळीस वर्षांच्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होते का, तेही पाहता येईल. आपण भारतीय फुटबॉलमध्ये कुठेच नसलो म्हणून काय झालं, आपण कोणत्या तरी संघाचे फॉलोअर्स असतोच.
छायाचित्र फिफाच्या संस्थळावरुन.
मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने सामन्याला सुरुवात झाली. मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला दोन-शून्याने हरवले. बाकी, तिकिटांचा घोळ, युद्ध, आंदोलने जगभर चालू आहेत, तरीही हा सोहळा १९ जुलैपर्यंत रंगणार आहे. अर्थात, भारतीय चाहत्यांना आपल्या लाडक्या मेस्सी, रोनाल्डो, नेमार, किलियन एम्बाप्पे, लामिन यमाल यांना खेळताना बघण्याची संधी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या लढती मध्यरात्री, भल्या पहाटे किंवा अगदी सकाळी असणार आहेत.
एक मिपाकर आणि भारतीय चाहता म्हणून आपलं प्रेम कायम ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल या संघांवर राहिलं आहे. जागतिक फुटबॉलमध्ये ब्राझीलइतके यश इतर कोणत्याही देशाला मिळालेले नाही. पाच वेळा विजेता असलेला ब्राझील संघ सध्या मागे पडला आहे. यामुळे ब्राझीलचे चाहते अजूनही आपल्या संघाच्या सुवर्णकाळाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. स्पेन नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीने फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतो. अनेक उत्कृष्ट तरुण खेळाडू तयार करून आणि युरोपमध्ये एक मजबूत संघ म्हणून टिकून राहूनही, त्यांना दुसरा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. ब्राझील आणि स्पेन भूतकाळातील आठवणींचा मागोवा घेत असतील, तर अर्जेंटिनाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. या दक्षिण अमेरिकन देशाने २०२२ मध्ये कतार येथे मेस्सीच्या फुटबॉल इतिहासातील एका अत्यंत संस्मरणीय कामगिरीच्या जोरावर ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवून वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. आता, अर्जेंटिनाचे ध्येय जेतेपद राखण्याचे असेल. विजेतेपदाच्या शर्यतीत इंग्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, हॉलंड, नॉर्वे, बेल्जियम हे संघदेखील असतील. यावेळी कुठला संघ बाजी मारणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत आता जास्त उमटत आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील इराणच्या तिन्ही साखळी लढती अमेरिकेत होणार आहेत. त्या लढतींच्या दिवशीच इराणचा संघ अमेरिकेत येईल, असे सुरुवातीस अमेरिकेने सांगितले होते. परवानगी देणे-न देणे, तात्यांची हुकूमशाही आणि सद्यस्थिती पाहता खेळापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींची चर्चा जास्त असेल.
फुटबॉलचे सामने जमेल तसे पाहत राहू. सध्या फुटबॉल सामन्यांच्या हायलाइट्सची व्यवस्था नाही, म्हणून सर्वत्र बोंब आहे; तरीही आपण मिपाकर जमेल तसे सामन्यांवर, सामन्यांतील घटनांवर लिहीत-बोलत राहू. (धागा अपडेट करत राहीन)
फिफा विश्वचषक २०२६ - GROUP STAGE
GROUP A
Mexico • South Africa • Korea Republic • Czechia
GROUP B
Canada • Bosnia and Herzegovina • Qatar • Switzerland
मोरोक्को हा कायम आक्रमणास पसंती देणारा संघ. मात्र, फ्रान्सची वाढती ताकद त्यांनीही सामन्यापूर्वी मान्य केली. मोरोक्कोने बचावास प्राधान्य दिले. त्यानंतरही फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील फ्रान्सच्या वेगवान, योजनाबद्ध आक्रमणासमोर लढतीपूर्वीच हार पत्करली. फ्रान्सने या स्पर्धेत प्रभावी खेळ केलेल्या मोरोक्कोचे आव्हान २-० असे संपवून फ्रान्स ने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल इजिप्त हरले त्यांच्या खेळाडूंच्या काही शॉर्ट व्हीडीयो मधे फीफा पंच यांनी आमच्यावर अन्याय केला, अर्जेंटीनालाच जर जिंकवायचे होते तर आम्हाला कशाला बोलावले वगैरे सुरु झालं.
जुन्या काळी जेव्हा वायकिंग योद्धे मोहिमांवर निघत तेव्हा आपल्या लाँग शिप अशाच प्रकारे हाकत खुल्या समुद्रात, ड्रम आणि तुतारी (व्हायकिंग हॉर्न) फुंकत त्याच्या तालावर
ह्या फिफाचा माझा पहिला सामना नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आता पाहिला, ऑनलाईन पाहायला फार जुगाड करावे लागले, २:३० वाजल्यापासून ३:३० पर्यंत प्रयत्न केले तेव्हा कोला टीवी ह्या व्हिएतनामी चॅनल वर मैच पाहता आली पण १ तास उलटला होता नी १-१ बरोबरी झाली होती तिथून व्हिएतनामी भाषेतील कॉममँट्री झेलत मैच पाहने सुरू केले, इंग्लंडचा दुसरा गोल अफलातून होता, अचानक थेट गोलपोस्टवर अनपेक्षितपणे बॉल झाडला नी तितक्याच वेगवान पद्धतीने गोल केला गेला, नंतर अनेक संध्या येऊनही नॉर्वेला अटॅक करता आला नाही. इंग्लंडचे अनेक हल्ले नॉर्वेच्या गोलकीपरच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वाचले. नॉर्वेने एक चांगला हल्ला चढवला असता तर कदाचित गोल झाला असता, इंग्लंडचे पासेस अतिशय स्मूथ होते. शेवटच्या ४५ मिनिटात तर साधा गोलपोस्ट पर्यंतही बॉल नेता आला नाही नॉर्वेला. आता switz विरुद्ध अर्जेंटीना मैच पाहायला मी नसेन. झोपावे लागेल. उठल्यावर निकाल कळेलच. तो पर्यंत कुणाला इंग्रजी कॉमँट्री सह ऑnlain मैच पहायचा चकटफू जुगाड माहीत असेल तर सांगा.
फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यात फ्रान्स जिंकले. स्पेन विरुद्ध बेल्जियम, स्पेन जिंकले. नॉर्वे विरुद्ध इंग्लंड, इग्लंड जिंकले. अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड आज अर्जेंटीना जिंकले.
फ्रान्स विरुद्ध स्पेन, दि. १५ जुलै, बुधवारी रात्री १२;३० वाजता. इग्लंड विरुद्ध अर्जेंटीना, १६ जुलै, गुरुवारी रात्री १२:३० वाजता.
ज्यांचा राग आहे क्रिकेट वर गुलामांचा खेळ इत्यादी इत्यादी कारणांनी. त्यांना चालेल का इंग्लंड जिंकलेलं ? आपल्याला गुलाम करणाऱ्यांनी मुक्त खेळ इत्यादी जिंकलेला वगैरे वगैरे ? 😂😂😂😂
फ्रान्सचं जीव् तोडून आक्रमण करीत आहे, एम्बापेवर सर्व भरवसा पण स्पेनचा बचाव आणि आक्रमण यापुढे फ्रान्स फीका पडत चालला आहे. 85 मिनिटाचा खेळ झाला आहे प्रचंड वेगवान खेळ धूसमुसळेपणाचाही वेग वाढलाय शेवटचे काही मिनिट बाकी
जिंकला स्पेन! फ्रान्स ने एकही हल्ला केला नाही, अगदी नावकही टीम खेळतेय असे वाटले. स्पेन चा खेळ प्रचंड म्हणजे प्रचंड चांगला होता. फ्रांसचे पासेसही धड नव्हते, अलगद बॉल काढून न्यायचे स्पॅनिश खेळाडू! स्पेनची जागा पक्की झाली आहे फायनलला! आता इंग्लंड अर्जेंटिनात इंग्लंड जिंकावा अशी फार ईच्छा आहे!
आदल्या दिवशी मध्यरात्रीचा मॅच संपवून नंतर झोंपेचं खोबरं झालेलं सकाळीच उठून पुन्हा कामेही होती दिवस सर्व पांगुन गेला होता.
काल इच्छा असूनही इंग्लण्ड आणि अर्जेंटीना पाहिला नाही. सकाळी डोळे उघडल्यावर स्कोर बघितला अर्जेंटीना 02- इंग्लण्ड 01 असा निकाल पाहुन आनंद झाला. आज दिवसभरात क्षणचित्रांचा आनंद घेतला. इंग्लण्ड 01 गोलची आघाडी होती शेवटच्या दहा मिनिटात अर्जेंटीनाने हरलेला मॅच दोन गोल करुन जिंकला.
आता स्पेन आणि अर्जेंटीचा फायनल मॅच दुस-या दिवशी सुटी घेऊन बघणे आले.
सेम सेम! पहाटे २:३० पर्यंत स्पेन फ्रान्स पाहीली नी नंतर रात्रभर झोप आली नाही डिपसिक सोबत रात्रभर गप्पामारून सकाळी सात वाजता कामावर सुटलो, अख्खा दिवस पेंगत गेला रात्री ९ वाजता १२:३० ची अलार्म लाऊन गाढ झोपी गेलो नंतर १२:३० ला अलार्मच्या आवाजाने जागलो पण बंद करून पुन्हा आडवा झालो नी सकाळी ऊट्या उठल्या स्कोर पाहिला नि श्या हे उद्गार आले. मागच्या फायनला अर्जेंटीना जिंकावा अशी दार इच्छा होती पण ह्यावेळी अर्जेंटीना फायनललाच पोहोचू नये अशी फार ईच्छा होती.
मी मेस्सी टीम कडून अर्थात अर्जेंटीना. अर्जेंटीना जिंकली तरी, अंपायर व्हिडिओ फॉल्स सगळं दुर्लक्ष करून अर्जेंटीना पक्षपात करून जिंकला एवढं ऐकले की मित्रो म्हणून डोळे मिटायला मोकळा... ;)
अर्जेंटीना जिंकेल हे मला माहितीय पण मला स्पेन जिंकावा असे वाटतेय. स्पेन जिंकला तर तो चमत्कारच असेल! बाकी फ्रान्स स्पेन मैच मधे एकही बॉल डोक्यावरून गोलपोस्ट जवळ मारण्यात फ्रान्स अपयशी ठरला हे कसे शक्य झाले?
फायनल सुरू झालीय, स्पेनने जोरदार हल्ले चढवले सुरुवातीला पण यश आले नाही! नंतर ढकलाढकली सुरू झाली, त्यातूनही कुणाला काही मिळाले नाही, तात्या सुध्दा आलेत मॅच पाहायला!
सहमत! स्पेन सहज बॉल काढून नेतोय, स्पेनने असंच खेळ सुरू ठेवला नी एखादा झोतात हल्ला चढवला तर गोल दूर नाही. अर्जेंटिनाला स्पेनची भक्कम फळी भेदावी लागणारे जी फार कठीण आहे.
हेच लिहायला आलो होतो, आर्जेंटीनाच्या गोलकीपरच्या भरवशावरच गोल वाचले, नाहीतर स्पेनचे ४ गोल तरी झाले असते. पण मला वाटतय आता मैच अर्जेंटिनाच्या बाजूने झुकेल, पेनल्टी शुटाउट मधे गेली मॅच तर मग अर्जेंटिना जिंकेल. आता उरलेल्या खेळात मजा येणारे.
तो गोल द्यायला हवा होता स्पेनला असे वाटते! बाकी अर्जेंटिना कडे १ तर स्पेनकडे ११ मेस्सी आहेत. अर्जे गोलकीपरने एकूण ११ गोल वाचवले. आता पेनल्टी शुटाउट आहे बहुतेक.
स्पेन 1 - अर्जेंटीना 0 अशा त-हेने अप्रतिम खेळ करणरा संघ स्पेन विश्वविजेता ठरला. अर्जेंटीना आजच्या सामन्यात कुठेच् नव्हता गोल कीपर केवळ गोल वाचवत होता. अर्जेन्टीनाच्या गोलकीपरने कमाल गोलकिपरिंग केली. मेस्सी अजिबात जाणवला नाही.
मला शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होती की अर्जेंटीना गोल करणार, मैच १-१ बरोबरीत जाणार नी पेनल्टी शुटाउट मधे अर्जेंटीना जिंकणार. पण १ गोल होऊनही स्पेनने आजीबात सामन्यावरून पकड ढिली केली नाही.
अरे रे, ऐन फुटबॉल worl cu मध्ये हा धागा पाहता आला नाही.. तेव्हडीच मज्जा..
बाकी मेस्सी आणि अर्जेंटीना मला आवडायचा आधी परंतु इजिप्त पासूनच्या match पासून मात्र मला सा संघ आवडेनासा झाला... आणि त्या पुढील प्रत्येक सामान्यात त्यांचा धसमुसळा खेळ, पंचांचे निर्णय याने वाईट वाटले...
आणि शेवटच्य सामन्यात स्पेन ला सपोर्ट करत असल्याने खुप्पच मज्जा आली..
आणि धसमुसळा खेळ करणारा अर्जेंटीना हरला त्याचा आनंद झाला...
स्पेन इतकी भारी खेळेल आणि त्यांचा defense अर्जेंटीना भेदू शकणार नाही ह्याची बेट मी जिंकली...
आणि स्पेन ने चिडक्या लोकांना तोंड दाखवायला पण जागा दिली नाही या बद्दल स्पेनचं कौतुक...
कॉलेजला मी गोलकीपर असल्याने अर्जेंटीना च्या गोळकिपरचे तरी हि मला कौतुक वाटले... तो एकटाच काय तो स्पेन चा विरोध करू शकला...
प्रतिक्रिया
फ्रांसचा विजय...
In reply to अंतिम आठ संघ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोरोक्को हा कायम आक्रमणास पसंती देणारा संघ. मात्र, फ्रान्सची वाढती ताकद त्यांनीही सामन्यापूर्वी मान्य केली. मोरोक्कोने बचावास प्राधान्य दिले. त्यानंतरही फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील फ्रान्सच्या वेगवान, योजनाबद्ध आक्रमणासमोर लढतीपूर्वीच हार पत्करली. फ्रान्सने या स्पर्धेत प्रभावी खेळ केलेल्या मोरोक्कोचे आव्हान २-० असे संपवून फ्रान्स ने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
-दिलीप बिरुटे
आता डीडी वर दिसणार ना?
आता डीडी वर दिसणार ना?
फिक्सिंग ?
काल इजिप्त हरले त्यांच्या खेळाडूंच्या काही शॉर्ट व्हीडीयो मधे फीफा पंच यांनी आमच्यावर अन्याय केला, अर्जेंटीनालाच जर जिंकवायचे होते तर आम्हाला कशाला बोलावले वगैरे सुरु झालं.
अरे देवा...!
-दिलीप बिरुटे
ओफसाइडचा नियम काढून टाकायला पाहिजे.
किंवा सुधारणा करायला हवी.
तसेच कुणाच्या पासवर डोक्याने मारलेल्या चेंडूवर गोल बाद ठरवला तर मजा येईल. पायानेच खेळा. डोक्याने चेंडू अडवता आला तर ठीक. पण गोल बाद.
बर त्या नॉर्वे संघाची,…
बर त्या नॉर्वे संघाची, त्यांच्या बोट वलव्हण्याची खुप हवा आहे सध्या!!!
अंतिम सामना अर्जेंटिना वि. नॉर्वे पाहिजे, मजा येईल 😅
तुम्ही म्हणता आहात ती एक नॉर्वेजियन वायकिंग परंपरा आहे
In reply to बर त्या नॉर्वे संघाची,… by Bhakti
जुन्या काळी जेव्हा वायकिंग योद्धे मोहिमांवर निघत तेव्हा आपल्या लाँग शिप अशाच प्रकारे हाकत खुल्या समुद्रात, ड्रम आणि तुतारी (व्हायकिंग हॉर्न) फुंकत त्याच्या तालावर
नॉर्वे विरुद्ध इंग्लंड
रंगतदार मॅच सुरु आहे. सामन्याचा निर्धारित वेळ संपला आहे 1-1 अशी बरोबरी आहे आता दोन्ही संघाकडून धूसमुसळेपणा सुरु आहे.
कोण जिंकेल त्याचा निकाल थोड्या वेळात येइल...
-दिलीप बिरुटे
इंग्लण्डची आघाडी 02-01
In reply to नॉर्वे विरुद्ध इंग्लंड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधिकच्या वेळात इंग्लण्डने नॉर्वे विरुद्ध आघाडी घेतली आहे 02-01
-दिलीप बिरुटे
ह्या फिफाचा माझा पहिला सामना…
ह्या फिफाचा माझा पहिला सामना नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आता पाहिला, ऑनलाईन पाहायला फार जुगाड करावे लागले, २:३० वाजल्यापासून ३:३० पर्यंत प्रयत्न केले तेव्हा कोला टीवी ह्या व्हिएतनामी चॅनल वर मैच पाहता आली पण १ तास उलटला होता नी १-१ बरोबरी झाली होती तिथून व्हिएतनामी भाषेतील कॉममँट्री झेलत मैच पाहने सुरू केले, इंग्लंडचा दुसरा गोल अफलातून होता, अचानक थेट गोलपोस्टवर अनपेक्षितपणे बॉल झाडला नी तितक्याच वेगवान पद्धतीने गोल केला गेला, नंतर अनेक संध्या येऊनही नॉर्वेला अटॅक करता आला नाही. इंग्लंडचे अनेक हल्ले नॉर्वेच्या गोलकीपरच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वाचले. नॉर्वेने एक चांगला हल्ला चढवला असता तर कदाचित गोल झाला असता, इंग्लंडचे पासेस अतिशय स्मूथ होते. शेवटच्या ४५ मिनिटात तर साधा गोलपोस्ट पर्यंतही बॉल नेता आला नाही नॉर्वेला. आता switz विरुद्ध अर्जेंटीना मैच पाहायला मी नसेन. झोपावे लागेल. उठल्यावर निकाल कळेलच. तो पर्यंत कुणाला इंग्रजी कॉमँट्री सह ऑnlain मैच पहायचा चकटफू जुगाड माहीत असेल तर सांगा.
आता सेमी फायनल.
फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यात फ्रान्स जिंकले.
स्पेन विरुद्ध बेल्जियम, स्पेन जिंकले.
नॉर्वे विरुद्ध इंग्लंड, इग्लंड जिंकले.
अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड आज अर्जेंटीना जिंकले.
फ्रान्स विरुद्ध स्पेन, दि. १५ जुलै, बुधवारी रात्री १२;३० वाजता.
इग्लंड विरुद्ध अर्जेंटीना, १६ जुलै, गुरुवारी रात्री १२:३० वाजता.
-दिलीप बिरुटे
फुस्स.व्हायकिंग उत्सव फुस्स…
फुस्स.
व्हायकिंग उत्सव फुस्स.
हालांड फुस्स.
मेस्सी फुस्स.
केन फुस्स
इंग्लंड कदाचित Fifa विजेते…
इंग्लंड कदाचित Fifa विजेते ठरतील असे वाटते आहे
ते एक कोण ते
In reply to इंग्लंड कदाचित Fifa विजेते… by खिलजि
ज्यांचा राग आहे क्रिकेट वर गुलामांचा खेळ इत्यादी इत्यादी कारणांनी. त्यांना चालेल का इंग्लंड जिंकलेलं ? आपल्याला गुलाम करणाऱ्यांनी मुक्त खेळ इत्यादी जिंकलेला वगैरे वगैरे ? 😂😂😂😂
मॅच पाहतोय! थरारक!
मॅच पाहतोय! थरारक!
फ्रांस 0 स्पेन 02
In reply to मॅच पाहतोय! थरारक! by अमरेंद्र बाहुबली
स्पेनचा फायनल प्रवेश दिसत आहे, अजून वीस मिनिट खेळ बाकी...
-दिलीप बिरुटे
फ्रान्सचं आक्रमण
In reply to फ्रांस 0 स्पेन 02 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्रान्सचं जीव् तोडून आक्रमण करीत आहे, एम्बापेवर सर्व भरवसा पण स्पेनचा बचाव आणि आक्रमण यापुढे फ्रान्स फीका पडत चालला आहे. 85 मिनिटाचा खेळ झाला आहे प्रचंड वेगवान खेळ धूसमुसळेपणाचाही वेग वाढलाय शेवटचे काही मिनिट बाकी
-दिलीप बिरुटे
जिंकला स्पेन! फ्रान्स ने…
In reply to फ्रान्सचं आक्रमण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जिंकला स्पेन! फ्रान्स ने एकही हल्ला केला नाही, अगदी नावकही टीम खेळतेय असे वाटले. स्पेन चा खेळ प्रचंड म्हणजे प्रचंड चांगला होता. फ्रांसचे पासेसही धड नव्हते, अलगद बॉल काढून न्यायचे स्पॅनिश खेळाडू! स्पेनची जागा पक्की झाली आहे फायनलला! आता इंग्लंड अर्जेंटिनात इंग्लंड जिंकावा अशी फार ईच्छा आहे!
स्पेन...
अंतिम फेरी अर्थात फायनलला पोहोचले.. सविस्तर गप्पा सकाळी करुया...
-दिलीप बिरुटे
स्पेनचे खेळाडू बॉल कसा फिरवतात
एवढेच बघणे फ्रान्सच्या खेळाडुंचे काम होते ते त्यांनी केले.
सिक्स सेन्स
ह्यावेळी इंग्लंड विश्व चषक जिंकेल असे गट फिलिंग आहे ! अर्थात गट फिलिंग बऱ्याच बाबतीत निरर्थक असते !
काल १२:३० ची अलार्म लावून…
काल १२:३० ची अलार्म लावून झोपलो पण काय उठल्या गेले नाही, अर्जेंटीना फायनएलटी मधे धडकला! इंग्रज जिंकावेत आही फार ईच्छा होती, पण गळपटले! कशी झाली मैच?
मीही बघितला नाही.
In reply to काल १२:३० ची अलार्म लावून… by अमरेंद्र बाहुबली
आदल्या दिवशी मध्यरात्रीचा मॅच संपवून नंतर झोंपेचं खोबरं झालेलं सकाळीच उठून पुन्हा कामेही होती दिवस सर्व पांगुन गेला होता.
काल इच्छा असूनही इंग्लण्ड आणि अर्जेंटीना पाहिला नाही. सकाळी डोळे उघडल्यावर स्कोर बघितला अर्जेंटीना 02- इंग्लण्ड 01 असा निकाल पाहुन आनंद झाला. आज दिवसभरात क्षणचित्रांचा आनंद घेतला. इंग्लण्ड 01 गोलची आघाडी होती शेवटच्या दहा मिनिटात अर्जेंटीनाने हरलेला मॅच दोन गोल करुन जिंकला.
आता स्पेन आणि अर्जेंटीचा फायनल मॅच दुस-या दिवशी सुटी घेऊन बघणे आले.
-दिलीप बिरुटे
सेम सेम! पहाटे २:३० पर्यंत…
In reply to मीही बघितला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सेम सेम! पहाटे २:३० पर्यंत स्पेन फ्रान्स पाहीली नी नंतर रात्रभर झोप आली नाही डिपसिक सोबत रात्रभर गप्पामारून सकाळी सात वाजता कामावर सुटलो, अख्खा दिवस पेंगत गेला रात्री ९ वाजता १२:३० ची अलार्म लाऊन गाढ झोपी गेलो नंतर १२:३० ला अलार्मच्या आवाजाने जागलो पण बंद करून पुन्हा आडवा झालो नी सकाळी ऊट्या उठल्या स्कोर पाहिला नि श्या हे उद्गार आले. मागच्या फायनला अर्जेंटीना जिंकावा अशी दार इच्छा होती पण ह्यावेळी अर्जेंटीना फायनललाच पोहोचू नये अशी फार ईच्छा होती.
अर्जेंटिना जिंकली…
In reply to काल १२:३० ची अलार्म लावून… by अमरेंद्र बाहुबली
अर्जेंटिना जिंकली म्हणण्यापेक्षा इंग्लड हरले ....
आता स्पेन - अर्जेंटिना फायनल कशी होते बघूया ...
(फ्रान्स ला सपोर्ट होता पण त्यांनी निराशा केली )
१७ वर्षांपूर्वी मेसीने ज्याला न्हाऊ घातलं तोच यमाल विरुद्खेळणार
😅😅 कमाल आहे.४ वर्षांपूर्वी…
In reply to १७ वर्षांपूर्वी मेसीने ज्याला न्हाऊ घातलं तोच यमाल विरुद्खेळणार by Bhakti
😅😅 कमाल आहे.
४ वर्षांपूर्वी मेसीचा संघ जिंकला तो आनंद अजूनही आठवतो, परत इतिहास रिपीट होणार का??
फायनल अर्जेंटिनाच जिंकणार…
In reply to 😅😅 कमाल आहे.४ वर्षांपूर्वी… by Bhakti
फायनल अर्जेंटिनाच जिंकणार आहे, कुणीही पैंज लावा!
आपला सपोर्ट स्पेन ला
In reply to फायनल अर्जेंटिनाच जिंकणार… by अमरेंद्र बाहुबली
आपला सपोर्ट स्पेन ला
हो तर मेस्सीकडून अंबानीने…
In reply to फायनल अर्जेंटिनाच जिंकणार… by अमरेंद्र बाहुबली
हो तर मेस्सीकडून अंबानीने मोठी पूजा करून घेतली तर 😅
मेस्सी आणि अंबानी कनेक्शन 😂
नक्की पहा रील
https://www.instagram.com/reel/Dajv-JAyg6w/?igsh=M2VoNjh5c2k1Y3d1
१९ नंबर कॉन्स्पिरेयांसी इन…
In reply to हो तर मेस्सीकडून अंबानीने… by Bhakti
१९ नंबर कॉन्स्पिरेयांसी इन फिफा😂तुफान हसतेय. नक्की पहा.
https://www.instagram.com/reel/Da4UGbbOlFa/?igsh=MTB1ZTFld3V5bGVzMw==
फेक फोटो की खरा ?
In reply to १७ वर्षांपूर्वी मेसीने ज्याला न्हाऊ घातलं तोच यमाल विरुद्खेळणार by Bhakti
फेक फोटो की खरा ?
खरा आहे.
In reply to फेक फोटो की खरा ? by अमरेंद्र बाहुबली
https://www.bbc.com/sport/football/articles/c9w0j104rvgo
बाकी जो थ्रिल लाइव मॅच…
बाकी जो थ्रिल लाइव मॅच पाहण्यात आहे यो क्षणचित्रात नाही.
अर्जेंटीना... फॉलोअर्स
मी मेस्सी टीम कडून अर्थात अर्जेंटीना. अर्जेंटीना जिंकली तरी, अंपायर व्हिडिओ फॉल्स सगळं दुर्लक्ष करून अर्जेंटीना पक्षपात करून जिंकला एवढं ऐकले की मित्रो म्हणून डोळे मिटायला मोकळा... ;)
-दिलीप बिरुटे
अर्जेंटीना जिंकेल हे मला…
अर्जेंटीना जिंकेल हे मला माहितीय पण मला स्पेन जिंकावा असे वाटतेय. स्पेन जिंकला तर तो चमत्कारच असेल! बाकी फ्रान्स स्पेन मैच मधे एकही बॉल डोक्यावरून गोलपोस्ट जवळ मारण्यात फ्रान्स अपयशी ठरला हे कसे शक्य झाले?
फायनल सुरू झालीय, स्पेनने…
फायनल सुरू झालीय, स्पेनने जोरदार हल्ले चढवले सुरुवातीला पण यश आले नाही! नंतर ढकलाढकली सुरू झाली, त्यातूनही कुणाला काही मिळाले नाही, तात्या सुध्दा आलेत मॅच पाहायला!
अंतिम सामना.
In reply to फायनल सुरू झालीय, स्पेनने… by अमरेंद्र बाहुबली
26 मिनिट्स झाले. दोन्ही कडून जोरदार आक्रमण सुरु 0- 0 बरोबरी आहे.
बघू कोण जिंकते.
_दिलीप बिरुटे
40 मिनिट्स झालेत..
In reply to अंतिम सामना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्पेंन भारी खेळतोय अर्जेन्टीनाच्या तुलनेत.
अजुनही कोणाचा गोल नाही
सहमत! स्पेन सहज बॉल काढून…
In reply to 40 मिनिट्स झालेत.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत! स्पेन सहज बॉल काढून नेतोय, स्पेनने असंच खेळ सुरू ठेवला नी एखादा झोतात हल्ला चढवला तर गोल दूर नाही. अर्जेंटिनाला स्पेनची भक्कम फळी भेदावी लागणारे जी फार कठीण आहे.
पहिला हाफ
In reply to 40 मिनिट्स झालेत.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
0-0 आज स्पेन विश्वकप नेतो असे वाटत आहे. खेळ पाहता.
अर्जेण्टीना शेवटी आक्रमण आणि चमत्कार करतो. बघूया दुस-या हाफ मधे...
-दिलीप बिरुटे
60 मिनिट्स
In reply to पहिला हाफ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्पेन वाल्यांचा खेळ जबरा आहे. अजेंटिनाच्या गोल कीपर कौतुक करावे तेवढे कमी. अजुन खेळ बाकी.
-दिलीप बिरुटे
हेच लिहायला आलो होतो,…
In reply to 60 मिनिट्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच लिहायला आलो होतो, आर्जेंटीनाच्या गोलकीपरच्या भरवशावरच गोल वाचले, नाहीतर स्पेनचे ४ गोल तरी झाले असते. पण मला वाटतय आता मैच अर्जेंटिनाच्या बाजूने झुकेल, पेनल्टी शुटाउट मधे गेली मॅच तर मग अर्जेंटिना जिंकेल. आता उरलेल्या खेळात मजा येणारे.
75 मिनिट्स
In reply to 60 मिनिट्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्पेन कडून गोल कड़े आक्रमण वेग अर्जेन्टीनाच्या तुलनेत खुप आहे. अर्जेंटीनाला शेवटी जाग येते तरीही स्पेन आज भारी
0 - 0
-दिलीप बिरुटे
+१ स्पेनचे तोफगोळ्यासारखे…
+१ स्पेनचे तोफगोळ्यासारखे येणारे हिट निधड्या छातीने अडवणाऱ्या अर्जेंटिनाच्या गोलकीपरचे मनापासून कौतुक! शेवटची यमाल ची हिट तार काय वाचवली त्याने. जबरजस्त!
90 मिनिट्स
90 मिनिट्स खेळ संपला. दोन्ही हाफ मधे स्पेन वरचढ़ होता. अर्जेंटीनाच्या गोलकीपरने अफ्लातुन गोलकिपरिंग केले. किमान सहां सात गोल वाचवले.
अधिकच्या वेळात निर्णय लागतो की पेनल्टी शूटवर मॅच जातो.
-दिलीप बिरुटे
तो गोल द्यायला हवा होता…
In reply to 90 मिनिट्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो गोल द्यायला हवा होता स्पेनला असे वाटते! बाकी अर्जेंटिना कडे १ तर स्पेनकडे ११ मेस्सी आहेत. अर्जे गोलकीपरने एकूण ११ गोल वाचवले. आता पेनल्टी शुटाउट आहे बहुतेक.
स्पेनच गोल
In reply to 90 मिनिट्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधिकच्या वेळात स्पेनचा पहिला गोल खरं तर स्पेनला आज विजयी घोषित करून टाकावे इतका अप्रतिम खेळ त्यांनी केला आहे.
मेस्सी मैदानात दिसत नाही त्याच खेळही दिसत नाही सर्व बचाव स्पेनने भेदुन काढला आहे.
-दिलीप बिरुटे
स्पेनचा गोल! अफलातून!…
स्पेनचा गोल! अफलातून! जबरजस्त!
स्पेन!🇪🇸 जगज्जेता!
स्पेन!🇪🇸 जगज्जेता!
स्पेन विश्वकप विजेता..
स्पेन 1 - अर्जेंटीना 0 अशा त-हेने अप्रतिम खेळ करणरा संघ स्पेन विश्वविजेता ठरला. अर्जेंटीना आजच्या सामन्यात कुठेच् नव्हता गोल कीपर केवळ गोल वाचवत होता. अर्जेन्टीनाच्या गोलकीपरने कमाल गोलकिपरिंग केली. मेस्सी अजिबात जाणवला नाही.
स्पेनचं अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
मला शेवटच्या क्षणापर्यंत…
मला शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होती की अर्जेंटीना गोल करणार, मैच १-१ बरोबरीत जाणार नी पेनल्टी शुटाउट मधे अर्जेंटीना जिंकणार. पण १ गोल होऊनही स्पेनने आजीबात सामन्यावरून पकड ढिली केली नाही.
माझा मेस्सी हरला 😔अर्थात जो…
माझा मेस्सी हरला 😔अर्थात जो उत्तम तोच जिंकतो!!!स्पेनचे अभिनंनंदन 💐
विल मिस यु मेस्सी इन फिफा😇
मेस्सीचा संघ जिंकावा अशी…
मेस्सीचा संघ जिंकावा अशी इच्छा होती, स्पेनचे अभिनंदन.
सामना सुरू झाल्यावरच कळलं की…
सामना सुरू झाल्यावरच कळलं की निळ्यापांढऱ्यांवर लालपिवळे भारी पडत आहेत.
अरे रे, ऐन फुटबॉल worl cu …

असो...