Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रौशनी.. ३

व
विसोबा खेचर
Sat, 09/22/2007 - 10:46
💬 38 प्रतिसाद

Book traversal links for रौशनी.. ३

  • ‹ रौशनी.. २
  • Up
  • रौशनी.. ४ ›

प्रतिक्रिया द्या
50272 वाचन

💬 प्रतिसाद (38)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/22/2007 - 11:00 नवीन
तात्या, रौशनी भाग -१, आणि २ ह्यातलं प्रामाणिक प्रकटन जसं मनाला भावलं तसच ह्या तिसर्‍या भागातलंही. आम्ही वाचतो आहोत. लवकरंच पुढे चौथा भागही येऊ द्यात. वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्‍या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं! ह्यात थोडं फेरफार करून, सिलिकॉन व्हॅलीतील १०/१५ आय टी इंजिनियर्सचा बॉस होणे, त्यांना सांभाळणे, व्हीपी, कस्टमर्स, एच आर ह्यांच्याशी नेहमी संबंध असणारी मुले ही. यांना साधं गरीब असून चालणारंच नव्हतं! असं वाचलं. काही चूक असेल, तर सांगा. - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/22/2007 - 11:12 नवीन
ह्यात थोडं फेरफार करून, सिलिकॉन व्हॅलीतील १०/१५ आय टी इंजिनियर्सचा बॉस होणे, त्यांना सांभाळणे, व्हीपी, कस्टमर्स, एच आर ह्यांच्याशी नेहमी संबंध असणारी मुले ही. यांना साधं गरीब असून चालणारंच नव्हतं! असं वाचलं. काही चूक असेल, तर सांगा. नाही रे बाबा! यात काहीच चूक नाही.. आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/22/2007 - 11:53 नवीन
आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :)) हहपुवा प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केशवसुमार Sat, 09/22/2007 - 12:40 नवीन
आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :)) आम्ही आमच्या रिसोर्स मानेजरला 'आन्टी' म्हणायचो.. आणि बॉडीशॉपिंगला 'देहविक्री'... प्रोजेक्ट असाईनमेंटला 'जा उसके साठ बैठ'...त्याची आठवण झाली.. तात्याशेठ, आहो जरा मोठ्ठे भाग लिहा.. उगाच त्या मराठी मालिकां सारख्या लांबवू नका.. उत्सुक्ता वाढली आहे ..पुढचा भाग लवकर येऊद्या.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/24/2007 - 01:05 नवीन
पर्सिस्टंट काय रे केशवा ? का इन्फोसिस ?? - (आण्टी) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ल
लिखाळ Sat, 09/22/2007 - 16:14 नवीन
आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :)) ह ह पु वा :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/22/2007 - 11:04 नवीन
तात्या, खुप चांगले वर्णन, समोर प्रसंगच उभा राहतो. मनाल कुबड आलेल्या १८ वर्षावरील व्यक्तींनी नाही वाचले तरी चालेल. असे डिस्क्लेमर मधील अदृष्य ओळी मी वाचल्या. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/22/2007 - 11:17 नवीन
वा तात्या ... मस्तच, पुढील भाग कधी ? राजे (*हेच राज जैन आहेत) Image removed.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 09/22/2007 - 11:23 नवीन
तात्या, हा भागही आवडला. मिलिंदरावांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटन प्रामाणिक आणि ओघवत्या शैलीत झाले आहे. पुढच्या भागाची वाट पाहतोय. [अवांतर -- मिलिंदरावांच्या प्रतिक्रियेवरुन हेराफेरीमधला असरानीचा "पता है, आप जैसे लोगोंकोभी अभी इज्जतसे मॅनेजर बुलाना पडता आहे." हा सीन आठवला. अर्थात, जगात विकणारे आणि विकत घेणारे असे दोनच वर्ग असल्याने हे साम्य तितकेसे अनपेक्षित वाटू नये. :)] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/22/2007 - 11:23 नवीन
पता है, आप जैसे लोगोंको भी इज्जतसे मॅनेजर बुलाना पडता आहे. नंदनराव, आम्हीही आता "डार्क साईड" ला, बरं का ? तेव्हा जरा सांभाळून ;-) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आजानुकर्ण Sat, 09/22/2007 - 11:28 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रियाली Sat, 09/22/2007 - 12:56 नवीन
तात्या, हा भागही आवडला. मिलिंदरावांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटन प्रामाणिक आणि ओघवत्या शैलीत झाले आहे. पुढच्या भागाची वाट पाहतोय. अवांतरसह हेच..फक्त पाहते आहे असे वाचावे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/22/2007 - 14:04 नवीन
तात्या, हा भागही आवडला. मिलिंदरावांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटन प्रामाणिक आणि ओघवत्या शैलीत झाले आहे. पुढच्या भागाची वाट पाहतोय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 09/22/2007 - 13:51 नवीन
>>सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! :) बाकी एकदम खास तात्या शैली भाग ३ मधेही आबाधीत आहे. खूप दिवस वाट बघायला लावलीत भाग ३ साठी आता भाग ४ जरा लौकर येऊ देत.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 09/22/2007 - 16:16 नवीन
वा छान. तात्या, हा भागही आवडला. वर मिलिंदरावांनी दिलेल्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. पुढचा भाग वाचायला उत्सुक. जरा लवकर टाका. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Mon, 09/24/2007 - 18:54 नवीन
..म्हणतो.. मस्त लेखन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ध
धनंजय Sat, 09/22/2007 - 18:52 नवीन
छान चालू आहे. कृष्णाचे नवे पात्र उंबरठ्यावर आणून "क्रमशः" लिहिलेत. आता फार ताटकळत ठेवू नका - येऊ द्या! अवांतर - अजूनतरी अश्लील काहीच दिसले नाही. म्हटलेच तर प्रतिसादांतल्या सि.व्हॅ.मधल्या मावसोबांबद्दल लहान मुलामुलींनी वाचू नये. पण संदर्भ नीट समजावून सांगून मम्मीपप्पा कोवळ्या मनावरील दुष्परिणाम टाळू शकतिल.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 09/22/2007 - 21:35 नवीन
'तिकडचा' माहोल अगदी परिणामकारकपणे उठवलाय तात्या. पांढरपेशा मध्यमवर्गीय माणसाची त्या वातावरणात होणारी पंचाईत समजण्यासारखी; आणि ती हुबेहूब चितारली आहे. आपल्या निरीक्षणाला आणि व्यक्तीचित्रणाला दाद देतो.
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/25/2007 - 05:06 नवीन
> 'तिकडचा' माहोल अगदी परिणामकारकपणे उठवलाय तात्या. पांढरपेशा मध्यमवर्गीय माणसाची त्या वातावरणात होणारी पंचाईत > समजण्यासारखी; आणि ती हुबेहूब चितारली आहे. आपला अनुभव? पण तात्यांची शैली आवडली. भाग १ आणि २ वाचले नाहीत अजून, वाचेन म्हणतो, पण तेही परिणामकारक आणि इंटरेष्टिंग असतील, याबद्दल खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
व
विसोबा खेचर Tue, 09/25/2007 - 05:19 नवीन
>>पण तात्यांची शैली आवडली. टग्यारावांसारख्या चोखंदळ रसिकाला आमची शैली आवडली हे वाचून धन्य झालो! आज बुधवार नाहीये त्यामुळे आज काही जमणार नाही, परंतु उद्या या आनंदाप्रित्यर्थ ब्लॅक डॉगचा अर्धा पेग जास्त पिईन! :) धन्यवाद टग्याराव.. पहिले दोन भागही सवडीने वाचा ही इनंती! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
च
चित्रा Sun, 09/23/2007 - 01:08 नवीन
रौशनीच्या पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे. तुमचे अनुभव ज्या "रेंज" (मराठीतला शब्द आठवत नाही) मधले आहेत ते विस्मयकारक आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/24/2007 - 00:19 नवीन
रेंजला प्रतिशब्द म्हणून संदर्भाप्रमाणे आवाका/कक्षा/(अनुभवांचा) परीघ/पल्ला हे शब्द चालू शकतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
र
राजीव अनंत भिडे Sun, 09/23/2007 - 06:43 नवीन
साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्‍याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्‍या असतात असा माझा समज होता! वास्तववादी वर्णन! ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. 'च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला! यातला प्रांजळपण आवडला! संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या. खरं आहे. तुम्हाआम्हा पांढरपेशा समाजाला कल्पनाही करता येणार नाही अश्या अनेक गोष्टी याच जगात इतरत्र घडत असतात! तात्या, रौशनीची वाटचाल उत्तम सुरू आहे. पुढचा भाग टाक बाबा लवकर! अवांतर: तुमचे अनुभव ज्या "रेंज" (मराठीतला शब्द आठवत नाही) मधले आहेत ते विस्मयकारक आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्या. चित्रांप्रमाणे मीही हेच म्हणेन. एकच माणूस शेयर बाजार, संगीत, व्यक्तिचित्रं, मध्येच कुठल्याकुठल्या स्पर्धा, इत्यादी विविध विषयावर लिहितो ही तात्याची व्हर्सटॅलिटी वाखाणण्यासारखी आहे. जवळचा मित्र म्हणून तात्याशी बर्‍याचदा प्रत्यक्ष भेट होत असते तेव्हा ही व्हर्सटॅलिटी अनुभवायलाही मिळते. एकिकडे रौशनीसारखं वास्तववादी व्यक्तिचित्र रंगवणारा माणूस गीतमेघदूतातल्या संगीतावरही लिहू शकतो, बसंतचं लग्नही लिहू शकतो हे आंतरजालावर मला तरी कुठेच पाहायला मिळालं नाही. एकिकडे काही विघ्नसंतोषी लोक मिसळपावला खोडा घालू पाहात आहेत. तात्याने तिकडे लक्ष न देता लेखन सुरू ठेवावे असे वाटते. लोकांची साथ मिळाली (आणि ती मिळेल अशी खात्री आहे!) तर उत्तमच आहे पण हा माणूस एक हाती हे संकेतस्थळ पुढे घेऊन जाऊ शकतो असे वाटते! (तात्याचा मित्र) राजीव अनंत भिडे.
  • Log in or register to post comments
र
राजीव अनंत भिडे Sun, 09/23/2007 - 06:52 नवीन
सुरवात करून नंतर गायब व्हायचं, लेखन अर्धवट सोडायचं, हा तात्यामधील एक मोठा दोष आहे. सालस अशीच अर्धवट राहिली, शिंत्रेगुरुजींचीही वाट लागली! रौशनीच्या बाबतीत असं होऊ नये एवढंच वाटतं! राजीव अनंत भिडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजीव अनंत भिडे
स
सहज Sun, 09/23/2007 - 07:06 नवीन
तात्याला भांडणात कमी अडकवल गेल तर तात्या जुन्या राहिलेल्या कामांचा पसारा निपटेलच. पण अजून नवनवीन कार्ये करेल. काय खर की नाय तात्या? :-) पण काय जाणो की भांडणातून तात्याला एक अशी ऊर्जा / उर्मी (इंग्रजी "हाय") मिळत असेल की ज्या मूळे तात्या एवढा हरहुन्नरी झाला आहे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजीव अनंत भिडे
ग
गुंडोपंत Sun, 09/23/2007 - 12:12 नवीन
लोकांची साथ मिळाली (आणि ती मिळेल अशी खात्री आहे!) तर उत्तमच आहे पण हा माणूस एक हाती हे संकेतस्थळ पुढे घेऊन जाऊ शकतो असे वाटते! अरे भिडे साहेब, क्या बात कही! वा एकट्यानेही काही करून दाखवण्याची; तात्यांची तेव्हढी ताकद तर नक्कीच आहे... पण कुणी साथ सोडेल असे वाटते का तुम्हाला? जे सोडून जात आहेत ते कधी होते बरोबर? ते त्यासाठीच आले होते हो! त्यांना विसरून ही वाटचाल पुढे आपण सगळे मिळून सुरु ठेवणार आहोत. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजीव अनंत भिडे
प
प्रमोद देव Sun, 09/23/2007 - 07:03 नवीन
तात्याचे निरीक्षण जबरी आहे पण ते शब्दात मांडणे त्याहूनही जबरी आहे.(जय भाईकाका) तात्या पुढील भाग लवकर येऊ देत. तात्या हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे ह्यात दुमत नाही. हे संकेतस्थळ तो एकहाती चालवू आणि नावारुपाला आणू शकेल ह्याबद्दलही मनात संदेह नाही. मात्र एक गोष्ट आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्यात आणि आपल्याला होणारा आनंद इतरांना वाटण्यात जो एक वेगळाच आनंद आहे तो इतर कशातच नाही.म्हणून तात्याने आता जरा जबाबदारीने वागायला हवेय.वेळप्रसंगी समजूतीने घ्यायला हवेय. आम्ही सगळे त्याच्या बरोबर आहोतच. पण मालक-चालक म्हणून त्याची जबाबदारी सांभाळताना उदारमतवादी असावे इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/23/2007 - 16:59 नवीन
पण मालक-चालक म्हणून त्याची जबाबदारी सांभाळताना उदारमतवादी असावे इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो. हेच तर अवघड असतं. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्राजु Mon, 09/24/2007 - 00:47 नवीन
तात्या.. जागी खिळवून ठेवणारी कथा आहे ही. .. लवकर लिहा पुढचा भाग. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/24/2007 - 09:31 नवीन
असेच अगदी वरील सर्व प्रतिक्रियांसारखेच.. अतिशय प्रभावी चित्रण केले आहेस, फक्त ते पुढचे भाग जरा लवकर लवकर टाक आणि वर कोणी म्हटल्याप्रमाणे आधीची काही प्रोजेक्ट्स पण लवकर पुरी कर बाबा,टांगत ठेवू नकोस,:)) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/24/2007 - 10:11 नवीन
सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार... रौशनीचा मला आलेला अनुभव शब्दात मांडणं मलाही थोडं कठीणच जात आहे. वास्तविक ती एक सत्यघटना असल्यामुळे जशी घडली तशी भराभर पुढे लिहिणं मला सहज शक्य आहे. परंतु रौशनीच्या बाबतीत आणि एकूणच त्या माहोलच्या बाबतीत काही लिहायला घेतलं की रौशनीच्या कथेसोबतच त्या त्या वेळेला मनात आलेले विचारही आपसुकच कागदावर उतरतात. काही वेळेला डोकं सुन्न होऊन थकायलाही होतं आणि लिहिणं थांबवायला लागतं! थोडा ब्रेक घ्यावा लागतो.. त्या माहोलमधल्या काही काही गोष्टी तर इतक्या भयानक आहेत की त्या इथे लिहिणं टाळलं आहे. असो, पुढचा भागही थोडाफार लिहून पूर्ण आहे. लवकरच पूर्ण करून इथे टाकतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 09/24/2007 - 11:34 नवीन
तात्या, तिथला माहौल चांगला जिवंत केला आहेस. रंगतदार, मस्त, बेष्ट.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Tue, 09/25/2007 - 15:49 नवीन
तात्या,हा भाग वाचला. प्रामाणिक वर्णन आवडले. काही वाक्ये पचवणे जड गेले पण विषय ,कथा प्रसंगानुरुप तुम्ही वर्णन करतांना अतिशयोक्ती केली नाही... म्हणून ती वाक्ये योग्य वाटली. तुम्ही केवळ स्त्रीचे वर्णन करता आहात म्हणून हा प्रतिसाद नाही, यात पुरुषाचे असे वर्णन असते तरी प्रतिक्रीया सेम राहिली असती. पुढील भाग लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 12/16/2008 - 09:03 नवीन
तात्या तुम्ही केलेले वर्णन खूप छान आहे. सध्या तरी ३ रा भाग वाचला आहे. पण कथा खूप सु॑दर आहे. मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/16/2008 - 11:37 नवीन
पण कथा खूप सु॑दर आहे. ही कथा नसून सत्यघटना आहे.. असो, आपला, (रौशनीचा मित्र) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनम
अ
अनंत छंदी Tue, 12/16/2008 - 11:34 नवीन
तात्या, रोशनीचा पाचवा भाग आल्याला आता बरेच दिवस झाले. ती कथा वाचली की हुरहुर लागून राहते. असं किती दिवस आम्हाला अस्वस्थ ठेवणार? पुढचा भाग लिहा ना!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/16/2008 - 11:43 नवीन
तात्या, रोशनीचा पाचवा भाग आल्याला आता बरेच दिवस झाले. ती कथा वाचली की हुरहुर लागून राहते. असं किती दिवस आम्हाला अस्वस्थ ठेवणार? पुढचा भाग लिहा ना!
तो भाग दिवाळीत येणार आहे ... ११ महिने थांबा छंदी साहेब .. -(रोशनी-६ ची वाट पहाणारा) टारझन (आता पळतो.. नाय तर तात्या जोडे हाणेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
व
विसोबा खेचर Tue, 12/16/2008 - 11:47 नवीन
अहो सध्या खरोखरंच सवड नाही, परंतु लौकरच लिहीन.. इन फॅक्ट बरचसं लिहून तयारही आहे... असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा