Skip to main content

मटार चाट

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 26/09/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
From मटार चाट :------ साहित्य:- कोवळे मटार दाणे दोन वाट्या, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा ताजी मिरपूड, एक चमचे चाट मसाला, अर्धा चमचा वाळलेल्या पुदिन्याची पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, दहा-बारा भेळेच्या किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या, एक वाटी दही ( जास्त चालेल), दोन चमचे तेल. कृती : मिरच्या उभ्या चिराव्या. पातेल्यात तेल तापवावे. त्यावर जिरे व मिरच्या घालून धुतलेले मटारदाणे फोडणीस टाकावेत. अर्धी वाटी गरम पाणी घालून वर पाण्याचे झाकण ठेवावे. उकळी आल्यावर आंच मंद ठेवावी. सुमारे दहा मिनिटांनंतर मटार शिजतील त्यात मीठ व जरून वाटल्यास झाकणीवरचे गरम पाणी घालावे. खाली उतरवुन मिरपूड, पुदिनापूड व चाट मसाला घालून ढवळावे. गार झाल्यानंतर वाढावच्या भांड्यात काढून ठेवावे. दह्यात पाणी व घालता नुसतेच घुसळावे किंवा चमच्याने फेसावे. हे दही भाजीवर घालावे. कोथिंबीर वरून शिवरावी. खायला देताना पुऱ्या कुस्करून वरून घालाव्या व द्यावे.

वाचने 5146
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्त दिसतेय चाट!!! फोटो जरा मोठे काढ्त चला.. तुमच्या पिकासा अल्बमवर जाऊन पाहिले, तिथेही तो छोटाच आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

थंडी झाली रे फोटुला! पाकृ झ्याक एकदम! मस्त सोपे व झटपट क्याटेगरीत!