Skip to main content

फोडणीचा ऊस

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 29/07/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फोडणीच्या गंडेर्‍या ही पाककृती http://misalpav.com/node/8730 या लेखना वरून आठवली आहे. त्यामुळे लगेच फोटो उपलब्ध झाला नाही साहित्य : मस्त पुंड्या उसाच्या गंडेर्‍या तीन वाट्या, तेल १ चमचा , मोहोरी १ चमचा, हळद ,कढीपत्ता , लाल मिर्ची , लिंबाचा रस तीन चमचे, मीठ चवीपुरते. मस्त पुष्ट पुंड्या उसाच्या साधारण अर्धा इंच आकाराच्या गंडेर्‍या करून घ्याव्या, त्या मिठाच्या पाण्यात तासभर भिजत घालाव्या, तेल तापवून त्यात मोहोरी हळद आणि मिर्चीची फोडणी तयार करावी. उसाच्या गंडेर्‍या कढईत गरम कराव्या. त्याला कढईतच वरील फोडणी द्यावी, लिम्बाचा रस टाकून पाच ते दहा मिनिटे कढईत गंडेर्‍या हलवाव्या . हलवले नाही तर गंडेर्‍या खाली लागण्याचा संभव असतो . फोडणीच्या गंडेर्‍या गरम असतानाच खायला द्याव्यात. टीपः लिम्बाचा रस न मिळाल्यास चिंचेचे पाणीही चालेल. पण चिंचेचे पाणी वापरल्यास मिठाच्या पाण्यात भिजवण्याऐवजी शेंदेलोण वरुन टाकावे. सावधगिरीची सूचना : गंडेर्‍या सामान्यतः ऊस खातो त्या पद्धतीनेच खाव्यात. गिळण्याचा प्रयत्न करु नये.

वाचने 5004
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

नको .. हात फार चिकट होतात उसामुळे !! उस आपला आहे तसाच सालं काढून खावा किंवा उसाचा रस सरळ रसवंती गॄहात जाउन प्यावा !! कोणी सांगितलेत नसते प्रयोग करायला ? का हो विजुभौ .. सहमत ना ? :) - टारझन उसंगावकर

विजुभाऊ, भन्नाट पाककृती !! ही कल्पना कोणाची?? - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

पाककृती माझीच आहे. त्याची प्र॑थम परीक्षणेही माझ्यावरच झालेली आहेत :)

In reply to by विजुभाऊ

हो का ? :) भेटा ह्या वेळी .. तुम्हाला शिजवलेले पाणी देतो प्राशणास :) - (पाणी तळून शिजवणारा) शेफ टारझन

ऊस आणि त्याची काकवी पण मस्त लागत. माझी अन मित्राची ऊस खाण्याची स्पर्धा लागायची. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

या चर्चेवरुन आठवले संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातही एकदा एक उस फेकून मारणार्‍या देवतेचे चित्र लावले होते

In reply to by विजुभाऊ

देवीला देवता म्हणून लिंगबदल करणार्‍या विजुभौंचा कडकडीत शब्दांत घनघोर निशेध करण्यात येत आहे -(णिशेधप्रेमी) टार्‍या

टारुल्ला ओमर जी ..... देवी ही मुळात देवताच असते. मराठीत "ती देवता" आणि "तो देव" असे म्हणतात. अर्थात "तो बाक" , "ती वही" आणि "ते मास्तर" असेही होतेच की

In reply to by विजुभाऊ

जाणून बुजून धार्मिक रंग देणार्‍या आणि धर्मनिरपेक्ष असणार्‍या कबिरवादी टारझनाला "टारूल्ला" करून धर्माचा कडेलोट करणार्‍या विजुभाऊंचा कडकडीत णिशेध करण्यात येतोय - टारझन

विजूभाऊ, लेका तूदेखील अंमळ वेडझवा दिसतोस. अरे ऊस हा गोड पदार्थ आहे. त्याचा चांगला रस प्यायचा सोडून तो फोडणीचा कुठे करायला निघालास? :) तात्या.

ऊस हा गोड पदार्थ आहे. त्याचा चांगला रस प्यायचा सोडून तो फोडणीचा कुठे करायला निघालास? अरे!!!!!!!!! उसाचे कांडके फेकून मारलेले चालते . उसाला फोडणी दिलेली चालात नाही? :( अन्याय अन्याय अन्याय घोर अन्याय