भारतातील विमा उद्योग प्रामाणिक नाही. क्लेम पास होईलच अन किती होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रिमीअम भरूनही पैसे मिळतील की नाही अन किती याची काळजी असते.
माझी सुरुवातीची अठरा वर्षांपासूनचा आरोग्य विमा होता.
कोरोनात त्याच कंपनीचा दुसरा अधिकचा विमा प्रत्येकाचा वेगळा कोरोना कवच नावाचा घेतला. कुटूंबात कोरोना झाला झाल्यानंतर, दावा टाकला तरी देखील मिळत नव्हता. विमा कंपनीच्या कार्यालयात आकांडतांडव केले तेव्हा काय ते १२ हजार की काय दोन जणांचे मिळाले.
साध्या आजारांचे एका दिवसाचे (त्यांच्या भाषेत डे केअर) पैसे मिळतच नाहीत. साखळी व्यवसाय फोफावला आहे. डॉक्टर प्रामाणिक असू शकतात पण इस्पितळांचे व्यवस्थापन करणारे नोकरशाही पैसा कसा जास्तीचा मिळेल याकडे पाहतात.
साधं काल परवाच आईला डोळ्यांच्या दवाखान्यात नेले तर नाव नोंद करतांना स्वागतीकाने दोन वेळा आरोग्यविमा आहे का असे विचारले.
वाहनांचा विम्याबाबतीतही असाच प्रकार होत असतो. एखादा अपघात झाला तर आधीच्या दुरुस्त्याही करवून घेता येतात. हा फायदा आहे की तोटा? मग त्यामुळे आपलाला जास्तीचा हप्ता द्यावा लागतो याचा ग्राहक विचार करत नाही.
आयुर्विमा अगदी कोटींत आहे अन त्याचा दावा कुणाला मिळाला आहे (अर्थातच नातेवाईकांना) असा अनुभव कुणाचा आहे काय? इतर देशांत या व्यवसायाचा काय अनुभव आहे?
मिसळपाव
प्रतिक्रिया
कार आणि आरोग्य विमा यांचे…
कार आणि आरोग्य विमा यांचे फायदे घेतले आहेत. तरीदेखील आतापर्यंत भरलेल्या रकमेपेक्षा कमी खर्चातच निपटारा झालेला आहे. अचानक खर्च उद्भवून शॉक नको एवढाच काय तो फायदा.
पुन्हा सैमला लावले कामाला
या मजकुरात विमा उद्योगाबद्दलचा वैयक्तिक अनुभवावर आधारित तीव्र अविश्वास व्यक्त केला आहे. त्यात काही मुद्दे वास्तवाशी जुळणारे आहेत (क्लेम प्रक्रियेतील अडचणी, हॉस्पिटल बिलिंगचे प्रश्न, ग्राहकांचा त्रास), पण काही निष्कर्ष सर्वसाधारण (overgeneralized) आहेत. चिकित्सक विश्लेषण आणि प्रतिपक्ष पुढीलप्रमाणे.
मुख्य दावा: “भारतातील विमा उद्योग प्रामाणिक नाही”
हा निष्कर्ष वैयक्तिक अनुभवावरून संपूर्ण उद्योगाबद्दल काढलेला आहे.
प्रतिपक्ष:
भारतात दरवर्षी लाखो आरोग्य, वाहन आणि आयुर्विमा दावे मंजूर होतात.
विमा कंपन्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो (Claim Settlement Ratio) सार्वजनिकरित्या जाहीर केले जातात.
काही कंपन्यांची कामगिरी चांगली, काहींची मध्यम, तर काहींची तुलनेने कमकुवत असते.
त्यामुळे “संपूर्ण उद्योग अप्रामाणिक आहे” हा निष्कर्ष पुरेशा पुराव्याशिवाय काढलेला वाटतो.
आरोग्य विम्याचा अनुभव: “क्लेमसाठी भांडावे लागले”
हा अनुभव महत्त्वाचा आहे, कारण अनेक ग्राहकांना प्रत्यक्षात क्लेम प्रक्रियेत अडथळे येतात.
मात्र दुसरी बाजू:
कोरोना काळात अनेक पॉलिसींमध्ये कव्हरेज, वेटिंग पिरियड, सब-लिमिट, पॅकेज रेट, नॉन-पेयेबल आयटम यामुळे क्लेममध्ये कपात झाली.
काही वेळा हॉस्पिटल आणि विमा कंपनी यांच्यातील दस्तऐवजीकरणातील त्रुटींमुळेही क्लेम अडकतात.
कार्यालयात जाऊन दबाव टाकल्यानंतर पैसे मिळाले, याचा अर्थ कंपनी चुकीची होतीच असे निश्चित होत नाही; परंतु ग्राहक सेवा कमकुवत होती असे म्हणता येईल.
येथील योग्य टीका अशी: क्लेम प्रक्रिया पारदर्शक, वेळेवर आणि कारणांसह असावी.
“डे केअरचे पैसे मिळत नाहीत”
हा दावा सर्व पॉलिसींना लागू होत नाही.
प्रत्यक्षात:
अनेक आधुनिक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये शेकडो डे-केअर प्रक्रियांना कव्हर असते.
प्रश्न असा असू शकतो की संबंधित उपचार पॉलिसीमध्ये समाविष्ट नव्हता, किंवा कागदपत्रे अपुरी होती, किंवा सब-लिमिट लागू झाले.
त्यामुळे समस्या पॉलिसी समजण्यात आणि उत्पादनाच्या अटींमध्ये देखील असू शकते.
हॉस्पिटल व्यवस्थापनावर टीका
हा मुद्दा तुलनेने मजबूत आहे.
वास्तविक समस्या:
विमा असल्याचे कळल्यावर काही हॉस्पिटल्स जास्त तपासण्या, जास्त दिवस दाखल ठेवणे, किंवा जास्त बिलिंग करण्याचा प्रयत्न करतात.
यालाच आरोग्य अर्थशास्त्रात moral hazard किंवा provider-induced demand म्हणतात.
त्यामुळे विमा कंपन्या तपासणी करतात; आणि त्यामुळे प्रामाणिक ग्राहकांनाही त्रास होतो.
म्हणजे येथे समस्या फक्त विमा कंपनीची नाही; हॉस्पिटल व्यवस्थापनाचीही आहे.
“विमा आहे का?” हा प्रश्न
स्वागतिकाने दोनदा विम्याबद्दल विचारणे संशयास्पद वाटू शकते.
पण त्याची वैध कारणेही असू शकतात:
कॅशलेस सुविधा,
नेटवर्क हॉस्पिटल,
पूर्वपरवानगी (pre-authorization),
बिलिंग प्रक्रिया.
तथापि, जर विमा असल्यामुळे अनावश्यक उपचार सुचवले जात असतील, तर तो गंभीर प्रश्न आहे.
वाहन विम्यातील गैरवापर
लेखकाने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
होय, काही लोक:
जुन्या नुकसानाची दुरुस्ती,
बनावट बिल,
वाढीव अंदाजपत्रक,
यांचा वापर करून जास्त क्लेम करण्याचा प्रयत्न करतात.
यामुळे:
विमा कंपन्यांचे नुकसान वाढते,
प्रीमियम वाढतात,
सर्व ग्राहकांवर भार पडतो.
म्हणजेच येथे ग्राहकांचाही गैरवापर असतो, हे लेखकाने मान्य केले आहे. हा मजकुरातील संतुलित भाग आहे.
आयुर्विमा: “कोटींचे दावे कुणाला मिळाले आहेत का?”
हा प्रश्न अनुभवाधारित आहे, पण निष्कर्ष चुकीचा ठरू शकतो.
प्रतिपक्ष:
भारतात LIC आणि खासगी आयुर्विमा कंपन्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात मृत्यू दावे मंजूर करतात.
अनेक कुटुंबांना कोटींचे दावे प्रत्यक्षात मिळालेले आहेत.
आयुर्विमा दावे नाकारण्याची सामान्य कारणे:
माहिती लपवणे,
चुकीची माहिती,
फसवणूक,
पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन.
म्हणून “कोटींचे दावे मिळत नाहीत” असे म्हणणे तथ्याधारित नाही.
इतर देशांतील अनुभव
हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
संक्षिप्त तुलना:
म्हणजे भारतातील समस्या अद्वितीय नाही; पण पारदर्शकता आणि ग्राहक साक्षरता ही मोठी आव्हाने आहेत.
मजकुरातील तर्कदोष
Hasty generalization (घाईचा सर्वसाधारण निष्कर्ष) — स्वतःच्या काही अनुभवांवरून संपूर्ण उद्योगाबद्दल निर्णय.
Availability bias — नकारात्मक अनुभव अधिक लक्षात राहतात; यशस्वी क्लेमची उदाहरणे कमी दिसतात.
Confirmation bias — हॉस्पिटलने विम्याबद्दल विचारले म्हणजे नक्कीच आर्थिक गैरवर्तन होणार, असे गृहित धरणे.
अधिक मजबूत टीका कशी असू शकते?
मूळ मजकुराऐवजी असा युक्तिवाद अधिक प्रभावी ठरेल:
“भारतातील विमा उद्योगात क्लेम प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीची, अपारदर्शक आणि ग्राहकांसाठी त्रासदायक असते. हॉस्पिटल बिलिंग, पॉलिसीतील सूक्ष्म अटी, सब-लिमिट, आणि ग्राहकांना योग्य माहिती न मिळणे यामुळे प्रत्यक्ष लाभ अपेक्षेपेक्षा कमी मिळतो. त्यामुळे विमा उद्योगात अधिक पारदर्शकता, मानकीकरण, जलद तक्रार निवारण आणि हॉस्पिटल-विमा कंपन्यांवरील कडक नियमन आवश्यक आहे.”
हा युक्तिवाद अनुभवाशी प्रामाणिक राहतो आणि पुराव्याधारित टीका करतो, सर्व उद्योगाला अप्रामाणिक ठरवत नाही.
सहमत आहे रा.जो.जी.
In reply to पुन्हा सैमला लावले कामाला by राज जोशी
Hasty generalization (घाईचा सर्वसाधारण निष्कर्ष) — स्वतःच्या काही अनुभवांवरून संपूर्ण उद्योगाबद्दल निर्णय.
Availability bias — नकारात्मक अनुभव अधिक लक्षात राहतात; यशस्वी क्लेमची उदाहरणे कमी दिसतात.
Confirmation bias — हॉस्पिटलने विम्याबद्दल विचारले म्हणजे नक्कीच आर्थिक गैरवर्तन होणार, असे गृहित धरणे.
+ १००० म्हणतो
शहाण्या माणसाने मणिपाल…
शहाण्या माणसाने मणिपाल सिग्ना ह्या फ्रॉड विमा कंपनीपासुन दुर रहावे. जवळ जवळ ८ महिने खेटे मारायला लाउन ५५००० रुपये ऐवजी ४७३२ रुपयॅ देउन उपकार केल्याचा आव आणला. ह्या कंपनीत सगळे बिहारगांडे भरलेले आहेत. खळ्ळ खट्याक शिवाय पर्याय नाही.
ह्या कंपनीत सगळे बिहारगांडे…
In reply to शहाण्या माणसाने मणिपाल… by प्राध्यापक नाग…
ह्या कंपनीत सगळे बिहारगांडे भरलेले आहेत. खळ्ळ खट्याक शिवाय पर्याय नाही.
छान भाषा आहे आपली. अगदी अलंकारिक 😇🙏🏾. तसे त्या कंपनी मध्ये कोणीही असला तरी
जे मालक ठरवेल ते अन् त्यासाठी IRDA च्या कचाट्यात न सापडता जितके देणे शक्य आहे तितकेच ती कंपनी देणार प्राध्यापकजी.
आपल्याला त्यांच्याशी…
In reply to ह्या कंपनीत सगळे बिहारगांडे… by वृषभ खोंडे
आपल्याला त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायचा अनुभव आहे का? त्यांनी मला जेवढं रखडवलयं आणि तीच तीच कागदपत्रं मोजुन १८ वेळा द्यायला लावली आहेत. आणि फोनवर त्रास दिलाय तो वेगळाच. त्यामुळे चार सहा अलंकार कमीच पडलेत.
आपल्यावर वेळ न येवो कधी पण आपण माझ्या जागी असतात तर काय केलं असतत? त्यामुळे आपण माझ्या भाषेची चिंता न करता विमा कंपन्यांच्या विषयावर बोललात तर बरं होइल. :)
भारतातल्या विमा कंपन्या आणि त्यातल्या त्यात मणिपाल सिग्ना अत्यंत भिकार मानसिकतेच्या आहेत. असो. माझे पैसे बुडवणाऱ्याला नंतर त्रास होतोचं.
हम्म
In reply to आपल्याला त्यांच्याशी… by प्राध्यापक नाग…
आपल्याला त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायचा अनुभव आहे का?
कोणाशी बोलण्याचा ? विमा कंपनी कर्मचारी ? बिहारी लोक ? का विमा कंपनी कर्मचारी असणारे बिहारी लोक ? ते नीटसे कळले नाही. तितके स्पष्ट केले तर आवडेल आणि समर्पक उत्तर देता येईल असे सुचवतो.
एकंदरीत माझं तर बरं झालं म्हणायचं संभाषण विमा कंपनी आणि बिहारी लोकांसोबत पण.
त्या विविक्षित विमा कंपनी सोबत डीलिंग करताना एकदा फोन आला की साहेब तुम्ही आता पे आऊटला एलिजिबल आहात तेव्हा केवायसी करून घ्या. डॉक्युमेंट्सची लिस्ट व्यवस्थित सांगितली त्यांनी, स्थानिक प्रतिनिधीसोबत नीट अपॉइंटमेंट फिक्स करून दिली, मी कागदपत्र संच तयार करून ठरलेल्या वेळी त्या प्रतिनिधीला तो दिला, त्यानंतर २४ तासात मला SMS आला आणि प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर एकदाही फोन नाही का मेल नाही का SMS नाही ठरवल्या बरहुकुम पे आऊट येत असतात.
यशस्वी विमा वाटचाल
२०११ साली एकदम एकरकमी २ लक्ष रुपये + २०२१ पर्यंत वर्षाकाठी ₹.२०,०००/- प्रीमियम भरण्याचा एक एन्डोवमेंट प्लॅन घेतला होता. २०२१ पर्यंत प्रीमियम भरली, तत्पश्चात २०२१ - २२ कुलिंग इयर होते (ना प्रीमियम भरणे न काही मिळकत) २०२३ पासून प्लॅन मधे ठरलेल्या कंडीशन प्रमाणे वर्षाला ₹.४४,५००/- मिळतात. ते एकूण २०३५ पर्यंत मिळणार आहेत. एकंदरीत चांगली मिळकत आहे वर्षाला ४०-४५,००० उत्पन्न त्यातून वाटल्यास सुरू असणारे म्युच्युअल फंड टॉप अप केले जाऊ शकतात किंवा आपापल्या वकूब अन् मगदुराप्रमाणे खर्च किंवा पुढे गुंतवले जाऊ शकतात, मी वर्षा आड एकदा गुंतवतो आणि एकदा ते पैसे फिरणे, पर्यटन, तीर्थाटन, घरातील बालगोपाल मंडळींसाठी काही सरप्राइज (सायकल, व्हिडिओ गेम) इत्यादी काहीतरी घेण्यासाठी किंवा वाढदिवस / ऍनिवर्सरी इत्यादी प्रसंगात होणार रेस्टॉरंट खर्च/ पार्टी खर्च इत्यादीसाठी वापरतो.
फक्त एवढेच की शेवटी काही…
In reply to यशस्वी विमा वाटचाल by वृषभ खोंडे
फक्त एवढेच की शेवटी काही बोनस आहे? डाऊन परत मिळणार का? सम ॲश्शुअर्ड काय आहे? ती कधीपासून कधीपर्यंत लागू राहील?
वरचे सगळेच सोडले तर हिशेब काय पडला-
अ. यात 3 कॅश फ्लो आहेत. 1. डाऊन, 2. ठराविक आऊटफ्लो, (ॲन्युइटी), 3. ठराविक इनफ्लो ( ॲन्युइटी).
ब. 2022 या वर्षी- 1. डाऊन + 2.ॲन्युइटी थांबेल.
ब.1
(2011 - 2021) 2.00 लाख वार्षिक कंपाऊंडिंग ने, 8% दसादशे ने होतील 4.32 लाख.
2 × ((1.08)^10)=4.32
ब.2
(2011 - 2021) 0.20 लाखाची ॲन्युइटी वार्षिक कंपाऊंडिंग ने, 8% दसादशे ने होइल 2.90 लाख.
FV(0.08,10,0.2)=2.90
ब.3
ब.1 + ब.2=7.22
ब.4 या दोन्ही रकमा अजून एक वर्ष कुलिंग मध्ये आहेत.
7.22 ×1.08= 7.79 लाख
टेक्निकली 8% एफ डी / आर डी तून 2022 साली एवढी रक्कम झाली असती. किती? 7.79 लाख .
क. पुढील 13 वर्ष मिळणाऱ्या 0.445हजार ची 2022 सालची 8% ने काय किंमत असेल? 7.79 लाखापेक्षा जास्त की कमी?-
=pv(0.08,13,0.445)= 3.52 लाख...
ड. सारांश-
2022 सालच्या हिशेबात-
दिले- 7.79
मिळाले- 3.52
इ. डाऊन परत मिळणार असेल तर हा हिशेब थोडा बदलेल.
माझं काही चुकतंय का या हिशेबात? काय चुकतंय? 8% फार जास्तं आहेत का? 2% करावे?
2% ने-
दिले. 4.72
मिळाले. 5.05
2.4541 % ने हा हिशेब ब्रेकइवन, ना नफा ना तोटा होतो. जवळपास.
काही दुसरं चुकत असेल तर कृपया सांगावे...
चांगला विषय आहे
माझे २ पैसे
इन्वेस्टमेंट आणि इन्शुरन्स नेहमी वेगळे ठेवा.
१. १ किव २ करोडचा टर्म इन्शुरन्स घ्या. महीन्याला २-४ हजार जातील , पण काही दुर्घटना झाल्यास घरच्यंना पैसे मिळॅतील
२. दर महीन्याला सोने घेउन डब्यात टाकुन ठेवा आणि आजारपणाला वापरा.
३. जमतील तेव्हढी एस आय पी करत रहा चांगल्या म्युच्युअल फंड मधे दर महीना. इन्व्हेस्टमेंट म्हणुन
इथे विषय फक्त इन्स्युरन्सचा…
इथे विषय फक्त इन्स्युरन्सचा आहे, पण मला अनेक कंपन्यांकडून फसवणुकीचा अनुभव आला आहे, ग्राहक मंच माझ्या ओळखीचा झाला आहे, १५-२० तक्रारी टाकून भरपाई घेतली आहे, अनेक वेळा तक्रार दाखल करायची गरजही पडली नाही. हा विषय इन्सुरन्स पुरता मर्यादित असल्याने त्यावर लिहितो. २०२२ ला मला मुलगा झाला तेव्हा मी पबजी च्या व्यसनात डुबलो होतो, माझ्या बायकोचा विमा तिच्या वडिलांनी त्यांच्या नोकरी थ्रू परस्पर क्लेम केला, त्यामुळे मला काम करत असलेल्या कंपनीत इन्सुरन्स प्रोवायडरला कळवायची गरज पडली नाही, पण मुलगा झाला आणी एडमिट केले, ३० हजार खर्च झाला, कंपनीत क्लेम टाकला तर ते बोलले की मुलगा जन्माला पासून १ महिन्याच्या आत कंपनीला कळवावे लागते नाहीतर क्लेम पास नाही होत, त्याचे बारसे झाले नव्हते वगैरे मी काहीबाही करणे दिली पण ती फेटाळून लावण्यात आली, शेवटी कंपनीतील ही सर्व कामे पाहणऱ्या मानसला मी पकडले आणी काहितरी कर बोललो, त्याने सांगितले की हा क्लेम नामंजूर आहे हे गृहीत धरूनच चाल आम्ही प्रयत्न करतोय पण मिळणार नाही! पण माझ्या सारखाच आणखी एक होता त्यानेही विमा कंपनीला त्याला मूल झालेय हे कळवले नव्हते, माझ्या कंपनीने इन्सुरन्स कंपनीला दोघांपैकी एकाचा क्लेम पास कराच म्हणून दबाव टाकला, माझ्या क्लेमची रक्कम कमी असल्याने माझा क्लेम पास झाला तो दुसरा बिचारा.
गाडीच्या इन्स्युरन्सचा अनुभव अजून तरी चांगला आहे. सर्व काही बिचाऱ्यांनी बदलून दिले.