Skip to main content

खानदेशी शेव भाजी

लेखक रश्मि दाते यांनी सोमवार, 20/09/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गावाहुन येता येता वाटेत जळगाव लागले चहा करीता थांबलो तर मस्त भाजीची शेव दिसली म्हंटल चला घेउन जाउ शेव घरी आज भाजी केली होती तर वाटल डकवु या मि पा वर शेव भाजी साहित्य: कांदे २+१ सुके खोब्रे ५० ग्राम खसखस २ चमचे धणे २ चमचे जीरे १ चमचा शेंगदाणे मुठभर तीळ २ चमचे लवंग ४ काळे मीरे ६-७ लाल तिखट २_३ चमचे हळद १ चमचा मिठ चवीनुसार लसुण ५_६ पाकळ्या आलं १/२ इन्च कोथिंबीर मुठ्भर तेल १/४ वाटी पाणी गरजेनुसार शेव २५० ग्राम सोबत भाकरी,कांदा आणी लिंबु हवेच आणी तिखट सहन होत नसल्यास ताक किंवा दह्याची वाटी मस्ट २ कांदे आणी खोबरे आचेवर खरपुस भाजुन घ्यावे खसखस,जीरे,धणे,लवंग,मीरे,तीळ,दाणे सर्व कोरडे भाजुन घ्या भाजलेले सर्व साहीत्य मीक्सर वर वाटुन घ्या १ कांदा आणी कोथींबीर बारीक चीरुन घ्या तेल तापवत थेवा बारीक चीरलेला कंद आणी थोडीशी कोथींबीर फ़ोडणी ला घाला गुलाबी होऊ द्या वाटण घाला आणी तेल सुटे पर्यन्त भाजा तिखट हळद घाला २ मी परता पाणी घाला आणी २-३ दणदणीत उकळ्या काढा मग मंद आचेवर १० मी उकळा वाढताना आधी वाटीत शेव घेउन वरुन रसा घालावा वरुन कोथींबीर पेरावी गरमा गरम शेव भाजी भाकरी सोबत खायला तयार

वाचने 9822
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

फोटो???? पण भाजी आमची अंमळ आवडती असल्याने पाकृ शेफ आहे, गच्चीवर वाळत टाकलेली नाही. ;) तरी फोटोशिवाय पाकृंना मजा नाही. हे मी या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो!

In reply to by सहज

माझ्या आठवणी प्रमाणे बहुदा बिका काकाने पण फोटुसकट ही पाकृ टाकली होती मागे एकदा. लिंकाळ्यांनो लिंक द्या रे. :) मिपाच सर्च काय कामाच नाय बा (किंवा मलाच ते वापरायची पद्धत माहित नाही.)

In reply to by गणपा

गणपाशेट, >>मिपाच सर्च काय कामाच नाय बा (किंवा मलाच ते वापरायची पद्धत माहित नाही. गुगल मधे मराठीत धाग्याचे नाव + मिसळपाव असे टाकल्यास पहिलिच लिंक तुम्हाला हव्या त्या धाग्यावर नेऊन ठेवते. खुप वेळा अनुभव घेतला आहे. :)

In reply to by सहज

धाग्याचे शिर्षक वाचल्या वाचल्या आधी दिपालीतैच्या पाकृचीच आठवण झाली. तिची पाकृ आली आणि लगेच २/३ दिवसांनी आमचा 'अपाचे कट्टा' झाला आणि त्यादिवशी अगदी लक्षात ठेवुन शेवभाजी खाउन बघितली होती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>तिची पाकृ आली आणि लगेच २/३ दिवसांनी आमचा 'अपाचे कट्टा' झाला आणि त्यादिवशी अगदी लक्षात ठेवुन शेवभाजी खाउन बघितली होती. शिवाजीनगर ला.. रात्री १ वाजता. :D

पाकक्रुती छानच आहे पण रश्मीताई ही शेव कशी असते? कारण शेवेचे खूपच प्रकार आहेत म्हणून विचारते आहे. क्रूपया कळवाल का?

भाजीची शेव ही वेगळी असते,फरसाणाच्या दुकानात भाजीकरीता शेव मागावी,आणी घरी करणार असाल तर मोहन न घालता शेव पाडावि,जरा कड्क असावी म्हणजे वीरघळत नाही रश्यात टाकल्यावर फोटो आहे हो पण आम्ही पड्लो माथ त्यामुळे चिकटवता आला नाही कुणी चिकटवुन देत असेल तर mail id dya पाटवते मी

छान. करुन पाहिली पाहिजे ही भाजी आता. मेघवेडा, दहीबुत्ती म्हणजे दहीभातच त्याला फोडणी दिलेली असते फक्त.

मला भारी आवडते शेवेची भाजी.. दिपालीने केलेली शेवेची भाजी आठवली.. आता लवकरच केलीच पाहिजे . स्वाती

रश्मी ताई तोन्दाला पाणी सुटले !! पण आले लसुण ?????????? फक्त सगळे देतात म्हणुन दिले का?

कशाला आठवण करून देता ताई अगदी मुंबईत आमच्या घरी बनते हो हि बाकी खानदेश अन्याय झाला किंवा राजकारणात जास्त नसतो.खा आणि खाऊ घाला हीच शिकवण बाकी मुंबईत सामंत डेअरी चे दुध लोणी चक्क अस्सल चाळीसगाव