‘कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे ट्रॉपिकल मलिबु पंच (Tropical Malibu Punch)
पार्श्वभूमी:
आज विकांत, जवळ जवळ 8 वर्षांनी कॉकटेल लाउंज उघडलं. मागच्या 8 वर्षांपासून सर्व इंटॉक्सिकेशन्सपासून दूर आहे त्यामुळे कॉकटेल लाउंज बंद पडलं आहे. पण माझा धाकटा मुलगा, ह्या महिन्यात, इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षाच्या सुट्टीत घरी आलाय आणि त्याने ह्यावेळी आल्यावर प्रश्न विचारला, "तुम्ही कॉकटेल्स बनवणं का बंद केलं आहे?" मला त्याचा अचानक आलेला प्रश्न समजला नाही, तसं त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, "मी लहान असताना रंगबिरंगी मॉकटेल्स बनवून द्यायचात, आता मी आणि दादू (मोठा) अडल्ट झालोत आणि आता कॉकटेल्स ट्राय करायची वेळ आली तर नेमकं तुमच कॉकटेल्स बनवण बंद झालंय! कसं बनवायचात, खरच एक्सपर्ट होतात का ते कसं कळेल आम्हाला?" नुसतं एवढं बोलून थांबला नाही. जवळच्या मॉलमध्ये घेऊन गेला मला आणि लिकर आणि लिक्युअरच्या बाटल्या घ्यायला लावल्या. घरी येऊन कॉकटेल शेकर व इतर सगळं साहित्य स्वच्छ घुवून पुसून सगळी तयारी करून ठेवली आणि म्हणाला, "हं, होऊन जाऊदे आता!"
मॉलमधून धाकट्याने बकार्डी व्हाइट रम, ब्लू क्यूरोसाओ लिक्युअर आणि मालिबू लिक्युअर आणली होती. अननस आणि संत्र्याचे ज्यूस घरात होतेच. एक फक्कड ट्रॉपिकल कॉकटेल आठवलं. सगळं साहित्य समोर दिसल्यावर जुने दिवस आठवले आणि आतला बारटेंडर बाहेर आला आणि हे आजचं ट्रॉपिकल मलिबु पंच कॉकटेल हा त्याचा परिपाक!
मालिबू ही नारळाच्या फ्लेवरची लिक्युअर आहे. म्हणजे नारळाच खोबरं आणि नारळपाणी ह्यात व्हाइट रम मुरवत ठेवून ही लिक्युअर बनवली जाते. ही मालिबू ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.
साहित्य:
| प्रकार | व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल |
| व्हाइट रम | १ औस (३० मिली) |
| मालिबू | २ औस (६० मिली) |
| संत्र्याचा रस | १ औस (३० मिली) |
| अननसाचा रस | १ औस (३० मिली) |
| बर्फ | |
| ग्लास | कॉलिन ग्लास |

कृती:
कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या.
सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या.
कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.
शेक केलेले मिश्रण, कॉकटेल शेकरच्या अंगच्या फिल्टरने, कॉलिन ग्लासमध्ये ओतून घ्या.
अफलातून चवीचे ट्रॉपिकल मलिबु पंच (Tropical Malibu Punch) कॉकटेल तयार आहे!
मिसळपाव











प्रतिक्रिया
क्या बात है.. आनंदाने मन…
क्या बात है.. आनंदाने मन भरून आलं. उत्तम..
आला दर्जाची मै
जवळ जवळ 8 वर्षांनी कॉकटेल लाउंज उघडलं.
सोत्री भाऊसाकी भाऊ! इतक्या वर्षांनंतर तुमच्या मैकद्यातून आला दर्जाची मै पाहायला मिळाली ही आमची किस्मत! अजून येऊ द्या.अर्थात रेसिपी आवडली असं प्रकटपपणे म्हणणं ही केवळ औपचारिकता आहे, तुमची रेसिपी आवडणं हे default value आहे!
- (मैक् वार) कांदा लिंबू
सादरीकरण नेहमीप्रमाणेच…
In reply to आला दर्जाची मै by कांदा लिंबू
सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
वाह!
इथला उल्लेख वाचून तुमचे कॉकटेल लाउंज उघडून बघितले ! तुम्ही तर साक्षात मद्यगुरू निघाले.
ट्रॉपिकल मालिबु पंच हे आवडते आहे अननसाच्या एक्सट्रा हिट सोबत.
🍹🍹🍻🍻
छोड़ आए हम वो गलियाँ जहाँ…
छोड़ आए हम वो गलियाँ जहाँ कभी गले तर हुआ करते थे,
अब तो सूखे होठों से बस, अफ़साने पुराने बयाँ किया करते हैं।
लेख, प्रचि प्रचंड आवडले.
मियाँ कर्नलतपस्वी,यह अफसना…
In reply to छोड़ आए हम वो गलियाँ जहाँ… by कर्नलतपस्वी
मियाँ कर्नलतपस्वी,
यह अफसना नया है लेकिन यह सूखे होठों से ही बयाँ किया हैं। 😀
- (सूखे होठोंवाला साकीया) सोकाजी
वेलकम ब्याक....सोत्री…
वेलकम ब्याक....सोत्री.
मिपाच्या गल्लीत पुन्हा फॉर्मात आलात.
आनंद झाला
सोत्रिंचे दमदार कमब्याक…
सोत्रिंचे दमदार कमब्याक.
पुढचे भाग येणार का?
आपल्याकडे दमणला व्हिस्की नारळपाण्यात घालून पितात असे मित्राकडून ऐकले होते. नारळ हा तसाही सर्वच प्रकारात खूप आवडतो पण या प्रकारे अजून कधी चाखता आला नाही.
आमचे उपद्व्याप
In reply to सोत्रिंचे दमदार कमब्याक… by सौंदाऴा
मी व माझ्यासोबत अजून एकजण. त्याच्या फार्महौसला जात होतो. कारमध्ये अब्सोल्यूट वोडका बाटली होती. ORR चढण्याआधी ताजे हिरवे नारळ विक्रीला असलेले दिसले. दोन मोठे नारळ घेतले, स्ट्रॉ लावून थोडे थोडे नारळपाणी पिऊन घेतले. पुरेशी जागा झाल्यानंतर दोन नारळांत अंदाजे ६०-६० एमएल वोडका ओतली. मस्त सिप करत निघालो. (प्यायलाच जायचे होते, ड्राइवर सोबत घेतला होता.)
- (प्रयोगशील) कांदा लिंबू
अब्सोल्यूट वोडका बेस्ट! 👍️- …
In reply to आमचे उपद्व्याप by कांदा लिंबू
अब्सोल्यूट वोडका बेस्ट! 👍️
- (एकेकाळचा प्रयोगशील) सोकाजी