Skip to main content

कडधान्यांचे धिरडे -------------

लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 27/09/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :--सर्व प्रकारची कडधान्ये (मूग, मटकी, चवळी, हुलगा, मसुर, हरबरे, प्रत्येकी दोनशे ग्रॆम,व तांदूळ एक पावशेर, उडीद डाळ अर्धा पावशेर, जिरे अर्धा वाटी, धने अर्धा वाटी... हे थोडेसे गरम करुन दळून आणावे.टॊमॆटो सॊस, साजूक तूप, तेल, मीठ-मिरची पावडर चवीप्रमाणॆ. कॄती :- दळून आणलेले पिठ दोन वाट्या,मिरची पावडर मिठ चवीप्रमाणे घालून पिठ सरसरीत भिजवावे,
From माधुर्य
निर्लेप तव्यावर थोडेसेच तेल पसरवून धिरडे घालावे...कडेने थोडे तेल सोडावे.
From माधुर्य
दोन-चार मिनिटांनी उलटावे
From माधुर्य
चांगले भाजू द्यावे.
From माधुर्य
गरम गरम धिरडे , साजूक तूप व सॊस बरोबर खायला द्यावे. ह्यात सर्व कडधान्ये असल्याने हे अतिशय रुचकर लागते.

वाचने 7520
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

निवेदिता ताई, धिरडे खुपच पौष्टीक आहेत ह्यात शंकाच नाही... फक्त एक अवांतर प्रश्न की ह्यात टमाट्याचे तुकडे घातले तर चालतील का? - पिंगू

In reply to by पिंगू

चालेल, टोमॅटो चालेल, बारिक चिरुन कांदा, कोथिंबीर मिरची तुकडे घातलेत तरी चालेल.

शॉल्लेट !! प्लिज मला कुणीतरी हे गोल आकाराचे (निदान गोल सारखे दिसणारे) धिरडे / डोसा तव्यावर कसा टाकायचा ह्याचा सोपा उपाय सांगेल का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

उपायः १) हे पीठ साधारण घट्ट भिजवून पेल्याने पॅनवर मध्यभागी ओतून त्या पेल्याच्या बुडाने बाहेरच्या दिशेने गोलाकार पसरवा. २) पीठ पातळ भिजवा आणि पॅनवर ओतून पॅन अशा तर्‍हेने फिरवा की ते पॅनभर पसरेल.

In reply to by रेवती

(जिज्ञासू)बेसनलाडू धिरडी बाकी छान + पौष्टिक! (तंदुरुस्त)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

तो आयटी मधला नॉन आयटी आहे... पण खरा प्रश्न हा आहे की परा तु आय टी बायको करणारेस की नॉन आय-टी... :D

In reply to by दिपाली पाटिल

मला आत्महत्येला प्रवृत्त करणार नाही अशी बायको चालेल.

मस्तच .... पण एक शंका.... पीठ भिजत घालण्या पेक्षा डाळी भिजवून मग दळून पण धिरडी करता येतात का? माझी आजी मुगाचे धिरडे डाळ भिजून करते म्हणून विचारलं....

In reply to by अनामिक

अनामिक.........अवांतर - तवा बदला हो निवेदिता-ताई. (ह. घ्या) तुच एक नवा निर्लेप तवा दे पाठ्वून.............हा हा हा . लय भारी.

खुप छान पाकक्रुती...... हे पीठ तयार करुन ठेवल्यास आयत्या वेळी धीरडे करता येतील.....कडधान्य भीजवुन करण्यासाठी पुर्वतयारी लागते...... पीठाचे धीरडे लगेच करता येतिल..... मस्त पाकक्रुती..... :)

तर काय बनवता येत नाहीत. पण कालच डब्यात आले होते मेसमधुन. अगदी असेच होते अन चविलाही मस्त होते.