कलादालन
माझी चित्रे -भाग २
Primary tabs
माझी चित्रे - भाग १
माझी चित्रे - भाग २
नमस्कार मिपाकर मंडळी!
पहिल्या भागाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलात आणि मला प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार!
आज या दुसर्या भागात मी काही चित्रे देत आहे. जेंव्हा माझा क्लास सुरु झाला तेंव्हा सुरवातीला सराव व्हावा म्हणुन माझ्या सरांनी एका पुस्तकामधिल ३ चित्रे मला करायला दिली होती. ति मी आज इथे देत आहे. त्या चित्रांचा मुळ चित्रकाराचे नाव मला माहित नाही म्हणून दिले नाही. पण मी ती तशीच चितारण्याचा प्रयत्न केला आहे.
ही तिन्ही चित्रे अॅक्रिलिक कलर्स वॉटर कलर पध्दतीने वापरुन केली आहेत.
हे चौथे चित्र माझे मेमरी ड्रॉईंग आहे.. यात ऑईल कलर्स वापरले आहेत.
तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. बाकी चित्रे पुढील भागात.
दुसरं जास्त आवडलं !! वॉटर कलर मध्ये असे रंग हाताळणं आणि आभास तयार करणं अवघड असतं.
झाडाची पानं आणि ती ओळीत असलेली झाडं छान आली आहेत.
पहिल्याचीही मांडणी छान आहे.
पुलाच्या चित्रात पाण्यात रंगाची सरमिसळ न होता वेगवेगळे पॅच बरोबर वाटले नाही पण रंगांचा पोत सुंदर आहे.
खूप छान. अजून येऊ द्या!
दुसरं जास्त आवडलं !!
चुचु
मला पाचवं .. खालुन तिसरं , वरुन तिसरं ,, खालुन पाचवं आणि खालून दुसरं चित्र आवडलं ...
लय बहारी !!
टारझन भाउ.... ते पाचवे चित्र माझ्याकडुन तुम्हाला भेट बर का.
अप्रतिम ! :)
सर्व चित्रे आवडली.
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
फार सुंदर आहेत सगळीच चित्रे....
दुसरं जास्त आवडलं !! बाकि सर्व चित्रे छान...
एकदम झकास !
सगळी चित्रे आवडली.
राजा परा वर्मा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
सुरेख.!
तात्या.
पहिलं चित्र सगळ्यात जास्त आवडलं!!!
बिपिन कार्यकर्ते
एक पुसटशी श॑का ..वरुन तिसरे चित्र...त्याच साईज चे आहे की फोटो डकवताना साईज कमी झाली आह
सुहास
तु कधी येणार.....
मुद्दाम लहान टाकला होता. नंतर परत टाकते.
काय सुंदर चित्र काढतेस तु.... मला पहिलं सगळ्यात जास्तं आवडलं!
-अनामिक
त्यातही पहिले फारच आवडले! तिसरेही छान आहे.
(ऑईलवर अजून बरेच काम हवे त्यासाठी शुभेच्छा.)
(जलरंग)चतुरंग
चित्रकारी सायली. सगळी चित्रं आवडली.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
चित्रकार मॅडम,
आपण ग्रेट आहात!
चित्र क्र. एक व दोन भारी!:)
रेवती
पहीलं चित्र आवडलेल्यांशी सहमत!
मिपावर कोणीतरी ऑनलाईन क्लासेस बद्द्ल बोलत होतं, एक जपानी भाषेचा, तसा हा दुसरा, सुरु करायला हरकत नाही! पाककला क्लास तर जोरात चालुच आहे. ;)
सर्व चित्रे उत्तम आहेत. अभिनंदन.
छान... :)
पहिल चित्र फार आवडल.
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
सगळीच चित्रं छान आहेत एकदम :)
सहमत!
सर्वच फोटू सुंदर आहे ... :) :)
त्यातल्या त्यात दुसरे चित्र खूपच छान... =D> =D>
आम्हाला नाही येत असे छान छान चित्र काढता :( :(
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
छान आहेत सर्व चित्रे.मला दुसरे चित्र जास्त आवडले.
;;)
धन्यवाद स्वाती आणि सोनम!
;;)
धन्यवाद स्वाती आणि सोनम!
सुरेख आहेत सर्वच चित्रे ..
मेमरी ड्रॉइंग खूपच सुंदर ..