कलादालन

सूर्य-ढगांची लपाछपी..

Primary tabs

आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला! Image removed. Image removed. आज एकंदरीत सूर्य वेगळाच दिसत होता.. म्हणजे प्रचंड ढग दाटून आले होते.. आणि सनसेटच्या वेळेस तर चक्क उलटा सनराईज दिसला..! म्हणजे वर ढगांची चादर, आणि खाली सूर्याची कोर! पण गाडी भरधाव चालल्याने आणि तित्काच फास्ट सूर्य पळल्यामुळे ती मोमेंट काही टिपता नाही आली.. :( सूर्य पटकन डोंगरांमागे लपला आणि मला असा फोटो मिळाला.. आधी तो डोंगरही ढगांचा पट्टा वाटला होता.. :) Image removed. (हे वरचे तीन फोटो मी आयुष्यात प्रथमच मॅन्युअली (पक्षी: काय वाट्टेल ती ) सेटींग्स लावून काढली आहेत.. डोळ्याला बरी वाटली म्हणून देतेय.. हीच सेटींग्स का ती का नको.. म्या अजाणाला नाही समजत! :( ) बरं... सूर्य गेला.. आणि ढगांनी चादर अंथरली.. अशक्य हवा होती आज! ढग शक्य तितके खाली उतरलेले.. प्रचंड वारं असल्याने तेही पळत होते.. सूर्यही पळालाच.. उकाडाही एकदम गायब.. आणि थंडी अचानक वाढली .. समुद्र देखील ढगांच्या प्रतिबिंबामुळे वेगळाच दिसत होता.. माहौलच वेगळा! Image removed. Image removed. Image removed. किती उच्च कॅमेर्‍याने फोटो काढले की तो निसर्ग कॅमेर्‍यामधे आणणे आणि जसे डोळे कॅप्चर करतात तसंच फोटो मधे येणे कधी जमेल?? (Flickr Link) Image removed.
सोनम

किती अप्रतिम फोटो आहेत. :)
छान्,सुंदर फोटू. =D> =D> =D>

विसोबा खेचर

सगळीच चित्र छान परंतु दुसरं चित्र जबर्‍याच!

आपला,
(भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या.

मराठमोळा

सुरेख छायाचित्रे आहेत. आवड्ली :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती

सगळी चित्रे छानच!
लग्गेच लाँगड्राइव्हला बाहेर पडावसं वाटलं.

रेवती

क्रान्ति

फोटो आवडले.

=D> =D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

शितल

भाग्यश्री,
तु एक उत्तम फोटोग्राफर आहेस. :)

सहज

सर्व फोटो छान आहेत.

राघव

छान फोटू! एकदम आवडलेत. :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

ऋषिकेश

सगळेच फोटू मस्त आहेत.. शेवटून दुसरा लै आवडला

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

तुमचा हेवा वाट्तोय ..
मुंबई मध्ये लाँग ड्राईव्ह कसलं :S
सगळे फोटो छान !!

बेसनलाडू

त्याचे चित्र (जीप सोडून) जलरंगात कागदावर उतरवायचा प्रयत्न करावासा वाटतो आहे.
(चित्रकार)बेसनलाडू

छायचित्र म्हणून दुसरं आवडलं. पण शेवटच्या दोन चित्रातला वातावरण जबरदस्त आहे. एकदम फंटाष्टिक.

बिपिन कार्यकर्ते