कलादालन

अमेरिकन पाट्या!!!!!

Primary tabs

पुणेरी पाट्यांच्या पाठोपाठ येत आहेत अमेरिकन पाट्या!!!!! १. हर्शे चॉकलेट पार्क, पेनसिल्वानिया. :X Image removed. २. एक असेच रस्त्याचे नाव... ( देणारा कंटाळला असावा बिचारा (|: Image removed. ३. NYSE च्या दारात ONE-WAY अशी पाटी आहे. आत गेलेला $ परत बाहेर येत नसावा. पाटी सार्थ आहे :D Image removed. टीपः #१ मी स्वतः काढला आहे. # २, # ३ एका मित्राच्या Orkut मधून साभार!
Nile

हा हा हा! मस्त. (हा पुणेकरांच्या अनिवासी होण्याचा परिणाम तर नसेल?) ;) ;)

भाग्यश्री

श्या हे लिहून शायनिंग मारायचा विचार करायच्या आत नंदन हजर! :(
हेहे..
सही पाट्या आहेत हा! जरा चेंज!!

http://www.bhagyashree.co.cc/

Nile

हा हा. नंदनशेठ म्हणजे encyclopedia of what not. :)
गुगला वर एक इंटरेस्टींग ट्रेलर सापडला. :) पाहीला आहे का?

छोटा डॉन

>>हा हा. नंदनशेठ म्हणजे encyclopedia of what not.
नाईलरावांचा निषेध ...
तुम्ही धडधडीतपणे आमचे वाक्य चोरलेत, आम्ही हेच लिहणार होतो ... ;)
पाटील, हे चांगलं नव्हं ..

बाकी फोटो मजेशीर आहेत.
आम्हाला २ मिनीटे वाटले की आमचे विजुभाऊच हामेरिकेला गेले काय ऑनसाईट ??? ;)

------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

रेवती

आम्हाला २ मिनीटे वाटले की आमचे विजुभाऊच हामेरिकेला गेले काय ऑनसाईट ???
तसं झालं असतं तर लगेच 'अमेरीका लाइफ' मालिका आली असती.
विजूभाऊ हे वाक्य हलके घेतीलच.;)

रेवती

विजुभाऊ

आम्हाला २ मिनीटे वाटले की आमचे विजुभाऊच हामेरिकेला गेले काय ऑनसाईट ???
हो ना मलाही तीच शन्का आली.
परवा पुणे स्टेशन जवळ एक पाटी वाचली.
" आमचे येथे स्टोव छत्री सायकली रीपेर करून मिळतील.
सायकलीचे स्पोक्स बसवून मिळतील.
मूळव्याधीवर रामबान औषध मीळेल "
आहे का चॅलेन्ज या पाटीला ;)

अवांतरः कृपया हा प्रतिसाद "अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे" असे लिहून चांदण्या मिळवण्याचा प्रयत्न करू नये ही इनन्ती

विकास

ही घ्या अजून एक (सेप्टीक टँक ट्रकच्या मागचे):

शाहरुख

आज एका गाडीमागे खालील वाक्य लिहिलेली पट्टी बघितली..फोटो घेऊ शकलो नाही पण.

"A patriotic is a person who fights for his nation against its government"

:-)

विकास

"A patriotic is a person who fights for his nation against its government"

ह्या मुलभूत तत्वावरच अमेरिका हे राष्ट्र म्हणून तयार झाले आणि त्यावर आधारीत राज्यघटना जन्माला आली. त्याचा सद्यस्थितीत काही बाबतीत अतिरेकही होतो. उ.दा. बंदुक जवळ ठेवण्याचा हक्क. (उद्या सरकार विरुद्ध उठाव करायचा असेल तर बंदुक हवी ना! कदाचीत विकीसाहेबांना हे आवडू शकेल ;) )

सरकार म्हणजे उपयोग नाही, करदात्यांचा पैसा वाया घालवणारे असा अजून एक अतिरेकी गैरसमज (काही बाबतीत अर्थातच खरे आहे). किंबहूना जेंव्हा स्टीम्युलस पैसे घेताना उद्योगधंद्यांनी करदात्यांचेच पैसे घेतले होते :)

तरी देखील हा घेण्यासारखा गुण आहे. या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यक्तीच्या हट्टामुळे कायद्याने अथवा इतर पद्धतीने समाजत बदल घडवून आणण्यास कारणीभूत झाल्यात. आधी एका प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे त्यात अनेक पर्यावरणीय कायदे आहेत. (सिव्हील अ‍ॅक्शन हा उदास करणारा आणि तरीदेखील स्फुर्तीदायक चित्रपट या संदर्भात पहा, अथवा एरीन ब्रॉकोविच (ज्युलीया रॉबर्ट्स). त्याच प्रमाणे हुमन राईट्स, अमेरिक डिसअ‍ॅबिलीटी अ‍ॅक्ट वगैरे..

थोडे अवांतरः अमेरिकेत गाड्यांच्या मागच्या बंपर स्टिकर्सप्रमाणे, नंबर प्लेटवर ज्या राज्यात गाडी नोंदवली गेली असेल त्या राज्याचे घोषवाक्य असते. न्यू हँपशायर या राज्याचे घोषवाक्य आहे: Live free of die. गंमत म्हणजे हे घोषवाक्य असू नये असे वाटणार्‍यांना तसे वागण्याचा मात्र त्यात स्वातंत्र्य (freedom) दिलेले नाही!

शाहरुख

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
मला ते वाक्य थोडे बंडखोरीकडे झुकलेले वाटले.

सरकारच्या धोरणांबद्दल जागरूक राहून चुकीच्या वाटणार्‍या धोरणांना विरोध दर्शवणे मी समजू शकतो आणि अर्थातच मला तो देशभक्तीचा भाग वाटतो.

विकास

मला ते वाक्य थोडे बंडखोरीकडे झुकलेले वाटले.

अगदी! तसेच आहे ते आणि म्हणूनच म्हणले की त्याचा कधी कधी अतिरेक होतो.

हरकाम्या

हे अमेरिकन्स आपल्या " पुणेरी " मंडळींपेक्षा जरा जास्तच वाटतात.

टेक्सासमध्ये प्रवास करीत असतांना एका प्रॉपर्टीच्या कुंपणावर वाचलेली पाटी...

"Tresspassers will be SHOT!
Survivors will be shot AGAIN!!!"

हाय कुनाची बिशाद?
:)

अगायाययाया .......... :O ही भयानक आहे पाटी...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

आशिष सुर्वे

मज्जा वाटली वाचून!!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

विकास

मराठी संकेतस्थळांसाठी पण अशीच काहीशी पाटी (बॅनर) अदृश्यावस्थेत असते का? ;)

मिसळभोक्ता

मराठी संकेतस्थळांसाठी पण अशीच काहीशी पाटी (बॅनर) अदृश्यावस्थेत असते का?

+१.

(ब्रिंगिंग जॉय टू मिसळपाव, ईदर वे)

-- मिसळभोक्ता