Skip to main content

कोकोनट पेढा

लेखक दिपाली पाटिल यांनी गुरुवार, 18/06/2009 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
कृती आपली मागच्या सारखी च , फक्त त्यात बाजारातील (डेसिकेटेड) खोबरे टाका आणि खोबर्‍यातुन घोळवुन वरुन मनुका किंवा बदाम काप लावा. लगेच संपवायचे असतील तर ओलं खोबरं ही छान लागतं.

वाचने 5655
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

हे पेढेही मस्त! भयंकर सुंदर फोटू! आता फक्त पायनॅपल पेढा राहिलाय. तोही लवकर टाक! रेवती

तुला आता पेढेवाली दिपाली असचं म्हणायला पाहिजे ;) एकदम झकास दिसतायत पेढे समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

कुठे फेडशील गं हे पाप?? का खेळते आहेस जीवाशी?? ;) आमची तात्यांना विनंती : इतके सुंदर पेढ्यांचे फोटो टाकून जळवणार्‍या दिपालीचे खाते रद्द करावे. ;) (ह , घेशीलच नक्की.) खल्ल्लास फोटो.. काय वर्णावा महिमा या पेढ्यांचा. - (सर्वव्यापी) प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

डिट्टो असेच म्हणतो. आधीच नारळाची बर्फी आणि पेढे हे दोन आवडीचे पदार्थ, त्यात आता हे एकत्र ... का त्रास देते दिपाली ?

In reply to by प्राजु

बहुमताने सहमत !!! आणी हो आमच्या मनातली प्रतिक्रीया चोरली म्हणुन प्राजुतै चे खाते पण डिलीट करावे [;)] º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

पेढे द्यायची भलतीच घाई झालेली दिसतेय!!! (ह. घ्या.) - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

२७ तारखेला बे एरियात येतोय!! माझ्यासाठी काही पेढे फ्रीझमध्ये राखून ठेवा असा काकूचा निरोप आहे!!!!! :) नाय म्हणजे चव घेतल्याशिवाय प्रतिक्रिया कशी देणार ना? :))

In reply to by पिवळा डांबिस

आमीबी चव घ्यायला मिळाल्याशिवाय प्रतिसाद द्यायचे नाहीत असे ठरवले आहे. निर्जन बेटावरील आधुनिक आदीवासी,:| -नाईल.

In reply to by पिवळा डांबिस

ती कट्ट्याला येनार नाय म्हनून रायलीय नव्हं. आनं पेढे कशापाई केलंत एवडं साद ध्यानात येईना व्हय तुमच्या. ;-) काय सांगायचं राव, आमी एवड्या जवळ राहून कंदीबी बलीवलं नाय का कंदी एक पेडा घरी धाडला नाय. निस्तीच फोटू दावुन कवतीक करून घेतीय बघा. फोटु काय चाटायचाय. - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

अहो आपण आमचे वजन वाढवायच्या मागे लागला आहात असे वाटते. चांगल्या चांगल्या म्हणुन किति पाकक्रुती द्याव्यात. बाइग आमचे सगळे कुटूम्बच तुझे फ्यान झालेले आहे.

दिपाली तै, उगाच छळताय बर का लोकांना असे नुसतेच फोटो दाखवुन. पार्सल करा बरं आता पेढे सर्वांना लवकर.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

फोटो १ नंबर. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.