तद्दन भंपकपणा..
Primary tabs
मला(देखील) येत असलेल्या असंख्य इ-पत्रामधलं हे एक.
तद्दन भंपकपणा कसा असावा :-)))
----------------------------------------------------------------------------------------------------------
१. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?
२. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का?
४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का?
नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का?
५.(दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------
प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तर- ग्लास काळा होईल.
मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात
मिपाच्या धोरणानुसार व या निवेदनानुसार सदर लेखन हे येथून कधीही काढून टाकले जाऊ शकते याची संबंधितांनी नोंद घ्यावी!
--जनरल डायर.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात
:)))))) ....
घ्या विजुभाउ आता बोला, तुम्ही म्हणत होता ना इंग्रजीचे हिंदीकरण (तक्नीक वैगेरे), बघा आम्ही हिंदीचे मराठीकरण कसे करतो ते !
हे बघ आणखी उदाहरणे
भात मे खडा क्युं है? ( खडा= कंकर)
हमारे यहां नवरा मुलगा नवरी मुलगी को घास खिलाता है ( घास? हिन्दीत घास म्हणजे गवत)
अरे हो गुजराती मधे एक मस्त शब्द आहे तो मराठीमधे पण आहे.
"नवरा" या गुजराती शब्दाचा अर्थ मराठी मध्ये "रिकाम टेकडा " नवरी "= "रिकामटेकडी"
"नवरा" चे उलट केले तर "रावन"(रावण) असे होते. हाय की नय झक्कास शब्द
माझ्या डोक्यात पण अशीच अचाट उत्तरे येत.
ही हा हा
वाळुमधुन चालण्यास त्रास का होतो?
बुटामध्ये वाळु जाते म्हणुन
चुंबकीय प्रवर्तनचे उपयोग काय?
खोट्या पावल्या , अधेल्या ओळखण्यासाठी.
अभय
कारणे द्या-
वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.
कारण त्यांना ते स्वस्त पडते.
हे मी स्वतः एका उत्तर पत्रिकेत वाचले आहे.
मिपावर आता पुढे ढकललेल्या इपत्रातले इतके तद्दन भिकार साहित्य येऊ लागले आहे, ही वेळ मिपावर यावी, हे पाहून मला मिपाकर म्हणून शरम वाटते!
बाकी चालू द्या!
तात्या,
मी हे सहज, गंमत म्हणून इथे दिलं होतं.
चार भंपक विनोद २ सेकंदाकरिता का होईना, गालातल्या गालात का होईना हसवून गेले. इतरांनाही थोडंस तसंच हसवावं असा शुध्द हेतू होता त्यात.
असो, योग्य वाटत नसल्यास हा धागा उडवून लावावा, ही विनंती.
रात्री झाडाखाली झोपू नये....... कारणे द्या. असा एक प्रश्न नियमितपणे विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत असे.
त्यावर माझे ठरलेले उत्तर होते.....
कारण रात्री झाडांवर भूते असतात आणि खाली साप वगैरे सारखे सरपटणारे प्राणी असतात. ह्यांच्यापासून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये.
इतके खरे उत्तर लिहूनही प्रत्येक वेळी मला ह्या उत्तरासाठी "भोपळा" मिळत असे. त्यावेळी वाटायचे "एकदा तरी त्या शिक्षकांना रात्रीचे झाडाखाली झोपायला लावले पाहिजे होते. म्हणजे कळले असते!"
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मी एक इ-पत्रातला मजकूर काय टाकला, इथे तर चढाओढच लागली की !!!!
लै भारी :-))))
फुस्स्स्स !!! पुन्हा एकदा माझी कॉफी, स्क्रीनवर !!
हे मी खरोखर एकदा म्हणालो होतो अभयभाऊ. भयानक..जळजळीत वगैरे वास्तव.
अरे हे काय आहे काय? जबरा लॉजीक ! आपणतर फ्लॅटच झालो.
स्वातीताई, मार्क किती पैकीच्या पैकी दिलेस ना ?
पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात??
खरे आहे
प्रकाटाआ
काही प्रश्न?
१) शोलेतल्या ठाकुर चे दात कोण घासते?
२) जर कंसाला माहीत होते की देवकी आणि वसुदेवाचा आठवा पुत्र त्याचा नाश करणार आहे तर त्याने त्या दोघाना कोठडीत एकत्र का
ठेवले?
३) रावण लहान पणी कानगोष्टी कसा खेळत असेल.
हे प्रश्न विचारून मी मोठ्याना उत्तर येत नसलेले "प्रश्न विचारु नयेत " हा धडा लहानपणीच शिकलो आहे
शोलेतल्या ठाकुर चे दात कोण घासते?
फक्त दातच????
पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?
याला वपुंनी एक चांगले उत्तर दिले आहे
माणसापेक्षा पशु-पक्षी जास्त श्रेष्ठ आहेत, कारण ते इन्स्टिंक्ट वर जगतात. उगाच भयानक वजन वाढलय म्हणून घारीला उडता येईना किंवा मासा बुडुन मेलेलं कधी ऐकलं आहे का?
बिचारा रामलाल.
शिकार आणि पोकळ्वाडीचे चमत्कार्रचा म्होरला भाग कधी येतोय तुम्ही आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या
पुढला भाग ?