Skip to main content

तुम्ही नियमितपणे कोणते मराठी वर्तमानपत्र वाचता?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 15/06/2010 13:44 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 3463
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

आकडेमोडी विषयी महत्वाची माहिती येते. इंटरनेट प्रेम्या, अजुन एक माहिती मला दे,इंग्रजी वर्तमान प्रत्राच्या रद्दी ला ज्यादा भाव येतो. त्याचे कारण काय? वेताळ

तुम्हाला इंटरनेट प्रेमी नाव बदलून वर्तमानपत्र प्रेमी करायच आहे का ? मला सगळ्या पेपरच्या पुरवण्या आवडतात.

सोमवार ते रविवार----- सकाळ रविवार------लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स. जालावर रोज----महाराष्ट्र टाईम्स, सामना, लोकसत्ता.

जो फुकटात वाचायला मिळतो तो कोणताही. (शेजार्‍यावर अवलंबुन आहे बेण नेहमी वेगवेगळा ब्रँड घेतं.)

मत सकाळला दिले आहे...पण अनेक पर्याय निवडायची सोय हवी. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

महाराष्ट्र टाईम्स ला एकही मत नाही. मटा बहुतेक लोक वाचत नसावेत, बघत असावेत. ;) ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

सनातन प्रभात! =)) अवांतर: कौल घेण्यामागचा हेतु हेतु कौलासोबत विषद करावा असा एक प्रघात असतो. उग्गाचच आपण कोणाला प्रश्न विचारत फिरलो तर उत्तरं खात्रीलायक मिळतील ह्याची शाश्वती फारच कमी! ह्यापुर्वी एक सदस्य ऊठसुठ कौलं फोडत बसायचे..पब्लिक इतकं कावलं त्या प्रकाराला की योग्य पुर्वपिठिका नाही दिली तर त्या कौलाचा हेतु चांगला असुनही त्याचं मात्रं होणार हे अगदी नक्की. :)

In reply to by टारझन

+१ हेच म्हणतो कौलाराम चाटणे होता राव तो ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

In reply to by धमाल मुलगा

अगदी अगदी. असेच म्हणतो. काहीतरी शाळेत/कॉलेजातले काम दिलेले दिसते त्या इंटरनेटप्रेमीला. बाबा आता अभ्यास कर. कौलं काढू नको. पानकाळा सुरू झालाय ना. घर गळेल. :-) बाकी मी सगळे पेपर हाताळतो. म्हणजे ठळक ठळक मथळे वाचतो. डोक्याला शॉट लावणार्‍या बातम्या अन पाकिस्थानी बातम्या जाणीवपुर्वक टाळतो. बाकी कोणते वर्तमानपत्र कसे आहे, त्यातील बातम्या यावर मला पीएच्च्डी करायची इच्छा आहे. काय काय बातम्या छापतात एक एक. बातमीमुल्य कमी मनोरंजन मुल्य जास्त. आजकाल हैद्राबाद, कराची, लाहोर हे गावे भारतात असल्यासारख्या डिटेल्ड बातम्या येतात.रोज एकदोन तरी दोन कॉलमी बातम्या असतातच बहूतेक. सगळे पर्याय निवडता येत नाही. वर बदल करावा. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

>>बाबा आता अभ्यास कर. कौलं काढू नको. पानकाळा सुरू झालाय ना. घर गळेल. =)) =)) =)) लै खास...लै खास...

In reply to by पाषाणभेद

आजकाल हैद्राबाद, कराची, लाहोर हे गावे भारतात असल्यासारख्या... पाभे, हैदराबाद अजून तरी भारतातच आहे रे ! :>

In reply to by ज्ञानेश...

पाभे, हैदराबाद अजून तरी भारतातच आहे रे ! ते मिर्झांच्या सानियाचं तसं झाल्यापासून त्यांना हल्ली आठवण करून द्यावी लागत असेल

In reply to by पाषाणभेद

हॅ हॅ हॅ आमाला वाटलं की आमी चुकलोच की काय? आवं हे पगा. हैदराबाद पाकिस्थानात बी हाये. http://maps.google.co.in/maps?hl=en&rlz=1R2GGLL_enIN378&q=pakistan%20ci… http://www.google.co.in/search?hl=en&rlz=1R2GGLL_enIN378&&sa=X&ei=sUwZT… The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

तुमच्या पासुन जरा जपुन राहिले पाहिजे. हा पेपर कुठे आणि कसा ईकत घ्यावा? वेताळ

वर्तमान पत्र मुळी वाचण्यासाठी घेतच नाही. त्या मुळे कोणतं ही चालत ;) मोजणीप्रेमी जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by परिकथेतील राजकुमार

कीती पेप्रं घेतो रे जयपाल इथे मेघवेडा, परा, पुपे .. लाईन लागली ना बसायला... ;) माझी सोय झालीए, कल्जी नको -Nile

आम्ही काली गंगा आणि पोलिस टाईम्स वाचतो. पोलिस टाईम्स हे कवितेला वहिलेले एकमेव वृत्तपत्र आहे. त्यातल्या आम्हाला भावलेल्या काही ओळी: हीच ती कर्नाटकाची बॉर्डर , जिथे केला त्याने मर्डर . म्हैस धुवायला सोडला तिने गाव , ओढ्याच्या काठी साधला त्याने डाव

In reply to by अडगळ

>>पोलिस टाईम्स हे कवितेला वहिलेले एकमेव वृत्तपत्र आहे. अगदी अगदी. ह्ल्ली मटाला पण हे चाळे सुचायला लागलेत. यांची ऑनलाईन आवृत्ती?असेल तर लिंक द्या रे. (रोज शाळेत जाताना बसस्टॉपच्या शेजारच्या पेपर स्टँडवर बसची वाट पहात मान वाकडी / तिरकी करुन पोटाच्या हेडलाईन वाचणारा) - गणा

In reply to by गणपा

पोटा आपला पण एकदम आवडता पेपर आहे. शाळेत असतांना वाचायची सोय नव्हती, आजोळी एकटा जायचो बसने तेव्हा नक्की वाचायचो. अजुनही पुण्याला गेलो की पहिल्यांदा पोटा घेउन येतो. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

नवाकाळ कोणीच वाचत नाही? जुनाकाळ झाला तो. हेडालाइनींचा एकेकाळी तो बादशहा होता.(स्वतःला ते अग्रलेखांचा बादशहा समजायचे). "संजय दत्तसाठी तुरुंगात परदेशी बनावटीचा संडास!" नवाकाळची हेडलाइन होती एकदा. बेळगाव्/कोल्हापूरच्या तरुण भारतच्या हेडलायनी पण वाचनिय असतात्-"कर्नाटक सरकारची हडेलप्पी- मराठीची गळचेपी". "म्हशीची धडक्-स्कूटरस्वार जखमी" "***राव पाटील ह्यांच्यातर्फ शौचालयांचे उद्घाटन!! त्यातल्या त्यात लोकसत्ता बरा वाटतो(कुमार केतकरांचे काँग्रेसची वकीली करणारे अग्रलेख सोडून!!) P = NP

In reply to by चिरोटा

>>त्यातल्या त्यात लोकसत्ता बरा वाटतो(कुमार केतकरांचे काँग्रेसची वकीली करणारे अग्रलेख सोडून!!) == दर सोमवारी लाल किल्ला नावाचे सुनिल चावकेचे सदर असते, ते कधी तरी वाचुन पहा. केतकरकाका, खुप बरे लिहीतात असे वाटेल.

In reply to by महेश हतोळकर

महेश साहेब किती वेदनादायक बातमीची तुम्ही लिंक दिलीत. वाचल्यामुळे माझे मन खुप दु:खी झाले. ;) वेताळ

In reply to by महेश हतोळकर

ही बातमी अनावश्यक आहे असे नाही. पण मटामधील बर्‍याच बातम्या ह्या असल्याच असतात. संपादकीय हे सदर फक्त नावालाच संपादकीय आहे. जास्तीत जास्त प्रौढाच्या बातम्या किंवा तत्सम देणे ह्यातच धन्यता वाटते. सानियाच्या नवर्‍यावरील बंदी उठली, त्याची वातमी छान होती.

In reply to by महेश हतोळकर

हे निबिर्जीकरण काय असते बुवा? त्यांना (मटावाल्यांना) निर्बिजीकरण म्हणायचे असेल का :? :? :? रिक्शावाल्यांच्या चुका पेपरवाले करायला लागले तर रिक्शावाल्यांनी कुठे जावे? :''( मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

मटाला एक मत पडले आहे, मटा वाचणा-याने समोर यावे गुन्हा कबूल करावा !! :B

१.लोकस्त्ता - अग्रलेख.. २.स्थानिक वृत्तपत्र सकाळ बाकी प्रहार भारी असतो ,ई -प्रहार वाचतो अधुन मधुन विनायक पाचलग वाँट टु टॉक

In reply to by विनायक पाचलग

तुझे लेख बर्‍याच वर्तमानपत्रात येतात, त्या पत्रातील तुझे आणि इतरांचे लेख वाचतोस का?

In reply to by II विकास II

वाचतो पण त्यासाठी बर्‍याचदा ही सोय वापरतो http://www.epapergallery.com/index.htm लय भारी आहे बरका... विनायक पाचलग वाँट टु टॉक

In reply to by II विकास II

ते स्वतःला वेगळे समजतात .. जेव्हा सोनिया बाई सांगतील ई पेपर काढा ,त्याच्या दुसर्‍या दिवशी येईल बघा... तोपर्यंत आमच्या पेपर वाल्याला फक्त सकाळी गडबडीत पुणे लोकसत्ता टाकावा लागेल एवढेच .. विनायक पाचलग वाँट टु टॉक

In reply to by विनायक पाचलग

>>तोपर्यंत आमच्या पेपर वाल्याला फक्त सकाळी गडबडीत पुणे लोकसत्ता टाकावा लागेल एवढेच .. विनायक, तुझा व्यासंग दाडंगा आहे. असेच वाचत रहा. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

In reply to by II विकास II

(त्या मानाने) सिनियर आणि ज्युनियर सखाराम गटणेंचा संवाद वाचुन डोळे वाक्कस झाले || वाक्कस ||

In reply to by टारझन

डोळे पाणावले :)
फक्त पाणावले .............. छे छे छे.. मला वाटले ही प्रतिक्रिया वाचल्यावर जो कोल्हापुरात पाऊस सुरु झाला तो आपल्या अश्रुंचाच आहे ...... असो.. पुढच्या वेळी आपल्या अश्रुंचा महापुर येईल असा प्रतिसाद देईन.. धन्स आपलाच मित्र विनायक खविस विनायक पाचलग वाँट टु टॉक

मी जालीय इतिहासा विषयी अनभिज्ञ आहे. कृपया सिनियर आणि ज्युनियर सखाराम गटणेंचा परिचय करुन द्यावा ही नम्र विनंती >:D विनीत जयराम *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

कृपया सिनियर आणि ज्युनियर सखाराम गटणेंचा परिचय करुन द्यावा ही नम्र विनंती विनीत जयराम
>>>>> =)) =)) =)) =)) गांजा छू! चिलिम छू!!!!

अन्य या पर्यायास मत दिले आहे याचे कारण असे कि कोणताही पेपर वाचनीय वाटत नाही. कधीतरी सकाळ वाचते महिना दोन महिन्यांनी एकदा! बातम्या त्याच असतात मंत्रीमंडळातील गोंधळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बलात्कार, खून, फसवाफसवी इ. काहीतरी वेगळं असलच तर मिपावर समजतच कि! नाहीतर नवरा सांगतो. बर्‍याच बातम्या न समजल्याने बरेच वाटते. रेवती

सदर कौलाला मत दिल्याबद्दल व प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वच वाचकांचा मी मनापासुन आभारी आहे. धन्यवाद. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

In reply to by इंटरनेटस्नेही

ओह! व्हॉट्ट रबिश्श!... टाइम्स ऑफ इंडिया' बद्दल कुणी काही बोलतच नाहीये! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

लोकसत्ता ला मत दिले आहे. आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.