Skip to main content

अरुणोदय झाला!

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 11/03/2008 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यभूमीत डोंगराआड उगवणार्‍या सूर्याने दिलेले दर्शन :) ही वाट दूर जाते... माझिया पाषाणहृदयी वेदनेचे झाड आहे. सूर्यकिरण सोनेरी हे... तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही... झाडाआडून कोण पाहतो? तेजोमय सूर्य उगवला ,प्रकाश पडला, आडवा डोंगर... पानांच्या कुशीत... सोनेरी मुशीत... आलाय खुशीत.. नारायण! उत्तिष्ठोऽत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरूडध्वज । उत्तिष्ठ कमलाकान्त, त्रैलोक्यम् मंगलम् कुरू ॥ त्या तरूतळी... रानफुला...

वाचने 11153
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

खूपच छान छायाचित्रे. अनेक दिवसांपासून सूर्योदय बघण्याचे मनात होते. पण आज योग आला. सकाळी खूपच लवकर होतो म्हणतात.. (शेवटच्या चित्रातील फुलांचे नाव कुणाला आठवते का ? ह्या झाडाला पांढरा चीक असतो, आणि तो डोळ्याला अपायकारक असतो असे ऐकले आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मारुतीला रुईची पाने वाहातात. याच्या फळांत रुईसारखा कापूस असतो. फोटो मस्तच. काही चित्रांत सूर्याभोवती खालच्या बाजूला कडे आहे... कॅमेर्‍यामुळे?

जबरदस्त! मन प्रसन्न जाहले... अवांतर: ही प्रकाशचित्रे लॉ कॉलेजमागच्या हनूमान टेकडीवरुन घेतली आहेत काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

तसा प्रत्यक्ष सुर्योदय पहाण्याचा फारच कमी वेळा योग आला आहे ;) .. तुमच्या ह्या चित्रमालेने एक प्रसन्न सुर्योदय पहायला मिळाला! धन्यवाद!!

चित्रे मस्तच आहेत. हा परिसर वेताळ टेकडी आणि ए.आर्.ए.आय. चा आहे का? पुण्याचे पेशवे

चित्रे मस्तच आहेत. हा परिसर वेताळ टेकडी आणि ए.आर्.ए.आय. चा आहे का? पुण्याचे पेशवे

अप्रतिम चित्र.... एका झुडुपा मागे... खूपच सुंदर.. मानलं तुम्हाला... - (सर्वव्यापी)प्राजु

ही टेकडी वानवडी आणि महंमदवाडी च्या मध्ये आहे. ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असल्याने सद्ध्या तरी हे सुख अनुभवता येते. माझे घर इथून १० मि. वर असल्याने मनात येईल आणि वेळ मिळेल तसे मी कधीही इथे भटकायला जातो.

छायाचित्रे तर सुंदर आहेतच पण गाण्यांची निवडही आवडली. रुईची झाडे सध्या शहरात एवढ्या सहज दिसत नाहीत. मला तर या भारत भेटीत अगदी दूर जिथे वस्ती नाही तिथे एखादे रुईचे झाड दिसले असेल. बाकी या झाडाशी निगडीत सगळया आठवणी लहानपणच्या आहेत. सोनाली

सर्वच चित्रे सुंदर आहेत्,रुई च्या झाडाचे चित्र तर फार आवडले. या झाडाचा कापुस जेव्हा आकाशात उंच उडतो तेव्हा तेही पहायला मजा वाटते. ( ॐ सुर्यय नमः ) मदनबाण