जे न देखे रवी...

फक्त ती सुखात राहायला हवी...

Primary tabs

त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?

मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला

अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला

थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला

अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी

(बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर आलेला...)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर

छान कविता आहे.
जगाच्या पाठीवर शोधून शेवटी मिपावर आलात.
इथे तरी ती भेटो तुम्हाला.

अरूण मनोहर

वेदश्री

एकदम खत्तरी कविता. खूपच आवडली. धन्यवाद.

शितल

सु॑दर काव्य रचना आणिखी त्यातील आशयही एकदम हळवा.

विसोबा खेचर

अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी

धत तेरीकी! हा तर साला घाबरटपणा झाला :)

ती सुखी रहायला हवी वगैरे सगळं ठीक आहे, परंतु तिला विचारायला काय हरकत आहे?

च्यामारी फार फार तर नाही म्हणेल! नशीब तिचं! दुसरं काय? मग 'ती जगात कुठेही राहो, सुखी रहायला हवी बापडी!' असं म्हणावं! :))

असो, सतिशराव बर्‍या‍च दिवसांनी आपलं पुन्हा एकदा मिपावर स्वागत. कविता छान आहे.. :)

आपलाच,
(नकार पचवण्याची हिंमत असलेला!) तात्या. :)

शुचि

=D> =D> =D>

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

(बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर आलेला...)

स्वागत

<:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P