Skip to main content

तळलेले मोदक

लेखक प्राजक्ता पवार यांनी रविवार, 12/09/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
सहित्य : मैदा - १/२ वाटी रवा - २ चमचे तेल खोबरा कीस - १ वाटी खडीसाखर वेलची पावडर चारोळी बदाम व काजु पावडर - मैदा व रवा एकत्र करुन त्यात २ चमचे तेलाचे कडकडीत मोहन घाला. त्यात थोडे पाणी घालुन घट्टसर पीठ मळुन घ्या्. पीठ झाकुन अर्धा तास ठेवुन द्या. सारण -खोबरा कीस मंद आचेवर हलकासा भाजुन घ्या. बदाम व काजु पावडर देखील भाजुन घ्या. खडी साखर थोडी कुटुन घ्या. खोबरा कीस , बदाम व काजु पावडर, खडी साखर , वेलची पावडर , चारोळी एकत्र करुन सारण तयार करा. पीठाची पारी लाटुन त्याला मुखर्‍या पाडुन त्यात सारण भरुन त्याला मोदकाचा आकार द्या. तयार झालेले मोदक मंद आचेवर तळुन घ्या. चला मंडळी बाप्पाचा प्रसाद खायला या.

वाचने 6970
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

धन्यवाद! उकडीच्या (किचकट) मोदकाला चांगला (सोपा) पर्याय!

In reply to by सुनील

बनवता येत नाहीत म्हणून उकडीचे मोदक किचकट ??? तळलेले मोदक आम्ही दिवळीत खातो करंजी बरोबर :) आत्ता उकडीचेच मोदक सही वाटतात...

In reply to by कुक

तळलेले मोदक खाताना थोडे चिवट वाटतात, जर फक्त मैदा वापरुन मोदक बनवले तर ते चिवट होतात. त्यासाठी थोड्या दुधात रवा भिजवुन घ्यावा, आणि तो मैद्यात एकत्र करुन पीठ छान मळुन घ्यावे. नंतर हे पीठ थोडा वेळ कुटावे. नंतर त्याची पोळी लाटुन घ्यावी व तिला तुपाचा हात लावावा. त्याची गुंडाळी करुन साधारण बाकरवडी एवढे काप करावे. आणि मग त्याचे मोदक बनवुन घ्यावेत. अवांतरः माझी आई असेच करते मोदक... आणि मला तर कधीच चिवट मोदक खायला लागले नाहीत. :)

तळ्लेल्या मोदकांमध्ये जर ओल्या नारळाचे सारण टाकले तर मोदक चविष्ट होतात. गुळ,खसखस, ओले नारळ,वेलची, काजू,बदामाचे तुकडे,खवा परतुन घ्यावे, व मोदकात सारण भरावे.

तळलेले मोदक छान दिसताहेत. मला उकडीचे आणि तळलेले दोन्ही प्रकार आवडतात. ज्यांच्याकडे पाच दिवस किंवा १० दिवस असे बप्पा असतात त्यावेळेस आरास मांडताना फराळाच्या पदार्थांबरोबर तळणीचेच मोदक लागतात.

वाह मस्त पा़कृ. घरी दिड दिवसाचा गणपती असल्याने मातोश्रींनी कालच तळलेले मोदक आणि डाळ असा मेनु केलेला होता :) फोटु चढवता आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ;) फक्त फोटु थोडे अजुन मोठे पाहिजे होते.

च्छ्या:! पाकृमधलं आपल्याला काही कळत नाही. खायला बोलावत असाल तर सांगा. :) अवांतरः लै वेळा शिर्षक वाचलं, पण आज डोकंच जागेवर नाहीये बहुतेक...दरवेळी 'तळलेले बदक' असंच का वाचतोय मी?

In reply to by धमाल मुलगा

कोण रे तो तिकडे म्हणतोय की धमालराव नुकतेच बदकाच्या शिकारीवरुन परत आलेत!

In reply to by टिउ

तेव्हढा 'बदकाच्या' हा शब्द सपष्टपणॅ ठळ्ळक लिहिला असता तर कुणी फाशी दिलं असतं का रे टिऊल्या बाऊल्या? आता पब्लिक येतंय आमच्या धोतराला फटाके बांधायला. :(

In reply to by धमाल मुलगा

ऐन गणपतीत तुला 'तळलेलं बदक' वगैरे आठवतंय?? चीनवरचा एखादा लेख वाचलास की नॅशनल जियॉग्राफिकची डोक्यूमेंटरी बघितलीस चीनवरची?? तुझ्या पाठीत सोंडेनं धपाटा घातला मेल्या!! ;) (छळणारे मोदक)चतुरंग

In reply to by चतुरंग

काय करता, नुसतं गोग्गोड खाऊन खाऊन तोंडालाच काय पण विचारांनाही मिठीच बसल्यासारखं वाटतंय. >>चीनवरचा एखादा लेख वाचलास की नॅशनल जियॉग्राफिकची डोक्यूमेंटरी बघितलीस चीनवरची?? आयला! चीनमध्ये बदकं हादडतात होय? लै भारी लागतं राव बदक. आमच्या एका किरिस्ताव मित्राच्या आईनं खाऊ घातलं होतं एका ख्रिसमसच्यावेळी... >>तुझ्या पाठीत सोंडेनं धपाटा घातला मेल्या!! =)) =)) =)) गंपती बाप्पा फ्रेंचकट दाढी ठेऊन फिरताना कसा दिसेल असा विचार करुन फुटलो ना राव. =)) >>(छळणारे मोक) सुद्दलेकन चुकतंय.... ;)

तळलेले मोदक छानच लागतात. मी परवा सारण तयार करताना खोबरं, सुकामेवा, साखर, दूध मिसळून तुपात भाजून घेतले, मग त्यात मँगो पल्प घालून परत आटवून घेतले. पारी साठी फक्तं रवा दुधामधे भिजवला, आणि मोदल शुद्ध तुपात तळले. मँगोयुक्त सारणाचे तळलेलेल मोदक लै म्हणजे लै भारी लागले! बाप्पा नक्कीच खूश झाले असणार!

@ धमाल मुलगा.. श्रावण संपलाय...मारा कि हात मग बदकावर.... पण बदक आणि तेही तळलेले ?????? :-)