Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरा

व
व्यंकट
Fri, 10/05/2007 - 21:07
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14255 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मनिष Fri, 10/05/2007 - 21:14 नवीन
'नीरा' (दीर्घ 'नी') माझ्या माहितीप्रमाणे ताडाच्या/माडाच्या झाडापासून तयार करतात व ताजीच प्यावी असे म्हणतात कारण नीरा नासल्यावर त्याची ताडी बनते. http://knowaboutyourfood.blogspot.com/2007/05/blog-post_1228.html
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 10/05/2007 - 21:16 नवीन
इतरत्रही नीरा मिळते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/05/2007 - 21:41 नवीन
ताडाच्या आणि माडाच्या झाडापासून बनवतात. आणि ती ताजीच प्यायची असते. ताजी असताना प्याल्यास तब्बेतीला अतिशय चांगली असते असे सांगतात. - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/05/2007 - 21:52 नवीन
नीरा ताडाच्या झाडावरून सुर्योदयाच्या आधी काढतात. एकदाका (झाडांवरील त्या फळांवर) सूर्यप्रकश पड्ला की नंतर निघणारा रसा हा त्डी असते.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 10/05/2007 - 21:57 नवीन
..ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते?
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/05/2007 - 22:04 नवीन
.ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते? ताडगोळा. मला वाटते नीरा फक्त ताडाच्या झाडातूुनच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ध
धनंजय Fri, 10/05/2007 - 23:54 नवीन
ताडातून ताडी आणि माडातून माडी नावाचे द्रव पेय मिळते. झाडाच्या फुलोर्‍याचे टोक कापतात, आणि त्यातून स्रवणारा रस मडके लटकवून गोळा करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कोलबेर Fri, 10/05/2007 - 23:56 नवीन
मग निरा म्हणजे ताडी, माडी की दोनीही? झाडाचा फुलोरा म्हणजे काय? माझ्या समजुतीप्रमाणे निरा ही झाडाच्या बुंध्यातून काढतात बहुदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Sat, 10/06/2007 - 00:43 नवीन
इथे माझा गोवेकरपणा आड येत असेल. पुढे ज्याची दारू बनू शकते अशा कुठल्याही गोड द्रवाला गोव्यात निरा म्हणतात. उदा : काजूच्या बोंडांचा निरा, माडाचा निरा, ताडाचा निरा मी ताडाचा निरा काढतानाची प्रक्रिया जवळून बघितलेली नाही, म्हणून माडाचे सांगतो. झाडाच्या बुंध्यातून फुले असलेला एक दांडा बाहेर पडतो, त्यातील प्रत्येक फुलाचा एक-एक नारळ होतो. त्या दांड्याला मी "फुलोरा" म्हटले (चुकला तर सुधारा - इंग्रजीत इन्फ्लोरेसेन्स). सर्व फुलांना तसेच सोडले तर बहुधा सर्व नारळ लहान होतात - कोणास ठाऊक. पण त्या फुलांच्या दांड्याचे टोक कापतात, म्हणजे दांड्याला आणखी फुले फुटणे बंद होते. पण कापलेल्या टोकातून एक द्रव स्रवते, ते लटकवलेल्या मडक्यात जमा करतात, तो माडाचा निरा. त्याची दारू माडी. ताड हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने माडासारखे असते, म्हणून मला वाटते, त्यातूनही असाच निरा काढत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 04:39 नवीन
माडाच्या आणि ताडाच्या झाडात एक 'पोय' नावाचा भाग असतो.त्याचा नेमका अर्थ माहित नाही;पण ती कोवळी असताना कापल्यावर त्यातून स्रवणार्‍या द्रवाला 'नीरा' म्हणतात आणि हीच नीरा आंबली की त्याची ताडी/माडी होते. कोकणात हे काम 'भंडारी' जातीचे लोक करतात. त्यांना 'पोयकापे' असेही विशेषण लोक वापरतात. ह्या लोकांचा दारु(देशी) गाळण्याचा धंदा असतो. ह्यांना 'कलाल' असेही म्हणतात. ही सर्व माहिती ऐकीव आहे. ह्या बाबतीत नेमके सत्य तात्यासारखा अस्सल कोकणीच काही सांगू शकेल. अस्सल मुंबईकर(पुलंच्या व्याख्येप्रमाणे) प्रमोद देव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
व्यंकट Sat, 10/06/2007 - 21:17 नवीन
सगळ्यांचे माहिती पुरवल्याबद्दल आभार! ताडा-माडाच्या झाडांना इंग्लिश मधे काय म्हणतात?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा