लोकहो,
भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळालं. तर हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी माझ्या मनांत थोडाबहुत संभ्रम आहे. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हा लेख लिहितो आहे. स्वातंत्र्यासोबत फाळणीही झाली. त्यामुळे तिचा विचारही आपोआप होणार. तर मुद्द्याला हात घालूया.
तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अॅटलींनी २० फेब्रुवारी १९४७ साली ब्रिटीश संसदेत जाहीर केलं की ०३ जून १९४८ पर्यंत ब्रिटीश इंडियास पूर्णपणे स्वयंशासित करणार. अर्थात, या तारखेपश्चात ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही. या घोषणेस सत्तांतराची घोषणा म्हणतात. १६ जुलै १९४७ रोजी या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झालं. त्याच वेळेस भारताची फाळणी करायचं ठरलं. तर प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या खंडप्राय देशाची फाळणी फक्त ११ महिन्यांत ( जुलै १९४७ ते जून १९४८ ) कशी करायची? आणि भरीस भर म्हणून सत्तांतराचा दिवस जून १९४८ च्या तब्बल १० महिने आधी म्हणजे १४ व १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत मागे खेचला. म्हणजे फाळणीसाठी अवघा दीड महिनाच उरला होता. ही घिसाडघाई का?
सत्तांतराच्या पश्चात दोन अंमलशाह्या ( = dominions ) उत्पन्न झाल्या. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व दुसऱ्या दिवशी भारत. ह्या दोन्ही अंमलशाह्या स्वायत्त होत्या. म्हणजे भारत व पाकिस्तानी सरकारे स्वयंशासित असणार आणि त्यांचा प्रमुख ब्रिटनचा राजा केवळ नामधारी असणार. आज घडीस इ.स. २०२६ साली कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व जमेका ( यादी अपूर्ण ) या प्रकारच्या अंमलशाह्या आहेत. आता, हाच दर्जा मिळावा म्हणून पहिल्या महायुद्धाच्या नंतर प्रयत्न सुरू केले होते. १९१६ साली लखनौ करार झाल्यावर हिंदू व मुस्लिमांची तेव्हढ्यापुरती एकजूट झाली. हिंदी लोकांना स्वायत्तता मिळावी म्हणून मुस्लीम लीगने काँग्रेसशी सहकार्य करायचं मान्य केलं. याच कारणासाठी टिळकांनी होमरूल चळवळ ( १९१६ ते १९१८ ) याचसाठी राबवली. टिळक १९२० साली स्वर्गवासी झाले. तोवर गांधी भारतीय राजकारणांत स्थिरावले होते. त्यांनी १९२१ मध्ये असहकार चळवळ पेटवली. ती जर नीट तडीस नेली असती तर अंमलशाही स्वायत्तता तेव्हाच मिळाली असती. मात्र चौरीचौरा येथील पोलिसांच्या हत्यांच्या सबबीखाली गांधींनी चळवळ मागे घेतली. तर मग तांत्रिक दृष्ट्या पाहू जाता १९२१ ते १९४७ या वर्षांत हिंदू जनतेने काय कमावलं, असा प्रश्न पडतो. जर अंमलशाही स्वायत्तताच मिळवायची होती तर पहिल्या महायुद्धानंतर सर्वात चांगली संधी होती. ती वाया दवडल्यामुले दुसरं महायुद्ध संपेपावेतो वाट बघावी लागली. मग गांधी आणि नेहरू पितापुत्रांच्या राजकारणाचं फलित काय? भारताची फाळणी सोडल्यास दुसरं काही दिसून येत नाही. मात्र यावर चर्चा झालेली आवडेल.
मध्यंतरीच्या काळांत १९२८ साली ( मोतीलाल ) नेहरू रिपोर्ट आला. त्यांतही स्वायत्ततेची मागणी होती. तेव्हा लॉर्ड आयर्विनने अनौपचारिक जाहीरनाम्याद्वारे मधाचं बोट चाटवलं होतं ( इ.स. १९२९ ). मात्र पुढे फारशी प्रगती झाली नाही. म्हणून गांधींनी सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू केलं ( १९३२).
तर मग स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतराद्वारे मिळालेली स्वायत्तता असं म्हणावयास पाहिजे. आता यांस स्वातंत्र्य का म्हणायचं? बहुधा १९४८ नंतर ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही अशी नि:संदिग्ध घोषणा झालेली असल्याने या सत्तांतरास स्वातंत्र्य म्हणता यावं. असं माझं आकलन आहे.
सत्तांतर म्हंटलं की आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जवाहर नेहरूंना शासनप्रमुख म्हणून कोणी नेमलं? त्यांनी १९४६ साली सरकारात शिरतांना साधा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. कृपया हे हिंदी चलचित्र ( साडेपाच मिनिटे ) पाहणे : https://www.youtube.com/watch?v=1FobmFy1qM4
१९५२ साली निवडून आल्यावरच नेहरू पंतप्रधान झाले. मग १९४७ ते १९५२ पर्यंत ते कशाच्या आधारावर पंतप्रधान म्हणवले जातात? याच मुद्द्यामुळे फाळणीच्या अधिकृत दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. मी ती अधिकृत का मानावी? तसंच नेहरूंनी कोणत्या आधारे भारतीय सैन्याच्या विजयी आगेकूचीत हस्तक्षेप केला? भारताने काश्मीरच्या प्रश्नी राष्ट्रसंघाचे निरीक्षक मागवले होते, त्याची मागणी नेहरूंनी केली. ती अधिकृत ठरेल का? त्यावरही प्रश्न उपस्थित होतात.
१९४७ च्या सत्तांतरात काही महत्त्वाचे धागे सुटेच लटकंत आहेत.
यांतला एक धागा पटेलांविषयी आहे. त्यांना जर पोलादी पुरुष मानलं जातं, तर त्यांच्या नजरेतनं नेहरूंचा दर्जा कसाकाय निसटला? त्यांनी संस्थानांच्या एकीकरणाचं काम खमकेपणाने केलं. पण हा खमकेपणा गांधींना संरक्षण देण्यात का कमी पडला? इंग्रजांनी भारत एक केला असं म्हंटलं तर १९४७ साली सत्तांतराच्या वेळेस ५५०+ संस्थाने वेगळी का राहिली? इंग्रजांनी भारत एक केला आणि सरदार पटेल लोहपुरूष आहेत ही दोन विधाने परस्परविरोधी आहेत.
असो.
सध्या इतकच लिहून थांबतो. जसजशा गोष्टी आठवतील तसतशा लिहीत जाईन म्हणतो. चर्चा सुरू होऊद्या.
आपला नम्र,
-गामा पैलवान
मिसळपाव
प्रतिक्रिया
हलाला वगैरे ?
In reply to अस्मानी पुस्तकात सती इतकी… by अमरेंद्र बाहुबली
हलाला वगैरे ?
त्यात जीव जातो का?
In reply to हलाला वगैरे ? by श्वेता व्यास
त्यात जीव जातो का?
जीव गेला तरच एखादी गोष्ट…
In reply to त्यात जीव जातो का? by अमरेंद्र बाहुबली
जीव गेला तरच एखादी गोष्ट क्रूर असते का ?
हलालात कबुलीजबाब प्रकार होता…
In reply to त्यात जीव जातो का? by अमरेंद्र बाहुबली
हलालात कबुलीजबाब प्रकार होता, तसा सती प्रथेत नव्हता! सती ही अफूचे दूध पाजून पाय चितेला खांबाला बांधून मग जाळले जायचे, जिवाच्या आकांताने स्त्री बाहे रायू लागली तर तिला बांबूने पुन्हा आत लोटले जायचे, तिच्या किंकळ्या ऐकू येऊ नये म्हणून ढोल वाजवले जायचे.
हलालात कबुलीजबाब प्रकार…
In reply to हलालात कबुलीजबाब प्रकार होता… by अमरेंद्र बाहुबली
हलालात कबुलीजबाब प्रकार होता
हे काय असते, जरा सविस्तर माहिती मिळेल का ?
हलालाची सविस्तर माहिती घ्या!…
In reply to हलालात कबुलीजबाब प्रकार… by श्वेता व्यास
हलालाची सविस्तर माहिती घ्या! बाकी हलाला काही चांगला प्रकार नव्हता, त्यातही स्त्रियांवरच अत्याचार होत होता पण ते तिकडे, आपल्या धर्मातील सतीप्रथा चांगली ठरत नाही त्यामुळे.
कुठे मिळत नाही ना माहिती,…
In reply to हलालाची सविस्तर माहिती घ्या!… by अमरेंद्र बाहुबली
कुठे मिळत नाही ना माहिती, मला वाटलं तुमच्याकडे असेल म्हणून तुम्ही इतकं विश्वासाने सांगताय.
आपल्या धर्मातील सतीप्रथा चांगली ठरत नाही त्यामुळे
मी कधी म्हणाले सतीप्रथा चांगली होती. पण आता ती बंद झाली आहे, जे चालू आहे त्यावर बोलू म्हटलं जरा.
सतीप्रथा बंद झाली? शेवटची…
In reply to कुठे मिळत नाही ना माहिती,… by श्वेता व्यास
सतीप्रथा बंद झाली? शेवटची सती केव्हा गेली ते पहा! आणी सतीचे उदात्तीकरण अजूनही चालू आहे, आजूबाजूला अनेक सती मंदिरे दिसतील!
तुम्हीच तर म्हणालात…
In reply to सतीप्रथा बंद झाली? शेवटची… by अमरेंद्र बाहुबली
तुम्हीच तर म्हणालात इंग्रजांचे तुम्ही आभारी आहात प्रथा बंद पाडल्याबद्दल. मला तर कोणी दिसत नाहीये उदात्तीकरण करताना. दोन मते अशी दिसली की प्रथा होती किंवा नाही.
सती मंदिरे - हिंदू धर्मात आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे. म्हणून आज कोणी सती जावे असे होताना दिसते का? तुमच्या जन्मानंतर तुमच्या पाहण्यात कोणी गेलं असेल, इथून पुढे कुठे आढळलं तर मला नक्की सांगा.
बादवे हलाला प्रथा सक्तीने चालू आहे अजूनही. स्त्रीची इच्छा विचारात घेतली जात नाही.
तुम्हीच तर म्हणालात…
In reply to तुम्हीच तर म्हणालात… by श्वेता व्यास
तुम्हीच तर म्हणालात इंग्रजांचे तुम्ही आभारी आहात प्रथा बंद पाडल्याबद्दल. >>
फक्त आभारीच नाही तर इंग्रजांचे मी १००० वेळा आभार मानेन, कारण त्यांनी एकच नाही तर हजारो जिवंत जाळून क्रूरूपणे मारल्या जाणाऱ्या स्त्रिया वाचवल्या.
मला तर कोणी दिसत नाहीये उदात्तीकरण करताना. >>>
राणीसती मंदिर वगैरे ऐकले आहे का? ते उदात्तीकरणच आहे, राजस्थानातल्या शेखावती भागात (झुनूझुनू, सीकर, चुरू जिल्हे) १०० सती मंदिरे आहेत. सती economy स्ट्राँग आहे तिथे. हे उदात्तीकरनच आहे.
सती मंदिरे - हिंदू धर्मात आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे. >> हे पहा, हा पण उदात्तीकरणाचाच प्रकार आहे. तुम्हाला दिसत नाहीये पण उदात्तीकरण तुमच्याकडूनच होतेय.
बादवे हलाला प्रथा सक्तीने चालू आहे अजूनही. स्त्रीची इच्छा विचारात घेतली जात नाही. >>>
चालू आहे, तुम्हाला माहिती आहे, तर उठवा आवाज! तुम्हाला मला कोणी अडवले आहे? आणी सरकार का बंदी आणत नाहीये त्यावर? त्यांच्या धर्मातूनही कुणी पुढ येत नाहीये? आपल्या धर्मातल्या कुप्रथा तर आपण बंद करू शकलो ना?
एकदा म्हणता बंद पडली, एकदा…
In reply to तुम्हीच तर म्हणालात… by अमरेंद्र बाहुबली
एकदा म्हणता बंद पडली, एकदा म्हणता बंद नाही पडली काय एक ते ठरवा बुवा.
उदात्तीकरण --> म्हणून आज कोणी सती जावे असे होताना दिसते का? तुमच्या जन्मानंतर तुमच्या पाहण्यात कोणी गेलं असेल, इथून पुढे कुठे आढळलं तर मला नक्की सांगा.
एकदा म्हणता बंद पडली, एकदा…
In reply to एकदा म्हणता बंद पडली, एकदा… by श्वेता व्यास
एकदा म्हणता बंद पडली, एकदा म्हणता बंद नाही पडली काय एक ते ठरवा बुवा. त्यांचं असंच असतं नेहमी. एक ना धड भराभर मनुस्मृत्या! प्राडॉ साहेब त्यांना खांद्याखालचे बळकट म्हणतात ते खोटे नाही.
श्वेताताई, शेवटची सती…
In reply to एकदा म्हणता बंद पडली, एकदा… by श्वेता व्यास
श्वेताताई, शेवटची सती bhartat२००८ साली गेली आहे, त्या आधीचे सर्वात प्रसिद्ध प्रकरण म्हणजे १९८७ चे देवराला गावचे रूप कुंवर प्रकरण!
२००८ मध्ये स्वेच्छेने महिला…
In reply to श्वेताताई, शेवटची सती… by अमरेंद्र बाहुबली
२००८ मध्ये स्वेच्छेने महिला सती गेली आहे. आता त्या पिढीतील त्या विचारांचे लोक आणखी शिल्लक असतील असे वाटत नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिला विरोध केला नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. दुसऱ्या बाजूला अजून हे काही चुकीचं आहे आणि त्यावर कायदा यावा असे वाटणे याचीच बोंब आहे.
२००८ मध्ये स्वेच्छेने महिला…
In reply to २००८ मध्ये स्वेच्छेने महिला… by श्वेता व्यास
२००८ मध्ये स्वेच्छेने महिला सती गेली आहे. >
प्रत्येक जाळून गेलेली महिला स्वेच्छेने सती गेली आहे असेच सांगितल्या गेले आहे!
कायदेशीर कारवाई केली म्हणून त्या महिलेचा जीव नी झालेल्या यातना परत येणार नाहीयेत.
ब्रिटनचे काय वेगळे आहे?
In reply to तुम्हीच तर म्हणालात… by अमरेंद्र बाहुबली
कुप्रथा बंद व्हायला हव्यात हे खरेच आहे. पण ब्रिटनचा इतिहासही फारसा वेगळा नाही. पाश्चात्य जगताला देखील वसाहतवाद आणि गुलामगिरीचाच इतिहास आहे. असो.
(ब्रिटनच्या इतिहासामध्ये स्त्रियांना चेटकीण (Witch) ठरवून छळ करणे आणि त्यांना मृत्यूदंड देणे हा एक अत्यंत काळा आणि भयानक कालखंड होता. १६ व्या आणि १७ व्या शतकात ब्रिटनमध्ये जादूटोण्याच्या संशयावरून हजारो निष्पाप लोकांवर खटले चालवून त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. यात प्रामुख्याने वृद्ध, गरीब, विधवा किंवा समाजात एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना लक्ष्य केले जायचे. गावात अचानक पीक खराब होणे, गुरे मरणे, किंवा कोणी आजारी पडणे अशा नैसर्गिक आपत्तींचे खापर या महिलांवर 'करणी' किंवा 'काळी जादू' म्हणून फोडले जायचे. )
दोन कारणे असावीत
In reply to इंग्रजांनी जशी सती प्रथा बंद… by श्वेता व्यास
मला वाटते दोन कारणे असावीत-
१. सतीची प्रथा मुळात होती का, असल्यास किती व्यापक होती वगैरे मुद्दे आता बाजूला ठेऊ. निदान काही ठिकाणी तरी सतीच्या नावाने हत्या करायचे प्रकार निश्चितपणे झाले होते असे म्हणायला जागा आहे. तो क्रूरपणा होता आणि तो संपवायला हवा होता यात कोणतेही दुमत नसावे. त्या प्रकाराविरोधात हिंदू समाजातील सुधारकांनीच आवाज उठवला होता. तसा आवाज आस्मानी पुस्तक आदर्श मानणाऱ्या समाजातील कोणी तिकडच्या अनिष्ट प्रथांविरोधात उठवला होता असे वाटत नाही. त्या समाजात मुळात सुधारक किती प्रमाणात होते हा पण प्रश्नच आहे.
२. सती जायच्या घटना उघड्यावर होत असल्याने कोणालाही- अगदी इंग्रजांनाही दिसत असाव्यात. त्याउलट हलाला, खतना वगैरे प्रकार चार भिंतीआड होत असल्याने सहजपणे ते प्रकार दिसणे अशक्य होते. त्यामुळे इंग्रजांनाही सती मधील अमानुषता जितकी समजली तितकी अस्मानी पुस्तक पाळणाऱ्या समाजातील अनिष्ट प्रथांमधील अमानुषता समजली नसावी.
सहमत आहे.
In reply to दोन कारणे असावीत by चंद्रसूर्यकुमार
सहमत आहे.
त्या प्रकाराविरोधात हिंदू…
In reply to दोन कारणे असावीत by चंद्रसूर्यकुमार
त्या प्रकाराविरोधात हिंदू समाजातील सुधारकांनीच आवाज उठवला होता.
सुधारणा आपल्याला हव्या होत्या म्हणून झाल्या, इंग्रजांना हव्या होत्या म्हणून नाही. हेच अधोरेखित करायचं होतं.
सुधारणेला “आपण” भरपूर विरोध…
In reply to त्या प्रकाराविरोधात हिंदू… by श्वेता व्यास
सुधारणेला “आपण” भरपूर विरोध केला होता, धर्मसभेने हा हिंदूंचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हटले पण इंग्रजानी ऐकले नाही, सिंधचे ब्राह्मणही आमची प्रथा आहे म्हणून टाहो फोडत इंग्रजाकडे गेले होते, पण माझ्या देशाची प्रथा जोवंत जाळनार्या व्यक्तीला फाशी देणे अशी आहे, तुम्ही तुमची प्रथा पाळा मी माझी पाळतो असे त्याने सांगितले नी नंतर कुणी त्यांच्याशी वाद घातला नाही.
सहमत आहे.
In reply to दोन कारणे असावीत by चंद्रसूर्यकुमार
सहमत आहे.
ईस्ट इंडिया कंपनीने इ.स…
In reply to वर कुठेतरी सती प्रथेचा उल्लेख आला आहे by अप्पा जोगळेकर
ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८१५ ते १८२८ या १४ वर्षांत बंगाल प्रेसिडेन्सीत एकूण ८,१३५ सतींची नोंद केली (सरासरी दरवर्षी ३७८ ते ८३९), त्यापैकी ७५% सती एकट्या बंगालमध्येच झाल्या. वयाचा विचार करता, इ.स. १८२३ मधील ५७५ सतींपैकी २४० महिला ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या.
इ.स. १८२३ मध्ये बंगालमध्ये झालेल्या ५७५ सतींची नोंद पाहता:
३२ बायका २० वर्षांखालील होत्या.
२०८ बायका २० ते ३० वयोगटातील होत्या.
उर्वरित ३३५ बायका ३० वर्षांपेक्षा मोठ्या होत्या.
कारण: कुलीन ब्राह्मणांमधील बहुपत्नीत्व प्रथा आणि लहान वयातील बालविवाह यामुळे अनेक स्त्रिया लवकर विधवा होत असत
जातीच्या बाबतीत, ब्राह्मण व राजपूत यांचे प्रमाण सर्वाधिक होते, तर सामाजिक-आर्थिक स्तरात मध्यमवर्गीय जमीनदार वर्गातील विधवांच्या मालमत्तेच्या हक्कामुळेही ही प्रथा टिकून होती. ही आकडेवारी बंगाल गॅझेट्स, बिनॉय भुषण रॉय यांचे 'Socioeconomic impact of Sati in Bengal', डी. सुब्रमण्यम रेड्डी यांचे 'Social and Cultural Awakening in India' तसेच विकिपीडियावरील 'Sati (practice)' या लेखात तपशिलाने वाचायला मिळेल.
स्वातंत्र्योत्तर भारतात १९४७…
In reply to वर कुठेतरी सती प्रथेचा उल्लेख आला आहे by अप्पा जोगळेकर
स्वातंत्र्योत्तर भारतात १९४७ ते १९८७ दरम्यान अधिकृतपणे सुमारे ४० सतीप्रकरणांची नोंद आहे, त्यापैकी एकट्या राजस्थानात २९ घटना घडल्या. या काळातील पहिली नोंदलेली घटना १९७९ मध्ये उत्तर प्रदेशातील बंदा जिल्ह्यात जावित्री तिवारी हिची होती. त्यानंतर सोना कंवर (१९८१, राजस्थान, वय ६२), वैजयंत्री (वय २०), जानकरानी (२००२, मध्य प्रदेश, वय ४०) आणि लालमती वर्मा (२००८, छत्तीसगढ, वय ७५) या घटना घडल्या. मात्र, या सर्वांपेक्षा सर्वाधिक चर्चित आणि केंद्र सरकारला कठोर कायदा करण्यास भाग पाडणारी घटना म्हणजे ४ सप्टेंबर १९८७ रोजी राजस्थानातील देवराला गावात घडलेली १८ वर्षीय रूप कंवर हिची सती होती. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला तिच्या पतीच्या जळत्या चितेवर बसवण्यात आले; ती विवाहित वस्त्रे परिधान करून होती आणि हजारो लोकांनी हा प्रकार पाहिला. या घटनेनंतर देशभर मोठा आक्रोश झाला. याचा परिणाम म्हणून सरकारने 'सती (प्रतिबंध) अधिनियम, १९८७' लागू केला. या नवीन कायद्याने केवळ सती करणेच नव्हे, तर तिचा 'महिमा गायन' (ग्लोरिफिकेशन) करणेही प्रथमच गुन्हा ठरवले. रूप कंवर ही भारतातील शेवटची नोंदलेली सती मानली जाते; तथापि, अधिकृत आकडेवारीनुसार १९८७ नंतर कोणतीही यशस्वी सती झाली नसली, तरीही २००८ मध्ये छत्तीसगढमध्ये लालमती वर्माचा मृत्यू ही शेवटची घटना मानली जाते.
लेखक गापै कुठे आहेत?
इतक्या सगळ्या घमासानात लेखक गामा पैलवान कुठे आहेत? की ते काडी टाकून पळून गेले? 😁
प्रथा किंवा परंपरा यांचे…
प्रथा किंवा परंपरा यांचे उत्तम उदाहरण म्हणजे कुंभमेळा शेकडो वर्षे प्रत्येक ३ वर्षांनंतर ठरलेल्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. यादृष्टीने सती ही परंपरा किंवा प्रथा नाही.
सती ही घृणास्पद प्रथा भारतात कशी होती यावर प्रचंड टीका करणारा मुग्धा कर्णिकचा लेख पाहिला. त्यामुळे भारतात सती ही परंपरा किंवा प्रथा नसून काही अपवादात्मक घटनांचा बागुलबुवा केला आहे हे नक्की झाले.
त्या लेखाचा दुवा कृपया…
In reply to प्रथा किंवा परंपरा यांचे… by श्रीगुरुजी
त्या लेखाचा दुवा कृपया द्यावा.
बाकी सती प्रथा भारतात सर्वत्र होती, दक्षिणेतील अनेक राजस्त्रिय सती गेल्या होत्या, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई तसेच माधवराव पेशव्यांच्या पत्नी सती गेल्या होत्या, महाराणा रणजितसिंह ह्यांच्याही पत्नी सती गेल्या होत्या. बंगालात ब्रिटिश सत्ता असल्याने त्यांनी व्यवस्थित नोंदणी ठेवली, इतर ठिकाणी व्यवस्थेचा अभाव असल्याने सती गेलेल्यांची नोंद झाली नाही. स्वतंत्र भारतातही बऱ्याच सती गेल्या.
१९८७ ला राजस्थानच्या देवराला गावात रूप कण्वर ही अठरा वर्षांची विधवा सती गेली होती, तिला अफूचे दूध पाजण्यात आले होते नी ती बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती पण तिला बांबूने परत ढकलण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिल्याचे सांगितले होते.
१८१५ ते १८२८ या १४ वर्षांत…
In reply to प्रथा किंवा परंपरा यांचे… by श्रीगुरुजी
१८१५ ते १८२८ या १४ वर्षांत बंगाल प्रेसिडेन्सीत एकूण ८,१३५ सतींची नोंद केली (सरासरी दरवर्षी ३७८ ते ८३९), त्यापैकी ७५% सती एकट्या बंगालमध्येच झाल्या. वयाचा विचार करता, इ.स. १८२३ मधील ५७५ सतींपैकी २४० महिला ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. आता ८१३५ स्त्रिया चौदा वर्षात म्हणजे वर्षाकाठी सरासरी ५८१ स्त्रिया म्हणजेच रोज १.५ स्त्रिया.
आणि हो आता मूळ मुद्दा :
स्त्री म्हणजे भाजीपाला/ बकरी कोंबडी नाही ना हो ८१३५ आणि सरासरी १.५ मांडून मोकळे व्हायला. अतिशय क्लेशातून जाऊनही हा प्रतिसाद लिहितो आहे कारण आकडेवारी रक्ताळलेली असली तरी आरसा दाखवते. अर्थात ८१३५ स्त्रिया काय किंवा अगदी एकटी एक स्त्री म्हणा काय ? भयावह आहे हे किमान भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या कुठल्याही सामान्य माणसाला माझ्यासारख्या.
तरीही,
रोज जवळपास २ स्त्रिया जाळल्या जात ते पण १४ वर्षे ह्या फॅक्ट नंतर सुद्धा आपला स्टँड सती प्रथाच नव्हती असा असेल तर माझी लेखनसीमा आणि हात जोडून निरोप ह्या विषयावर.
(अंतर्मुख चाबरा) खोंडे
अपवादात्मक गोष्टी सुद्धा…
In reply to प्रथा किंवा परंपरा यांचे… by श्रीगुरुजी
अपवादात्मक गोष्टी सुद्धा प्रथा असू शकतात. प्रथा असण्यासाठी सर्वच विधवांनी सती गेले पाहिजे असे नाही. त्याशिवाय त्या काळाच्या संकेतानुसार, सती जाणे हे अत्यंत गौरवशाली होते. कुणी आपल्याच घरातील सुनांना अफूची गोळी वगैरे खाऊन मारले तर तो खून असू शकतो पण त्यामुळे सरसकट सर्व सती गेलेल्याना अपवाद वगैरे म्हणून हिणविणे योग्य नाही. पुतळाबाई, रमाबाई किंवा मुक्ताबाई फणसे (होळकर) इत्यादीना "अपवाद" म्हणून दुर्लक्षित करणे योग्य वाटत नाही.
इंग्रजांनी आणि मिशनरी मंडळींनी सती प्रथेच्या अतिरंजित कथा पसरविल्या असल्या तरीसुद्धा ज्याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत त्यावरून सुद्धा सती "प्रथा" हि भारतांत बराच काळ होती असे आपण सहज म्हणून शकतो. बहुतेक तटस्थ लेखन हे सती प्रथा गौरवशाली होती आणि पूर्णतः स्वैच्छिक होती असेच सांगते. अर्थांत ह्या प्रकारे जीव देण्यासाठी त्या महिलेला बरेच धैर्य पाहिजे त्यामुळे खूप कमी विधवा सती जात असतील ह्यांत आश्चर्य नाही.
हिंदू बाजूने प्राध्यापिका मीनाक्षी जैन ह्यांनी सती विषयावर अक्खे पुस्तक लिहिले आहे. अयोध्या आणि इतर विविध विषयांवर हिंदू बाजूने त्यांनी लेखन केले असल्याने किमान त्यांच्या लेखनाला महत्व दिले पाहिजे. त्या सुद्धा सती प्रथा अस्तित्वांत नव्हती किंवा "अपवाद" होता वगैरे लिहीत नाही. ब्रिटिश लोकांची आकडेवारी बरोबर नाही हा त्यांच्या मूळ मुद्दा आहे आणि मिशनरी मंडळींनी बंगाल प्रांतात खोटा डेटा निर्माण केला अशी त्यांच्या पुस्तकाची मुख्य भूमिका आहे.
पण त्या पुस्तकांत सुद्धा, जैन स्वतः सती प्रथेचे अस्तित्व मान्य करतात, विविध कालखंडात, विविध दरबारातील दस्तऐवज, विदेशी प्रवासी चे प्रवास वृत्तांत इत्यादीत अनेक महिला सती गेल्याचे दिसून येते. विदेशी प्रवासी अत्यंत कुतूहलाने आणि आश्चर्याने हे पाहण्यासाठी गेले होते आणि बहुतेक जुन्या प्रवाश्यांची सती प्रथा हि पूर्णतः स्वैच्छिक निर्णय असल्याचे लिहिले आहे असे जैन ह्यांचे लेखन सांगते.
काही जुन्या प्रवासवरणात ग्रीक प्रवासी आपला वृत्तांत लिहितो. पर्शियन सैन्यातील हिंदू सरदार मारतो आणि त्याच्या दोन्ही बायका सती जाण्याच्या सन्माना साठी भांडतात. थोरली बायको गरोदर असते पण आपण थोरली म्हणून आपला अधिकार प्रथम मानते तर दुसरी आपण गरोदर नसल्याने आपल्याला अधिकार आहे म्हणून भांडते. शेवटी पर्शियन अधिकारी हस्तक्षेप करून निवाडा धाकट्या बायकोच्या नावे देतात. महत्वाचे म्हणजे इथे दोन्ही पत्नी "मी सती जाणार" म्हणून भांडत आहेत.
त्याच प्रकारे ईस्ट इंडिया कम्पनीच्या विविध वृत्तांतात "सेल्फ immolation of widows" असा उल्लेख आढळतो. बहुतेक वेळी परिवारातील सदस्य आणि तिथे असलेले ब्राम्हण वगैरे विधवेला सती न जाण्यासाठी परावृत्त करतात असेच विविध लिखाणात वर्णित आहे. मिशनरी लोकांचा प्रभाव वाढल्यानंतर हा सूर बदलतो आणि वेगळे वळण घेतो.
सती प्रथा वैदिक धर्मापेक्षाही जुनी आहे. सती चा उल्लेख सर्वप्रथम रिग्वेदांत आढळतो जिथे ऋषी मुनी एका विधवेला सती जाण्यापासून परावृत्त करतात आणि सती जाणे योग्य का नाही ह्याचे मार्गदर्शन करतात. तरी सुद्धा रिग्वेद नंतरच्या हिंदू साहित्यांत सती चा उल्लेख येतो. पांडू नंतर माद्री सती जाते. वासुदेव नंतर त्यांच्या ४ पत्नी सती जातात आणि श्रीकृष्णांनी अवतार समाप्ती केल्या नंतर त्यांच्या ५ पत्नी दाह करून सती जातात. आधुनिक काळांत शिवाजी महाराज ह्याच्या शिवाय रणजित सिंग ह्याच्या चितेवर ४ पत्नी आणि अनेक रखेल सती गेल्या. शिवाजी महाराजांच्या सर्वच पत्नीनं सती जायचे होते पण इतर दोघांना लहान मुले असल्याने इतरांनी त्यांना परावृत्त केले. १९८७ मध्ये रूप कुवर सती गेल्या. अनेकांनी ह्याला खून घोषित करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या माहिती प्रमाणे भारतीय कोर्टाने ह्याला खून म्हणून मान्य केले नाही.
त्यामुळे सती प्रथा नव्हती असे म्हणणे चुकीचे आहे. इतिहासांत, पुराणांत आणि आधुनिक काळांत सुद्धा अनेक स्त्रिया सती गेल्या आहेत असे आढळून येते. प्रत्येक कालखण्डात सती गेलेल्या महिलेला परावृत्त करण्याचा प्रयत्न इतरांनी केला आणि बहुतेक वेळा तो तिचा स्वतःचा निर्णय होता असे आढळून येते. सती गेलेल्यांचा गौरव इतर समाजाने केला असे सुद्धा आढळून येते.
चूक कि बरोबर ? माझ्या मते साईट प्रथेला किमान आधुनिक काळांत गौरव देणे योग्य नाही. पण जुन्या काळांत ज्या राणी वगैरे स्वेच्छेने सती गेल्या त्यांचा गौरव करण्यात काही चूक आहे असे वाटत नाही. तो काळ वेगळा होता आणि तेंव्हाचे मापदंड वेगळे होते.
इंग्रज नसते तर आज सुद्धा महिला सती गेल्या असता असे तरी मला वाटत नाही. बहुतेक सुधारणावादी चळवळी नेहमीच भारतांत आल्या आहेत आणि अत्यंत लवकर त्यांनी समाजांत बदल सुद्धा घडवून आणला आहे. स्त्री शिक्षण असो वा परिवार नियोजन किंवा अस्पृश्यता विरोध, इंग्रजांची भूमिका बहुतांशी शून्य राहिली आहे. सती प्रथेवर सुद्धा मिशनरी मंडळींनी रिपोर्ट्स लिहिले तरी सुद्धा ते अतिरंजित होते असेच मानावे लागेल पण तरी सुद्धा प्रथा होती आणि ती जाणे आवश्यक होते ह्यात शंका नाही.
सती प्रथा ऐच्छिक असती, तर…
In reply to अपवादात्मक गोष्टी सुद्धा… by साहना
सती प्रथा ऐच्छिक असती, तर विधवेला अफूचे दूध, तिचे किंचाळणे ऐकू येऊ नये म्हणून चितेच्या बाजूला ढोल वादन, नी ती चितेतून बाहेर येऊ लागल्यावर तिला पुन्हा आत लोटण्यासाठी बांबू घेऊन उभे असलेले कार्यकर्ते असा लवाजमा नसता!
हलालाच्या पैदाशीला हलाला…
हलालाच्या पैदाशीला हलाला चांगलीच वाटणार!
संपादक मंडळ
In reply to हलालाच्या पैदाशीला हलाला… by झालमुरी
हा एक अतिशय अश्लाघ्य, अश्लील व सभ्य सभेत व्यत्यय आणणारा प्रतिसाद असून तो तडक उडवून संबंधित सभासदांना कडक समज देऊन ती पण त्यांना न समजल्यास त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी ही नम्र विनंती.
(संसदीय कार्यमंत्री मिसळपाव सरकार)
किरेन खोंडिज्जू
त्यांना हालाला चांगली वाटते…
In reply to हलालाच्या पैदाशीला हलाला… by झालमुरी
त्यांना हालाला चांगली वाटते तर वाटू द्या की. तुम्ही कामुन त्यांना शिंगावर घेताय?
माझा मूळ प्रश्नच बदलला आहे
In reply to त्यांना हालाला चांगली वाटते… by झालमुरी
झालमुरी मध्ये कांदा लिंबू असतात का ? पण ते असो. हलालाची पैदास म्हणा का काय म्हणा तुम्हाला अमरपट्टा आहे आता.
गामांनी काडी टाकून विरेचक…
गामांनी काडी टाकून विरेचक दिले आहे,.,, अनेकांची पोटे ढवळून येत साफ होत आहेत...
चांगले आहे.. आरोग्यं धनसंपदा !!
राजो धन्यवाद साहेबा
In reply to गामांनी काडी टाकून विरेचक… by राज जोशी
मिसळपाववरच इतरत्र उजव्या इतिहासकारांची काही व्यवच्छेदक लक्षणे मांडली होती.
त्याला सप्रमाण लाईव्ह विदा तुमच्या प्रतिसादातून मिळणे हे आमचे भाग्यच.
(भारावून गेलेला पीएसपीओ) पंखा खोंडे
ओ ... तुम्ही झेंड्यावर…
In reply to राजो धन्यवाद साहेबा by वृषभ खोंडे
ओ ... तुम्ही झेंड्यावर पंढरपूर करणे बंद करा बर का !
दोन दिवसांनी पोळा आहे म्हणून सोडुन देतो... :)
परत तेच ते
In reply to ओ ... तुम्ही झेंड्यावर… by राज जोशी
🤣🤣🤣🤣🤣.
सोडणारे अन् धरणारे भरपूर बघितले साहेब. धरणारे अन् सोडणारे आपण कोणी लागून जात नाही राजो. आम्ही महादेवाचे नंदी. रोज भूतांत बसतो. प्रसंगोचित प्रात्यक्षिक पण दाखवूच.
नक्की. :) वाढदिवसाच्या…
In reply to परत तेच ते by वृषभ खोंडे
नक्की. :) वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
हेच करणार असाल
In reply to नक्की. :) वाढदिवसाच्या… by राज जोशी
तर रोज वाढदिवसाची पार्टी होईल बघा बुवा 🤣
सती, हलाला आणि Female Genital Mutilation (FGM)
सती प्रथेचे भारतातून उच्चाटन झाले आहे.
आंजा वरील वाचनातून हलाला प्रथा चालू असल्याचे समजते.
परंतु
जगातील काही भागात चालू असलेल्या Female Genital Mutilation (FGM) ह्या घृणास्पद प्रथेचा कोणीही उल्लेख केलेला नाही ह्याचे आश्चर्य वाटले.
काहीतरीच काय? FGM मुळे…
In reply to सती, हलाला आणि Female Genital Mutilation (FGM) by चामुंडराय
काहीतरीच काय? FGM मुळे कोणाचा जीव जातो का? सती प्रकाराखाली हत्या (सती प्रथा नव्हे. अशी प्रथा किंवा परंपरा कधीही नव्हती) करण्याचे तुरळक प्रकार थांबून अनेक दशके लोटली असली तरी त्यावर कठोर टीका करायलाच हवी. पण हलाला, FGM या पवित्र प्रथा, परंपरा अजूनही सुरू असल्या तरी त्याविरोधात बोलणे हे मनुवाद्यांचे षडयंत्र आहे कारण त्यात कोणाचाही प्राण जात नाही.
अशी प्रथा किंवा परंपरा कधीही…
In reply to काहीतरीच काय? FGM मुळे… by श्रीगुरुजी
अशी प्रथा किंवा परंपरा कधीही नव्हती >>>
इतके पुरावे असूनही पळ काढून काय फायदा?
Female genital mutilation or…
In reply to काहीतरीच काय? FGM मुळे… by श्रीगुरुजी
Female genital mutilation or cutting (FGM/C) is a deeply entrenched cultural practice that affects around 200 million women and girls. It’s practised in at least 25 African countries, as well as parts of the Middle East and Asia and among immigrant populations globally.
Our study estimates that it causes approximately 44,000 deaths each year across the 15 countries we examined. That is equivalent to a young woman or girl every 12 minutes.
https://theconversation.com/female-genital-mutilation-is-a-leading-caus…
Traumatic. Painful…
In reply to Female genital mutilation or… by सुबोध खरे
Traumatic. Painful. Irreversible. Female genital mutilation (FGM) is a human rights violation that inflicts lifelong suffering on millions of women and girls.
https://www.unwomen.org/en/articles/faqs/faqs-on-female-genital-mutilation-causes-impact-and-how-to-end-it
As the practice is mainly carried out on young girls, FGM/C is not only a women’s rights issue but also a child rights issue.
In May 2017, a petition was filed before the Supreme Court of India seeking a complete ban on the practice of FGM/C and declaration of the practice as illegal and unconstitutional. Subsequently, the matter was referred to a larger constitutional bench, without an interim order being passed, and is still pending.
https://blogs.lse.ac.uk/humanrights/2022/05/06/female-genital-mutilatio…
वाट अबाउट सती सर?
In reply to Traumatic. Painful… by सुबोध खरे
वाट अबाउट सती सर?
I don't know
In reply to वाट अबाउट सती सर? by अमरेंद्र बाहुबली
व्हॉट अबाऊटरी
सतीची प्रथा चुकीची होती. …
In reply to I don't know by वृषभ खोंडे
सतीची प्रथा चुकीची होती. आताही जर तसे होत असेल ( एखद्या स्त्रीला सती जाण्यास भाग पडले जात असेल) तर कठोरपणे कायद्याची अंमल बजावणी करून ते थांबवले पाहिजे
याबद्दल काथ्याकूट करण्यात काहीही हशील नाही.
उगाच या त्या कारणाने हिंदू धर्माला झोडपण्याची संधी घेणारे फुरोगामी इतिहासातून बाहेरच आलेले नाहीत. ते एका विशिष्ट झापडबंद मनोवृत्तीनेच सर्वत्र वागताना दिसतात.
हिंदू धर्मात कोणतीही प्रथा अटळ म्हणून मानलेली नाही आणि कोणताही ग्रंथ हेच ज्ञानाचे शिखर म्हणून मानलेले नाही.
या ग्रंथात लिहिलेले हाच शेवटचा शब्द आणि भारतीय घटनेपेक्षा आम्ही त्याच पुस्तकाला मानतो असेच त्यांचे बहुसंख्य अनुयायी जाहीरपणे बोलतात. त्याविरुद्ध ब्र काढण्याची एकही फुरोगाम्याची छाती होत नाही. मग तो गिरीश कुबेर असो किंवा हमीद दाभोलकर असो. दुटप्पीपणा हा यांचा स्थायीभाव आहे. यात कम्युनिस्ट (निधर्मांध) हि येतात.
मनुस्मृतीच्या नावाने खडे फोडणारे यांनी ती पूर्णपणे वाचलेली नाही. मुळात मनुस्मृतीप्रमाणे धर्म चालणे बंद होऊन निदान पाच दशके तरी झालेली आहेत आणि त्याला कायद्याचा आधारही नाही. बहुसंख्य हिंदू मनुस्मृती वाचत नाहीत आणि त्यात काय लिहिलेले आहे याच्याशी त्यांना घेणे देणे सुद्धा नाही.
त्यातील एखादा उतारा घेऊन त्यातून हिंदू धर्माला झोडपण्याचा प्रयत्न करणारे लिब्रान्डु आणि इयत्ता आठवीची संस्कृत सुभाषितमाला वाचून गीतेवर प्रवचन देण्याचा प्रयत्न करणारे यात फार फरक नाही.
हि गोष्ट बायबल किंवा कुराणाच्या बद्दल म्हणता येत नाही. तशी बोलण्याची एकही फुरोगाम्याची हिम्मत नाही आणि कणाहीन बुळबुळीत फुरोगामी अशी दोन धर्मग्रन्थाची तुलना केली कि व्हॉट अबाऊटरीचा जप जपताना आढळतात.
पण केवळ एखादा उजवा आहे किंवा हिंदू धर्माचा अभिमानी आहे म्हणजे तो संघ शाखेतच जाणारा असला पाहिजे किंवा गायीला माताच मानणारा असला पाहिजे असा बाष्कळ आग्रह धरणारे पुरोगामी इथे मिपा वर सुद्धा भरपूर सापडतात.
बीफ खाणारे लोक सुद्धा हिंदूच आहेत असे हिंदू धर्म सुद्धा मानतो पण फुरोगामी मात्र अजून आपल्या जुनाट कल्पनांना चिकटून बसलेलं आहेत हे इथल्या अनेक प्रतिसादांवर स्पष्टपणे दिसते.
मी सुद्धा बीफ खाल्लेले आहे आणि त्यात काही गैर नाही असे मी उघड पणे सांगू शकतो.मी मांसाहार करतो म्हणजे मांसाहारच चांगला असे मी मुळीच मानत नाही. कारण शाकाहार हा आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगला आहे हे वैद्यकशास्त्रात सिद्ध झालेले आहे. (मी बीफ खात नाही कारण भारतात अशक्त आणि रोगी असेच पशु कत्तलीसाठी पाठवले जातात. बऱ्याच वेळेस मटण खाण्याबद्दल सुद्धा मी साशंक असतो याचे कारण मटणाच्या ऐवजी त्यात बीफ घातलेले असले तर ते शोधणे कठीण जाते).
खतना किंवा female genital mutilation हा प्रौढांवरील नसून बालिकांवरील निर्घृण अत्याचार आहे (ज्यांना परवानगी देण्याच्या वयाच्या अगोदरच हि क्रिया केली जाते). खरं तर सुंता सुद्धा लहान मुलांवर अत्याचार आहे हा साधा स्पष्ट मुद्दा आहे. त्यावर एकही फुरोगामी बोलण्याची हिम्मत करणार नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे.
तुम्ही हिंदू धर्मावर बोला असे ओरडणे सोपे आहे पण सर्मधर्म समभाव आणि सर्व सारखे आहेत या तत्वाला हरताळ फासताना फुरोगाम्यांना जनाची नाहीच पण मनाची सुद्धा लाज वाटत नाही.
बाकी --खांद्याखाली बळकट असणाऱ्या लोकांच्या प्रतिवादाला उत्तर देणे मी केंव्हाच बंद केलेले आहे.
पुरोगामी
In reply to सतीची प्रथा चुकीची होती. … by सुबोध खरे
आम्ही हिंदू आहोत आणि आमच्या समाजातील वाईट प्रथा नाहीशा व्हाव्यात असे आम्हाला वाटते म्हणून म्हणून आम्ही केवळ हिंदूंमधील वाईट प्रथांवरच टीका करतो आणि इतर समाजांमधील वाईट प्रथांवर काही बोलत नाही कारण जसा हिंदू समाजाविषयी आम्हाला आपलेपणा वाटतो तसा अन्य समाजांविषयी वाटत नाही हा नेहमीचा पुरोगामी युक्तीवाद आहे. खरं तर हा अत्यंत घातक युक्तीवाद आहे. अशा फुरोगामी लोकांचे ऐकून सारासार विचार करायची क्षमता अजून विकसित न झालेल्या पुढील पिढीला काय वाटेल? हे लोक कायम हिंदूंमधील वाईट प्रथांवर टीका करत असतात पण हिंदूंमध्ये जे काही आहे त्यावर कधी कौतुकाचे अवाक्षरही काढत नाहीत याचा अर्थ हिंदूंमध्ये सगळे काही वाईटच आहे. आणि ते लोक दुसऱ्या समाजाविषयी काहीही बोलत नाहीत- चुकूनमाकून बोललेच तर चांगलेच बोलतात (उदाहरणार्थ रमजानच्या महिन्यात रोजे पाळणे हे पचनसंस्थेसाठी कसे चांगले वगैरे) म्हणजे अहिंदूंमध्ये सगळे काही चांगलेच आहे.
असल्या पुरोगाम्यांचे ऐकून स्वत:च्या समाजाचा, परंपरांचा आणि जे काही हिंदू असेल त्या सगळ्याचा तिरस्कार करणारी आणि अहिंदूंचे सगळे काही कित्ती कित्ती चांगले असते असे वाटणारी पुढील पिढी तयार होईल ही भीती आहे. असल्या पुरोगाम्यांपासून - नात्यातील असतील तरी- आपल्या पुढच्या पिढीला कटाक्षाने दूर ठेवायला हवे.
चंद्रभाऊ
In reply to पुरोगामी by चंद्रसूर्यकुमार
हेच हिंदुत्ववादी ब्रिगेडला पण नगास नग होते की ! एकंदरीत पुढच्या पिढीला सगळ्याच मूर्खपणापासून वाचवून ठेवणे गरजेचे आहे.
ऑ !
In reply to सतीची प्रथा चुकीची होती. … by सुबोध खरे
कोणताही ग्रंथ हेच ज्ञानाचे शिखर म्हणून मानलेले नाही.
गीता ?
उगाच या त्या कारणाने हिंदू धर्माला झोडपण्याची संधी घेणारे फुरोगामी इतिहासातून बाहेरच आलेले नाहीत. ते एका विशिष्ट झापडबंद मनोवृत्तीनेच सर्वत्र वागताना दिसतात.
तुम्ही तरी काय वेगळं करता आहात ? 🤣🤣 तुम्हाला पण तेच सांगतो, हलाला किंवा FGM वर धागे काढा त्यावर सुद्धा चर्चा करू की नाही कोण म्हणतोय. माझा पॉईंट अतिशय साधा आहे डॉक्टर, विषय "द हिंदू पॅराडॉक्स" आहे तूर्तास.
मुसलमान धर्मावर टीकात्मक लेखन तुम्ही करा मी तुम्हाला मुसलमान धर्मातील कुप्रथांवर भाष्य करण्यासाठी पूर्ण समर्थन देईन. जे बरोबर ते बरोबर आहेच की.
आणि हो जसे हिंदुवादी म्हणजे गाय माता आहे मानणारा (तुमच्या लेखी) फुरोगामी असतो तसेच हिंदू धर्मातील कुप्रथा किंवा ऐतिहासिक चुकीच्या बाबींवर विवेचन करणारा फुरोगामीच असतो असे ही सोयीस्कर मांडणारे मिपाकर आहेतच की.
कोणी कोणाला बोलायचे ?
(तूर्तास विनम्र) खोंडे
अर्र
In reply to सतीची प्रथा चुकीची होती. … by सुबोध खरे
बाकी --खांद्याखाली बळकट असणाऱ्या लोकांच्या प्रतिवादाला उत्तर देणे मी केंव्हाच बंद केलेले आहे.
तुम्ही कोणाला प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. जर बोलायला काही सुचत नसेल तर गप राहा की, लोकांच्या बळकटीचा असला अंदाज बांधून सर्टिफिकेट वाटायचा धंदा करण्याचे काही खास प्रयोजन नाही साहेब.
कसं आहे, तुम्ही वाटेल ते वाटेल तसे बोलणार अन् कोणी काही प्रतिवाद करणार नाही हे दिवस मिपावर पण सरले आहेत हे लवकर लक्षात घ्या ही नम्र विनंती.
माझी भाषा extreme ट्रोलिंग मधे, बहिष्कारात पण संयतच असते. स्वतःची आब तुम्ही खराब करून घेण्याचे ठरवले असेलच तर माझाही निरुपाय असेल (आणि तो सुद्धा सभ्य भाषेतच असेल इतके नक्की)
(करारी) खोंडे
खांद्याखाली बळकट असणाऱ्या…
In reply to अर्र by वृषभ खोंडे
खांद्याखाली बळकट असणाऱ्या लोकांच्या प्रतिवादाला उत्तर देणे मी केंव्हाच बंद केलेले आहे.
या वाक्याचा आपला संबंध नाही. त्याचा इथला( मिपावरचा) इतिहासआपल्याला माहिती नाही. तेंव्हा उगाच उडता तीर मारून घेऊ नका.
कुणाकडून तरी इतिहास जाणून घ्या
*** जगातील काही भागात चालू…
In reply to सती, हलाला आणि Female Genital Mutilation (FGM) by चामुंडराय
तुम्ही चर्चा सुरु करा आणि आम्ही विस्ताराने प्रतिसाद देऊ. सती विषयावरील चर्चेसाठी FGM किंवा इतर बीभत्स गोष्टीवर सुद्धा चर्चा केलीच पाहिजे असा काय नियम आहे ? तुम्ही लेखन प्रपंच करा आम्ही तितक्याच आग्रहाने प्रतिसाद देऊ. पण FGM वर चर्चा नाही केली म्हणून सती विषयाच्या इतिहासावर आम्ही बोलू नये हा तर्कदुष्टपणा आहे.
+१
In reply to *** जगातील काही भागात चालू… by साहना
+१
तुरळक ?
एकही स्त्री जाळली जाणे भयावह असते गुरुजी, फक्त राजकीय विचार करणे सोडा आता तरी. मागच्या प्रतिसादात सुद्धा मी स्त्रिया काही भाजीपाला नाही नगात मोजायला असे स्पष्ट केले होते तरीही तुमचे भलतेसलते बोलणे सुरूच आहे .
समायोचित चर्चा सतीवर सुरू आहे म्हणून सतीवर बोलतोय. तुम्ही काढा धागा हलाला आणि FGM वर त्यावर सुद्धा टीका करेन.
कारण कसे आहे स्त्री मुसलमानांची आहे का हिंदूंची ह्यावर तुमची समीकरणे अवलंबून असतील माझी नाहीत.
+१
In reply to तुरळक ? by वृषभ खोंडे
+१
सती घटना (incidents)…
सती घटना (incidents) निषेधार्ह आहेत. एका जिवंत मानवाला जाळून अत्यंत वेदनादायक रीतीने नष्ट करणे हे अतिशय निर्घृण कृत्य आहे. त्यांचे समर्थन कुणीही सुज्ञ हिंदू करणार नाही. सनातन हिंदू धर्म कोणत्याही मानवताविरोधी वर्तनाला परवानगी देत नाही. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
तथापि, अश्या घटनांचा आधार घेऊन, त्यांची संख्या व तीव्रता amplify करून, त्या घटना मोठ्या संख्येने आजही घडत आहेत असे भासवून, "हिंदू धर्म हा अतिशय बुरसटलेला आहे, हिंदुत्व नष्ट व्हायला हवे, हिंदू ही ओळखच अतिशय लाजिरवाणी आहे" अश्या प्रकारचे narrative सातत्याने मांडत राहणे हे तितकेच निषेधार्ह आहे; त्याचा विरोधच व्हायला हवा.
कोणत्याही व्यक्ती,संस्था, संघटना, प्रतिष्ठाने वगैरे कधीही, केंव्हाही पूर्णतः दोषमुक्त नसतात. उणे-अधिक असणे हे नैसर्गिक आहे. महत्वाचे हे की त्या entity मध्ये अधिक चांगला भाग कोणता आहे हे पाहणे, त्याचे संवर्धन कसे करता येईल याची उपाययोजना करणे, त्यातील न्यूनाचा प्रभाव कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणे.
हे खऱ्या हेतूने करणाऱ्या व्यक्तींना वा संस्थांना पाठिंबा द्यायला हवा. हिंदू धर्म व हिंदू समाज या निकषांवर नेहमीच सकारात्मक, प्रागतिक व पुरोगामी (खऱ्याखुऱ्या अर्थाने पुरोगामी) राहिलेला आहे.
सती घटनांची चर्चा करताना हे विसरायला नको.
- (खरा पुरोगामी) कांदा लिंबू
+ १
In reply to सती घटना (incidents)… by कांदा लिंबू
+ १
ओके
आताच्या सतीच्या चर्चेत कोणी वरील ईच्छा दाखवली ते पॉईंट आऊट करा ! उगाच तुम्ही दिवाभित आहात ते जनतेवर लादू नका. आम्ही शाखेत नाही आखाड्यात पोसलो आहोत.
आमचे ज्ञान, विज्ञान, इत्यादी सगळे जागेवर आहे, हिंदू धर्म आणि हिंदुत्व ह्यात फरक असतो, हिंदू धर्म तगडा आहे तो सतीसारख्या प्रथा वेळोवेळी डिस्कार्ड करतो हिंदुत्व = राजकीय मूर्खपणा जो हिंदुधर्माचे रक्षण करण्याचा आव आणतो अन् स्वतःच्या राजकीय चपात्या शेकून घेतो.
आम्ही हिंदुत्ववादी खचित नाही पण हिंदू नक्कीच आहोत अन् हिंदुत्व जे हिंदुधर्माला अब्राहमिक चौकटीत बांधायचे पाप करते आहे त्यात आम्ही सहभागी नाही.
त्यामुळे आमचा धर्म पण धोक्यात नाही अन् पुढे कधी आला तर त्या धोक्याचा समाचार घ्यायला आम्ही समर्थ आहोत.
हिंदू संपवायला निघालेल्या जगाचा बागुलबुवा फक्त दाखवून राजकीय अजेंडा रेटलेला ह्यापुढे असाच कॉल आऊट करण्यात येणार आहे.
बोला हर हर महादेव
(स्पष्ट विचार धर्मभिमानी) खोंडे
बोला हर हर महादेवहर हर…
In reply to ओके by वृषभ खोंडे
बोला हर हर महादेव
हर हर महादेव!
आम्ही शाखेत नाही आखाड्यात पोसलो आहोत.
दोन्हींचा इथे संबंध काय?
संबंध नाही ?
In reply to बोला हर हर महादेवहर हर… by कांदा लिंबू
हिंदुत्व = शाखेत, भाजपच्या, सेनेच्या एजेंडा मध्ये, गावगुंड मंडित फ्लेक्स बॅनर मधे, महोत्सव साजरे करताना डी जे लावून दहीहंडी फोडणारे.
हिंदुधर्म = आमच्या घरात, ग्रामदेवतेच्या यात्रेत, ज्योतिबा, खंडोबा, सप्तमाता, अकरा मारुती, बिरोबा, म्हसोबा, कुळधर्म कुलाचार, दसऱ्याचे शिलंगण, दिवाळीचे अभ्यंग स्नान इतक्या सगळ्यात आहे अन् आम्ही तो पिढ्यानपिढ्या तलवारीच्या मुठीवर पकड पक्की ठेऊन साधला आहे त्यासाठी आम्हाला बेगडी राजकीय हिंदुत्वाची गरज नाही.
परत बोला
ज्योतिबाच्या नावाने चांगभले,
यळकोट यळकोट जय मल्हार.
परत बोला ज्योतिबाच्या नावाने…
In reply to संबंध नाही ? by वृषभ खोंडे
परत बोला
ज्योतिबाच्या नावाने चांगभले,
यळकोट यळकोट जय मल्हार.
ज्योतिबाच्या नावाने चांगभले,
यळकोट यळकोट जय मल्हार.
हिंदुत्व = शाखेत, भाजपच्या, सेनेच्या एजेंडा मध्ये, गावगुंड मंडित फ्लेक्स बॅनर मधे, महोत्सव साजरे करताना डी जे लावून दहीहंडी फोडणारे.
साफ चूक. मराठी आधी व्याकरण शिकून या; मग पुढे बोलू.
आता कसं आहे
In reply to परत बोला ज्योतिबाच्या नावाने… by कांदा लिंबू
विषयावर फोकस करता काही खास हातात लागणार नाही हे लक्षात आले की मग माझे व्याकरण, स्वतः खाल्लेले शिकरण, त्या शिकरणाचा इतिहास, त्याचे मटार ऊसळीसोबत मैत्रीपूर्ण संबंध, असे कैक फाटे सुचतील.
ही शैली आता जुनी झाली, तुम्ही अगदी त्या तुमच्या झालमुरी सारखे मला काहीही शिव्या घालून बोललात तरी मी फोकस ढळू देणार नाही. हिंदुधर्म हा हिंदुत्व नावाच्या बेगडी फालतू अन् फक्त विशिष्ट राजकीय आयुष्यक्रम असणाऱ्या दिखावा करणाऱ्या संकल्पनेपेक्षा अतिशय गहिरा आणि उच्च आहे(च).
(पक्ष्याचा डोळा पाहणारा स्थिर चित्त आज का अर्जुन) खोंडे हस्तिनापुरकर