पाककृती

हिरव्या भोपळ्याची भाजी

Primary tabs

'हिरव्या भोपळ्याची भाजी' शी खुप जणांचे वाकडे आहे. बाकी 'हिरव्या' म्हंटलं कि काहींच्या भुवया वर होतात, भोपळा म्हंटलं कि काहिंची तोंडे वाकडी होतात... परंतु भोपळ्याची भाजी हा माझा खुप आवडता प्रकार आहे ...

हि भाजी अशी करावी -
साहित्य :
अर्धा किलो भोपळा
दोन मध्यम हिरव्या मिरच्या (जास्त तिखट पाहीजे असल्यास अजून एक)
कोथिंबीर
मेथ्या (मेथिच्या बिया)
आले (अर्धा चमचा)
दोन मोठ्या पाकळ्या लसून
अर्धी वाटी सुके खोबरे
चवीपुरते मोहरी, हळद, मिठ, गूळ
दोन चमचे तेल

प्रथम कोथिंबीर व मिरच्या धुवुन घ्या. मग मेथ्या, आले, लसून, मिरच्या, कोथिंबीर आणी खोबरे एकत्र वाटून घ्या (मिक्सर मधे बारीक करून घ्या - कमीत कमी पाणि वापरून ). त्यानंतर भोपळाची साल काढून बारीक चौकोनी तुकडे करून ठेवा.

खोलगट भांड्यात तेल गरम करून मोहरी तड्तडून घ्या. त्यात वाटण एक मिनीट परता. त्यानंतर भोपळ्याचे तुकडे आणि हळद टाकून बंद झाकणावर शिजवून घ्या (साधारण ३ मिनीटे) थोडे पाणि टाकून, गुळ व मीठ टाकून भाजी हलवून घ्या. झाकण लावून मंद आचेवर अजून ५ मिनीटे शिजवा. चमचमीत भोपळा पटकन तयार...
BhopaLa BhajI

खुप सुंदर लागते एकदा करून बघाच !

लवंगी

मस्त दिसतेय. हिरवा भोपळा कुठे मिळतो?

बहुगुणी

छान हिरवा रंग आलाय! पाककृती आणि फोटो मस्त! धन्यवाद.

अडाणि

बराच वेळ मला नाव आठ्वत नव्हते. दुधी भोपळाच आहे तो. नेहमीची भाजी डाळ घालून करतात, हि वाटण घालून आहे..

-
अफाट जगातील एक अडाणि.

सहज

आमच्या घरात दुधी भोपळ्याचा फक्त हलवाच होईल असे संगनमताने ठरले आहे. :-)

असो भाजी मस्त दिसते आहे, दुधी भोपळ्याने डोके शांत होते म्हणतात. :-)

विसोबा खेचर

हम्म! भोपळ्याची भाजी!

म्हणजे आम्ही बाद..:)

आपला,
(भोपळा मुळीच न आवडणारा) तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

मी ह्या भाजीत पावभाजीचा मसाला घालते ;) ..त्यामुळे सगळ्याना जाम आवड्ते.

चुचु

प्राजु

आमच्याकडे दूधीची कोफ्ताकरीच होते किंवा हलवा.
अशी भाजी जरा कमीच होते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय

पुढच्या वेळी दुधी आणला की करून बघतो.