पाककृती
मेतकुट भात
Primary tabs
मेतकुट भात न आवडणारे फारच कमी लोक भेटतील. मेतकुट भात हा माझा वीक पॉइंट...
मी जरा वेगळ्या प्रकारे करुन खातो.
एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा. त्यात ३ ते ४ चमचे मेतकुट व ३ चमचे तुप घालावे. भांडे मंद आचेवर ठेवावे. त्यात अर्धा कप पाणी घालावे. हे सगळे मिश्रण नीट एकत्र करावे. भात गरम व चांगला गुरगुटा होऊन द्यावा. असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम..
शेखर.
असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम..
खल्लास!
आपला,
(सहमत) तात्या.
सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!!
खरे तर आम्ही त्याला गुरगुटा भात किंवा आटवल म्हणतो.
खूप पाणी घालून चुलीवर/ गॅसवर भात करायचा. शक्यतो वासाचा बारीक तांदुळ वापरायचा.
व्वा काय मस्त चविष्ट आठवण!
सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!!
मानलं बुवा तुमच्या आवडीला, तुम्ही तर अगदी काळजालाच हात घातलात..
पण मी एकच म्हणेन उडदाच्या पापडापेक्षा पेणचे तिखटजाळ पोह्याचे पापड
म्हणजे अगदी मर्माघातच. ब्रह्मानंदीच टाळी लागते...
एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा
माणसाचा भात कसा काय करतात बॉ....:)
पक्या
आपला सवाल लई आवडला.
"एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा" म्हणजे एका माणसाला पुरेसा. :)
पुण्याचे पेशवे
अहो ,
आटवल आणि मेतकूट काय भारी लागते म्हणून सांगू. आणि जर का ते तुम्ही केळीच्या पानावर खाल्लत तर अजूनच मजा येते.
पुण्याचे पेशवे
असा वासाच्या तांदळाचा मऊ भात, त्यावर तूप, मेतकूट किंवा लिंबाचे गोडाचे/तिखट लोणचे...
सोबत भाजलेली सालपापडी...
- प्राजु
बारीक तांदळाच्या भातात ताक घालून मेतकूट घालून तुपात जिर्याची फोडणी, मिरचीचे तुकडे , मीठ घालून बुडबुडे फुटून आवाज येईपर्यंत गरम करायचे. खमंग लागते.
चित्रा
मेतकुटाची पाकृ कोणी द्याल काय?
माझी आजी, 'मम्मी'ची आई :-) काय छान करायची !! पण आता ती थकली बिचारी आणि तिच्या मुलींना काही 'तसे' जमत नाही बुवा!! कदाचित नातवंडांसाठी करताना जरा जास्तच मन लावून करतात वाटतं ह्या आज्या ! आणि मला वाटतं कोकणातल्या वस्तुंची चवच वेगळी असते.
एनिवे, पण म्हणून काय आम्ही आता मेतकूट करूच नये की काय?
मग सांगताय ना मला पाकृ?
मेतकुट कसे बनवतात?
सोबत टकू असेल तर उत्तम!
मेतकुट कसे बनवतात?
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
आपल्या बाळाला गुरगुट्या मेतकुट भात भरवता येणं यासारखं सुख नाही :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
मस्तच!
मेतकूट भात म्हणजे काही बोलायलाच नको!
मी इथे जी कृती देतीये ती माझ्याकडच्या 'स्वयंपाक' या पुस्तकातील आहे. श्रेय लेखिका सौ. सिंधूताई साठे यांना द्यावे.
४ वाट्या हरभरा डाळ, १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी उडीद डाळ, २ टेस्पू धने, १ टेस्पू जिरे, ५ ते ६ लवंगा, ८ ते १० साधे वेलदोडे, एक जायफळ, सुंठीची २ कुडी, १ टीस्पू. लाल तिखट, अर्धा टिस्पू हळद, तेवढाच हिंग, १ टिस्पू मोहरी.
फक्त डाळी व तांदूळ बदामी रंगावर खमंग भाजून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून दळून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
माझा मुलगा लहान असताना मेतकूट मी घरी करत असे. त्याला गुरगुट्या भात मेतकूट घालून फार आवडत असे........आताही आवडतोच! सध्या विकतचे मेतकूट वापरते, ते संपले कि घरीच करीन.
रेवती
च्यायला , घरून आणलेलं मेतकूट संपलय...सध्या वांदे चालू आहेत...
असो, मेतकूट दह्यात कालवून गरम गरम पोळी सोबत खायलाही मजा येते..
त्यात चिरलेला कांदा आणि वरून तुपाची फोडणी.......... अहाहा..... तोंडाला पाणी सुटले ब्वॉ........ <:P
मेतकुट करायची कृती दिल्याबद्दल धन्यवाद !
करून बघायला हवे.
मीली