Skip to main content

दहीबुत्ती

लेखक मितान यांनी सोमवार, 20/09/2010 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते ! अशी ही माझी आवडती दहीबुत्ती- सामग्री : - भात दही फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप. कृती: १ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा. थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे. फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालावी. थोडी तिखट चव हवी असल्यास फोडणीसाठी गरम केलेल्या तेलात वाळलेली लाल मिर्ची किंवा तळणी मिर्ची तळून घावी. ती कुस्करून भातात घालावी. हा भात थोडावेळ फ्रीजमध्ये थंड होऊ द्यावा. जास्त छान लागतो. :) Dahibhat फक्त हेच जेवण असेल तर मी यात किसलेली काकडी पण मिसळते. आणि पाहुण्यांसाठी असेल तर कोथिंबीरी सोबत डाळिंबाचे दाणे पेरून सजवते. काल कोथिंबीर आणि डाळिंब घरात नव्हते म्हणून साधाच केला. त्याचा फोटो तुमच्यासाठी.. :)

वाचने 9186
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

च्यायल्ला! दहीबुत्तीसाठी आपण खूनपण करायला तयार है. :) मी तर बुवा त्या फोडणीत थोडे शेंगदाणेही घालतो. मस्त लागतात. अवांतरः दहीबुत्तीसोबत घोंगुरा पिक्कल खाऊन पाहणे. नाय तिच्यायला समाधी लागली तर सांगा. :)

In reply to by धमाल मुलगा

एकदम बरोबर! शेंगदाणे घालून फार छान लागतं. बाकी फोटो जबरा आहे. तों.पा.सु.आ.

रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते
हा त्या रावण पिठल्याचा, झणझणीत मिसळीचा/शेवभाजीचा घोर अपनाम आहे असे मी मानतो. तिखट खाता येत नाही तर त्या वाटे जाऊ नये ;) हां असा दहीभात नुसता आणुन द्या पातेलभर हाणु आपण. :D बाकी फोटो आणि पाकृ १०० पैकी १००. :)

In reply to by गणपा

>>>हा त्या रावण पिठल्याचा, झणझणीत मिसळीचा/शेवभाजीचा घोर अपनाम आहे असे मी मानतो. तिखट खाता येत नाही तर त्या वाटे जाऊ नये संदर्भासह स्पष्टीकरण द्या ! (तिखटखाऊ) मितान

आम्ही यात मेतकूट घालतो व फ़ोडणीसाठी तळणीची मिरची वापरतो..व्वा काय लागतो हा दही-भात, आम्ही दही-भात म्हणतो याला...

बरं झालं जेवण झाल्यावरच धागा उघडायचा निर्णय अंबळ बरोबर ठरला! ;) (दहीबुत्तीप्रेमी)रंगान्ना मिरजकर

सुरेख दिसतोय आणि लागेल पण... फोडणीत लसुण असेल तर आणखीच मस्त..

मलाहि खुप आवडतो दहिभात्,पण शेव भाजी सोबत साघा भातच हवा रश्याबरोबर ओरपायला,हवेतर नंतर ग्लास ग्लास ताक प्यावे तिख्ट झेपत नसेल तर

मस्त ! गार पाक्रु पण रश्मी ताईशी सहमत ! "साघा भातच हवा रश्श्याबरोबर ओरपायला,हवेतर नंतर ग्लास ग्लास ताक प्यावे "

व्वा! दहिभात्/दहिबुत्ती काही म्हणा! असं काही सुंदर खाणं समोर दिसलं की एकदम कडकडून भूक लागते. मितान, भगवंतास्टीक!!

मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध असे सुंदर धागे वाचनखुण म्हणून साठवता येत नाही अजुन म्हणून

In reply to by सहज

असा धाग्यांवर निषेध करण मिपाच्या धोरणात बसत का ;) मान्य आहे तुम्ही ही मागणी तांत्रिक समीतीकडे आधीच धा वेळा नोंदवली असेल पण म्हणुन इतका त्रागा :)

काल केलेल , दुपारी गणपती पाहुन आल्यावर येताना सोबत दही आणले , व करुन खाले मस्त झालेला सोबत चटणी होती